माळी पुनेव!
माळी पुनेवचा चंद्र
जशी पन्हावली गाय
धारा लागल्या दुधाच्या
भिजते धरनी माय
चांदन्याचं वावरातं
डोले पीक हिर्वं गारं
पाना पानाऊनं झरे
गोळं अमृताची धारं
कन्सा कन्सा वरं झाली
चांदन्याची आबादानी
कन्सातला दाना कसा
हासे तान्ह्या पोरा वानी
नयतुर्न्या पोरी वानी
चंद्र हरखूनं जाये
वायत्या पान्यातं नदीच्या
रूपं निरखूनं पाये
धुंद झाली चांदन्यानं
मैना फूगळी धरते
धरनीच्या मळक्यातं
रई गर्गरं फिरते
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5176
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर आणि
+१
In reply to सुंदर आणि by प्रचेतस
धन्यवाद !
फारच छान कविता! आवडली.
धन्यवाद !
अहाहाहा. अप्रतिम
कन्सा कन्सा वरं झाली
मस्त कविता!
अहाहा! केवळ क्लासच
वा!
आभार...
मस्त
वर्हाडी
In reply to मस्त by चाणक्य
वर्हाडी भाषा म्हटले की
In reply to वर्हाडी by ऊध्दव गावंडे
सुंदर!
मस्ताड आहे हे सारं
चित्रदर्शी.
सुंदर!
छान
येथे करं माझे जुळती...
आवडली
फार सुंदर आहे कविता.आवडलीच
सकारात्मक प्रतिसाद म्हणजे
कंसातले कॅव्हेट टाकलेत हे फार
In reply to सकारात्मक प्रतिसाद म्हणजे by ऊध्दव गावंडे
सुरेख!
अप्रतिम. ...