पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.
जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.
वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.
मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.
पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.
कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.
एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.
नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नांदी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.
कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.
शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.
सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.
download (1).jpg
सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.
असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्षा अपुर्ण ठेवणारी होती.
images.jpg
कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.
वाचने
30931
प्रतिक्रिया
134
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्कीच! पिक्चर सुपर डुपर हिट
कट्यार काळजात घुसली पाहिला !
In reply to नक्कीच! पिक्चर सुपर डुपर हिट by वेल्लाभट
सचिन पिळगावकर उर्फ
सचिन पिळगावकर या गुणी दिग्दर्शकाविषयी वैयक्तिक टीका, रुचली नाही
In reply to सचिन पिळगावकर उर्फ by काकासाहेब केंजळे
हेच
In reply to सचिन पिळगावकर या गुणी दिग्दर्शकाविषयी वैयक्तिक टीका, रुचली नाही by पगला गजोधर
हे बाकी खर बर का काकासाहेब!
In reply to सचिन पिळगावकर उर्फ by काकासाहेब केंजळे
...
In reply to हे बाकी खर बर का काकासाहेब! by पामर
ह ह पु वा !
In reply to हे बाकी खर बर का काकासाहेब! by पामर
उत्सुकता..
+ १ , स्वयंघोषित महागुरुंना
In reply to उत्सुकता.. by स्वाती दिनेश
कट्यार पुन्हा काळजात घुसली-
म्हागगुरुंना पाह्यलं आणि
+१
In reply to म्हागगुरुंना पाह्यलं आणि by सूड
नसरुद्दिन शहा एकदम मस्त शोभले असते
In reply to +१ by माझीही शॅम्पेन
+१ . नव्या कटयारमध्ये
In reply to +१ by माझीही शॅम्पेन
सचिन पिळगांवकरांची निवड
महागुरू _/\_
अपेक्षा उंचावल्यात या
महागुरू फेवरिंग विरुद्ध
कमीत कमी मिपावर वादाचा नवीन
In reply to महागुरू फेवरिंग विरुद्ध by वेल्लाभट
लौल !
In reply to कमीत कमी मिपावर वादाचा नवीन by टवाळ कार्टा
म्हाग्रू सोडून दुसरे लोक मेले
नाटक
In reply to म्हाग्रू सोडून दुसरे लोक मेले by बॅटमॅन
कट्यार नाटकात राहुलच करतो ना
In reply to नाटक by स्वाती दिनेश
आजकाल ज्याला अभिनय म्हणतात तो
In reply to कट्यार नाटकात राहुलच करतो ना by बॅटमॅन
असेल, मला माहिती नाही. मला
In reply to आजकाल ज्याला अभिनय म्हणतात तो by अभ्या..
असेल, मला माहिती नाही. मला वाटलेलं की तो फक्त गाण्यातला आहे. अॅक्टिंगही येते हे माहिती नव्हतं.म्हाग्रुंना तरी 'सचिन पिळगावकर'शिवाय इतर कुणाची अॅक्टिंग कुठे येते करायला? :Pम्हग्रू बद्दल किती काही वाटत
या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि
In reply to म्हग्रू बद्दल किती काही वाटत by अद्द्या
अगदी .
In reply to या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि by बॅटमॅन
+११११११११११
In reply to अगदी . by अद्द्या
थोडी टॅन आहे म्हण. >
In reply to +११११११११११ by बॅटमॅन
रावबाजी ज्वारीचे नायतर
In reply to थोडी टॅन आहे म्हण. > by अद्द्या
आता थेटरात दमदार निषेध नाही
In reply to रावबाजी ज्वारीचे नायतर by अभ्या..
रावबाजी?
In reply to रावबाजी ज्वारीचे नायतर by अभ्या..
बोकेश. दुसर्या रावसाहेबांंना
In reply to रावबाजी? by बोका-ए-आझम
पानिपतातला किस्सा पाहिला
In reply to बोकेश. दुसर्या रावसाहेबांंना by अभ्या..
येक लंबर !
In reply to +११११११११११ by बॅटमॅन
खरे आहे
In reply to +११११११११११ by बॅटमॅन
बाजीराव मस्तानी बघणार राव!!
In reply to अगदी . by अद्द्या
सुट्टीवर आलो असताना पोरगा खास
In reply to बाजीराव मस्तानी बघणार राव!! by सूड
सूडने म्हणे बाजीराव मस्तानी
In reply to अगदी . by अद्द्या
थेरडेशाही? वारलो!
In reply to या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि by बॅटमॅन
बापरे
In reply to या चित्रपटाबद्दल ऐकलेली हि by बॅटमॅन
म्हणू देत रे
In reply to म्हग्रू बद्दल किती काही वाटत by अद्द्या
वसंताराव देशपांडे आणि राहुल खासाहेबांची भुमिका करत होते/करतात
म्हाग्रू किंवा नो म्हाग्रू...
घेई छंद मकरंद
वरच्या बर्याच प्रतिसादांशी
गाण्यांसाठी बघावा वाटतोय
सुरतपिया-राहूल
लिंकांसाठी धन्यवाद!
In reply to सुरतपिया-राहूल by कंजूस
घेई छंद मकरंद
In reply to सुरतपिया-राहूल by कंजूस
१ ) घेई छंद -राहूल. टिव्ही
In reply to घेई छंद मकरंद by बासुंदी
आणखी टिव्ही ओडिओ रेकॅार्डिंगज
In reply to १ ) घेई छंद -राहूल. टिव्ही by कंजूस
आवडले.
वरील प्रतिक्रियांवरून
एकापेक्षा एक बघितलं असाल तर
In reply to वरील प्रतिक्रियांवरून by याॅर्कर
अगदी अगदी.. तोपर्यंत सचिन या
In reply to एकापेक्षा एक बघितलं असाल तर by सूड
या प्रतिसादाबद्दल तुम्हाला
In reply to एकापेक्षा एक बघितलं असाल तर by सूड
+११
In reply to या प्रतिसादाबद्दल तुम्हाला by आदूबाळ
दुसरा कोणी मिळाले नाही का?
म्हागुरू
अशोक सराफचा नारायण केला तसं
In reply to म्हागुरू by चित्रगुप्त
महागुरू..
अमिताभ / कमल हसन / शाहरुख
In reply to महागुरू.. by योगी९००
अमिताभ / कमल हसन / शाहरुख यांचा पण काही चित्रपटांमुळे कंटाळा आलाच होता ना?असल्या टुकार लोकांशी महागुरुंची तुलना?परा..
In reply to अमिताभ / कमल हसन / शाहरुख by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
In reply to परा.. by योगी९००
हेच बोल्तो. जनरली थट्टेचा
In reply to सहमत आहे. by प्रभाकर पेठकर
नेम्के
In reply to हेच बोल्तो. जनरली थट्टेचा by अनुप ढेरे
छळलं नाही ओ पीळलय या पिळगावकरानी
In reply to परा.. by योगी९००