'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे. तशी अगदी नावागावापासून सुरुवात करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो. :)
तर - इंटरनेटवर मराठीतून लिहिण्याची सोय होऊन, फ्याशन येऊन आणि त्याचा पायंडा पडूनही आता बर्यापैकी वर्षं लोटली. आधी ब्लॉग्स जोरात होते, मग मराठी संस्थळं येऊन स्थिरावली, लोक हळूहळू फेसबुकावर रमले आणि आता फेसबुकही स्थिरावून व्हॉट्सॅपकडे असूयेनं बघायला लागलंय. 'रेषेवरची अक्षरे' मात्र अगदी पहिल्या टप्प्यापासून मराठीतून लिहिणार्यांकडे लक्ष ठेवून होतं, आहे. आज पुस्तका-मासिकांतून भेटणारे काही लिहिते लोक 'रेषे'च्या जुन्या दोस्तांपैकी आहेत.
२००८ साली 'रेषे'चा पहिला अंक निघाला. २०१२ सालापर्यंत आम्ही सलग वार्षिक दिवाळी अंक काढत होतो. तेव्हा ब्लॉगविश्व बहरलेलं होतं. तिथे लिहिल्या जाणार्या लेखनापैकी निवडक ललित लेखन एका ठिकाणी संकलित असावं, नवख्या वाचकाला इथल्या चांगल्या लेखकांची ओळख व्हावी, आडवाटेचे नवीन ब्लॉग्स हुडकता यावेत; असे अनेक हेतू होते. मग मराठी संस्थळं आली आणि एक नवाच व्हर्च्युअल सामाजिक अवकाश मिळाल्यासारखा झाला. तिथले वाद, चर्चा, थट्टा-मस्कर्या यांच्यात लोक रमले. ब्लॉग्स काहीसे थंडावले. आम्हीही थोडे पोटापाण्याच्या उद्योगात रमलो, संस्थळांवर उंडारलो.
ब्लॉग्स आणि 'रेषेवरची अक्षरे' मागे पडली.
यंदा आमच्या व्हर्च्युअल साहित्यप्रेमानं (विशेषणाची जागा तशी जोखमीची निवडली आहे, मान्य आहे!) पुन्हा उचल खाल्ली. ब्लॉग्स अजूनही तसे थंडावलेलेच आहेत. मराठी लोकांना संस्थळांचं ऐसपैस वातावरण काहीसं मानवलेलं दिसतं आहे. तिथे जोमानं आणि नवनवीन प्रयोगांसह ललित लिहिलं जाताना दिसतं आहे. वाचकही त्या मजकुराच्या वाचनीयतेत भर घालत आहेत, असं एक मजेशीर आणि आशादायक चित्र आहे. या सगळ्या अवकाशातल्या - ब्लॉग्स आणि फोरम्सही - गेल्या तीन वर्षांतल्या लेखनाचा ढांढोळा घ्यायचं आम्ही यंदा ठरवलं आहे. काही नव्या दोस्तांची मदत मागितलीय, काही जुन्यांना थडग्यातून लाथा घालून बाहेर आणलं आहे आणि कामाला लावलं आहे. कामाचा एकूण आवाका पाहून दडपण येतं आहे खरं. पण ते हवंच!
या मंथनातून हाती लागलेले निवडक लेख 'रेषे'च्या यंदाच्या अंकात असतील. ब्लॉग आणि संस्थळं यांच्यावरच्या लेखनातली साम्यस्थळं आणि फरक (सोदाहरण!) तपासणारे काही लेख असतील. आणि खेरीज मराठी कवितेकडे काहीसा फेसबुकोत्तर नजरेतून टाकलेला एक दृष्टिक्षेप असेल. त्यात काही जाणते वितरक असतील, काही प्रकाशक, काही वाचक आणि अनेक कवी.
तर - यंदाचा 'रेषेवरची अक्षरे'चा भरगच्च अंक नक्की वाचा, अशी शिफारस.
भेटू - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, रेषेवरची अक्षरे'च्या ब्लॉगवर (reshakshare.blogspot.in)!
***
वाचने
14331
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
रामराम रेरे. छान कल्पना आहे.
धन्स एस. यंदाचा अंक नक्की
In reply to रामराम रेरे. छान कल्पना आहे. by एस
रेषेवरची अक्षरे परत आलेली
हाबार्स! तुम्ही अगदी
In reply to रेषेवरची अक्षरे परत आलेली by बिपिन कार्यकर्ते
बरं. वाचेन.
वाचूच!!
आभार बिन्नी आणि सूड. :)
प्रतीक्षेत!शुभेच्छा आणि
तुम्ही तोवर जुने अंक चाळू
नक्की!
In reply to तुम्ही तोवर जुने अंक चाळू by रेषेवरची अक्षरे
वाचन-आमंत्रणासाठी धन्यवाद.
मस्त साठा मिळालाय. धन्यवाद
ब्लॅाग मागे पडले कारण
ब्लॉग वरच्या दोन कविता
खटपट्या, :) वाचा, वाचा!
आवड्या आवड्या!
In reply to खटपट्या, :) वाचा, वाचा! by रेषेवरची अक्षरे
हां! :)
In reply to आवड्या आवड्या! by जव्हेरगंज
पुनश्च हरी ओम
आभार!
In reply to पुनश्च हरी ओम by रामदास
हा अंक नक्कीच वाचेन.
स्वागत
उत्तम!!! जरूर वाचणार. येथे
अंक प्रसिद्ध झाल्यावर
:-)
In reply to अंक प्रसिद्ध झाल्यावर by रेषेवरची अक्षरे
नावामागचं कारण काये या?
रेषेवरची अक्षरे ही तर
In reply to नावामागचं कारण काये या? by अनुप ढेरे
online alphabets = रेषेवरची
In reply to रेषेवरची अक्षरे ही तर by रेषेवरची अक्षरे
अंकाच्या प्रतिक्षेत!
शुभ दीपावली!
सवडीने वाचेन. तुर्तास अभिनंदन
अभिनंदन!!!!
नुसतं हाबिनंदन नको लोकहो!
अभिनंदन.
अभिनंदन....
अभिनंदन
Abhinandan!
Nandanchaa
Ramdaskaka _/\_ :)
In reply to Nandanchaa by रामदास
नंदन'चाचां'नी इतक्यात नवीन
In reply to Ramdaskaka _/\_ :) by यशोधरा
नंदनचाचांना लिहायला लावेल
In reply to नंदन'चाचां'नी इतक्यात नवीन by रेषेवरची अक्षरे
टप्प्याटप्प्यानं प्रकाशन
अर्रे! सगळ्यांचे आभार... :)
आभार मंडळी! आज ललित विभागातले
ओके!
अरे! आम्ही 'मचाक' वाचतोच!
In reply to ओके! by परिकथेतील राजकुमार
या वर्षीचा आलाय का?
In reply to ओके! by परिकथेतील राजकुमार
खरंच मचाकचा दिवाळी अंक असतो
In reply to या वर्षीचा आलाय का? by बॅटमॅन
दरवर्षीचं माहिती नाही, परंतु
In reply to खरंच मचाकचा दिवाळी अंक असतो by आदूबाळ
आजच 'कवितेची गोष्ट'च्या
हा ब्लॉग सध्या बंद का आहे ?