Skip to main content

"माझ्या सोलापुरी मातीत..."

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य बोरकरांची मनापासून क्षमा मागून... आ. बाकिबाबांची मुळ कविता : माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या सोलापुरी मातीत गड्या आभाळ कोरडे वेशी-पेठांच्या मधुन मराठी कन्नड़ चौघडे !! माझ्या सोलापुरी मातीत भाषा विविधेची रास ओठी शिव्यांचे पाझर मनी माणुसकीचा वास !! माझ्या सोलापुरी मातीत 'रामपुरें'ची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसर जगीं प्रसिद्ध चादरी !! माझ्या सोलापुरी मातीत सदा उन्हाळ्याचा वारा अंगोपांगी खेळती रे उष्ण घामाच्या या धारा !! माझ्या सोलापुरी मातीत येते लावणी माहेराला कविवरांच्या वचनांनी भेटे लावण्य कवितेला !! माझ्या सोलापुरी मातीत शिव्या शब्दांचीच फ़ुले असे राकट रांगडा जीव मनापासून बोले !! माझ्या सोलापुरी मातीत (पद्म)साळ्यांचा रे 'माग' येते कबिराच्या दोह्यांनी साखरपेठेला रे जाग !! माझ्या सोलापुरी मातीत 'मना-मना'चे रे सोने आतिथ्याचे, अगत्याचे आम्हां लाभले हे 'देणे' !! – विकुबाब सोलापूरकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5842
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

शब्दाशब्दाशी सहमत (दिलखुलास सोलापुरी मित्र असलेला) बाप्या

सोलापुरी कानडी मराठी मोड़ ऑन विशाSSSSSssssल ... काSSssय लिहिलं रेSSSSSssss ते कविता तूSSSSSssss व्वा व्वा व्वा ! म्हणून गेलो की रेSSSSSssss मना तून..

माझ्या गावाचा मनुष्य जेव्हा भेटे दूर देशी दाटे जिव्हाळा मनीचा पापण्यांच्या कडांपाशी! कवितेला आज सोलापूर लाभले! सुंदर! फारच आवडली! Sandy

छान कविता

कविता आवडली! 'मसाला' या चित्रपटात असली सोलापुरी माणसे भेटतात. तुफान आवडलेला.

लगेच सोलापुरकर मैत्रीणीला लिंक पाठवली.

In reply to by शिव कन्या

खंडकाव्याचं बघू कधीतरी. तोपर्यंत हे गद्य घ्या .. रंग सोन्नलगीचे – अर्थात आमचं सोलापूर !

मस्त जमलंय विकु. (जोडीला बाब म्हणणे न म्हणणे ही नंतरची बाब)

हे कसलं बढिया आहे यार!मूळची बोरकरांची कविता तर एकदम नितळ!

अरे इशल्या. मै देख्याच नै तो ये. अपनी गावकी बातां और कैसे नजरंदाज हुई बोलतो मै. जानछोड. क्या लिखा है बावा. कस्समसे एकदम झबरद्स्तच. आ बेस मे. चाय पियेंगे. . कौन बोलके मत पूछ अब. मैच तो. अभ्या

In reply to by अभ्या..

आत्याच रे अग्ले म्हैनेमें. होर भी कुछ लोगा होना उदरकु. सबकु लेको आत्या मई. मिलत्येच इस बार ...