✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कवितेवर केलेली कविता

न — निलम बुचडे, Mon, 11/02/2015 - 19:05
*****कविता***** कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब कविता म्हणजे हरवत जाणारी वाट कविता म्हणजे सुविचारांची पहाट कविता म्हणजे तृणातील इवले फूल कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा... - निलम बुचडे.

प्रतिक्रिया द्या
9548 वाचन

💬 प्रतिसाद (34)

आता कळाल पुलंनी ज्ञानेश्वरांना

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 21:07 नवीन
आता कळाल पुलंनी ज्ञानेश्वरांना "व्हाल का हो नवकवी?" अस च्यालेन्ज का दिलं होत!!
कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...
हा माझा एक थुकरट प्रयत्न... कविता म्हणजे निबुचा निळापिवळा निंबुडा! असो, जोक्स अपार्ट... कविता म्हणजे फक्त ओढूनताणून जुळवलेले यमक आणि खरवडून काढलेल्या उपमा एवढेच नसते. तुमचा प्रयत्न ठीकठाक होता. अजून चांगल लिहू शकता! पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments

जाता जाता...

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 21:12 नवीन
http://www.misalpav.com/node/1958
अशा काही लेखांचा अभ्यास करा एवढेच सुचवेन! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

http://misalpav.com/node

प्यारे१
Mon, 11/02/2015 - 21:11 नवीन
http://misalpav.com/node/19959 एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
  • Log in or register to post comments

प्यारेभाऊ...

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 21:13 नवीन
प्यारेभाऊ जब्रा!! ___/\___ घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मस्त प्यारे.

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 21:16 नवीन
मस्त प्यारे. बर्‍याच इन्स्टंट नवकविंनी हे वाचून पेर्णा घेतली तरी पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कवितेची कविता

मित्रहो
Tue, 11/03/2015 - 12:08 नवीन
एकदम जबरदस्त
आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
हे पटल तरी पोतेऱ्याचा मोह आवरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नव्या लेखकाना/लेखिकाना उत्तेजन

भाकरी
Mon, 11/02/2015 - 21:20 नवीन
'बोका' झाला, कविता झाली, आता पाककृती?! आणि खरं बोका-१ झालाय फक्त ;-) मिपावर कोणालाही लेखन करायचं असलं तर उत्तेजन देण्याचा प्रयत्न असतो. पण "कसंही करून एक घाणा पाडाच बुवा" असा त्याचा अर्थ नव्हे!! सर्वानाच रामदासांची उंची गाठणं शक्य नाही कबूल. पण परत तोच मुद्दा - याचा अर्थ काहीही "गोड मानून घ्यावं" अशी अपेक्षा खपून जावी, असाही नाही. पुलेशु.
  • Log in or register to post comments

भाकरी

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 23:43 नवीन
['बोका' झाला, कविता झाली, आता पाककृती?! आणि खरं बोका-१ झालाय फक्त ;-) ] नव्या नवलाईचा उत्साह जरा ऊतू जातोय हो... बस, बाकी काही नाही. ः-)) आणखी एक - पाककृतींची आवड नाहीय जास्त ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी

:-)

भाकरी
Tue, 11/03/2015 - 00:28 नवीन
समजू शकतो. लिहू नका असं नाही, पण १००% जमलंय वाटलं तर नाही, ११०% जमलंय वाटलं तरच टाका ;-) नव्या आहात तर एक टिप देतो - टूलबारवर अवतरण चिन्ह दिसतायत वरती? ती वापरून संदर्भासाठी दिलेला मजकूर दाखवणं जास्त सोईचं होतं आणि व्यवस्थित दिसतं. म्हणजे हे असं;
आणखी एक - पाककृतींची आवड नाहीय जास्त ;-)
हवा तो मजकूर हायलाईट करून अवतरण चिन्हावर क्लिक करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलम बुचडे

Sandy sir

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 21:20 नवीन
धन्यवाद. मी तुमची मनापासून आभारी आहे. प्रामाणिक प्रतिक्रिया आणि उपयुक्त मार्गदर्शन यांचा खूपच अभाव आहे आजकाल. प्रतिक्रिया तर सहज मिळतात, पण मार्गदर्शन कोणीच करत नाही.. खूप खूप धन्यवाद. अजून चांगले लिहीण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

काय हो तै??

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 21:31 नवीन
काय हो तै??
प्रतिक्रिया तर सहज मिळतात, पण मार्गदर्शन कोणीच करत नाही..
एकदम व्हिलनछाप अगरबत्तीच आमच्या समोर लावली की तुम्ही! आम्हीही वर आम्हाला झेपेल इतक मार्गदर्शन केलंय की!! (आम्ही स्वत:ला कधीमधी अहोजाहोपण करतो!) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलम बुचडे

अहो

चाणक्य
Mon, 11/02/2015 - 21:40 नवीन
अहो म्हणूनच तर तुम्हाला धन्यवाद देउ राह्यल्या ताई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वोक्के!

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 21:42 नवीन
तै प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहिण्याच्या विरोधी असाव्यात. काय कळेना त्याच्यामुळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

Sandy sir

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 22:28 नवीन
उपप्रतिसादाचं आधी लक्षात आलं नव्हतं ना.. मी नवीन आहे अजून. सांभाळून घ्या प्लीज. ः-) [ (आम्ही स्वत:ला कधीमधी अहोजाहोपण करतो!) ] याचा अर्थ नाही कळला हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

आधी ते सर बिर थांबवा हो तै!

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 22:53 नवीन
आधीच आमच्या लेखनाची पिसं निघायला लागलीत! ;-) त्यात वर तुमचे 'सर!' स्वत:ला अहोजाहो करायला लागणे हे दुस-याने हाडतुडं करायला लागल्याचे लक्षण आहे, बाकी काही नाही! (मीही नवीनच आहे, बास करतो आता!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलम बुचडे

आधीचा प्रतिसाद ढिस बर्का!

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 21:45 नवीन
आधीचा प्रतिसाद ढिस बर्का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलम बुचडे

प्यारेभाऊ

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 21:21 नवीन
खूपच छान...
  • Log in or register to post comments

कसे सुचते हो येवढे छान छान ?

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/02/2015 - 21:41 नवीन
कसे सुचते हो येवढे छान छान ?
  • Log in or register to post comments

परा ???

चाणक्य
Mon, 11/02/2015 - 21:43 नवीन
हायला. साक्षात परागमन? विश्वास बसेना राव. कुठे होता मालक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ह्या कवितेने खेचून आणले

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/02/2015 - 21:44 नवीन
ह्या कवितेने खेचून आणले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

नमस्कार घ्या मालक!!! --/\--

मांत्रिक
Mon, 11/02/2015 - 21:47 नवीन
नमस्कार घ्या मालक!!! --/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

__/\__

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/02/2015 - 21:48 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

खुद्द परा आले म्हणजे मिपा

मांत्रिक
Mon, 11/02/2015 - 21:49 नवीन
खुद्द परा आले म्हणजे मिपा होणार ढिंच्याक ढिच्याक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

आईशप्पथ!

भाकरी
Mon, 11/02/2015 - 21:48 नवीन
निलमताई, तुम्ही चक्क पर्‍याला बोलता केलंत परत!! पर्‍या, आता आल्यासारखा रहा ईथे महीनाभर. आणि त्या धम्यालाही बोलावता आलं माघारपणाला तर बघ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धम्यालाही बोलवा मालक!!!

मांत्रिक
Mon, 11/02/2015 - 21:50 नवीन
धम्यालाही बोलवा मालक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी

येणार सगळे येणार!

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/02/2015 - 21:51 नवीन
येणार सगळे येणार! अच्छे दिन आ रहे है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

परिकथेतील राजकुमार

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 22:38 नवीन
(अच्छे दिन आ रहे है!) तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, आमच्यासारख्यांच्या आयुष्यात नक्कीच अच्छे दिन येतील, असं वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तथास्तु!!!!

प्रीत-मोहर
Tue, 11/03/2015 - 07:04 नवीन
तथास्तु!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 22:33 नवीन
खूप छान. एवढया चांगल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुरेख............

एकप्रवासी
Mon, 11/02/2015 - 23:00 नवीन
कवितेची कल्पना आवडली ……….
  • Log in or register to post comments

एकप्रवासीजी धन्यवाद

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 23:26 नवीन
एकप्रवासीजी धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

कविता म्हणजे कवीने स्वता:वरून

बिन्नी
Tue, 11/03/2015 - 09:15 नवीन
कविता म्हणजे कवीने स्वता:वरून उतरून टाकलेला घास कविता म्हणजे उगीचच रसिकतेचा झालेला भास ! कविता म्हणजे गुरांपुढे टाकलेले खोटे गवत कविता म्हणजे.. इथे नको.. ख व त !!!:)
  • Log in or register to post comments

वा!:)

दमामि
Tue, 11/03/2015 - 16:32 नवीन
वा!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

=))

अजया
Tue, 11/03/2015 - 10:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा