उस तोड़....
भल्या पहाटच् मायन् दगड्याला बापाचा जुनाट सदरा घातला. बाह्या दुमटवल्या. गळयापासून पायापर्यंत तो झाकून गेला. चिमि अजुन झोपेतच् होती. मायन् तिला शेजारच्या कोपितल्या म्हातारी जवळ टाकलं. हातात कोयती घेऊन सगळे कोपीवाले निघाले.
"का गं? दगडूला कामुण घेतलं आज संग?" सोबतच्या एकिन् मायला विचारलं.
"अ गं! गेल्या हप्ती हाताला कोयतं लागून घेतलं म्हणून घरी ठीवलं त् त्या आंब्याखली जुगारी लोकाइला सिगरेटी-फुटान आणून द्यायला पळु लागलं. मनुन मनलं घीउ संगच्. तेव्हढच् चार दोन मोळ्या बी बांधू लागल." मायन सांगून टाकलं.
दगडू सगळ्यांच्या पुढे कनाकना पाय उचलत चालत होता. ढेकाळांनाही लाजवेल असा रंग पण रहायला अगदी टापटिप्. बारीक कापलेले केस, स्फटिकासारखे शुभ्र दांत. आणि हसरा चेहरा. कुणी चिडवले तरी दांतविचकुन हसायची सवय त्यामुळे टोळीत तो सर्वांचा आवडता प्राणी.
"त्याला शाळा शिकिव बाईं. लई चुनचुणित पोर हाय तेला उगीच तोडिला नग् दामटूं" सोबताची.
" हाव ना गं! या बारचिनि सगळा हिशिवबच् चुकला, पाटलिनबाईची सोनी अन् हेव एकाच शीन चे हाय. तिला औंदा शाळात घातलं. हे बी लए जीव काढतं शाळासाठी पर तोड़ीमुळं हुकतं सारं." माय.
"तेला कहयाला आणता तोडिला? घरीच ठीवायचं की शेजारच्या कांताक्का जवळ?" सोबताची दूसरी.
"नई बाई आपलं लेकरु आपल्या जवळ बरय. कई दुखलं खुपलं आपण कही बी खालवर करू. शेजारी कुठवर करणार? वरुण हे पोरगं बी लए अचपळ हाय. सारखं खटपटि करत असतं." माय.
फडावर आधिच ट्रक उभा होता. पोहोचल्याबरोबर सगळे उसावर भिडले. दलदलित जमीन खचावी तशी उसं गळु लागली. बाप अडदांड हातांनी सपासप वार करू लागला, माय आणि दगडू उस गोळा करुण जमतील तश्या मोळ्या बांधू लागले.
प्रतिक्रिया
उसतोडीवाल्यांची अशी भाषा मी
अभ्या भाऊ
शुभेच्छा मग. लगे रहो.
सशक्त कथा. भाषेबद्दल फारशी
जम्या
योगी बाबा