[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]
विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥
बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥
असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥
वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥
प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥
अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥
आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥
समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥
असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥
कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥
प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥
अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥
तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥
वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥
आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥
वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥
आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥
आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥
******************************************************************************************************
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
63554
प्रतिक्रिया
174
मिसळपाव
प्रतिक्रिया
( अवांतर : इथल्या शब्दांची
मानवी ज्ञानभांडार
यावर खूप बोलता येईल. पण उद्या
In reply to मानवी ज्ञानभांडार by यनावाला
धन्यवाद.
In reply to मानवी ज्ञानभांडार by यनावाला
विषय बदललेला नाही
In reply to मानवी ज्ञानभांडार by यनावाला
वालावलकरजी,
In reply to विषय बदललेला नाही by यनावाला
+१११११११११११
In reply to वालावलकरजी, by संदीप डांगे
टेसलाचे संशोधन जसे मारले गेलय
In reply to वालावलकरजी, by संदीप डांगे
जेटमाऊली,
In reply to टेसलाचे संशोधन जसे मारले गेलय by कवितानागेश
कोSहम् ? मी कोण ?
In reply to टेसलाचे संशोधन जसे मारले गेलय by कवितानागेश
मी कोण ? कोठून आलो ? माझ्या
In reply to कोSहम् ? मी कोण ? by यनावाला
+१११ डांगे साहेब...
In reply to मी कोण ? कोठून आलो ? माझ्या by संदीप डांगे
समजा, २ आयडेन्टिकल ट्विन्सचे
In reply to कोSहम् ? मी कोण ? by यनावाला
?
या चर्चेचा उपयोग काय हे कुणी
In reply to ? by कवितानागेश
म्हणजे अर्ध्या हळ कुंडाने
In reply to या चर्चेचा उपयोग काय हे कुणी by सतिश गावडे
उरलेलं अर्ध्ं हळकुंड कुठे
In reply to म्हणजे अर्ध्या हळ कुंडाने by कवितानागेश
सापडलच तर त्यातल अर्ध मलाही
In reply to उरलेलं अर्ध्ं हळकुंड कुठे by प्यारे१
डोक्याला थोड़ा मार लागलाय.
In reply to उरलेलं अर्ध्ं हळकुंड कुठे by प्यारे१
यनावाला साहेब, धन्यवाद!
परिहासविजल्पितम् (अर्थात 'जस्ट किडिंग')
आईनस्टाईन आणि न्यूटन
मी कोण? तथा कोह्म याच उत्तर
कोहं याचा उलगडा बुद्धि वा