Skip to main content

आप-मतलबी

लेखक विकास यांनी बुधवार, 26/08/2015 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आप बद्दल आता अजून काही बोलायचे राहीले नाही असे वाटत असतानाच अचानक दोन गोष्टी नव्याने आल्यात. एक प्रत्यक्ष आणि दुसरी किमान वरकरणी अप्रत्यक्ष... दुसरी अधिक गंभीर आहे. दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला, त्या मुलाला अटक देखील झाली, जरी त्याला आता जामिनावर सोडले असले तरी. त्यावरून टाईम्स नाऊ वगैरेने आकांडतांडव करत जनतेच्या भावना (त्या मुला विरोधात) भडकवण्याचे काम केले आहे असे देखील दिसत आहे. मात्र नंतर जे बाहेर आले ते वेगळेच होते. एका वयाने मोठी दिसत असलेल्या एका व्यक्तीने "आंखो देखा हाल" सांगितला त्याप्रमाणे तो मुलगा तिच्या जवळ देखील गेला नाही. आणि ती मुलगी मात्र आरडाओरडा करत होती. त्याला त्या मुलीची अथवा मुलाची ओळख नव्हती. त्याने झी टिव्हीवर दिलेल्या मुलाखतीत जे शेवटी म्हणले ते महत्वाचे वाटले... असे जर खोटे मुली बोलू लागल्या आणि ते प्रकाशात आले तर नंतर जेंव्हा खरेच एखादीस गरज असेल तेंव्हा जनता विश्वास ठेवणार नाही आणि दुर्लक्ष करेल... अर्थात त्याचे या आप समर्थकांना काय पडलेय? दुसरा भाग जास्त महत्वाचा आणि गंभीर वाटतो. गुजरातेत विशीच्या सुरवातीत असलेल्या एका युवकाने हार्दीक पटेल याने पटेल-पाटीदार समाजाला ओबिसी घोषित करून राखीव जागा मिळाव्यात म्हणून आंदोलन सुरू केले आहे. त्यातून थोडा भडका उडालेला आहेच पण तो अजून मोठा होण्याची शक्यता आहे. पण त्याचे त्याला काही नाही. वरकरणी तो भाजपाला पुढच्या निवडणुकात हराल असा दम देत आहे. हे प्रकरण अधिक गंभीर अशा साठी आहे कारण "भाजपाचे" म्हणून सरकारला ब्लॅकमेल करत असताना जनतेला आणि अगदी एका विशिष्ठ पटेल समाजाला देखील वेठीला धरणे चालू आहे. हे खचीतच योग्य नाही. पण कोण आहे हा हार्दीक पटेल? जेंव्हा जरा शोधले तेंव्हा त्याचे पान २०१४ चे ट्विटरचे अकाउंट मिळाले आणि त्यात त्याने केलेले आपचे समर्थन देखील दिसले...खालील दोन ट्वीट्स या प्रातिनिधीक आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे. ज्या पध्द्तीने यांचे "आप-मतलबी" राजकारण आता जनतेत जातीवरून फूट पाडण्याचा आणि भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघता सत्तेसाठी देश फोडायला पण आम्ही मागेपुढे बघणार नाही हा हीन उद्देश दिसत आहे.

वाचने 33816
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

>>> गुजरातमध्ये एवढा मोठा आंदोलन चालू आहे. १० हून जास्त लोका मेली आहेत . कित्येक जखमी आहे. शांतता राखण्यासाठी आर्मी बोलावली आहे, परंतु मिडीया कव्हरेज नाही. त्या आंदोलनाचा जोर फक्त २ दिवस होता. त्यानंतर ते थंड झाले आहे.

माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार. पण अर्थातच भक्तांसाठी हे मॉर्फ वगैरे केलेले व्हिडिओ असतील, किंवा पटेल समाजातले काही लोक पोलिसांच्या वर्दीत येऊन स्वतःच्या गाड्यांची तोडफोड करत असतील. असो, मिपावर मी परमभक्तांच्या (‘भक्त’ ही जमात आता नामशेष झाली आहे.) नादी लागणार नाहीये हे दोन-तीन वेळा सांगून झाले आहे. त्यातल्या त्यात श्री. गुरूजींसारख्या महान व्यक्तीच्या नादी तर मुळीच नाही लागणार मी. मी अक्षरशः गुडघे टेकलेत त्यांच्यापुढे. तरीही हार्दिक पटेलच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन मी स्वतः घेतलेले स्क्रिनशॉट्स इथे शेअर करतो. (या धाग्यावर बरेच जण नि:पक्षपाती वाटले म्हणून.) ज्यांना हे फोटो खोटे वाटत असतील, त्यांनी स्वतःचा थोडा वेळ खर्ची घालून हार्दिक पटेलच्या प्रोफाईलवर चक्कर मारून यावी. गुजरात पोलिसांचे अजून काही व्हिडिओ. https://www.youtube.com/watch?v=1j9XHorJdDc https://www.youtube.com/watch?v=RmNmGgou4lE https://www.youtube.com/watch?v=0NcAmgQmrv4

In reply to by नांदेडीअन

पण अर्थातच भक्तांसाठी हे मॉर्फ वगैरे केलेले व्हिडिओ असतील, किंवा पटेल समाजातले काही लोक पोलिसांच्या वर्दीत येऊन स्वतःच्या गाड्यांची तोडफोड करत असतील.
व्हिडिओ मॉर्फ करणे किंवा २-३ वेगवेगळ्या चित्रफिती तयार करून एक नवीन बनावट चित्रफीत तयार करणे या क्षेत्रात आआपला तोड नाही. काही दिवसांपूर्वीच तुम्ही दिलीप पांडेवर पोलिसांनी व्हॅन घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची चित्रफीत टाकली होती. ती चित्रफीत बनावट असल्याचे मी दाखवून दिल्यावर तुम्ही कोणताही प्रतिवाद न करता त्या धाग्यावरून पलायन केले.
मिपावर मी परमभक्तांच्या (‘भक्त’ ही जमात आता नामशेष झाली आहे.) नादी लागणार नाहीये हे दोन-तीन वेळा सांगून झाले आहे. त्यातल्या त्यात श्री. गुरूजींसारख्या महान व्यक्तीच्या नादी तर मुळीच नाही लागणार मी. मी अक्षरशः गुडघे टेकलेत त्यांच्यापुढे.
तुमच्यासारख्या आंधळ्या आआपभक्तांनी आआप आणि केजरीवालांचा जो खोटा प्रचार चालविला आहे, तो मी सबळ पुराव्यानिशी खोडून काढतो आणि त्यामुळेच तुम्हाला गुडघे टेकायची वेळ येते.
तरीही हार्दिक पटेलच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन मी स्वतः घेतलेले स्क्रिनशॉट्स इथे शेअर करतो. (या धाग्यावर बरेच जण नि:पक्षपाती वाटले म्हणून.)
त्या स्क्रीनशॉट्समधून काय सिद्ध होते किंवा काय निष्कर्ष निघतो तेही सांगा.

In reply to by नांदेडीअन

त्याचे चेपुचे पान पाहीले तर वरील पैकी एकच फोटो दिसतो जो त्याने कुठल्याही कॉमेंटविना ऑगस्ट २४ ला अपलोडकेला आहे असे दिसते... त्याचे प्रोफाईल बघायचा गेलो तर खालील अजून एक "इंटरेष्टीग" फोटो दिसला... ;) Hardik तसेच त्याच्या वॉलवर ऑगस्टच्या आधीचे काहीच का दिसत नाही ते कळले नाही....

गेल्या २-३ वर्षात आम आदमी पक्ष आणि त्यातील केजरीवाल, आशुतोष, संजय सिंग इ. नेते यांच्या संबंधित मी काही गोष्टी नोटिस केल्यात, त्या अशा.... १. या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि अंधभक्त आयुष्यात कधी खरे बोलतात का? २. या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांना कोणत्याही पुराव्याशिवाय दुसर्‍यावर कायम खोटे आरोप का करावेसे वाटतात? ३. केजरीवाल आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून स्वतःला जाहीररित्या चारचौघात थोबाडीत का मारून घेतात आणि स्वतःवर शाई का शिंपडून घेतात? असे झाल्यावर प्रत्येक वेळी ते भाजपवरच का आरोप करतात? या प्रकारामागे आआपचेच कार्यकर्ते होते हे प्रत्येकवेळी सिद्ध झाल्यावर आपण खोटे बोललो हे मान्य करून ते भाजपची माफी का मागत नाहीत? ४. दिल्ली विधानसभेत ७० पैकी तब्बल ६७ जागा मिळूनसुद्धा आआपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांना नौटंकी करण्याची काय गरज आहे? ५. या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि अंधभक्त नौटंकी करतच राहणार आहेत का? नौटंकी करणे कधीच थांबविणार नाहीत का? ६. राजस्थानमधील २७ एकर जमिनीचा मालक असलेल्या गजेंद्र सिंहला आआपच्या नेत्यांनी दिल्लीत बोलावून त्याला आत्महत्येला का प्रवृत्त केले? आआपमधील नक्की कोणत्या व्यक्तीने त्याच्या नावाने आत्महत्येची खोटी चिठ्ठी लिहिली होती? त्याला आत्महत्या करायला भाग पाडल्यावर, आआपच्या संजय सिंगांना, त्याच्या कुटुंबियांनी तोंड उघडू नये म्हणून बरोबर बाऊन्सर्सची टोळी घेऊन कुटुंबियांना धमकाविण्यास आआपमधील कोणत्या नेत्याने सांगितले होते? आपल्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला याची खंत आआपच्या नेत्यांना कधी वाटली का? ७. जनतेच्या पैशातून दरमहा लाखो रूपयांची वीज स्वतःच्या घरी वापरताना केजरीवालांना कधी खंत वाटते का? ८. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, मारूती भापकर इ. ना आआपच्या अधिवेशनात बाऊन्सर्सकरवी मारहाण करून का घालवून देण्यात आले? केजरीवालांना त्यांची भिती का वाटत होती? ९. भ्रष्टाचाराविरूद्ध टाहो फोडणारे केजरीवाल बिहारमध्ये महाभ्रष्टाचारी असलेल्या लालूच्या पक्षाच्या युतीला पाठिंबा देत आहेत. याबद्दल आआपचे अंधभक्त गप्प का? आता दहावा आणि शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा... १०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा. आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालांची मन भरून स्तुती करा. काय करणार, शेवटी आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कारटे!

In reply to by श्रीगुरुजी

अंध आआपभक्त यावर कोणतेही उत्तर देणार नाहीत याची खात्री आहे. काही दिवस ते गायब होतील आणि नंतर परत येऊन आआपने तयार केलेल्या बनावट चित्रफिती आणि मॅनेज्ड खोट्या बातम्या इथे देणे सुरू करतील याची खात्री आहे.

In reply to by कपिलमुनी

+१ तसंच वरच्या एका प्रतिसादात "यदाकदाचित फडणविसांनी ५ वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळवून दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले तर पटेलांप्रमाणेच मराठा समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल." याचा ह्या धाग्याशी काय संबंध हे मला कळलं नाही. त्यांना उत्तर देणार्‍या विकास साहेबांनी जी लिंक दिली आहे त्यातली आंदोलनं ही आधीचं सरकार असतांना सुध्धा रस्त्यावरंच झालेली आहेत, त्यामुळे त्या आदोलनांचा आणि आताच्या मुख्यमंत्र्यांचा डायरेक्टली / ईनडायरेक्टली का संबंध जोडला हे ही नाही कळलं.

http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Anti-Modi-Hardik-back… Hardik Patel, convener of the Patidar Anamat Andolan Samiti (PAAS) who has emerged as the face of the Patels' demand for OBC status, has always claimed that he is not linked to any political party. However, sources say that it is apparent from Hardik's past political activities that he has been consistently opposed to Narendra Modi. In one of his tweets during the Lok Sabha polls of 2014 when he actively supported the AAP , Hardik had called Modi "the worst betrayer of the people." Even his close friend, Chirag Patel, who is a key member of PAAS, was anti-Modi in his political stand earlier. He contested the 2012 assembly elections from Ghatlodiyaconstituency against Anandiben Patel as a candidate of former CM Keshubhai Patel's Gujarat Parivartan Party . Sources said Chirag had later joined AAP but Hardik claims that Chirag is currently in the BJP . During the 2014 Lok Sabha elections, Hardik had worked for AAP . In a tweet on March 26, 2014, he called Modi a `dhokebaj (betrayer)'. "Dhokebaj kone he vo sab ham Gujarat vale Jante he...Modi sabse bada dhokebaj hai." Hardik declined to say anything on his AAP connections.

पुर्वी भारतात काहि घडल की त्यामागे "विदेशी ताकत का हाथ " असायचा. आता मोदी किंवा केजरीवालचा हात असतो.* *बोलणारा कुठल्या बाजुला आहे त्यावर ठरत.

याला इथले केजरीवाल समर्थक उत्तर देतील का? कपिल मिश्रा या तत्कालीन आप मंत्रीमंडळातील कायदेमंत्र्याने शीला दिक्षित यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची सुचना सुचवली. या छोट्याश्या "तपाचे फळ" काय? कायदे मंत्रालयातून तात्काळ उचलबांगडी... आता ते फकस्त दिल्ली नामक शहरी राज्याचा टूरीझमचा कारभार बघणार... आणि शीला दिक्षितांचे काय झाले? अर्थातच जैसे थे! Tweet

In reply to by अर्धवटराव

एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.

In reply to by अर्धवटराव

टाचणीचा संबंध नाही हो हा! फुगा प्रमाणाबाहेर गेल्यावर फुटणारच! ;)

लागली भाजपाची मंडळी कामाला. कपिल मिश्रा यांनी ही चौकशी आणि FIR दाखल करण्याची सूचना दिल्ली जलमंडळाचे अध्यक्ष या नात्याने केली आहे, दिल्लीचे कायदा मंत्री या नात्याने नाही ! जर आम आदमी पार्टीला शीला दीक्षितचा बचाव करायचा असता, तर दिल्ली सरकारने कपिल मिश्रा यांची दिल्ली जल बोर्डावरून उचलबांगडी केली असती. याउलट दिल्ली सरकारने त्यांना तिथेच ठेवून एक प्रकारे त्यांना पाठिंबाच दिला आहे. मग प्रश्न उरतो की दिल्ली सरकारने कपिल मिश्रा यांच्याकडून कायदा मंत्रीपद का काढून घेतले ? याबाबत दिल्ली सरकारकडून अजूनपर्यंत तरी काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण Indian Express मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, कपिल मिश्रा दिल्ली जल बोर्डामध्ये जितके तत्पर आणि कार्यक्षम आहेत, तेव्हढे लॉ मिनिस्ट्रीमध्ये नाहीयेत. "It is learnt that complaints of the law department’s handling of government issues in the High Court had been conveyed to the upper echelons of the ruling AAP, including Kejriwal. Senior officials said that complaints included non-appearance of government lawyers before HC benches and lack of information with the government lawyers due to non-briefing by concerned department officials." हे झाले कपिल मिश्रांबद्दल. आता शीला दीक्षित आणि आप सरकारमध्ये असलेल्या सख्यत्वाबद्दल बोलुयात. मागच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळामध्ये आप सरकारने शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल केली होती. (कॉमनवेल्थ खेळांच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासाठी.) पण त्यावेळी केंद्रात असलेल्या कॉंग्रेस सरकारने शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल बनवून त्यांना एकप्रकारे राजाश्रयच मिळवून दिला होता. काही दिवसांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले. त्यांनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली, पण शीला दीक्षित यांना काही राज्यपाल पदावरून काढले नाही. (दिल्लीच्या नजीब जंग यांनासुद्धा काढले नाही.) यामागचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर एकतर तुम्ही परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात. या चौकशीची वाट लागल्यानंतर आम आदमी पार्टी वर्षभरानंतर परत सत्तेमध्ये आली. यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या CNG स्कॅमची चौकशी करायचे ठरवले. या चौकशीच्या शेवटी शीला दीक्षित आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता होती, पण केंद्रात असलेल्या भाजप सरकारने आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ही चौकशी समितीच रद्द करून टाकली. यामागचेसुद्धा कारण तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही एकतर परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात. आता आपच्या श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्ली जल बोर्डात झालेल्या ४०० करोडच्या वाटर टॅंक घोटाळ्यामध्ये शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल करण्याचे सुचवले आहे. हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते. अवांतर : आम आदमी पार्टीच्या दुर्दैवाने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाहीये. आणि भाजपाच्या सुदैवाने खोटी माहिती लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांच्याकडे मीडिया आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे परमभक्तांची फौज आहे.

In reply to by नांदेडीअन

बरी माहिती दिलीस रे नांदेडियना.गेल्या काही महिन्यात मिडियाच्या लोकांचे आम्हाला आश्चर्य वाटत आलेय.अनेक बातम्या,त्या सादर करण्याची स्टाईल राजकीय हेतुने प्रेरित असते.राजकीय मत जरूर असावे पण भाटगिरी करू नये असे ह्यांचे मत.

In reply to by नांदेडीअन

मागच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळामध्ये आप सरकारने शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल केली होती. (कॉमनवेल्थ खेळांच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासाठी.) पण त्यावेळी केंद्रात असलेल्या कॉंग्रेस सरकारने शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल बनवून त्यांना एकप्रकारे राजाश्रयच मिळवून दिला होता. काही दिवसांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले. त्यांनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली,
मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी भारतात अंदाजे ३० वेगवेगळ्या राज्यात राज्यपाल होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यापैकी काही जणांनी स्वत:हून राजीनामा दिला तर काही जणांची बदली केल्यावर बदली केलेले राज्य न आवडल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ३० राज्यपालांपैकी एकूण १० पेक्षा कमी राज्यपालांनी वरील २ पैकी एका कारणामुळे पद सोडले. मोदींनी एकाही राज्यपालाला स्वतहून काढलेले नाही. २० हून अधिक राज्यांचे राज्यपाल बदलले गेले नाहीत. त्यात जसे नजीब जंग आहेत तसेच त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटिलही आहेत. जर मोदींना राज्यपाल बदलायचे असते तर त्यांनी सर्व ३० राज्यांचे राज्यपाल बदलले असते. मोदींना अत्यंत त्रस्त करणार्‍या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची सुद्धा मोदींनी हकालपट्टी केली नव्हती. त्यांची बदली मिझोरामच्या राज्यपालपदी केल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. तस्मात मोदींनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली हा आरोप इतर सर्व आरोपांप्रमाणे धडधडीत खोटा आहे.
पण शीला दीक्षित यांना काही राज्यपाल पदावरून काढले नाही. (दिल्लीच्या नजीब जंग यांनासुद्धा काढले नाही.) यामागचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर एकतर तुम्ही परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.
नांदेडिअन किंवा आआपचे अंधभक्त कधी खरे बोलतील ही अपेक्षाच नाही. जरा २६ ऑगस्ट २०१४ ची खालील बातमी वाचा. http://indianexpress.com/article/india/india-others/modi-government-fin… या बातमीप्रमाणे
Yet another UPA appointed Governor Sheila Dikshit resigned today as the Narendra Modi government named former Uttar Pradesh Chief Minister Kalyan Singh as the nominee for Rajasthan along with three others for Maharashtra, Karnataka and Goa. Appointed in March on the eve of Lok Sabha elections, Sheila Dikhsit, who has been facing pressure, quit the post as Kerala Governor after her meeting with President Pranab Mukherjee and Home Minister yesterday.
केरळच्या राज्यपालपदावरून शीला दिक्षितांनी खूप पूर्वीच स्वतःहून राजीनामा दिलेला होता. त्यांच्यानंतर त्यांच्या जागी ५ सप्टेंबर २०१४ या दिवशी माजी न्यायाधीश पी. सथासिवम यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्यांच्याविषयी अधिकृत माहिती खालील धाग्यावर आहे. http://www.rajbhavan.kerala.gov.in/ शीला दिक्षितांनी स्वतःहून केरळ राज्याचा राजीनामा ऑगस्ट २०१४ मध्येच दिलेला असताना मोदी सरकारने शीला दिक्षित यांना राज्यपालपदावर कायम ठेवले (म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण दिले) असा धडधडीत खोटा आरोप नांदेडिअन यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या CNG स्कॅमची चौकशी करायचे ठरवले. या चौकशीच्या शेवटी शीला दीक्षित आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता होती, पण केंद्रात असलेल्या भाजप सरकारने आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ही चौकशी समितीच रद्द करून टाकली. यामागचेसुद्धा कारण तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही एकतर परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.
चौकशी समिती रद्द केली कारण अशी समिती नेमणे हे दिल्ली सरकारच्या अधिकारात येत नाही. "It has been clarified that the GNCTD (Government of NCT of Delhi) is not the competent authority to set up such an inquiry under various provisions of the Constitution and the Commissions of Inquiry Act, 1952. The notification issued by the GNCTD has therefore been declared legally invalid and void ab initio," स्वतःची घटनात्मक अधिकारकक्षा ओलांडणे हे केजरीवाल पहिल्या दिवसापासून करीत आले आहेत. कोणतेही नियम, कायदे, घटना याची पर्वा न करता मनाला येईल तसे वागणे आणि या वागण्यावर कोणी कायदेशीर आक्षेप घेतला तर तो भ्रष्टाचारी, भ्रष्टाचार्‍यांना पाठिंबा देणारा आहे असा कांगावा करून स्वतःची पाठ थोपटून घेणे हे केजरीवालांचे सुरवातीपासूनचे धोरण राहिले आहे. दिल्ली सरकारला अशी चौकशी समिती नेमायचे कायदेशीर व घटनात्मक अधिकार नाहीत हे माहित असूनसुद्धा त्यांनी मुद्दामच अशी समिती नेमली कारण ही समिती बेकायदेशीर आहे हे त्यांना माहित होते व अशी समिती नेमल्यावर ती रद्द होईल व त्यामुळे शीला दिक्षितांचा बचाव करता येईल हे त्यांनी ओळखले होते. म्हणून मुद्दाम हा खटाटोप त्यांनी केला. शीला दिक्षितांचा सहभाग असलेल्या सीएनजी घोटाळ्याची चौकशी यापूर्वीच अ‍ॅंटी करप्शन ब्यूरोने सुरू केली आहे. असे असताना त्याला समांतर अशी दुसरी चौकशी समिती नेमणे हे बेकायदेशीर आहे हे माहिती असूनसुद्धा शीला दिक्षितांना वाचविण्यासाठी त्यांनी ही समिती नेमण्याचा उद्योग केला आणि समिती रद्द झाल्यावर खापर भाजपवर फोडले.
आता आपच्या श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्ली जल बोर्डात झालेल्या ४०० करोडच्या वाटर टॅंक घोटाळ्यामध्ये शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल करण्याचे सुचवले आहे. हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.
केजरीवाल आजतगायत शीला दिक्षितांना वाचविण्यात यशस्वी झाले आहे. अजून किती काळ ते त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालू शकतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. आम आदमी पक्ष हा काँग्रेसचाच 'ब' संघ असल्याने केजरीवाल कॉन्ग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना वाचविण्यास पराकोटीचे प्रयत्न करणार हे नक्की.
अवांतर : आम आदमी पार्टीच्या दुर्दैवाने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाहीये. आणि भाजपाच्या सुदैवाने खोटी माहिती लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांच्याकडे मीडिया आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे परमभक्तांची फौज आहे.
पुन्हा एक असत्य. दिल्ली सरकारने केजरीवालांचा उदोउदो करणार्‍या जाहिरातबाजीसाठी तब्बल ५२६ कोटी रूपये बाजूला काढून ठेवले आहेत. दिल्लीत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी रस्ते विभागाकडे निधीची चणचण आहे. परंतु जाहिरातबाजीसाठी अब्जावधी रूपये आहेत. त्याच बरोबरीने आआपची टिमकी वाजविण्यासाठी आणि भाजपवर धडधडीत खोटे आरोप करण्यासाठी सोशल मिडियावर नांडेदिअन यांच्यासारखे आआपचे अंधभक्त आहेतच. _______________________________________________________________________________ नांदेडिअन यांच्या प्रतिसादातील खोटेपणा मी पुराव्यानिशी वर मांडला आहे. यावर ते उत्तर देतील ही अपेक्षाच नाही. यापूर्वी प्रत्येकवेळी त्यांच्या प्रत्येक प्रतिसादातला खोटेपणा मी पुराव्यानिशी दाखवून दिला आहे. परंतु आजतगायत त्यांनी आपल्या खोटेपणाची कबुली दिलेली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

खालील धाग्यावर भारतातील सध्या पदावर असलेल्या राज्यपालांची नावे आहेत. ते नक्की कोणत्या दिवसापासून राज्यपालपदावर आहेत हे देखील दिलेले आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_current_Indian_governors त्यानुसार, ओदी पंतप्रधान झाल्यावर २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी, एकूण १२ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन राज्यपाल आले. काही राज्यपालांकडे एकापेक्षा अधिक राज्याची जबाबदारी आहे. त्यांमुळे मूळच्या ३६ राज्यपालांपैकी प्रत्यक्षात ११-१२ राज्यपालच नवीन आहेत. कॉन्ग्रेसने राज्यपालपदी नेमलेले स्वतःचे नेते के. रोशय्या, एस सी जमीर, डी वाय पाटील, राम नरेश यादव, श्रीनिवास पाटिल असे अनेकजण अजून पदावर आहेत. काही राज्यात २००८ व २००९ पासून पदावर असलेले राज्यपाल अजूनही पदावर आहेत. मोदींनी सत्तेवर आल्यावर राज्यपाल बदलायचा सपाटा लावला हा आरोप अर्थातच खोटा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अर्थातच दणकून सहमत आहे.केजरूच्या गुलामांची अशीच पिसे काढायला हवीत.
त्यात जसे नजीब जंग आहेत तसेच त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटिलही आहेत.
आणि तसेच तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून के.रोसय्याही आहेत. हे २००९ ते २०११ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ७-८ महिन्यांपर्यंत शिवराज पाटीलही पंजाबचे राज्यपाल होते.

In reply to by नांदेडीअन

हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.
https://www.youtube.com/watch?v=dKYrwp0qly4#t=156 वरील चित्रफीत पहा. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुक प्रचारात केलेले हे केजरीवालांचे भाषण आहे. या भाषणात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे शीला दिक्षितांच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचाराचे ३७० पानांचे पुरावे आहेत. नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांनी हे पुरावे पोलिसांकडे देऊन शीला दिक्षितांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. आपल्या वरील भाषणात शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी केजरीवालांनी वाचून दाखविली आणि शीला दिक्षितांना आपण अजिबात सोडणार नाही असे सूचित केले होते. परंतु यानंतरचा हा यू टर्न - http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Give-proof-of-graft-again… २९ डिसेंबर २०१३ या दिवशी याच भ्रष्ट कॉन्ग्रेसचा पाठिंबा घेऊन केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. नंतर लगेच ६ जानेवारी २०१४ रोजी त्यांना शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविषयी विचारले असताना त्यांनी खालील उत्तर दिले. Responding to charges by BJP leader that AAP was not taking action against Dikshit, Kejriwal said: "I have asked him (Harsh Vardhan) to provide evidence and I will take action. We will not spare anyone involved in corruption. स्वतःकडे ३७० पानी पुरावे असताना कृती करायची सोडून हे हर्षवर्धनांनी शीला दिक्षितांविरूद्ध पुरावे द्यावेत आणि नंतरच आपण कारवाई करू असा केजरीवालांनी यूटर्न घेतला. सीएनजी घोटाळ्याबद्दल हेच होणार आहे. महाराष्ट्रात जेव्हा जलसंधारण कामात पवार, तटकरे इ. विरूद्ध भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप झाले तेव्हा विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी आणि पवार, तटकरे इ. ना क्लीन चिट देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक स्वतःची चौकशी समिती नेमली आणि नंतर त्या समितीने "या प्रकरणात अजिबात भ्रष्टाचार झाला नाही" असा निष्कर्ष काढून पवार, तटकरे इ. क्लीन चिट दिली. सीएनजी घोटाळ्याबद्दल केजरीवालांनी हीच युक्ती केली. आपण भ्रष्टाचाराविरूद्ध लढत आहोत हे दाखविण्यासाठी आणि आपल्याच पक्षाच्या शीला दिक्षितांना क्लीन चिट देऊन त्यातून वाचविण्यासाठी त्यांनी चौकशी समिती नेमायचे ठरविले. या चौकशी समितीकडून थातुरमातुर चौकशीचे नाटक करून शीला दिक्षित या निर्दोष आहेत असा रिपोर्ट देऊन त्यांना वाचवायचे अशी त्यांची योजना होती. त्यांच्या आणि शीला दिक्षितांच्या दुर्दैवाने केंद्र सरकारने वेळीच त्यांचा प्लॅन ओळखून समिती रद्द करून टाकली व आपल्या पक्षाच्या शीला दिक्षितांचा चौकशी समितीच्या माध्यमातून बचाव करण्याची केजरीवालांची योजना धुळीला मिळाली. आपल्याच पक्षाच्या शीला दिक्षित यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यातून वाचविण्यात केजरीवाल आजवर यशस्वी झाले आहेत. हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार आणि केजरीवाल परत एकदा शीला दीक्षित यांना वाचविण्याची कोणती नवीन योजना बनविते.

5 Convicted in 2010 Commonwealth Scam Breaking News: 5 Convicted in 2010 Commonwealth Scam Delhi court convicts five in 2010 Commonwealth Scam

सादरीकरण करताना गायिका शिल्पा राव. येत्या ११ सप्टेंबर रोजी दिल्ली विद्यापीठात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'आम आदमी'कडून या 'रॉक शो'चे आयोजन करण्यात आले होते. दस्तुरखुद्द केजरीवालांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आणि मजा वाढविली. ३-४ दिवसांपूर्वी बिहारमध्ये राजद-संजद-कॉंग्रेस-सपा या महायुतीची सभा आयोजिली होती. त्या सभेत सोनिया गांधी, लालू, नितीश इ. नी भाषणे केली. त्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी सभेपूर्वी बारबालांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कॉन्सर्टचा एक वृत्तांत - http://www.dnaindia.com/india/report-aap-promises-1-lakh-jobs-free-wi-f… अजूनही खोटी आश्वासने देणे सुरूच आहे.
Higher education loan scheme, one lakh jobs within a year and free wi-fi in colleges were among the promises made by Chief Minister Arvind Kejriwal to students of poll-bound Delhi University on a star-studded event organised by AAP's students' wing on Tuesday.
खोटे दावे अजूनही सुरूच आहेत.
In his speech, Kejriwal also pitched for "clean student politics" saying that Delhi University was besetted with corruption. The AAP government has reduced corruption in Delhi by over 70 per cent in six months, he said.
कलाकारांनी आपली कला सादर करूनसुद्धा केजरीवालांच्या उपस्थितीत त्यांना कार्यक्रम सादरीकरणाचे पैसे मागण्याची हिंमत नाही असे सिसोदियांनी अभिमानाने सांगितले.
In a bid to offset criticism over expenditure incurred for the marquee event, Sisodia emphasised that the artistes had not taken money for performing. "No one has been paid. Who can dare take money in front of Arvind Kejriwal in any case?" he quipped.
हेचि फल काय मम तपाला!
Kejriwal said bringing DU among the top 100 universities of the world was an imperative and stressed that an AAP-backed students' body would ensure that. "We are a party of the youth." However, the crowd had considerably thinned by the time Kejriwal rose to speak at the fag end of the event, officially publicised as freshers' rock concert 'DU rocks'.

In reply to by श्रीगुरुजी

अरेरे! हे काय झालं!! दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत सर्व चार जागांवर अभाविपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसप्रणित एनएसयूआय चे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिले आणि आआपच्या छात्र युवा संघर्ष समिती या विद्यार्थी संघटनेचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. एकंदरीत आआपने दिलेल्या 'एका वर्षात एक लाख नोकर्‍या देणार', 'महाविद्यालयात मोफत वायफाय देणार' इ. खोट्या आश्वासनांना आणि विद्यार्थ्यांना भुलविण्यासाठी आआपने आयोजित केलेल्या रॉक शो ला विद्यार्थी फसलेले दिसत नाहीत. २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री. रा. रा. केजरीवाल आपल्या संघटनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करायला गेले होते. परंतु विद्यार्थ्यांचा त्यांच्या थापेबाजीवर विश्वास बसलेला दिसत नाही.

गुरुजी, आपले चरण कमल कुठे आहेत, आहो त्या मायबोलीवर सुद्धा येऊन तिथल्या 'आपटार्ड'लोकांपासुन सामान्य जनांची सुटका कराच !

In reply to by डँबिस००७

आपले चरण कमल कुठे आहेत, यात "कमल" हा शब्द योगायोगाने आला आहे का? ;) (ह.घ्या)

धाग्याचं शतक झाल्याबद्दल विकासरावांना पट्ट्याच्या पितळी बक्कलला चमक येण्यासाठी पॉलिश आणि तांब्याचं बिगुल (अर्ध्या किंमतीत), श्रीगुरुजींना बंच ऑफ थॉट्स च्या नवी आवृत्ती च्या १० प्रति (तुमच्या भेटीला येणारांना वाटण्यासाठी. तुमचंच लिखाण तुम्हीच वाचा) नांदेडीयनना ट्विट्टरचं नवं अकाऊंट उघडण्यासाठी नेट कॅफे चा मासिक पास. कपिलमुनी आणि माईसाहेबांना अनुक्रमे 'मी कपिल' आणि 'मीच ह्यांची लाडकी' असं लिहीलेल्या टोप्या देऊन सत्कार करण्यात येत आहे. - अखिलमिपाझालंशतककीकरसत्कारसमितीसचिव

In reply to by प्यारे१

तरीच जेप्या म्हणत होता "आज मी निवांत आहे म्हणून" कृपया "माई" टोपी वर नाव पूर्ण लिहिणे संक्षीप्त नको "घोळ" होईल. -अखिलमिपाझालंशतककीकरसत्कारसमितीसचिव खुलासा सचीव क्र २

अन्ना हजारे मस्त खाउन पिउन तब्बेत बनवतो। मग वजन वाढल्यावर उपोषण करतो। त्यापेक्षा त्याने साने गुरुजींचा अादर्श घ्यावा।

अन्ना हजारे मस्त खाउन पिउन तब्बेत बनवतो। मग वजन वाढल्यावर उपोषण करतो। त्यापेक्षा त्याने साने गुरुजींचा अादर्श घ्यावा।

गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता! onion

In reply to by विकास

गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता!
यात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ४० रू. प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन ३० रू. किलो भावाने विकले ही आआपची शुद्ध थाप आहे. अर्थात थापा मारणे, खोटे बोलणे, खोटे आरोप करणे, कांगावा करणे इ. गोष्टी आआपची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यामुळे या थापेबाजीत काहीच आश्चर्य नाही. आता दुसरा मुद्दा. कांदे घेताना १५ रू. प्रतिकिलो दराने घेतले असतील. परंतु त्यानंतर मालाची साठवण, वाहतूक, ५-१० टक्के खराब माल निघणे इ. ची किंमत विकताना वाढविली तर विकताना ३० रू. प्रतिकिलो दराने विकणे रास्त वाटते.

हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय. http://www.thehindu.com/news/national/other-states/gujarat-hc-upholds-s… अतिशहाणपणा करायला गेल्यावर शिक्षा मिळणारच. आता म्हणे त्याच्या समर्थकांनी धमकी दिली आहे की पटेलांना आरक्षण दिले नाही तर आम्ही धर्म बदलू. एकंदरीत हा हार्दिक पटेल आणि त्याचे समर्थक म्हणजे अत्यंत उथळ आणि गुंडगिरी करणारे टगे आहेत. बहुतेक कोणी तरी उचकावल्याने, नरेंद्र मोदी व गुजरातमधील भाजपला अडचणीत आणण्यासाठी त्याने हा उद्योग केला असावा आणि आता तो चांगलाच गोत्यात आला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अतिशहाणपणा नसून सगळे कुठेतरी व्यवस्थित योजले जात आहे असे वाटते. बाकी धर्म बदलला तर राखीव जागा कशा मिळणार त्या?

कॉंग्रेस त्याला आर्थिक मदत करत असल्याची खबर आहे. तसेच कॉंग्रेस आता पटेल आरक्षणाला पाठींबा देत असल्याचे दिसते. तेथील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी लवकरच होणार आहेत. त्यात या युतीचा प्रभाव काय होतो ते दिसेल. एका गुजराती मित्राने हार्दिक चे वर्णन ' चिबावला' या शब्दाने केले. मला या शब्दा साठी मराठी शब्द सुचत नाहीये.