Skip to main content

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/10/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे कुणी होत वाचाळ थयथय उगाच कुणी शांत राहून ठेवीत जाच कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे कृतीतून ठरते इथे कोण वाघ मुखे बोंबलोनी करी काय सांग एकीत असते रहस्य यशाचे तुम्हाला महत्व न पटले अशाचे तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला तिथे एक चेहरा भुलवतो जगाला असे वेळ हाती न वागा असे रे कशाला करावे स्वतःचे हसे रे इथे संधी सर्वांस आहे समान भूतापरी हो जपा वर्तमान जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला करोनीच हो दाखवा या जगाला -अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

वाचने 6825
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

अब जाने भी दो...! म्हणतात ना सर्वात जवळचा मित्रच सगळ्यात धोकादायक शत्रु बनु शकतो विशेषतः जेंव्हा तो जास्त बलवान बनुन पलटतो तेंव्हा अशी अवस्था होतच असते. :( :)

अपूर्व कविता आहे..... अगदी योग्य शब्दात. पण शब्दांची भाषा कळत नाही म्हणे तिकडे....! भूमिपुत्रांच्या लढ्याला भुमिपुत्रांसोबत भूमीतच सोडून गेलेल्या (कट्टर) सामान्य शिवसैनिकांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत........

खरंच सुंदर , योग्य शब्द रचना आणि अचूक भाष्य

कुणाचे पद कोण हुकले बघा रे कुणाचे खाते कोण मुकले बघा रे कुणाचे बोलून तोंड सुकले बघा रे कुणाचे कुठे काय दुखले बघा रे

चांगली आहे कविता. मुळात एखादी व्यक्ती आपल्या वडिलांपुढे झुकत असेल तर तिने माझ्यापुढे पण झुकले पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?

मान कर्तृत्वाने मिळतो.मागून मिळत नाही.

अरे वा.. मस्त हो वेल्लाभट भौ.. समयोचित तर आहेच (त्याबद्दल काही न बोललेलेच बरे असे वाटतेय आज काल), अजून एक म्हणजे मस्त चाल देखील लागतेय "असा बालगंधर्व आता न होणे" या गाण्याची. :)

समयोचित कविता.

सगळ्यांचेच अनेक आभार... अस्वस्थामा, मी खरं तर मनाच्या श्लोकांच्या च्या मीटर मधे लिहिली आहे.

In reply to by वेल्लाभट

कुठला श्लोक हो? चाल कळेल काय ? मी पहिल्यांदा वाचताना जी लय माझ्या डोक्यात आली त्याशिवाय मी दुसरी कल्पू शकत नाहीय.. :)

बरी आहे, जरा वृत्त गंडलेय अधूनमधून तेवढं सुधारा जमल्यास. (भुजंगप्रयात वृत्तात ४ य गण, अर्थात् ल-ग-ग हा प्याटर्न चारवेळेस रिपीट होतो.)

वाह

अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली कमळाबाई मीच तुझ्यापेक्षा मोठी, सांगती बोंबलून झोळी पडली कमी इतुके दिले जनांनी पचवू कैसे हे सारे तीस न कळे हाताचे बोट धरून कोणी केले उभे दिला कोणी आसरा फरक आता न पडे आधी टेकले माथे मातोश्रीला सोडून लज्जा आणि लाज आता वाढली मस्ती आणि चढला माज पाकडे जाहले मित्र देशभक्ती झाली सैल... कितीही फुगला बेडूक होत नाही बैल. आपल्याला आस लई काव्य गिव्य लिवाय येत न्हाई, पर कवितेला कवितेने दिलेले लोकशाही मार्गाने उत्तर , आस समजा बुवा

वेल्ला, राजकारण ही शिवी वाटते हल्ली. राजकारणावर फक्त उदासबोधच लिहिता येईल.

कृतीतून ठरते इथे कोण वाघ मुखे बोंबलोनी करी काय सांग
कालच्या शिवसेनेच्या सभेत बोलताना रामदास कदम म्हणाले की "गिरीश बापट म्हणतात की शिवसेना धाकटा भाऊ असून आम्ही मोठा भाऊ आहोत. आम्ही धाकटा भाऊ नसून तुमचा बाप आहोत.". जनतेने भाजपच्या तुलनेत निम्म्या जागा देऊन, भाजपकडून इतकी अवहेलना होऊन सुद्द्धा यांच्या फुशारक्या कायम आहेत. या फुशारक्या आणि वरील पंक्ती मस्त जुळतात.

विधानसभानिवडणूकीच्या वेळी परिस्थिती ओळखली असती ५०% तैयार झाले असते तर तर आज मुख्यमंत्री झाले असते. आता व्यर्थ आरडाओरडा करण्यात काय अर्थ. वेळ निघून गेली कोण वाघ आणि कोण बिबट्या हे जनतेने ठरवून दिले आहे.