✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ये 'रेषेवरची अक्षरे' क्या हय?

र
रेषेवरची अक्षरे यांनी
Mon, 10/26/2015 - 12:05  ·  लेख
लेख
'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे. तशी अगदी नावागावापासून सुरुवात करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो. :) तर - इंटरनेटवर मराठीतून लिहिण्याची सोय होऊन, फ्याशन येऊन आणि त्याचा पायंडा पडूनही आता बर्‍यापैकी वर्षं लोटली. आधी ब्लॉग्स जोरात होते, मग मराठी संस्थळं येऊन स्थिरावली, लोक हळूहळू फेसबुकावर रमले आणि आता फेसबुकही स्थिरावून व्हॉट्सॅपकडे असूयेनं बघायला लागलंय. 'रेषेवरची अक्षरे' मात्र अगदी पहिल्या टप्प्यापासून मराठीतून लिहिणार्‍यांकडे लक्ष ठेवून होतं, आहे. आज पुस्तका-मासिकांतून भेटणारे काही लिहिते लोक 'रेषे'च्या जुन्या दोस्तांपैकी आहेत. २००८ साली 'रेषे'चा पहिला अंक निघाला. २०१२ सालापर्यंत आम्ही सलग वार्षिक दिवाळी अंक काढत होतो. तेव्हा ब्लॉगविश्व बहरलेलं होतं. तिथे लिहिल्या जाणार्‍या लेखनापैकी निवडक ललित लेखन एका ठिकाणी संकलित असावं, नवख्या वाचकाला इथल्या चांगल्या लेखकांची ओळख व्हावी, आडवाटेचे नवीन ब्लॉग्स हुडकता यावेत; असे अनेक हेतू होते. मग मराठी संस्थळं आली आणि एक नवाच व्हर्च्युअल सामाजिक अवकाश मिळाल्यासारखा झाला. तिथले वाद, चर्चा, थट्टा-मस्कर्‍या यांच्यात लोक रमले. ब्लॉग्स काहीसे थंडावले. आम्हीही थोडे पोटापाण्याच्या उद्योगात रमलो, संस्थळांवर उंडारलो. ब्लॉग्स आणि 'रेषेवरची अक्षरे' मागे पडली. यंदा आमच्या व्हर्च्युअल साहित्यप्रेमानं (विशेषणाची जागा तशी जोखमीची निवडली आहे, मान्य आहे!) पुन्हा उचल खाल्ली. ब्लॉग्स अजूनही तसे थंडावलेलेच आहेत. मराठी लोकांना संस्थळांचं ऐसपैस वातावरण काहीसं मानवलेलं दिसतं आहे. तिथे जोमानं आणि नवनवीन प्रयोगांसह ललित लिहिलं जाताना दिसतं आहे. वाचकही त्या मजकुराच्या वाचनीयतेत भर घालत आहेत, असं एक मजेशीर आणि आशादायक चित्र आहे. या सगळ्या अवकाशातल्या - ब्लॉग्स आणि फोरम्सही - गेल्या तीन वर्षांतल्या लेखनाचा ढांढोळा घ्यायचं आम्ही यंदा ठरवलं आहे. काही नव्या दोस्तांची मदत मागितलीय, काही जुन्यांना थडग्यातून लाथा घालून बाहेर आणलं आहे आणि कामाला लावलं आहे. कामाचा एकूण आवाका पाहून दडपण येतं आहे खरं. पण ते हवंच! या मंथनातून हाती लागलेले निवडक लेख 'रेषे'च्या यंदाच्या अंकात असतील. ब्लॉग आणि संस्थळं यांच्यावरच्या लेखनातली साम्यस्थळं आणि फरक (सोदाहरण!) तपासणारे काही लेख असतील. आणि खेरीज मराठी कवितेकडे काहीसा फेसबुकोत्तर नजरेतून टाकलेला एक दृष्टिक्षेप असेल. त्यात काही जाणते वितरक असतील, काही प्रकाशक, काही वाचक आणि अनेक कवी. तर - यंदाचा 'रेषेवरची अक्षरे'चा भरगच्च अंक नक्की वाचा, अशी शिफारस. भेटू - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, रेषेवरची अक्षरे'च्या ब्लॉगवर (reshakshare.blogspot.in)! ***
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
14300 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

रामराम रेरे. छान कल्पना आहे.

एस
Mon, 10/26/2015 - 12:12 नवीन
रामराम रेरे. छान कल्पना आहे. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्स एस. यंदाचा अंक नक्की

रेषेवरची अक्षरे
Mon, 10/26/2015 - 12:19 नवीन
धन्स एस. यंदाचा अंक नक्की वाचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

रेषेवरची अक्षरे परत आलेली

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/26/2015 - 12:28 नवीन
रेषेवरची अक्षरे परत आलेली पाहून अत्यंत आनंद झाला आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हाबार्स! तुम्ही अगदी

रेषेवरची अक्षरे
Mon, 10/26/2015 - 12:34 नवीन
हाबार्स! तुम्ही अगदी पहिल्यावहिल्या शुभेच्छुकांपैकी एक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बरं. वाचेन.

बिन्नी
Mon, 10/26/2015 - 13:46 नवीन
बरं. वाचेन.
  • Log in or register to post comments

वाचूच!!

सूड
Mon, 10/26/2015 - 14:44 नवीन
वाचूच!!
  • Log in or register to post comments

आभार बिन्नी आणि सूड. :)

रेषेवरची अक्षरे
Mon, 10/26/2015 - 14:51 नवीन
आभार बिन्नी आणि सूड. :)
  • Log in or register to post comments

प्रतीक्षेत!शुभेच्छा आणि

अजया
Mon, 10/26/2015 - 15:08 नवीन
प्रतीक्षेत!शुभेच्छा आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

तुम्ही तोवर जुने अंक चाळू

रेषेवरची अक्षरे
Mon, 10/26/2015 - 15:28 नवीन
तुम्ही तोवर जुने अंक चाळू शकता... ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या कल्पनांचंही.
  • Log in or register to post comments

नक्की!

अजया
Wed, 10/28/2015 - 12:30 नवीन
नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेषेवरची अक्षरे

वाचन-आमंत्रणासाठी धन्यवाद.

सस्नेह
Mon, 10/26/2015 - 15:47 नवीन
वाचन-आमंत्रणासाठी धन्यवाद. नक्की वाचू. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मस्त साठा मिळालाय. धन्यवाद

खटपट्या
Mon, 10/26/2015 - 20:21 नवीन
मस्त साठा मिळालाय. धन्यवाद रेषेवरची अक्षरे
  • Log in or register to post comments

ब्लॅाग मागे पडले कारण

कंजूस
Mon, 10/26/2015 - 20:36 नवीन
ब्लॅाग मागे पडले कारण जीवंतपणा गेला. भूल दिलेला रुग्ण अधूनमधून कण्हतो आणि झोपतो तसं झालं.सातत्य आणि एकच लेखक चांगलं लिहिल याची खात्री नाही.शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

ब्लॉग वरच्या दोन कविता

जव्हेरगंज
Mon, 10/26/2015 - 21:06 नवीन
ब्लॉग वरच्या दोन कविता वाचल्या. वारलो. भन्नाट....! :)
  • Log in or register to post comments

खटपट्या, :) वाचा, वाचा!

रेषेवरची अक्षरे
Mon, 10/26/2015 - 23:16 नवीन
खटपट्या, :) वाचा, वाचा! कंजूस, असं काही नाही अहो. राजचा ब्लॉग घ्या. नाहीतर संवेदचा ब्लॉग घ्या. मेरा कुछ सामान घ्या. श्रद्धा भोवडचा ब्लॉग घ्या. हे लोक लिहितातच आहेत की सातत्यानं. असे लोक कमी आहेत हे खरंच आहे. पण ते माहीत व्हावेत, म्हणून तर रेषेवरची अक्षरेसारखा उपक्रम... जव्हेरगंज, वारलात म्हणजे?! इतक्या वाईट होत्या?! की चांगल्या होत्या? छ्या! स्तुती कोड्यात नको बॉ!
  • Log in or register to post comments

आवड्या आवड्या!

जव्हेरगंज
Mon, 10/26/2015 - 23:22 नवीन
आवड्या आवड्या! अहो खाली भन्नाट पण लिवलय की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेषेवरची अक्षरे

हां! :)

रेषेवरची अक्षरे
Mon, 10/26/2015 - 23:44 नवीन
हां! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

पुनश्च हरी ओम

रामदास
Tue, 10/27/2015 - 11:02 नवीन
स्वागत आहे. आंतरजालावर प्रचारही होत आहे. वाचकांची संख्या वाढत जावी ही सदीच्छा.
  • Log in or register to post comments

आभार!

रेषेवरची अक्षरे
Tue, 10/27/2015 - 12:24 नवीन
आभार! (खवचटपणे) तुम्ही काय ब्लॉग अपडेटवून नका हो पण... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हा अंक नक्कीच वाचेन.

किसन शिंदे
Tue, 10/27/2015 - 12:45 नवीन
हा अंक नक्कीच वाचेन.
  • Log in or register to post comments

स्वागत

आतिवास
Tue, 10/27/2015 - 12:54 नवीन
आहे. स्वगत: आंतरजालावरील जुनी-जाणती रेषा नवख्या सभासदांसारखी प्रत्येक प्रतिसादाला उत्तर का बरं देत असेल? ;-)
  • Log in or register to post comments

उत्तम!!! जरूर वाचणार. येथे

शिव कन्या
Tue, 10/27/2015 - 18:54 नवीन
उत्तम!!! जरूर वाचणार. येथे त्यावरच्या लेखासह धागा टाकलात तर बरे!
  • Log in or register to post comments

अंक प्रसिद्ध झाल्यावर

रेषेवरची अक्षरे
Wed, 10/28/2015 - 12:23 नवीन
अंक प्रसिद्ध झाल्यावर लेखांच्या लिंकांसह इथे जरूर अपडेट करू, नक्की वाचा. बाकी आतिवास, अहो, आमचा ’रिक्षा फिरवणे मोड’ ऑन आहे ना सध्या! म्हणून उत्साहात जमेल त्या त्या प्रतिसादाला उत्तर. ;-)
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
Wed, 10/28/2015 - 15:42 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेषेवरची अक्षरे

नावामागचं कारण काये या?

अनुप ढेरे
Wed, 10/28/2015 - 15:19 नवीन
नावामागचं कारण काये या? रेषेवरची अक्षरे ही तर विंग्रजी अस्त्यात ना?
  • Log in or register to post comments

रेषेवरची अक्षरे ही तर

रेषेवरची अक्षरे
Wed, 10/28/2015 - 15:37 नवीन
रेषेवरची अक्षरे ही तर विंग्रजी अस्त्यात ना?
कशी काय? 'रेषेवरची अक्षरे' म्हणजे चक्क ’online alphabets’. थोडक्यात, जालावर - इंटरनेटवर - लिहिलं जाणारं अक्षर वाङ्मय - पक्षी: ललित साहित्य - ते म्हणजे 'रेषेवरची अक्षरे'. आता 'एका विशिष्ट रेषेच्या वरचा दर्जा असलेलं' असंही म्हणता येतंच. पण ते वाचकांनी म्हटलं, तर गंमत आहे, नाही का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

online alphabets = रेषेवरची

अनुप ढेरे
Wed, 10/28/2015 - 15:55 नवीन
online alphabets = रेषेवरची अक्षरे हे मिसलं मी. खुलाश्याबद्दल धन्यवाद. विंग्रजी अक्षरे ओळीवर लिहितात त्यामुळे मी कंफ्यूज झालो.
आता 'एका विशिष्ट रेषेच्या वरचा दर्जा असलेलं' असंही म्हणता येतंच. पण ते वाचकांनी म्हटलं, तर गंमत आहे, नाही का?
आम्ही तर म्हणतो ब्वॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेषेवरची अक्षरे

अंकाच्या प्रतिक्षेत!

दमामि
Wed, 10/28/2015 - 16:02 नवीन
अंकाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

शुभ दीपावली!

रेषेवरची अक्षरे
Wed, 11/04/2015 - 08:47 नवीन
शुभ दीपावली! यंदाच्या अंकाचं टप्प्याटप्प्यानं प्रकाशन करतो आहोत. ब्लॉगवर जाऊन (http://reshakshare.blogspot.in/) नक्की पाहा, प्रतिक्रिया द्या, सूचना कळवा... फेसबुकावर असाल, तर लाईक करा...
  • Log in or register to post comments

सवडीने वाचेन. तुर्तास अभिनंदन

ब्रिटिश टिंग्या
Wed, 11/04/2015 - 09:22 नवीन
सवडीने वाचेन. तुर्तास अभिनंदन! - टिंग्या
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!!

बॅटमॅन
Wed, 11/04/2015 - 11:50 नवीन
अभिनंदन!!!!
  • Log in or register to post comments

नुसतं हाबिनंदन नको लोकहो!

रेषेवरची अक्षरे
Wed, 11/04/2015 - 12:26 नवीन
नुसतं हाबिनंदन नको लोकहो! वाचा नि प्रतिक्रिया कळवा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

अभ्या..
Wed, 11/04/2015 - 12:42 नवीन
अभिनंदन. प्रतिक्रिया कळवल्या व वाचल्या जातील ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

मुक्त विहारि
Wed, 11/04/2015 - 15:12 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुमीत भातखंडे
Wed, 11/04/2015 - 18:51 नवीन
नक्की वाचू.
  • Log in or register to post comments

Abhinandan!

यशोधरा
Wed, 11/04/2015 - 19:09 नवीन
Abhinandan! Nandanchaa lekh aahe ka?
  • Log in or register to post comments

Nandanchaa

रामदास
Wed, 11/04/2015 - 19:42 नवीन
मी नंदनचाचा वाचलं !!
  • Log in or register to post comments

Ramdaskaka _/\_ :)

यशोधरा
Wed, 11/04/2015 - 19:59 नवीन
Ramdaskaka _/\_ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

नंदन'चाचां'नी इतक्यात नवीन

रेषेवरची अक्षरे
गुरुवार, 11/05/2015 - 09:39 नवीन
नंदन'चाचां'नी इतक्यात नवीन काही लिहिलं आहे का?! तुम्हांला सापडलं असेल, तर आम्हांलाही कळवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नंदनचाचांना लिहायला लावेल

यशोधरा
गुरुवार, 11/05/2015 - 17:24 नवीन
नंदनचाचांना लिहायला लावेल त्याला मी २० गावं इनाम द्यायला तयार आहे. किंवा नंदनचाचांनी स्वतःहून लिहिलं तर अख्खं कॅलिफोर्निया देईन त्यांना! पण रामा, शिवा, गोविंदा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेषेवरची अक्षरे

टप्प्याटप्प्यानं प्रकाशन

रामदास
Wed, 11/04/2015 - 20:17 नवीन
वाचतो आहे. मुखपृष्ठ व शीर्षचित्र अक्षरलेखन आवडलं. Masthead कडकडीत झाला आहे.
  • Log in or register to post comments

अर्रे! सगळ्यांचे आभार... :)

रेषेवरची अक्षरे
गुरुवार, 11/05/2015 - 07:35 नवीन
अर्रे! सगळ्यांचे आभार... :)
  • Log in or register to post comments

आभार मंडळी! आज ललित विभागातले

रेषेवरची अक्षरे
गुरुवार, 11/05/2015 - 08:39 नवीन
आभार मंडळी! आज ललित विभागातले इतर काही लेख आणि 'तुम्ही (नेटावर) काय लिहिता?' (http://reshakshare.blogspot.in/p/blog-page_0.html) हा छोटेखानी विभाग प्रसिद्ध झाला आहे. ब्लॉग्स खरे की फोरम खरे? आणि काय बरे? का बरे?! नक्की वाचा...
  • Log in or register to post comments

ओके!

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/05/2015 - 22:21 नवीन
तुम्ही आमच्या मचाकचा दिवाळी अंक वाचलात, तर आम्ही पण तुमचा वाचू.
  • Log in or register to post comments

अरे! आम्ही 'मचाक' वाचतोच!

रेषेवरची अक्षरे
Fri, 11/06/2015 - 08:03 नवीन
अरे! आम्ही 'मचाक' वाचतोच! त्याला आग्रह कशाला हवा? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

या वर्षीचा आलाय का?

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 14:36 नवीन
या वर्षीचा आलाय का? (मचाकप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खरंच मचाकचा दिवाळी अंक असतो

आदूबाळ
Fri, 11/06/2015 - 15:12 नवीन
खरंच मचाकचा दिवाळी अंक असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दरवर्षीचं माहिती नाही, परंतु

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 15:57 नवीन
दरवर्षीचं माहिती नाही, परंतु किमान एका वर्षी तरी विशेषांक निघालेला पाहिला आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आजच 'कवितेची गोष्ट'च्या

रेषेवरची अक्षरे
Fri, 11/06/2015 - 08:03 नवीन
आजच 'कवितेची गोष्ट'च्या प्रकाशनाला सुरुवात केली. इतर काही ललित लेखही प्रकाशित केले आहेत. नक्की वाचा नि कळवा... :)
  • Log in or register to post comments

हा ब्लॉग सध्या बंद का आहे ?

सस्नेह
Tue, 04/03/2018 - 16:51 नवीन
हा ब्लॉग सध्या बंद का आहे ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा