Skip to main content

विहंग तो विहरता झाला...

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 20/12/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
विहंग तो विहरता झाला... =========================== . . तडफडला फडफडला पक्षी जीवाकांताने कळवळला.. साद घातली काळाला ने.. ने.. मजसी वदला.. . खुरडत खुरडत सरपटला भाजला.. सोलवटला.. प्राणासहीत निश्चल पडला वेदनांनी पिळवटला..! . मंद मंद धुगधूग जिवात.. जमले कावळे टोचण्या! घाबरला.. थरथरला.. हालला..! बळ एकवटून फडफडला.. . जागच्या जागी फरफटला.. खाल्ल्या दोन-चार गटांगळ्या..! ठुसठूसत्या पसरून पंखांना विहंग तो विहरता झाला... . . =========================== स्वाती फडणीस ......................... ०१-०४-०७
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1945
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जयेश माधव मातीत ते पसरले अतीरम्य प॑ख केले वरी उदर पा॑डुर निश्कल॑क या भा.रा.ता॑बे या॑च्या ओळी आठवल्या. सु॑दर प्रयत्न!!

In reply to by जयेश माधव

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले! ही कविता ना.वा.टिळक ह्यांची आहे (भा.रा.तांब्यांची नव्हे.) चतुरंग

काय हे भीषण काव्य, वाचून शहारा आला. @) अयाईईईई, :O स्वाती, काहीतरी प्रेम कविता वैगरे लिही फर्मास. >:D केवळ सुंदर ललनांचा, साखरांबा

ना.वा टिळकांची कविता आठवली.. "पक्षिणी" ना?? कविता छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/