✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जेव्हा माणूस आणि जगातले सर्वात मोठे विमान बरोबरीने उडतात...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Fri, 11/06/2015 - 15:30  ·  लेख
लेख
ही काल्पनिक शस्त्रिय कथा नाही... बॅटमन, सुपरमॅन किंवा क्रिशची कथाही नाही... वेस रॉस्सी (Yves Rossy) व व्हिन्सेंट रेफे (Vincent Reffet) या दोन अफाट माणसांनी जेटमॅन विंग्ज (Jetman wings) नावाचे उपकरण वापरून एमिरेट्स कंपनीच्या A380 या जगातील सर्वात मोठ्या अजस्त्र दुमजली व्यापारी विमानाच्या बाजूने, जमिनीपासून ४००० फुटांवरून उड्डाण करून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. हे जगावेगळे अचाट साहस यशस्वीपणे करण्यामागे अनेक तंत्रज्ञांनी अत्यंत मेहनतीने केलेले किचकट व्यवस्थापन होते हे सांगायला नकोच. या साहसाबद्दल एमेरिट्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍याने काढलेले उद्गार रोचक आहेत... "This display between man and machine celebrates the magic and beauty of flight, a feat which just over a hundred years ago would have seemed an impossible dream. It also showcases how far human vision and ambition has, and can continue to push aviation's boundaries," : Adel Al Redha, executive vice-president and chief operations officer या साहसाचे चलत्चित्र... .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
विज्ञान
क्रीडा
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8170 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

रोमांचक

भुमन्यु
Fri, 11/06/2015 - 15:36 नवीन
रोमांचक... बघुन शहारे आले!! दाद त्यांच्या कामगिरिला
  • Log in or register to post comments

+++१११ अगदी असेच म्हणतो

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/06/2015 - 16:32 नवीन
+++१११ अगदी असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

अविश्वसनीय !

अरुण मनोहर
Fri, 11/06/2015 - 15:41 नवीन
अविश्वसनीय !
  • Log in or register to post comments

मला ही एक भानगड समजली नाही.

आदूबाळ
Fri, 11/06/2015 - 15:48 नवीन
मला ही एक भानगड समजली नाही. एखाद्या वेगाने एका दिशेने जाणार्‍या वस्तूच्या जवळ त्यापेक्षा कमी वस्तुमानाची वस्तू गेली की कमी वस्तुमानाची वस्तू त्याच दिशेला ओढली जाते. (याला बहुतेक स्लिपस्ट्रीम म्हणतात.) मोदकने आपल्या सायकलच्या लेखात याचा उल्लेख केला होता. असं इथे का झालं नाही?
  • Log in or register to post comments

असाच प्रश्न मलाही पडलाय.

एस
Fri, 11/06/2015 - 16:22 नवीन
असाच प्रश्न मलाही पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सेम हीअर...

संदीप डांगे
Fri, 11/06/2015 - 16:24 नवीन
सेम हीअर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अभ्यास नाही आणि विषयही नाही

बोका-ए-आझम
Fri, 11/06/2015 - 18:04 नवीन
पण कदाचित हे दोघं जण त्या विमानाच्या वेगापेक्षा जरा जास्त वेगाने गेले असतील म्हणून असं झालं नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

स्लिपस्ट्रीम

शब्दबम्बाळ
Mon, 11/09/2015 - 14:28 नवीन
स्लिपस्ट्रीम, यालाच Draafting असेही म्हणतात. हे खर तर गुरुत्वाकर्षण जसे काम करते तसे करत नाही. म्हणजे वस्तूला ओढून घेणे वगैरे. जेव्हा एखादी वस्तू पाणी किंवा हवा अशा माध्यमातून प्रवास करत असते तेव्हा ती या माध्यमाला बाजूला सारून पुढे जात असते. होडी पाण्यातून जाताना आपण बाजूला होणारा पाण्याचा प्रवाह पाहू शकतो. आता तेवढा वस्तूचा आकार मोठा तेवढ जास्त पाणी किंवा हवा बाजूला सरली जाणार. यामुळे एक प्रवाह तयार होऊन त्या वस्तूच्या मागच्या भागात हवेचा विरोध खूप कमी होतो. म्हणजेच त्या वस्तूच्या पाठीमागे एखादी दुसरी वस्तू जात असेल तर तिला खूप कमी अवरोध होतो आणि ती वस्तू कमी बल जाउन जास्त गती प्राप्त करू शकते. म्हणजे जर ट्रक सारखे मोठे वाहन चालले असेल आणि एखादी सायकल हि त्याच्या जवळपास असेल तर जेव्हा ती सायकल ट्रक ने निर्माण केलेल्या कमी अवरोधाच्या क्षेत्रात येते तेव्हा पूर्वी इतकेच बल लावूनही अचानक गती मध्ये मोठी वाढ होते. यामुळे "ओढल्यासारखी" अवस्था निर्माण होते. पण शक्यतो जास्त वेगाने जाणार्या वाहनांना एरो डायनामिक पद्धतीने बनवले जाते कि जेणे करून त्यांना हवेचा अवरोध कमी व्हावा. याचमुळे या वाहनामुळे होणारा स्लिपस्ट्रीम कमी असतो. या सिद्धांताचा वापर भविष्यातील ट्रक्स मध्ये केला जाऊ शकेल जे स्वयंचलित असतील. ते एकमेकांच्या जवळून प्रवास करू शकतील आणि हवेचा कमी अवरोध होऊन जवळपास ४०% पर्यंत इंधन बचत करू शकतील!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हैला

सुमीत भातखंडे
Fri, 11/06/2015 - 15:49 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

वाह! रोमांचक!!

शिव कन्या
Fri, 11/06/2015 - 15:57 नवीन
वाह! रोमांचक!!
  • Log in or register to post comments

दुबै २०२० ची याड.

संदीप डांगे
Fri, 11/06/2015 - 16:23 नवीन
दुबै २०२० ची याड.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मित्रहो
Fri, 11/06/2015 - 16:32 नवीन
साहस आहे
  • Log in or register to post comments

अधिक माहिती

उदय
Fri, 11/06/2015 - 19:02 नवीन
वेस रॉस्सी (Yves Rossy) हा जेटमॅन नावाने ओळखला जातो. हा आधी स्विस एअरलाईनमध्ये A320 चा पायलट होता. हवेत उडण्यासाठी त्याने बरीच वर्षे प्रयत्न केले. सुरुवात ग्लायडिंगपासून केली, मग स्वतःच पंख तयार केले आणि ते हळूहळू सुधारत नेले. सध्या तो कार्बन फायबरचे पंख आणि त्याला लावलेली ४ जेट इंजिन यांच्या सहाय्याने हवेत पक्षासारखा उडतो. पंख साधारणपणे दोन मीटर (~६.५ फूट) पसरलेले आहेत आणि जेट फ्युएलसकट वजन साधरणतः ५५ किलो (~१२० पौंड) होते. इतके वजन असल्याने हेलिकॉप्टरने वर जावे लागते आणि मग उड्डाण करता येते. जमिनीवर येताना पॅरॅशुट वापरावे लागते. सध्यातरी ही अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचा प्रकार दिसतोय (म्हणजे फक्त एक्स्पर्टलाच शक्य आहे, सामान्य व्यक्तीला नाही) पण पुढेमागे या प्रकारात अधिक प्रगती नक्कीच होऊ शकेल, कदाचित प्रत्येकालाच असे उडता येईल. अजून माहितीसाठी हा व्हिडिओ बघा.
  • Log in or register to post comments

आयला हे तर जंक्षानच काम झालं

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 19:04 नवीन
आयला हे तर जंक्षानच काम झालं की वो. अता आयर्न मॅनसारखे उडणे एकदम शक्यतेच्या कोटीत आले.
  • Log in or register to post comments

आणि क्विडिच खेळणं पण!

आदूबाळ
Fri, 11/06/2015 - 19:28 नवीन
आणि क्विडिच खेळणं पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

इंडीड! अता याचप्रमाणे एखादे

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 19:37 नवीन
इंडीड! अता याचप्रमाणे एखादे नाझगुल बनवा राव कोणीतरी...लय मज्या येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

माय गॉड!!!! साहसी शब्द कमी

पियुशा
Fri, 11/06/2015 - 19:22 नवीन
माय गॉड!!!! साहसी शब्द कमी पड़तोय कौतुक कारायला
  • Log in or register to post comments

तो व्हिडीओ काल बघताना ते दोघं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 11/06/2015 - 20:14 नवीन
तो व्हिडीओ काल बघताना ते दोघं आता इंजिनात खेचले जातात का काय अशी भिती वाटत होती.
  • Log in or register to post comments

रोमांचक धाडस

कविता१९७८
Fri, 11/06/2015 - 22:40 नवीन
रोमांचक धाडस
  • Log in or register to post comments

बापरे!

पैसा
Sat, 11/07/2015 - 13:08 नवीन
थरारक प्रयोग!
  • Log in or register to post comments

सही!

रातराणी
Sat, 11/07/2015 - 13:28 नवीन
सही!
  • Log in or register to post comments

सॉलिड्ड!

स्वाती दिनेश
Sat, 11/07/2015 - 14:22 नवीन
एकदम थरारक प्रकार! स्वाती
  • Log in or register to post comments

जबहर्या

नाखु
Sat, 11/07/2015 - 14:41 नवीन
थरारक चित्रफीत.
जाहीर स्वगत :जहाल हवाई प्रेमींना पुण्यातील वाहतूक समस्येवर उपाय सापडला !
  • Log in or register to post comments

Yves = ईव्ह

अमेरिकन त्रिशंकू
Sat, 11/07/2015 - 17:53 नवीन
Yves = ईव्ह
  • Log in or register to post comments

अफाट आहे हे

एक एकटा एकटाच
Sat, 11/07/2015 - 19:30 नवीन
अफाट आहे हे
  • Log in or register to post comments

थरारक,

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 11/09/2015 - 09:36 नवीन
थरारक प्रकार असला तरी अत्यंत धोकादायक. असे उडते प्रवासी रडारवर पकडले जाऊ शकतात का? नाहितर कसाब जसा समुद्रातुन आला, तसा एखादा कसाब उडत उडत यायचा, आणि कदाचित परतही जाऊ शकेल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आतंकवादी प्रोसेस ओरीयंटेड

संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 15:36 नवीन
आतंकवादी प्रोसेस ओरीयंटेड नसून रीझल्ट ओरियंटेड असतात. त्यामुळे 'उडून येणे-परत जाणे' ह्या उद्देशासाठी एवढी रिस्क घेणार नाहीत. इतर सोपे मार्ग हजारो आहेत भारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा