Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user नितीनचंद्र
Submitted by नितीनचंद्र on Mon, 11/02/2015 - 15:06
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे. जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी. वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल. मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला. पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील. कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही. एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता. नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नांदी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही. कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अ‍ॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे. शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती. या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे. सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे. download (1).jpg सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल. असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्षा अपुर्ण ठेवणारी होती. images.jpg कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.
  • Log in or register to post comments
  • 30888 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Mon, 11/02/2015 - 20:21

In reply to सुरतपिया-राहूल by कंजूस

Permalink

लिंकांसाठी धन्यवाद!

लिंकांसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by बासुंदी on Tue, 11/03/2015 - 02:08

In reply to सुरतपिया-राहूल by कंजूस

Permalink

घेई छंद मकरंद

घेई छंद मकरंद चे पण असे रेकॉर्डिंग आहे का? असल्यास प्लिज शेअर करा
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/03/2015 - 08:29

In reply to घेई छंद मकरंद by बासुंदी

Permalink

१ ) घेई छंद -राहूल. टिव्ही

१ ) घेई छंद -राहूल. टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंग घेई छंद -राहूल; MP3 size 6 MB २) शंकर महादेवन-- घेई छंद मकरंद - tv ओडिओ रेकॅार्डिंग शंकरचे घेई मकरंद tv SOUND recording,7MB
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/03/2015 - 12:10

In reply to १ ) घेई छंद -राहूल. टिव्ही by कंजूस

Permalink

आणखी टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंगज

आणखी टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंगज ३) गुजरे सनम -राहूल.7.3 MB गुजरे सनम -राहूल.7.3 MB ४ ) लागी_करे, राहूल.7.3MB लागी_करे, राहूल.7.3MB ५ ) तेजो निधि गोल- राहूल 6.2 MB तेजो निधि गोल- राहूल 6.2 MB
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 11/02/2015 - 19:44

Permalink

आवडले.

वसंतराव देशपांडे ह्यांच्या बुलंद आवाजात खाँ साहेबांना पाहिलं/ऐकलं आहे. (१९७३). अभिनेता सचिन असला तरी पार्श्वगायनात राहूल देशपांडे आहेत. आवाज आणि गायकी तेव्हढीच दमदार आहे. त्यामुळे पुन्हा कट्यार भावली.
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Mon, 11/02/2015 - 20:25

Permalink

वरील प्रतिक्रियांवरून

महागुरूंबाबत आकस दिसतोय,का बरे?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 11/02/2015 - 22:18

In reply to वरील प्रतिक्रियांवरून by याॅर्कर

Permalink

एकापेक्षा एक बघितलं असाल तर

एकापेक्षा एक बघितलं असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. 'मला पहा फुल वाहा' टाईप कमेंट्स नी डोक्याचं भजं झालंय!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Mon, 11/02/2015 - 22:26

In reply to एकापेक्षा एक बघितलं असाल तर by सूड

Permalink

अगदी अगदी.. तोपर्यंत सचिन या

अगदी अगदी.. तोपर्यंत सचिन या व्यक्तिमत्वाबद्दल थोडं फार कौतुक होतं, ते पूर्ण गेलं.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 11/02/2015 - 22:27

In reply to एकापेक्षा एक बघितलं असाल तर by सूड

Permalink

या प्रतिसादाबद्दल तुम्हाला

या प्रतिसादाबद्दल तुम्हाला शंभर रुपये...
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 11/03/2015 - 09:01

In reply to या प्रतिसादाबद्दल तुम्हाला by आदूबाळ

Permalink

+११

आप्लया हातानी माती करणे हा वाकप्रचार तेव्हांच जन्माला आला.
  • Log in or register to post comments

Submitted by बिहाग on Mon, 11/02/2015 - 20:29

Permalink

दुसरा कोणी मिळाले नाही का?

खांसाहेब म्हणून सचिन? दुसरा कोणी मिळाले नाही का? या एकाच कारणासाठी बघायला नको वाटतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 11/02/2015 - 20:40

Permalink

म्हागुरू

हा धागा वाचूनच समजले याविषयी आणि लगेच पिच्चराचे टेल्लर बघितले. म्हागुरूच्या टकुरात अजून नच बलियेतील ती एनर्जी, कोर्योग्राफी अन काय काय ते वळ्वळ्ते आहेसे वाटले. आप्लयासार्खे लई लोक इथे आहेत, हे बघून परम संतोष जाहला आहे. बाकी दिल्लीत हा पिच्चर लागणार नाही त्यामुळे कधीतरी छोट्या पडद्यावर बघणार.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/03/2015 - 08:51

In reply to म्हागुरू by चित्रगुप्त

Permalink

अशोक सराफचा नारायण केला तसं

अशोक सराफचा नारायण केला तसं का?
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 11/02/2015 - 22:05

Permalink

महागुरू..

महागुरूंविषयी फारच आकस दिसतोय. त्यांचे ते महागुरू पण आणि काही बकवास पिक्चर सोडले तर इतके काही वाईट अ‍ॅक्टर नाहीयेत आपले सचिन सर... अमिताभ / कमल हसन / शाहरुख यांचा पण काही चित्रपटांमुळे कंटाळा आलाच होता ना? (शाहरुखचा राम जाने किंवा गुड्डु चित्रपट बघा, त्यानंतर प्रदिप कुमार / भारत भुषण यांचे चित्रपट सुद्धा सुसह्य होतील).
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 11/02/2015 - 22:22

In reply to महागुरू.. by योगी९००

Permalink

अमिताभ / कमल हसन / शाहरुख

अमिताभ / कमल हसन / शाहरुख यांचा पण काही चित्रपटांमुळे कंटाळा आलाच होता ना? असल्या टुकार लोकांशी महागुरुंची तुलना?
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 11/03/2015 - 08:48

In reply to अमिताभ / कमल हसन / शाहरुख by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा..

परा परत आलात? तुमचे स्वागत. आता परत मज्जा येणार..!! (तुमचे फेसबुक पेज भारी हाय..) असल्या टुकार लोकांशी महागुरुंची तुलना? याहुन टुकार नाही मिळाले आणि मुळ मुद्दा असा आहे की महागुरू म्हणून पिळगांवकरांनी फार छळलं याचा अर्थ असा नाही की कायम आपण त्यांना कमी लेखावं. किती झालं तरी पन्नास वर्ष पुर्ण केलीत त्यांनी. हाच जर रोल विक्रम गोखले किंवा या सम जेष्ठ अभिनेत्याने केला असता तर उगाचच त्यांचे कौतूक झाले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 11/03/2015 - 11:29

In reply to परा.. by योगी९००

Permalink

सहमत आहे.

सहमत. शिवाय हिन्दी चित्रपटात आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर छोट्या पडद्यावर 'तू तू मैं मैं' सारख्या मालिकेतून यशस्वी दिग्दर्शन केले आहे. शिवाय 'नवरा माझा नवसाचा' ह्या चित्रपटातून निर्मिती, दिग्दर्शन, कथा आणि पटकथा वगैरे सर्व क्षेत्रात हात अजमावून त्या चित्रपटाला यशस्वी करून दाखविले आहे. इतर अनेक मराठी कलाकारांपेक्षा सचिनने वैयक्तिक पातळीवर बर्‍यापैकी चतुरस्त्र प्रगती साधली आहे. त्याचे महागुरू प्रकरण, स्वतःच्याच चेहर्‍याभोवती आरती ओवाळण्याचे प्रकार चेष्टेचा विषय ठरले. ते नैसर्गिकही आहे. पण तेव्हढे वगळून त्यांनी मिळविलेले यश हे नेत्रदिपकच म्हणावे लागेल. ह्या चित्रपटातील त्यांची खाँसाहेबांची भूमिका त्यांना देऊन निर्माता/दिग्दर्शकाने चूक तर केली नाही नं? असा विचार माझ्याही मनात आला. त्याला मुख्य कारण सचिन ह्यांची शारीरीक उंची आणि आवाज 'खाँसाहेब' ह्या व्यक्तीरेखेला साजेसा वाटत नाही. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच मतप्रदर्शन करणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 11/03/2015 - 11:35

In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर

Permalink

हेच बोल्तो. जनरली थट्टेचा

हेच बोल्तो. जनरली थट्टेचा विषय असलेले सचिन, महेश कोठारे, लक्षा आणि अशोक सराफ यांच्याबद्दल खूप आदर आहे. मराठी सिनेमा 'प्रगल्भ' (!) होण्यापूर्वी या लोकांनी निखळ करमणूक केलेली आहे. अजूनही त्यांचे अनेक सिनेमे टीव्हीवर लागले की पाहतोच. महागुरू म्हणवून घेणं वगैरे प्रकार फाल्तू आहे याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 11/03/2015 - 12:04

In reply to हेच बोल्तो. जनरली थट्टेचा by अनुप ढेरे

Permalink

नेम्के

आणि अचूक . सरत्या काळात अशी स्वतःच्या हाताने माती करून घेऊन पूर्वीची (जमवलेली) पुण्याई वाया घालवली सचिन ने किमान अशोक सराफ वयानुरूप भूमीका तरी करतायत.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 11/03/2015 - 12:54

In reply to परा.. by योगी९००

Permalink

छळलं नाही ओ पीळलय या पिळगावकरानी

शारूक पण एवढा अभिनय नाही करत. आमची किमान अपेक्षा होती कि म्हाग्रू स्वतः अभिनय करताना गायक जेव्हा गाणे म्हणतो तेव्हाचे त्याचे हावभाव पाहून त्याप्रमाणे हावभाव करतील. किती हलवावं हो माणसानं अंग गाणं म्हणताना! असो झापडं घेऊन जावं थेटरात असं मत झाल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 11/03/2015 - 15:21

In reply to छळलं नाही ओ पीळलय या पिळगावकरानी by sagarpdy

Permalink

तेव्हडाचाच ड्यान्स करायचा

तेव्हडाचाच ड्यान्स करायचा चान्स ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Mon, 11/02/2015 - 22:32

Permalink

खानसाहेब

साकारण्यासाठी सचिनने लागा चुनरी दागचा राजकुमार किंवा सावन बीता जाए चा मेहमूद वगैरे कॉपी केल्यासारखा वाटतो. खानसाहेब हे अतीहुशार , मितभाषी , स्थितप्रज्ञ तरीही पाताळयंत्री असे अजीब रसायन होते. पं. वसंतराव , राहूल देशपांडे किंवा सीडीत असलेले पं. लिमये याना तो बाज छान जमला होता. सीडी आहे त्यात लहानपणीचा सदाशिव सुबोध भावे आहे. आता मोठा होऊन तोच मोठ्या सदाशिवचा रोल कर्रणार हाही एक नवीन विक्रम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Mon, 11/02/2015 - 22:39

In reply to खानसाहेब by मोगा

Permalink

सीडी आहे त्यात लहानपणीचा

सीडी आहे त्यात लहानपणीचा सदाशिव सुबोध भावे आहे. आता मोठा होऊन तोच मोठ्या सदाशिवचा रोल कर्रणार हाही एक नवीन विक्रम आहे.
अरे वा, हे माहिती नव्हतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Mon, 11/02/2015 - 22:50

In reply to सीडी आहे त्यात लहानपणीचा by स्रुजा

Permalink

सीडी तीन की चार भागात आहे.

यु ट्युबावर आहे. www.youtube.com/watch?v=X6RSKJURpss
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Mon, 11/02/2015 - 22:57

In reply to सीडी तीन की चार भागात आहे. by मोगा

Permalink

नाही.

सीडीत तो राहूल वैद्य आहे. सुबोध भावे लहानपणी हा रोल करायचा का हे कन्फर्म करायला हवे. मी सीडी कट्यारच्या प्रयोगावेळीच दीनानाथ पार्ले बाहेर जो स्टॉल होता तिथे घेतली होते. तो सीडीवाला तसे बोलल्याचे अंधुकसे आठवते. कन्फर्म करायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Mon, 11/02/2015 - 23:21

In reply to नाही. by मोगा

Permalink

ओके ओके, मी पण जरा आंजावर

ओके ओके, मी पण जरा आंजावर उचकापाचक करते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/03/2015 - 00:09

In reply to ओके ओके, मी पण जरा आंजावर by स्रुजा

Permalink

सुबोध भावे बहुतेक लहानपणी काम

सुबोध भावे बहुतेक लहानपणी काम करत नव्हता. 2004 ला नाशिक सीबीएस ला एस टी ने प्रवास करताना भेटला होता. तेव्हा ती शामराव परांजपे वाली सीरियल इटिव्ही मराठी ला लागायची.'या गोजिरवाण्या घरात' त्यात तो काही काळ होता. सिगारेट ओढ़त उभा होता. बोललो. compliment दिली. व्यवस्थित बोलला.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 11/03/2015 - 08:43

In reply to खानसाहेब by मोगा

Permalink

राजकुमार..??

साकारण्यासाठी सचिनने लागा चुनरी दागचा राजकुमार... तो राजकपुर आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Tue, 11/03/2015 - 09:15

In reply to राजकुमार..?? by योगी९००

Permalink

हो.

चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 11/04/2015 - 23:30

In reply to खानसाहेब by मोगा

Permalink

लागा चुनरी मे दाग चा राजकुमार?

तुम्हाला राज कपूर म्हणायचंय का? कारण पडद्यावर हे गाणं राज कपूरनी म्हटलंय. (दिल ही तो है) सावन बिता जाय मेहमूदवर आहे.(सांझ और सवेरा)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 11/04/2015 - 23:31

In reply to खानसाहेब by मोगा

Permalink

लागा चुनरी मे दाग चा राजकुमार?

तुम्हाला राज कपूर म्हणायचंय का? कारण पडद्यावर हे गाणं राज कपूरनी म्हटलंय. (दिल ही तो है) सावन बिता जाय मेहमूदवर आहे.(सांझ और सवेरा)
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on गुरुवार, 11/05/2015 - 13:24

In reply to लागा चुनरी मे दाग चा राजकुमार? by बोका-ए-आझम

Permalink

हो

हो
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 12/05/2015 - 02:47

In reply to खानसाहेब by मोगा

Permalink

...

छोटा सदाशिव, मोठा सदाशिव खाँसाहेब चारुदत्तचने केले आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Tue, 11/03/2015 - 04:27

Permalink

प्रदर्शनाची वेळ...

मला एक कळत नाही , की १२ तारीख का निवडली ?? त्या दिवशी अजुन एक मोठा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय ंमु.पु.मु.-२ शिवाय सलमानचा आहेच. निदान एक आठवडा जाऊ दिला असत्ता तर दोन्हि मराठी चित्रपटाना चान्गला प्रतिसाद मिळाला असता. मला तरी वाटतय की , ंमु.पु.मु.-२ जास्त भाव खाऊन जाईल , कारण त्याची उत्सुकता जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 11/07/2015 - 12:37

In reply to प्रदर्शनाची वेळ... by अभिदेश

Permalink

मराठी सिनेमाचे लोक

मराठी सिनेमाचे लोक प्रदर्शनाच्या तारखांबाबत एवढे का बिनडोक वागतात तेच कळलं नाही आजवर.. मागे तर एकाच दिवशी चार का पाच चित्रपट आले होते. काय मूर्खपणा आहे राव? एक एका शुक्रवारी काढा की बाहेर. सगळेच धंदा करतील.
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Sun, 12/06/2015 - 08:19

In reply to मराठी सिनेमाचे लोक by संदीप डांगे

Permalink

उलट

उलट मला वाटले की कट्यार वाल्यांनी प्रेम रतन च्या रिलीज च्या दिवशी रिलीज करून मोठी डेअरिंग केली, आणि सुदैवाने त्याचा फायदा झाला. असेही ऐकले की दुसर्‍या आठवड्यात काही थिएटर्स नी शोज वाढवले. बाकी एकमेकांशी स्पर्धा न करता रिलीज करण्याबाबत सहमत. अगदी 'आनंदाचं झाड' आणि 'भाजीवाली सखू, हवालदार भिकू' असतील तर दोघांचा प्रेक्षकवर्ग एकदम वेगळा असल्याने हरकत नाही :). (हे दोन्ही खरेच चित्रपट आहेत)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 11/03/2015 - 08:46

Permalink

सचिन पिळगावकर...

हम्म्म्म.. थोडी धाकधुक आहेच म्हणजे. शोलेमधला अहमद म्हातारा होऊन ए.के हंगलचे कपडे घालुन वावरतोय असं वाटतय. ट्रेलर तर फस्क्लास वाटतय. सिनेमापण भारी जमला असेल. पण एकुणच मुख्यं पात्रं-पंडीतजी आणि खाँसाहेब- कुडतेमे रहे तो बेहेतर.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 11/06/2015 - 01:13

In reply to सचिन पिळगावकर... by अर्धवटराव

Permalink

+१

शोलेमधला अहमद म्हातारा होऊन ए.के हंगलचे कपडे घालुन वावरतोय असं वाटतय.
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Sun, 12/06/2015 - 08:19

In reply to सचिन पिळगावकर... by अर्धवटराव

Permalink

हे खत्रा आहे

शोलेमधला अहमद म्हातारा होऊन ए.के हंगलचे कपडे घालुन वावरतोय असं वाटतय. >> लोल हे खत्रा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Tue, 11/03/2015 - 10:08

Permalink

सचिन

भाऊंची निवड खटकली. एखादा तगडा नट असायला हवा होता असं वाटतय. तरीपण चित्रपट थेट्रात जाऊन पाहणार. राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांची आणि इतर गाणी सिनेमाला तारतील असं वाटतय.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Tue, 11/03/2015 - 14:51

Permalink

हान् तिज्यायला

घेई छंदची जुगलबंदी बघितली आत्ताच. आपण सिनेमात गायकाची भुमीका करत आहोत हे विसरून महागुरू प्लेबॅकवर नॄत्य करत असल्यासारखे वाटले. देवा काय काय दाखवणार आहेस ह्या जन्मात अजून?????
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/03/2015 - 15:52

In reply to हान् तिज्यायला by आदिजोशी

Permalink

म्हाग्रू रॉक्स

म्हाग्रवे णमो णमः =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 11/03/2015 - 20:25

In reply to हान् तिज्यायला by आदिजोशी

Permalink

नाही हो..

आपण सिनेमात गायकाची भुमीका करत आहोत हे विसरून महागुरू प्लेबॅकवर नॄत्य करत असल्यासारखे वाटले. माफ करा.. मला तसे नाही वाटले. कदाचित त्या भुमिकेची गरज असावी म्हणून खांसाहेबांनी तसली अ‍ॅक्टींग केली असावी असे वाटले. पंडीतजींपेक्षा आपण चांगले गायक आहोत हे सिद्द करण्यासाठी थोडी ओवरअ‍ॅक्टींग जरूरी होती असे वाटले ते सचिनने नॅचरली केले आहे. बाकी चित्रपट बघणेबल आणि ऐकणेबल असणार हे निश्चित..
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Tue, 11/03/2015 - 21:02

In reply to नाही हो.. by योगी९००

Permalink

पं. चंद्रकांत लिमयेंचा अभिनय पहा.

www.youtube.com/watch?v=U0PMxF0n3h4
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 11/03/2015 - 21:13

In reply to पं. चंद्रकांत लिमयेंचा अभिनय पहा. by मोगा

Permalink

अप्रतिम..

आधी बघितलाय हा व्हिडीओ..अप्रतिम एवढेच म्हणतो. यांच्या तुलनेत सचिन कोठेच नाही. पण एक गोष्ट मात्र की पं. लिमये स्वत: गात आहेत आणि सचिन त्या गाण्यावर अ‍ॅक्टींग करत आहेत त्यामुळे फरक हा असणारच..( मी काही सचिनचा फॅन नाही पण उगाचच झोडपलेले आवडत नाही... पुर्णपिक्चर पाहून सांगतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 11/03/2015 - 21:12

In reply to नाही हो.. by योगी९००

Permalink

साजेसा अभिनय.

ही दोन गायकीच्या घराण्यातील जुगलबंदी आहे असे वाचले आहे. (संगितातील मला फार कमी ज्ञान आहे) खाँसाहेबांचे व्यक्तिमत्व आक्रमक आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे शारीरीक हावभाव सुद्धा आक्रमक असणं नैसर्गिक असणार. त्यांच्या संवादातूनही ते हेच दाखवितात. त्या हवेलीत आल्यावर तिथे असणारे 'मवाळ हळवे सुर जाऊ द्यात' (ह्या भवनातील गीत पुराणे) असे म्हणतात शिवाय ह्या 'घेई छंद मकरंद' गाण्याबाबतीतही ते म्हणतात 'गाण्याला चाल कशी नागिणी सारखी सळसळती असावी. विद्युलते सारखी चपळ असावी' आणि 'घेई छंद'ची द्रुत चाल ते नागिणीच्या आक्रमतेने पेश करतात. मला वाटते, त्यांच्या स्वभावाला साजेसे हावभाव ती भूमिका करणार्‍या सचिन ह्यांच्या कडून दिग्दर्शकाने (सुबोध भावे?) करुन घेतली आहे. जरा ब्रॉड अ‍ॅक्टींग आहे पण ते भूमिकेला साजेसे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 11/03/2015 - 22:11

In reply to साजेसा अभिनय. by प्रभाकर पेठकर

Permalink

+१

+१ मला जे म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात व्यक्त केलेत..
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 11/03/2015 - 22:11

In reply to साजेसा अभिनय. by प्रभाकर पेठकर

Permalink

+१

+१ मला जे म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात व्यक्त केलेत..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 11/03/2015 - 21:24

In reply to नाही हो.. by योगी९००

Permalink

साजेसा अभिनय.

ही दोन गायकीच्या घराण्यातील जुगलबंदी आहे असे वाचले आहे. (संगितातील मला फार कमी ज्ञान आहे) खाँसाहेबांचे व्यक्तिमत्व आक्रमक आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे शारीरीक हावभाव सुद्धा आक्रमक असणं नैसर्गिक असणार. त्यांच्या संवादातूनही ते हेच दाखवितात. त्या हवेलीत आल्यावर तिथे असणारे 'मवाळ हळवे सुर जाऊ द्यात' (ह्या भवनातील गीत पुराणे) असे म्हणतात शिवाय ह्या 'घेई छंद मकरंद' गाण्याबाबतीतही ते म्हणतात 'गाण्याला चाल कशी नागिणी सारखी सळसळती असावी. विद्युलते सारखी चपळ असावी' आणि 'घेई छंद'ची द्रुत चाल ते नागिणीच्या आक्रमतेने पेश करतात. मला वाटते, त्यांच्या स्वभावाला साजेसे हावभाव ती भूमिका करणार्‍या सचिन ह्यांच्या कडून दिग्दर्शकाने (सुबोध भावे?) करुन घेतली आहे. जरा ब्रॉड अ‍ॅक्टींग आहे पण ते भूमिकेला साजेसे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 11/03/2015 - 21:34

In reply to साजेसा अभिनय. by प्रभाकर पेठकर

Permalink

काका, तुम्ही म्हणल्याप्रमाणे

काका, तुम्ही म्हणल्याप्रमाणे अभिनयात दिग्दर्शकाचाही वाटा आहेच. जर प्रत्यक्ष चित्रपटात अभिनय रुचला नाही तर त्याचा २५% वाटा तरी दिग्दर्शकाच्या पदरात घालणे भाग आहे. आतापर्यंतच्या चित्रफीतींवरून तरी खानसाहेबांचे आक्रमक हावभाव हे उधोजीराजांसारखे अधिक वाटतात, बालासाहेबांसारखे नाही. (उसने अवसान)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com