इष्टाप ( शतशब्द्कथा )
लेखनप्रकार (Writing Type)
दिपवाळीच्या सुट्ट्या लागल्या.
सकाळधरनं लय खेळलो .
किल्ला कराय अजून टाईम हाय .
दिप्या म्हनला लपाछपी खेळायची .
कसं म्हाईत नाय , पन दर खेपेला माज्यावच पैलं राज्य येतंय.
चला, धा - इस -तीस - चाळीस - पन्नास- साट- सत्तर --- रेडी का?
कोनच बोलंना !
लागलो हुडकाय … पार नाना सुताराच्या वखारीपस्नं परीट आळीपत्तर -कोनच घावंना !
गोठ्यात -गंजीत घुसून बगितलं. नानाची म्हातारी लई कावली.
आता मला भुका लागल्या.
लपा म्हनलं लेकांनो, म्या जातो जेवायलाच .
घरला जाऊन जेवलो, बचाकभर शेंगा घिउन निगलो .
नाथाच्या देवळापाशी आलो. लपाछपी इसारलोच हुतो.
तर समदी पोरं दिसली माज्याफुडच चालल्याली.
मलाच हुडकित व्हती.
समदी देवळात घुसली तसा मागनं म्या खच्चून वराडलो ,
'' दिप्या, बाळ्या, रम्या, सुन्या - इष्टाप !!''
प्रतिक्रिया
हेहेहे! मीपण असेच करायचो! ;-)
झक्कास!!!!!!!!!!!
झक्कास.
आवडली.
मस्तं, एकदम क्यूट गोष्ट आहे.
+१
मस्त
+१
झकास फक्कड .
:)
मस्त फिरकी!
सुंदर.
मस्त!
हेहेहे!
आवडली.
हीहीही..आवडली. ..माझ्यावर
तो रडुन , कांगावा करुन
क्युट शशक
आवडली.
धप्पा!
कथा आवडली.
छान कथा!
Mast kathaa! Khup aavadali!
आम्ही चिटींग करायचो शेवटचे
खलास ! मस्त.
कथा आवडली..
मस्तच
हे भारीच की. :D
फक्कड
वाचक आणि प्रतिसादकांचे आभार..
वा वा
हां हां हां मस्त लहान पणीचा