Skip to main content

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?

लेखक यनावाला यांनी सोमवार, 26/10/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला] विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥ बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥ अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥ असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥ विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥ विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥ वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥ प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥ अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥ आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥ वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥ समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥ अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥ असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥ कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥ प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥ अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्‍या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥ तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥ वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥ आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥ वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥ आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥ "जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥ आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥ अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥ ******************************************************************************************************

वाचने 63289
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

आणि तरीही हिंदुविरोधी इंग्रजांचे पाय चेपायला गामा लंडनला गेलेत बरं का !

In reply to by मोगा

काहीही हं मोगा. मी इंग्लंडला हिंदुत्वाची ध्वजा उंच धरायला आलो आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by यनावाला

आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या दृष्टिकोनातून बघतो यावर बरेच अवलंबून असते. विज्ञानामुळे माणसाची आश्चर्यकारक प्रगती झाली. जीवन अधिक सुख-सुविधापूर्ण झाले. कोट्यवधींचे दु:ख कमी झाले. अनेकांचे अकाली होणारे मृत्यू टळले. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या प्राथमिक गरजा बर्‍याच प्रमाणात पुर्‍या होऊ शकल्या. मनोरंजनाची दालने घरा घरात पोचली. हे सर्व विज्ञानामुळे घडले. यात अध्यात्माचे योगदान शून्य आहे. विज्ञानामुळे प्रगती झाली की अधोगती हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. "माझे सुखात चालले आहे ना?" एवढाच प्रश्न असेल तर त्यास विज्ञान लागत नाही. विज्ञानाच्या एक एका सुखसोयीमागे लपलेल्या एक एक दुखदायी वास्तवांना दुर्लक्षित करणे हे कितपत योग्य? कोट्यावधींचे दु:ख कमी झाले हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकाल? दु:ख कमी झाले नसून बदलले आहे. अकाली होणारे मृत्यू टळले तर लोकसंख्या भरमसाठ वाढली. तिच्या सगळ्या गरजा भरमसाठ वाढल्या, त्या पूर्ण करता करता नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड ताण आला आहे. एक उपाय शोधता त्यावर आ वासून दुसरे प्रश्न उभे राहत आहेत. आजचे ग्राउंडब्रेकींग सोल्युशन्स उद्यासाठी खरंच ग्राउंडब्रेकींग असतील. उदा: सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स. प्रचंड प्रमाणात जमिनित जात आहेत. खाद्यपिकांसाठी उद्या ही एक गंभीर समस्या असणार आहे. महिलांना, मुलांना आज सोयीचे आहे पण पुढ्च्या पिढ्यांसाठी आपण एक मोठे डंपिंग ग्राउंड सोडून जाणार आहोत याबद्दल डायपरचा शोध लावण्याअगोदर विज्ञानाने काय विचार केला? "अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्‍यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संत -महात्म्यापेक्षा अधिक मोठा वाटतो." माझी चप्पल शिवून देणारा चांभार मला डोईचे केस भादरनार्‍या न्हाव्यापेक्षा मोठा वाटतो. प्रत्येकाचं आपलं एक स्थान, महात्म्य असतं. उगा बैलाने दूध दिलं असतं तर किती बरं झालं असतं असं म्हणायला काय लागतं. पु.ल.नीं व्यक्त केलेल्या या अपेक्षा अध्यात्माच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण समाजावर शतकानुशतके प्रभुत्व गाजवणारे अध्यात्म, हिंदुधर्माला कलंकभूत ठरलेले चातुर्वर्ण्य संपवू शकले नाही. असेच आधु-संतही ते नष्ट करू शकले नाहीत. ते संपवले प्रजासत्ताक भारताच्या संविधानाने. बैलानं दूध द्यावं ह्या अपेक्षा बैलाच्या आवाक्याबाहेरच असणार. तुमचे वरील विधान म्हणजे चमत्कारिक स्वमतांधतेचा उत्कृष्ठ नमुना आहे. आपलं मत पटवण्यासाठी भारदस्त वाटेल असं काहीही ठोकून द्यावं? समाजावर अध्यात्माने कधीच प्रभुत्व गाजवलेले नाही. प्रभुत्व गाजवले ते अवडंबर करणार्‍यांनी, खोटे बोलणार्‍यांनी, जनतेला उल्लू बनवणार्‍यांनी. अध्यात्म म्हणजे पुजा-कर्मकांडं हेच सर्व समाजाचे मत बनवले, (तुमचेही तसेच झाले आहे.) हिंदूधर्माला कलंकभूत ठरणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था लादली माणसांनीच, पाळली माणसांनीच. भारतीय संविधानही बनवले माणसांनीच, राबवले माणसांनीच. आकाशातून तर नाही पडले की कुठल्या प्रयोगशाळेत तयार झाले. चातुर्वर्ण्य म्हणा की आणखी काही वर्गाधिष्ठित समाज असणे ही समाजाची स्वत:ची मानसिकता आहे. विज्ञानाचे डंके वाजवणार्‍या, मी मी म्हणणार्‍या पाश्चात्त्य देशांमधेही वर्णभेद कसा पाळला जातो हे आपणांस जास्त ठावूक असावे. तस्मात् माणसे जिथून तिथून सारखीच असतात. हा देश तमाशाने बिघडला नाही की किर्तनाने सुधारला नाही. साधारणपणे इ.स.५०० पासून बहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे पाठ फिरविली. परलोकाचा ध्यास घेतला. समृद्धतेतूनच वैराग्य जन्माला येतं. भारतीय समाजाने गुप्तकाळात ऐहिकसुखाची परमावधी गाठली. सर्व मिळाल्यावर पुढे अजून काही तरी मिळवायचे राहते आहे, संपूर्ण समाधान मिळत नाही. संपूर्ण समाधान हे अध्यात्मातच आहे याचा शोध लागल्यावर ऐहिकाकडे पाठ फिरवणे सूरू झाले असेल. स्वघोषित बाबा बुवांनी परलोकाचा ध्यास वैगेरे व्याकूळ जनतेच्या गळी उतरवले. इहलोक (हे जग) अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे, किंबहुना खोटे आहे, जे काही खरे, चिरंतन आनंदमय आहे ते सगळे तिकडे, परलोकी. असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, प्रवचने, यांमुळे जनसामान्यांच्या मनात दृढ झाला. बुद्धिमंतांचे डोळे तर तिकडेच लागलेले. कारण इहलोक भ्रामक. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान. अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, ऊर्जा, वेळ आणि पैसा या गोष्टी वाया गेल्या. आपणास खरेच अध्यात्माबद्दल कणभरही माहित नाही हे वरील विधानावरून स्पष्ट होते. पोथ्या-पुराणांमधली वर्णने म्हणजे अध्यात्म असे जर वाटत असेल तर खरंच अभ्यास वाढवा. इहलोक अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे म्हणजे नक्की काय याचा अर्थ शोधा. इथेच राहून इहलोकात गुंतून न पडणे म्हणजेच परलोक सिद्ध करने, चिरंतन आनंद इथेच याच आयुष्यात मिळवता येतो हे जनतेस कधीच समजले नाही. चुकीच्या मार्गदर्शनाचे फळ अजून काय? अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, उर्जा वेळ आणि पैसा वाया जातो ह्या गोष्टी विज्ञान विज्ञान चा जप करणार्‍या पाश्चात्त्य देशांना बहुधा कळल्या नाहीत. भारतातले अनेक अध्यात्मिक गुरु तिकडे जाउन प्रसिद्ध झालेत ते... कधी विचार करा असे का झाले. जिथे सर्व सुखं पायाशी लोळण घेतात, आयुष्यात आता काहीच मिळवायचे शिल्लक राहिले नाही तरी मनाची अशांतता दूर होत नाही. तिथे विज्ञान माघार घेतं आणि अध्यात्मच मदतीस येतं. अभागी, गरिब, भौतिक विवंचनेत अडकलेल्या मनुष्यास अध्यात्म वापरताच येत नाही. तो टाळ कुटत बसतो, प्रभुच्या कृपेची वाट पाहत. त्याला प्रभूची कृपा हवी असते दोन वेळेची भुक भागवायला, बायकोला मूल व्हायला, आईची गुडघे दुखी दूर व्हायला, बहिणीला सासरी नीट वागणूक मिळायला. पण अध्यात्म ह्यासाठी नाही हे कुणीच त्या खुळ्याला सांगत नाही. अध्यात्म ह्या सगळ्या कचाट्यातून बाहेर निघण्यासाठी आहे. या अध्यात्मामुळे कोणता लाभ झाला? शेत नांगरण्याची पद्धत , बी बियाणे यांत काही सुधारणा झाली? धान्य उत्पादन वाढले? दळणा-कांडणाची सुलभ रीत शोधून आध्यात्मिकांनी स्त्रियांचे कष्ट कमी केले?( नांगर आणि जाते या साधनांत महाभारत काळापासून पेशवाईपर्यंत कांही सुधारणा झाली नाही असे अभ्यासक सांगतात.) वाहतुकीची साधने वाढून प्रवास सुखकर झाला? रात्रीचा अंधार दूर झाला? परत तेच. बैलाकडून दूधाची अपेक्षा. अध्यात्माने काय साधले ते तरी सांगावे! नीतिमत्ता वाढली म्हणता? मग भ्रष्टाचार, व्यभिचार, बालिकावरील अत्याचार यांत भारत देश अग्रगण्य कसा? अध्यात्मामुळे मन:शांती लाभते म्हणावे तर देशात मानसोपचार तज्ञांची संख्या अपुरी पडते आहे. बेछूट गोळीबार...? प्रथमतः एक गोष्ट स्पष्ट करतो यनावालावलकरजी. नीतीमत्ता तर विज्ञानानेही वाढत नाही. निष्पाप व निरागस शहरवासीयांवर दोन दोन अणुबॉम्ब टाकतांना नीतीमत्ता फारच उचंबळून आली होती का? भ्रष्टाचार, व्यभिचार व बालिकांवरील अत्याचार, नीतीमत्ता यात विज्ञानाने नेमके काय काम केले ते तरी सांगा. मानसोपचार तज्ञांची गरज का वाढते आहे त्याचे कारण विज्ञान देईल काय? योग्य पद्धतीने आध्यात्मिक जीवनपद्धती आत्मसात करणार्‍यास मनःशांती लाभतेच. कर्मकांडं वा अवडंबर करणार्‍यास नाही. कितीही गॅजेट्स, कार, मोठे मोठे बंगले बाळगले तरी मनःशांती लाभत नाहीच. आधुनिक विज्ञानाने कितीही उड्या मारल्या तरी मनःशांती देणारं औषध कुठ्ल्याही प्रयोगशाळेत बनणार नाही. तुमचा मूळ मुद्दा, अध्यात्म वर्सेस विज्ञान नसून, प्रयत्नवाद वर्सेस दैववाद हा आहे. हे आपण आधीच स्पष्ट करून घ्यायला पाहिजे होते. विज्ञानाची बाजू मांडतांना तुम्ही गरज नसतांना, माहिती नसतांना अध्यात्मावर चिखलफेक करत आहात हे आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रमाद करत आहोत ह्याबद्दल क्षमस्व. कारण दैववाद म्हणजेच अध्यात्म अशी अगदी चुकीची, अवैज्ञानिक संज्ञा आपण तयार करून अज्ञानी जनतेची दिशाभूल करत आहात. हे आपले वर्तन एका विज्ञानवाद्यास शोभणारे आहे का याबद्दल आत्मचिंतन करावे. आपणास दैववादाचीच चिरफाड करायची असेल तर तीच नीट करावी, न कळणार्‍या प्रांतात घुसखोरी करून उपयोग नाही. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

तुम्ही 'सातच्या आत घरात' सिनेमा पाहिला आहे का? "महाराज.. गाढवापुढे गीता वाचायला माझी काहिच हरकत नाहिए... पण गाढवं जागी हाएत का झोपलेली ते तर बघुन घ्या" - इती मकरंद अनासपुरे. एंजोय :)

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव म्हणतात तसे गाढवं जागी हाएत का झोपलेली ते तर बघुन घ्या हे फार महत्वाचे असल्याने एकुणच किअतपत गांभीर्याने चर्चा करावी याला स्पश्ट मर्यादा आहेत. लिंबु टिंबु ना अर्धराज्य माफ हे विसरु नका. मुलांशी मुल बनुन खेळा...

आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.


In reply to by यनावाला

आधुनिक विज्ञानाला दुषणे देत नाही. कारण या मार्गावरून परत फिरणे मानवाला आता अशक्य आहे. पण एक गोष्ट प्रामाणिक पाने सांगा - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनेक सुख सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी अशा प्रत्येक शोधामुळे पर्यावरणाला अत्यंत घातक दूरगामी परिणाम झालेत त्याची चर्चा विज्ञान उघडपणे करत नाही. आज जगभर जनुकीय तंत्रज्ञानाने बनवलेले अन्न घटक, रसायने आणि रासायनिक खतांपासून होणार्या दुष्परिणामां विषयी जागृती होत आहे. वाहतुकीची साधने, उर्जा निर्मिती, दूर संचार या साधनांनी जरी आज दैनंदिन जीवन व्यापून टाकले असले तरी त्याचे ( साधनांचे आणि त्यांच्या अतिवापराचे) अदृश्य आणि दूरगामी वाईट परिणाम आहेतच हे अमान्य करण्यात हशील नाही ( जरी या गोष्टी सोडून देने आजच्या युगात अशक्य असले तरी). हरित वायू उत्सर्जन, ओझोनथराची हानी, प्रदुषित हवा, पाणी, जमीन यामुळे अन्न घटकात वाढणारे शिसे, पारा, आणि इतक घातक रसायने या हाताबाहेर गेलेल्या गोष्टी नियंत्रणात आणण्यात विज्ञानाला यश येईल? विविध तंत्रज्ञानामुळे, वाढणारा किरणोत्सार मानवाचे भविष्य सुकर करत आहे कि धोकादायक? ( हे फक्त भारतासारख्या प्रगतीशील देश किंवा अप्रगत राष्ट्रांपुर्तेच मर्यादित नाही हे लक्षात घ्या) अजून एक महत्वाची गोष्ट- जरी यामुळे सर्वसामान्यपणे मानवी जीवन सुकर झाले आहे हे मान्य करतांनाच हे सर्व तंत्रज्ञान ( दळणवळण, संरक्षण, दूर संचार, वाहन निर्मिती, अगदी वैद्यक) १००% व्यापार केंद्रित आहे हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तीकडे हे विकत घेण्याची ताकत नाही त्याला यापैकी कशाचाही फायदा पोचणे शक्य नाही. विविध अध्यामिक, धार्मिक संस्था मोफत धर्मादाय शाळा, कोलेज, दवाखाने, अन्नछत्रे चालवितात याची आपण माहिती करून घेतलेली दिसत नाही. मोठमोठे व्यावसायिक दवाखाने आज रुग्णाला दाखल करून घेताना प्रथम रुग्णाच्या आर्थिक परिस्थिती ची खात्री केल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. यात आपल्याला कोणालाच काहीच चुकीचे वाटत नाही. मग विज्ञान अशा व्यक्तीपर्यंत खरच पोचते का ? मानसोपचारांची गरज कशामुळे वाढली आहे? अध्यात्मामुळे कि आणि कशामुळे याचा विचार व्हावा. विज्ञानाची कास जरूर धरावी पण डोळसपणे. एकांगी विचार कधीही धोकादायक आणि विनाशकच .

सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. तेव्हा ते दिसण्याचा प्रश्न नाही. पण मनोभावनांचा आविष्कार दिसतो. भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तो मूर्त आहे. तो अर्थातच दिसतो. बुद्धीसुद्धा अमूर्तच आहे. म्हणून ती प्रत्यक्ष दिसण्याचा प्रश्न नाही.. माणसाच्या विविध कृतींतून त्याची बुद्धी व्यक्त होते.
वालावलकर सर, प्रतिसादासाठी धन्यवाद. म्हणजे मन, बुद्धी भावना या अमुर्थ गोष्टी असतात सिद्ध करता येत नाहीत हाच माझा मुद्दा होता. कोणतेही मूर्त स्वरूप नसतांना, भावना मन बुद्धी आहे किंवा यावर आपला आणि विज्ञानाचा पुर्ण विश्वास आहे आणि ते असण्याची ग्वाही देताना आपण (वैज्ञानिक सिद्धता देत येत नसल्याने ) तर्क लावता ( बुद्धी, भावना कृतीतून व्यक्त होतात). खरेतर तर्क हे तत्वज्ञानाचे अंग आहे पण विज्ञानालाही कधी कधी तर्क, गृहीतके यांचा आधार घ्यावाच लागतो. आणि आपणही त्याला नाकारत नाही याचे करण अगदी सोपे आहे ते म्हणजे स्वानुभव. भावना, बुद्धी, विचार, मन ( व्याख्या काहीही करा) इ. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची महत्वाची अंगे अमूर्त, अदृश्य असली तरी आपण कोणीही त्या नाकारू शकत नाही कारण या गोष्टी अनुभव सिद्ध आहेत. विज्ञान सिद्ध नाहीत. मग जर तत्वज्ञानाने काही अमूर्त गोष्टी तर्काच्या आधारे मांडल्या तर त्या विज्ञान कसोटीवर सिद्ध करा म्हणणे सयुक्तिक होणार नाही. कोणत्याही रासायनिक बदल/ प्रक्रिया/ प्रतिक्रिया शरीरात घडत असल्या तरी जीव ज्यामुळे जिवंत असतो ते चैतन्य ( तुम्ही काहीही नाव द्या) नाकारण्यात मला तरी काहीच अर्थ दिसत नाही. विज्ञानाचे सगळे सिद्धांत आपण वाचतो आणि विश्वास ठेवतो. सगळे सिद्धांत आपण प्रयोगशाळेत सिद्ध करून मग विश्वास ठेवत नाही. त्याच प्रमाणे अध्यात्मिक मनुष्य काही तात्त्विक सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. मग अशा व्यक्तीला अडाणी का म्हणावे? इथे असलेल्या कोणालाही अद्वैत ज्ञान, मुक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही/ नसावे ( किमान मला तरी नाही) पण कोणीतरी हे अनुभव घेतले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जावे लागते. कारण असे अनुभव भौतिक शारीरिक अनुभवांच्या पलीकडचे असतात. जेव्हा तुकाराम महाराज या अद्वैतानुभावाचे वर्णन त्यांच्या अभंगात करतात- अणु रेणूया थोकटा तुका आकाशाएवढा गिळूनी सांडिले कलेवर, भव भ्रमाचा आकार ( माया) सांडूनी त्रिपुटी दीप उजळला घटी, ( अद्वैत) इथे तुकोबारायांनी हे सांगितले त्यावर का विश्वास ठेवावा? याला तर्क आहे कि असे खोटे सांगण्यामागे तुकोबारायांचा काहीच वैयक्तिक स्वार्थ नसावा. ( नाहीच). शेवटी स्वतः तुकाराम बुवाच सांगतात- तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता. ( अवांतर : इथल्या शब्दांची रचना- अणु रेणू सुमारे ४०० वर्षापूर्वी झाली आहे यावर थोडा अभ्यास करायचा आहे कोणी केला असल्यास कृपया माहिती देणे.)

( अवांतर : इथल्या शब्दांची रचना- अणु रेणू सुमारे ४०० वर्षापूर्वी झाली आहे यावर थोडा अभ्यास करायचा आहे कोणी केला असल्यास कृपया माहिती देणे.) मलाही यावर वाचायला आवडेल. माझे मरण पाहिले मी डोळा अशी काहीतरी ओवी आहे त्यांची. या अनुभवालाच बहुतेक बुद्धांनी निर्वाण म्हटले आहे. २५०० वर्षांपूर्वी बुद्धांनी कलापअसा शब्द वापरलाय. तो छोट्यात छोटा कण जो विघटित होत नाही या अर्थाने.

@दत्ताजी जोशी ............ ते म्हणतात
,"विज्ञानाचे सिद्धान्त आपण वाचतो आणि विश्वास ठेवतो. ते प्रयोगशाळेत सिद्ध करून मग विश्वासठेवतो असे नाही."
.... भौतिकी, रसायन, वैद्यक, जीवशास्त्र अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी प्रयत्‍नपूर्वक अनेक निसर्गनियम शोधले. त्यांची सत्यासत्यता ठरविण्याची वैज्ञानिक पद्धत विकसित केली. तदनुसार ते तपासले. अनेक वैज्ञानिकांनी तपासले. त्या नियमांचा संग्रह म्हणजे मानवाचे अर्जित ज्ञानभांडार. अर्जित म्हणजे मिळवलेले, प्राप्त केलेले. सत्याच्या कसोटीला उतरणार्‍या तत्त्वांनाच या भांडारात स्थान मिळते. त्यामुळे हे नियम विश्वासार्ह असतात. त्या आधारे निर्माण केलेले तंत्रज्ञान इच्छित कार्य करतेच असा सार्वत्रिक अनुभव येतो. या ज्ञानभांडारावर कोणाचा एकाधिकार नाही. सर्वांना ते मुक्तपणे उपलब्ध आहे. आपण शाळा-कॉलेजात जे मूलभूत ज्ञान शिकतो ते या भांडारातील असते. खगोलशास्त्राच्या पुस्तकात ग्रहतार्‍यांची माहिती असते. पण त्यांत मंगळाची बाधा, शनीची साडेसाती, गुरुपुष्य योग, कालसर्पयोग इत्यादींचा उल्लेख नसतो. माणसाच्या जीवनावर ग्रह-तार्‍यांचा परिणाम होतो असेही कुठे म्हटलेले नसते. कारण हे ज्ञानाचे विषय नाहीत. शरीरशास्त्राच्या पुस्तकात हृदय, मेंदू, यकृत इ. इंद्रियांची माहिती असते. पण आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, इ.चा उल्लेख नसतो. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी ती प्रत्यक्ष दिसली पाहिजे असे नाही. तिचे जे गुणधर्म वर्णिलेले असतात,परिणाम सांगितलेले असतात त्यांतील एकाचा तरी अनुभव यायला हवा. तो व्यक्तिनिरपेक्ष हवा. तसेच स्थल-काल निरपेक्ष हवा. देव दिसत नाही ठीक आहे. पण तो दयाळू आहे. दीनांचा वाली आहे. संकटकाळी धावून येतो. सज्जनांचे रक्षण करतो. दुर्जनांचे निर्दालन करतो. असे गुणवर्णन आहे. त्यांतील एकाही गुणाचा, कधीही अनुभव येत नाही. म्हणून देव अस्तित्वात नाही असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. गणित, व्याकरण इ.विषय हे मानवाच्या निर्मित ज्ञान संग्रहातील आहेत. तेही आपण शाळा-कॉलेजात शिकतो. यावरून सत्यज्ञान कोणते ते ओळखता येते. अज्ञानाच्या मागे लागणे हितावह नाही.

In reply to by यनावाला

धन्यवाद. :D :D तो दोन बेडकांचा विनोद माहिती आहे का? don 't change the subject वाला? त्याची आठवण आली. असो. दिवाळीच्या अनेक उत्तम शुभेच्छा...!

In reply to by यनावाला

@ दत्ताजी जोशी, जरा समजून घ्या. विषयाला धरूनच लिहिले आहे.तुमची शंका होती
,","विज्ञानाचे सिद्धान्त आपण वाचतो आणि विश्वास ठेवतो. ते प्रयोगशाळेत सिद्ध करून मग विश्वास ठेवतो असे नाही."
.... ..त्यांची सत्यासत्यता ठरविण्याची वैज्ञानिक पद्धत विकसित केली. तदनुसार ते तपासले. अनेक वैज्ञानिकांनी तपासले. त्या नियमांचा संग्रह म्हणजे मानवाचे अर्जित ज्ञानभांडार.आपण शाळा-कॉलेजात जे मूलभूत ज्ञान शिकतो ते या भांडारातील असते.म्हणून त्या वैज्ञानिक नियमांवर विश्वास ठेवणे, ते खरे मानणे योग्य आहे. हे ग्रंथप्रामाण्य नव्हे. सत्यता आधीच पडताळली आहे. असे त्याचे स्पष्टीकरण आहे. नियमांची सत्यता आधीच पडताळलेली असते. कृपया ते प्रतिसादलेखन पुन्हा वाचावे. म्हणजे खुलासा होईल.

In reply to by यनावाला

वालावलकरजी, बुद्धांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत, येशूपासून तुकारामापर्यंत, कबीरापासून नानकजींपर्यंत सर्व दिग्गज मंडळींनी काही प्रयोग करून लिहून ठेवलंय. त्या मार्गाने निष्ठेने जाणार्‍यांनाही तसेच अनुभव येतात. गीता/ज्ञानेश्वरीचे फक्त बडबड पारायण करणार्‍याला ते नाहीच कळणार. तत्सम शाळेत जे विज्ञान शिकवले जाते ते अनेक वैज्ञानिकांनी प्रयोग करून सिद्ध केले आहे. सामान्य माणसांनी केले आहे का? सामान्य माणसाला ते शक्य आहे का? क्रोसिन बनवणे विज्ञानाच्या तत्त्वानुसार शक्य आहे, विमान बनवणे हे विज्ञानाच्या नियमांवर आधारित आहे. विमान वा क्रोसिन बनवण्याचे फक्त पुस्तक वाचून प्रत्येक सामान्य माणुस विमान व क्रोसिन नाही बनवू शकत. त्यासाठी काही मूलभूत गुण लागतात, काही गोष्टींचा सखोल अभ्यास लागतो. अध्यात्म असो वा विज्ञान कुठलीही गोष्ट मिळवायला अभ्यास लागतोच. बाजारात सामान्य माणसासाठी मिळणारे मोबाईल, टीवी, कार इत्यादी गॅजेट्स हे तंत्रज्ञानाचे उत्पादन आहे. हे विशिष्ट लोकांनी व्यवसायासाठी पैसा कमवण्यासाठी सिमित ज्ञान बाजारात उपलब्ध केले आहे. 'ज्याला शक्य आहे तो' ती प्रत्येक गोष्ट स्वतः बनवू शकतो. विज्ञान सगळ्यांसाठी उपलब्ध असले तरी एडिसन वैद्यकशास्त्रातले शोध लावू किंवा तपासू शकत नाही. प्रत्येकाच्या संशोधनाचे एक क्षेत्र आहे. ते म्हणतील ते सत्य मानायला लागतं. ते सत्य आहेच असे नसतं. विज्ञानाचे नियम तर दर नवीन संशोधनागणिक नेहमीच बदलत आले आहेत. न्युटन चूक आहे हे सिद्ध करायला आइन्स्टाईन व्हायला लागतं. पिंपळगाव बुद्रुकचा कुणी शेतमजूर ते सिद्ध करत बसेल का? त्यासाठी त्याला आइन्स्टाइन इतकी बुद्धीमत्ता व व्यासंग पाहिजेच. "निकोला टेस्लाचं काय झालं?" ह्या प्रश्नाचं उत्तर आपण द्याल तर विज्ञान विज्ञान म्हणून आपण ज्या सर्वसमावेशक, सहिष्णु, अभ्यासू वैगेरे जगाचा अभिमान बाळगता ते विश्व खरंच विज्ञानाची मूलतत्वे पाळतं का नाही हेही समजून येईल. एडिसनने एसी करंट्च्या विरोधात किती अवैज्ञानिक आकांडतांडव केला हेही आपणास ठावूक असेल. तेव्हा एडीसन आपण बरोबरच आहोत हेच सांगत होता ना? त्याने का नाही सत्य तपासायला प्रयोग केले? शाळामहाविद्यालयांतून टेस्ला सारख्या प्रभृतींचे काही शिकवल्या जाते का हो कुठे? मलाच टेस्लाचे नाव आयुष्याच्या ३२व्या वर्षी कळले. आइन्स्टाईन-एडिसनचे बालपणापासून माहित आहे. अशी भेदभाव करणारी विज्ञानवादी जमात नेमकी कुठली वैज्ञानिक तत्त्वे पाळत असते कोण जाणे.

In reply to by संदीप डांगे

टेसलाचे संशोधन जसे मारले गेलय तसच जगदीशचन्द्र बोस यांचेही मूलभूत संशोधन मारले गेलय. असो. फ़क्त अत्यंत खेदानी नमूद करते की "मी म्हणजे आपले स्वतः चे नाव" इतके पोरकट उत्तर मी आजपर्यंत ऐकले नाही. :-(

In reply to by कवितानागेश

कोsहम् ? या प्रश्नाचे "स्वनाम"हे उत्तर लीमा उजेट यांना पोरकट वाटते. वस्तुत: तेच खरे उत्तर आहे. प्रश्न बालिश आहे म्हणून उत्तर पोरकट वाटणे स्वाभाविक आहे. मी कोण ? कोठून आलो ? माझ्या जन्माचे उद्दिष्ट काय ? मृत्युपश्चात् मी कोठे जाणार ? हे प्रश्न बाष्कळ आहेत. आध्यात्मिकांना ते गूढ, गहन, गंभीर वाटतात. त्यांनी असल्या फुटकळ प्रश्नांचे वृथा अवडंबर माजवून ठेवले आहे. त्यांना सरळ, साधे, सोपे भावत नाही. गूढ, धूसर, गंभीर आवडते. जनुकसातत्य राखणे ही जन्मदात्यांची नैसर्गिक ऊर्मी असते.(नॅचरल इन्स्टिंक्ट). त्या ऊर्मीतून अपत्याचा जन्म होतो. तो त्याचा पहिला आणि शेवटचा जन्म असतो. त्यामागे कोणाचा काही हेतू नसतो. आनंद मिळतो,सुख होते म्हणून हे घडते. (आपल्याला सर्वगुणसंपन्न पुत्ररत्‍न होणार असे हल्ली काही जोडप्यांना वाटते. ते गर्भसंस्कारांविषयींच्या भ्रामक कल्पनांमुळे). "कस्य त्वं, त्वं कुत आयात:। ध्यानं देहि त्वमिह भ्रात: ।" (अरे भाऊ इकडे लक्ष दे. तू कोण ? कोणाचा? कुठून आलास ?) या आदिशंकरांच्या प्रश्नांची खरी उत्तरे आपल्या पासपोर्टवर असतात. ती म्हणजे, आपले नाव. माता-पित्यांची नावे आणि जन्मगाव. म्हणून उगीच दृष्टी ऊर्ध्वदिशेला लावून,उभंटा गंभीर चेहरा आणि तोंडाचा चंबू करून "मी कोsssण ? असा उद्गार काढू नये. कुणाच्या कानीं गेला तर ,"अरे, या वयातच याला अल्झायमर झाला की काय ?" अशी शंका यायची! * "मी म्हणजे कोण?" असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर "मी म्हणजे माझा मेंदू. " या उत्तराचे स्पष्टीकरण देता येते. * "माझे मूळस्वरूप काय?" या प्रश्नाचे उत्तर उत्क्रांतिवादात सापडते. ते आहे "लास्ट युनि्व्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर(luca). याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण देता येते. *मृत्युपश्चात् मी कोठे जाणार? "...बहुतेकांचा मृत देह स्मशानात नेतात. तिथे दहन केले तर राख होते. दफन केले माती होते. थोडी हाडे उरतात. आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष-सूर्यलोक-चंद्रलोक-ब्रह्मलोक-अर्चिरादि मार्ग या सर्व कल्पनेच्या भरार्‍या आहेत. *" शेवटी अमर काय राहाते ?".. यावर बृहदारण्यक उपनिषदात "याज्ञवल्क्य होवाच, नामेति। अनन्तं वै नाम" (याज्ञवल्क्य म्हणाले: नाव. ते दीर्घकाळ राहू शकते.") [जनुके अमर असतात असेही म्हणता येईल...अट लागू.]

In reply to by यनावाला

मी कोण ? कोठून आलो ? माझ्या जन्माचे उद्दिष्ट काय ? मृत्युपश्चात् मी कोठे जाणार ? हे प्रश्न बाष्कळ आहेत.
विकिपीडीयावरील लेखातून: Science is a systematic enterprise that builds and organizes knowledge in the form of testable explanations and predictions about the universe. खुद्द विज्ञानाचा उद्देश म्हणून वरचे प्रश्न असतांना ते बाष्कळ कसे काय? आपण कोण, कुठून आलो ह्यावरच गेले कित्येक शतके विज्ञानाचे संशोधन व अनुमान लावने सुरू आहे ना? जर ते बाष्कळ असेल तर त्या संशोधनांची गरज काय?
आध्यात्मिकांना ते गूढ, गहन, गंभीर वाटतात. त्यांनी असल्या फुटकळ प्रश्नांचे वृथा अवडंबर माजवून ठेवले आहे. त्यांना सरळ, साधे, सोपे भावत नाही. गूढ, धूसर, गंभीर आवडते.
परत तेच. तुमच्या नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय अध्यात्माबद्दल. बुवाबाजीवाल्यांना आध्यात्मिकचे लेबल लावू नका. तसेच पुलंनी वर्णिलेल्या आध्यात्मिक बाबांसारखेच अध्यात्माचे जग असते असेही समजू नका. खरे अध्यात्मिक गूरू साध्या, सरळ, सोप्या सामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करतात.
जनुकसातत्य राखणे ही जन्मदात्यांची नैसर्गिक ऊर्मी असते.(नॅचरल इन्स्टिंक्ट). त्या ऊर्मीतून अपत्याचा जन्म होतो. तो त्याचा पहिला आणि शेवटचा जन्म असतो. त्यामागे कोणाचा काही हेतू नसतो. आनंद मिळतो,सुख होते म्हणून हे घडते.
अपत्यांच्या जन्मासाठी शरीरसंबंध होतो की संभोगाचा आनंद, सुख मिळते म्हणून? नक्की काय ते एक ठरवा.
"कस्य त्वं, त्वं कुत आयात:। ध्यानं देहि त्वमिह भ्रात: ।" (अरे भाऊ इकडे लक्ष दे. तू कोण ? कोणाचा? कुठून आलास ?) या आदिशंकरांच्या प्रश्नांची खरी उत्तरे आपल्या पासपोर्टवर असतात. ती म्हणजे, आपले नाव. माता-पित्यांची नावे आणि जन्मगाव.
पासपोर्ट, नाव, गाव, माता-पिता नसणारे असंख्य लोक या भूतलावर आहेत. त्यांची ओळख काय असते? आज संदिप डांगे नावाचे अनेक लोक या जगात आहेत. एकाचे तर तंतोतंत संपूर्ण नाव माझे आहे. तर तो आणि मी एकच का? समजा त्याने आणि मी एकच घर घेतले राहायला. तर पासपोर्टवरचा पत्ताही सेम येईल. आईचेही नाव बदलून घेऊन माझ्या आईचेच ठेवले तर आम्ही दोघे म्हणजे एकच आहोत असे होईल काय? माणूस म्हणजे नाव, गाव, पत्ता यापेक्षा वेगळं काहीच नाही?
म्हणून उगीच दृष्टी ऊर्ध्वदिशेला लावून,उभंटा गंभीर चेहरा आणि तोंडाचा चंबू करून "मी कोsssण ? असा उद्गार काढू नये. कुणाच्या कानीं गेला तर ,"अरे, या वयातच याला अल्झायमर झाला की काय ?" अशी शंका यायची!
प्रयोगशाळेत राहून बर्‍याच वैज्ञानिकांना म्हणे, कधी कधी 'मी कोण व इथे काय करतोय' हा प्रश्न पडतो. तोही विनोदच समजावा का?
* "मी म्हणजे कोण?" असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर "मी म्हणजे माझा मेंदू. " या उत्तराचे स्पष्टीकरण देता येते.
विज्ञानवाद्यांचे हमखास फसणारे स्पष्टीकरण. मी म्हणजे 'माझा' मेंदू - हा 'माझा' म्हणणारा कोण आहे?
* "माझे मूळस्वरूप काय?" या प्रश्नाचे उत्तर उत्क्रांतिवादात सापडते. ते आहे "लास्ट युनि्व्हर्सल कॉमन अ‍ॅन्सेस्टर(luca). याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण देता येते.
मानवाच्या सिमित बुद्धीस पटणारे स्पष्टीकरण म्हणजेच सत्य अशी काही विज्ञानाची व्याख्या आहे का? कारण प्रत्येक मनुष्याची बुद्धी वेगवेगळ्या पातळीवरचे स्पष्टीकरण कबूल करते.
*मृत्युपश्चात् मी कोठे जाणार? "...बहुतेकांचा मृत देह स्मशानात नेतात. तिथे दहन केले तर राख होते. दफन केले माती होते. थोडी हाडे उरतात.
क्षणाक्षणाला मृत्यू घडतो, दोन वर्षात संपूर्ण मानवी देह नवा कोरा असतो. शरीरात दोन वर्षाआधीचे काही राहत नाही. ते सर्व कुठे जाते, हे नवीन कोठून येते? कसे येत? (विज्ञानाचेच प्रश्न आहेत बरंका..)
आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष-सूर्यलोक-चंद्रलोक-ब्रह्मलोक-अर्चिरादि मार्ग या सर्व कल्पनेच्या भरार्‍या आहेत.
कसं आहे की जन्म-मृत्यू हेच भ्रम आहेत. सूर्यलोक-चंद्रलोक-ब्रह्मलोक ह्या कल्पनेच्या भरार्‍या नसून अनुभवाला शब्दात बसवता येत नसल्याने झालेल्या घोडचुका आहेत. कश्मिरात 'स्वर्ग कुठे असेल तर इथेच आहे' असे कुठल्या बादशाहने लिहून ठेवले आहे. त्याला काश्मिरचे वर्णन त्याच शब्दात करता येत होते. म्हणून त्याच्यासाठी कश्मिर हा स्वर्ग.
*" शेवटी अमर काय राहाते ?".. यावर बृहदारण्यक उपनिषदात "याज्ञवल्क्य होवाच, नामेति। अनन्तं वै नाम" (याज्ञवल्क्य म्हणाले: नाव. ते दीर्घकाळ राहू शकते.")
खरंच. नाव अमर राहते? कुणाचे? माझ्या खापर-पणजोबाच्या खापर-पणजोबाच्या खापर-पणजोबाच्या खापर-पणजोबाचे नाव नाही राहिले अमर. काय झाले असावे ब्रे? उर्जा अमर आहे. न जन्मते न मरते. उर्जेचीच आपण सर्व रुपे आहोत. एनर्जी अँड म्याटर, यु नो..? हेच अध्यात्म आहे साहेब. तुम्ही कोणा बुवा-बाबाजींच्या नादी लागून कायतरी गैरसमज करून घेतला आहे.
[जनुके अमर असतात असेही म्हणता येईल...अट लागू.]
आर यु शुअर...?

In reply to by यनावाला

समजा, २ आयडेन्टिकल ट्विन्सचे एकच नाव ठेवले तर एकमेकांसमोर त्यांचा "हां मी की तो मी?" असा गोंधळ नक्कीच होणार नाही. किंवा एकाचे १० क्लोन्स केले आणि एकच नाव ठेवले तरी त्या ११ जणांमध्ये पुन्हा यातला नक्की मी कोण?, असा प्रश्न नक्की पडणार नाही. मग अशावे ळे स त्या प्रत्येकाच्या मी ची जाणीव वेगवेगळी असणार, नाव गाव वगैरे वरवरच्या गोष्टी सोडल्यास.... मग काय करायचे? तोंडाचा चंबू न करताच हां प्रश्न कुणालाही नार्मल माणसाला पडू शकतो,हे लक्षात घेतले तर एकन्दरीत माणूस नक्की काय शोधायचा प्रयत्न करतोय हे लक्षात येईल. मी म्हणजे माझा मेंदू हे उत्तर अर्धवट झाले. पुन्हा बुद्धी आणि मन अमूर्त आहेत असे तुम्हीच मागे एका प्रतिसादात लिहिलय. अमूर्त म्हणजे नक्की काय, आणि एखादी अमूर्त गोष्ट मूर्त परिणाम कशी काय घडवून आणत असते हेदेखिल आम्हा अडाणी लोकांना सांगा. अमूर्त मनात भीती वाटली की मूर्त शरीरातले हॉर्मोन्स बदलून घाम येतो, अति भीतीने केस उभे राहतात, क्वचित् पांढरेही होतात. अमूर्त बुद्धी म्हणजे नक्की काय. अमूर्त बुड्ढी मूर्त मेंदूत नक्की कुठे असते? कोमामधल्या पेशन्ट्सच्या अनुभवांचे काय? हेदेखिल सांगा. शिवाय उद्या माझामेंदू आणि माझ्याभावाचा मेंदू आम्ही एक्सचेंज केला तर त्याबरोबर बुद्धी आणि मन सुद्धा ट्रान्सफर होईल का? हे सगळे प्रश्न तुमच्या प्रतिसादातून निर्माण झालेले आहेत. त्यांचा अध्यात्माशी संबंध नाही! शिवाय यादन्यवल्क्य नक्की काय म्हणाले आहेत ते ज़रा बघून सांगते. इथे काहीतरी गोंधळ आहे नक्कीच.

या चर्चेचा उपयोग काय हे कुणी सांगेल का मला... डोळ्यावर तथाकथित अर्धवट विज्ञानाची अत्यंत शहानापणाची पट्टी बांधलेले कधीच योग्य उदाहरणे वाचणार नाहीत.

In reply to by कवितानागेश

या चर्चेचा उपयोग काय हे कुणी सांगेल का मला...
अजून काही नक्की ठरलं नाही. ठरलं की तुम्हाला व्यनि करु.
डोळ्यावर तथाकथित अर्धवट विज्ञानाची अत्यंत शहानापणाची पट्टी बांधलेले कधीच योग्य उदाहरणे वाचणार नाहीत.
अर्धवट विज्ञानाची शहानापणाची पट्टी म्हणजे काय?

In reply to by सतिश गावडे

म्हणजे अर्ध्या हळ कुंडाने पिवळे होणे. बेसिकली आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी नक्की माहीत नाहीत, पण माणसात हल्ली उगिचच स्वतः ला खूपच शहाणे समजायची फयाशन आली आहे. अजून पुष्कळ ज्ञान मिलवन्याचे पोटेंशियल माणसात नक्कीच आहे, पण आपण खरोखर माणूस म्हणून स्वतः ची असलेली ताकद न वापरता भलत्या आणि फुसक्या गोष्टीन्वर स्वतः ला फार शहाणे हुशार उत्क्रांत वगैरे समजतो, असे माझे आजपर्यंतच्या माझ्या अनुभवावरून, वाचनावरुन, निरीक्षणावरून आणि शिक्षणावरून मत आहे.

In reply to by कवितानागेश

उरलेलं अर्ध्ं हळकुंड कुठे मिळेल? डोक्याला थोड़ा मार लागलाय. उगाळून लावावी म्हणतो. ज्ञान प्राप्ती होईल ना?

न्यूटन चूक होता आणि आईनस्टाईन बरोबर?? कसे काय?? एक्सप्लेनशन ऐकायला आवडेल..मला वाटायचे दोघेही बरोबर

मी कोण? तथा कोह्म याच उत्तर आपल्या अध्यात्मात दिले आहे की? अहं ब्रह्मास्मि| हाय काय आन नाय काय? ब्रह्म स्वयंभू आहे त्यामुळे पुढचे प्रश्न विचार नका? :)

कोहं याचा उलगडा बुद्धि वा तर्कापेक्षा प्रत्यक्ष प्रयोगाने होईल. शांत जागी स्वस्थ चित्ताने श्वास घेताना को, सोडताना हं असा ध्वनी मनातल्या मनात करत किमान तीन मिनीटे रोज नेमाने बसा. महिनाभरात बघा काय होते. अध्यात्म, विज्ञान वगैरे भंकस करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करून पहा .