✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काहूर

ज
जव्हेरगंज यांनी
Wed, 10/21/2015 - 00:09  ·  लेख
लेख
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, पर आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या पण नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. आय कायच बुलली नाय. मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब म्या हातात धरलं. मग त्यनंच हात धुतलं. मग पुना थेंब थेंब पाणी हातात धरलं, परत त्यनंच हात धुतलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, मग माज्या बी पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु. छपरातनं पाणी गळायला लागलं. वाकळंवरच. म्या वाकळं एका बाजुला वढुन घीतली. ऊठुन दिवळीतलं भगुणं घेतलं, आन टपकणाऱ्या पाण्याखाली आदानाला ठिवलं. मग ऊखळापाशी बी टपकाय लागलं, तिथं फुलपात्र ठिवलं, शिक्क्याच्या खाली पाटी ठिवली, चुलीम्होरं तांब्या ठिवला. सगळं घरबार फिरुन म्या भांडीच भांडी केली. पर आय कायच बुलली न्हाय, नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली. कोपऱ्यात बसून म्या ठिबकणाऱ्या पाण्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. दुपारच्याला आमच्या शेताचा बांध कोरताना सदू पाटलाला आयशीनं बघीतलं हुतं. ह्यो सदू पाटील दादा माणुस. संध्याकाळी जवा बाप घरी आला, तवा टिकाव घीऊनच त्येच्या घरी गेलता. आजुन परत आला नव्हता. "आयं, आण्णा कदी येत्यालं गं?" म्या पाय हालवत रडकुंडीला यीवुन ईचारलं. पर आय कायच बुलली नाय. भाकऱ्याचा आवाज माझ्या मनात घुमत ऱ्हायला. रातभर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
7181 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

जबरदस्त लिहिलंय!

एस
Wed, 10/21/2015 - 00:14 नवीन
जबरदस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments

जव्हेरभाऊ. लिव्हताय खरं पन

अभ्या..
Wed, 10/21/2015 - 00:24 नवीन
जव्हेरभाऊ. लिव्हताय खरं पन असं चिपट्या मापट्यानं नगं. जरा हुंद्या उफणणी अन भरा कणगी पायली मणानी. निक्क्या सोन्याची रास बघता आमच्या संगं तुमचाबी जीव हारखून जाईल बगा. आन पावणं तुम्ही कुनकल्डं मनायचं? ईंदापूर पंढरपूर का बार्शी परंडा? असा टपोरा शाळू गावत नाही हो दुसरीकडं
  • Log in or register to post comments

मस्त लिहताय! अभ्या.. ला

रातराणी
Wed, 10/21/2015 - 00:33 नवीन
मस्त लिहताय! अभ्या.. ला अनुमोदन.
  • Log in or register to post comments

तुम्ही फार ताकदीने लिहिता !

प्राची अश्विनी
Wed, 10/21/2015 - 07:29 नवीन
तुम्ही फार ताकदीने लिहिता ! अभ्या..शी सहमत!
  • Log in or register to post comments

जव्हेर भौ

बाबा योगिराज
Wed, 10/21/2015 - 08:01 नवीन
लिखाण आवडले. अभ्या भौ म्हांत्येत तस, जरा मोट्ट मोट्ट लिवा की. भेष्ट. अंजून बी येऊ द्या की.... शशक शशक नगा करू. पर्धा कवाच संप्ली. दीर्घ कथा लिवा एकांदी.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतोय....

शित्रेउमेश
Wed, 10/21/2015 - 11:03 नवीन
हेच म्हणतोय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

:(

टवाळ कार्टा
Wed, 10/21/2015 - 08:59 नवीन
:(
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

तुषार काळभोर
Wed, 10/21/2015 - 10:10 नवीन
सदू पाटीलसारखे काही जण बघितलेत..अन् 'बापासारखे'पन काही बघितलेत. गेल्याच महिन्यात आमच्या बांधावर भावकीतल्या एकाची थोरल्या चुलत्याबरोबर भांडणं झालती. बांध कोरण्यावरणं भांडणं करणं लईच कॉमन आहे.क्वचित कुनाचं तरी डो़कंपन फुटतं.
  • Log in or register to post comments

.

नाव आडनाव
Wed, 10/21/2015 - 10:33 नवीन
.
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा.

अजया
Wed, 10/21/2015 - 11:04 नवीन
जबरदस्त कथा.
  • Log in or register to post comments

भारीच!

चांदणे संदीप
Wed, 10/21/2015 - 11:05 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments

तुमच्या ब-याच कथा वाचल्या.

आतिवास
Wed, 10/21/2015 - 11:13 नवीन
तुमच्या ब-याच कथा वाचल्या. छान लिहिता आहात. दीर्घकथा वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

जव्हेरगंजभो अभ्याशी शतप्रतिशत

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 11:26 नवीन
जव्हेरगंजभो अभ्याशी शतप्रतिशत सहमत. मेसमध्ये जेवताना मावशी रश्श्याबरोबर एक भाकरी करून वाढते, पैलवान दोन घासात संपिवतो आणि पुढच्या भाकरीची वाट बघत बसतो तसं झालंय. टोपली आक्खी भरा आधी नंतर हाळी द्या. येतोच वास काढत.
  • Log in or register to post comments

फार छान

बिन्नी
Wed, 10/21/2015 - 13:18 नवीन
माय गॉड ! काय भारी लिहिताय तुम्ही ! एकदम राजन खान वाचल्यासारखं वाटलं !
  • Log in or register to post comments

कथा आवडली नाही.

द-बाहुबली
Wed, 10/21/2015 - 13:28 नवीन
कथा आवडली नाही.
  • Log in or register to post comments

चांगली आहे .

मनीषा
Wed, 10/21/2015 - 16:21 नवीन
चांगली आहे .
  • Log in or register to post comments

भारी लिखाण. बरेच जण म्हणत

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/21/2015 - 16:31 नवीन
भारी लिखाण. बरेच जण म्हणत आहेत त्याप्रमाणे मोठी कथा-कादंबरी लिहायला घ्या आता... भातुकलीचा खेळ पुरे झाला. काय म्हणताय ?
  • Log in or register to post comments

आवडली बुवा आपल्याला..

आनंद कांबीकर
Wed, 10/21/2015 - 19:52 नवीन
एकदम झक्कास. पर प्यारे भौ म्हनताय तसं तोपलिभरुंन हवं.
  • Log in or register to post comments

मायेव. कसं जाणतं झालं माय

अभ्या..
Wed, 10/21/2015 - 21:39 नवीन
मायेव. कसं जाणतं झालं माय ह्ये लेकरु.
  • Log in or register to post comments

मला ही पाणी घातलेली कढी आवडली

बिन्नी
Wed, 10/21/2015 - 21:50 नवीन
मला ही पाणी घातलेली कढी आवडली नाही. पहिली खास इफेक्टवाली आहे!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत

जव्हेरगंज
Wed, 10/21/2015 - 22:23 नवीन
हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत लिहुन परिणामकरीत्या पोहोचले तर बस ना.पण लोकं वरडतात. लहान लहान म्हणुन. मग ओतावं लागतं पाणी. असो. ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत

जव्हेरगंज
Wed, 10/21/2015 - 22:24 नवीन
हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत लिहुन परिणामकरीत्या पोहोचले तर बस ना.पण लोकं वरडतात. लहान लहान म्हणुन. मग ओतावं लागतं पाणी. असो. ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

हा... हा... हा

चांदणे संदीप
Wed, 10/21/2015 - 22:32 नवीन
जव्हेरगंजभाऊ... तुम्ही ती पुणेकर माणसाची आणि मासेविक्रेत्या दुकानाच्या पाटीची गमतीशीर गोष्ट ऐकली नाही का?? नसल्यास सांगा, व्यनि करतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

व्यनि करा मालक :)

जव्हेरगंज
Wed, 10/21/2015 - 22:42 नवीन
व्यनि करा मालक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

लिखाण आवडल. पण पहिल्या कथेत

ज्योति अळवणी
Wed, 10/21/2015 - 22:52 नवीन
लिखाण आवडल. पण पहिल्या कथेत पूर्णता नव्हती. दुसऱ्या कथेत अघळपघळ होत थोड.
  • Log in or register to post comments

मूळ कथाच मस्त....

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 23:03 नवीन
हरेक का अपना अपना ष्टाइल है. तुम तुम्हारा ष्टाइल संभालो.. बदल आपोआप घडले तरच मजा हाय...
  • Log in or register to post comments

ऑ. एवढूसच व्हय ? जरा मोट्ट

तुडतुडी
Fri, 10/30/2015 - 13:56 नवीन
ऑ. एवढूसच व्हय ? जरा मोट्ट लिवलं असतं तर मजा आली असती .
  • Log in or register to post comments

काहूर (संपुर्ण)http://www

जव्हेरगंज
Fri, 10/30/2015 - 15:41 नवीन
काहूर (संपुर्ण) http://www.misalpav.com/node/33396
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा