✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आप-मतलबी

व
विकास यांनी
Wed, 08/26/2015 - 01:55  ·  लेख
लेख
आप बद्दल आता अजून काही बोलायचे राहीले नाही असे वाटत असतानाच अचानक दोन गोष्टी नव्याने आल्यात. एक प्रत्यक्ष आणि दुसरी किमान वरकरणी अप्रत्यक्ष... दुसरी अधिक गंभीर आहे. दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला, त्या मुलाला अटक देखील झाली, जरी त्याला आता जामिनावर सोडले असले तरी. त्यावरून टाईम्स नाऊ वगैरेने आकांडतांडव करत जनतेच्या भावना (त्या मुला विरोधात) भडकवण्याचे काम केले आहे असे देखील दिसत आहे. मात्र नंतर जे बाहेर आले ते वेगळेच होते. एका वयाने मोठी दिसत असलेल्या एका व्यक्तीने "आंखो देखा हाल" सांगितला त्याप्रमाणे तो मुलगा तिच्या जवळ देखील गेला नाही. आणि ती मुलगी मात्र आरडाओरडा करत होती. त्याला त्या मुलीची अथवा मुलाची ओळख नव्हती. त्याने झी टिव्हीवर दिलेल्या मुलाखतीत जे शेवटी म्हणले ते महत्वाचे वाटले... असे जर खोटे मुली बोलू लागल्या आणि ते प्रकाशात आले तर नंतर जेंव्हा खरेच एखादीस गरज असेल तेंव्हा जनता विश्वास ठेवणार नाही आणि दुर्लक्ष करेल... अर्थात त्याचे या आप समर्थकांना काय पडलेय? दुसरा भाग जास्त महत्वाचा आणि गंभीर वाटतो. गुजरातेत विशीच्या सुरवातीत असलेल्या एका युवकाने हार्दीक पटेल याने पटेल-पाटीदार समाजाला ओबिसी घोषित करून राखीव जागा मिळाव्यात म्हणून आंदोलन सुरू केले आहे. त्यातून थोडा भडका उडालेला आहेच पण तो अजून मोठा होण्याची शक्यता आहे. पण त्याचे त्याला काही नाही. वरकरणी तो भाजपाला पुढच्या निवडणुकात हराल असा दम देत आहे. हे प्रकरण अधिक गंभीर अशा साठी आहे कारण "भाजपाचे" म्हणून सरकारला ब्लॅकमेल करत असताना जनतेला आणि अगदी एका विशिष्ठ पटेल समाजाला देखील वेठीला धरणे चालू आहे. हे खचीतच योग्य नाही. पण कोण आहे हा हार्दीक पटेल? जेंव्हा जरा शोधले तेंव्हा त्याचे पान २०१४ चे ट्विटरचे अकाउंट मिळाले आणि त्यात त्याने केलेले आपचे समर्थन देखील दिसले...खालील दोन ट्वीट्स या प्रातिनिधीक आहेत.

सपने सच होगे आम आदमी पार्टी को लाना

— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 27, 2014

Gujarat AAM AADMI PARTY Conviner Shukhadev Patel Pe Humla Huva. Dekhiye Yeh He Aam aadmi ki Halat... Yeh bhajap ki kartut he....

— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 3, 2014
यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे. ज्या पध्द्तीने यांचे "आप-मतलबी" राजकारण आता जनतेत जातीवरून फूट पाडण्याचा आणि भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघता सत्तेसाठी देश फोडायला पण आम्ही मागेपुढे बघणार नाही हा हीन उद्देश दिसत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33734 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

:)

विकास
गुरुवार, 09/03/2015 - 23:02 नवीन
आपले चरण कमल कुठे आहेत, यात "कमल" हा शब्द योगायोगाने आला आहे का? ;) (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

धाग्याचं शतक झाल्याबद्दल

प्यारे१
Sat, 09/12/2015 - 13:13 नवीन
धाग्याचं शतक झाल्याबद्दल विकासरावांना पट्ट्याच्या पितळी बक्कलला चमक येण्यासाठी पॉलिश आणि तांब्याचं बिगुल (अर्ध्या किंमतीत), श्रीगुरुजींना बंच ऑफ थॉट्स च्या नवी आवृत्ती च्या १० प्रति (तुमच्या भेटीला येणारांना वाटण्यासाठी. तुमचंच लिखाण तुम्हीच वाचा) नांदेडीयनना ट्विट्टरचं नवं अकाऊंट उघडण्यासाठी नेट कॅफे चा मासिक पास. कपिलमुनी आणि माईसाहेबांना अनुक्रमे 'मी कपिल' आणि 'मीच ह्यांची लाडकी' असं लिहीलेल्या टोप्या देऊन सत्कार करण्यात येत आहे. - अखिलमिपाझालंशतककीकरसत्कारसमितीसचिव
  • Log in or register to post comments

धन्यवाद+१

नाखु
Sat, 09/12/2015 - 13:43 नवीन
तरीच जेप्या म्हणत होता "आज मी निवांत आहे म्हणून" कृपया "माई" टोपी वर नाव पूर्ण लिहिणे संक्षीप्त नको "घोळ" होईल. -अखिलमिपाझालंशतककीकरसत्कारसमितीसचिव खुलासा सचीव क्र २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अन्ना हजारे

Ram ram
Sat, 09/12/2015 - 16:05 नवीन
अन्ना हजारे मस्त खाउन पिउन तब्बेत बनवतो। मग वजन वाढल्यावर उपोषण करतो। त्यापेक्षा त्याने साने गुरुजींचा अादर्श घ्यावा।
  • Log in or register to post comments

अन्ना हजारे

Ram ram
Sat, 09/12/2015 - 16:05 नवीन
अन्ना हजारे मस्त खाउन पिउन तब्बेत बनवतो। मग वजन वाढल्यावर उपोषण करतो। त्यापेक्षा त्याने साने गुरुजींचा अादर्श घ्यावा।
  • Log in or register to post comments

कांदे नवमी...

विकास
Sun, 09/20/2015 - 20:55 नवीन
गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता! Image removed.
  • Log in or register to post comments

गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी

श्रीगुरुजी
Mon, 09/21/2015 - 13:41 नवीन
गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता!
यात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ४० रू. प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन ३० रू. किलो भावाने विकले ही आआपची शुद्ध थाप आहे. अर्थात थापा मारणे, खोटे बोलणे, खोटे आरोप करणे, कांगावा करणे इ. गोष्टी आआपची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यामुळे या थापेबाजीत काहीच आश्चर्य नाही. आता दुसरा मुद्दा. कांदे घेताना १५ रू. प्रतिकिलो दराने घेतले असतील. परंतु त्यानंतर मालाची साठवण, वाहतूक, ५-१० टक्के खराब माल निघणे इ. ची किंमत विकताना वाढविली तर विकताना ३० रू. प्रतिकिलो दराने विकणे रास्त वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय.

श्रीगुरुजी
Tue, 10/27/2015 - 12:59 नवीन
हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय. http://www.thehindu.com/news/national/other-states/gujarat-hc-upholds-sedition-charge-against-hardik/article7809310.ece?homepage=true अतिशहाणपणा करायला गेल्यावर शिक्षा मिळणारच. आता म्हणे त्याच्या समर्थकांनी धमकी दिली आहे की पटेलांना आरक्षण दिले नाही तर आम्ही धर्म बदलू. एकंदरीत हा हार्दिक पटेल आणि त्याचे समर्थक म्हणजे अत्यंत उथळ आणि गुंडगिरी करणारे टगे आहेत. बहुतेक कोणी तरी उचकावल्याने, नरेंद्र मोदी व गुजरातमधील भाजपला अडचणीत आणण्यासाठी त्याने हा उद्योग केला असावा आणि आता तो चांगलाच गोत्यात आला आहे.
  • Log in or register to post comments

खरे आहे...

विकास
Tue, 10/27/2015 - 19:53 नवीन
अतिशहाणपणा नसून सगळे कुठेतरी व्यवस्थित योजले जात आहे असे वाटते. बाकी धर्म बदलला तर राखीव जागा कशा मिळणार त्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बोलविता धनि

रमेश आठवले
Tue, 10/27/2015 - 20:01 नवीन
कॉंग्रेस त्याला आर्थिक मदत करत असल्याची खबर आहे. तसेच कॉंग्रेस आता पटेल आरक्षणाला पाठींबा देत असल्याचे दिसते. तेथील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी लवकरच होणार आहेत. त्यात या युतीचा प्रभाव काय होतो ते दिसेल. एका गुजराती मित्राने हार्दिक चे वर्णन ' चिबावला' या शब्दाने केले. मला या शब्दा साठी मराठी शब्द सुचत नाहीये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा