काहूर
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, पर आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या पण नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. आय कायच बुलली नाय.
मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब म्या हातात धरलं. मग त्यनंच हात धुतलं. मग पुना थेंब थेंब पाणी हातात धरलं, परत त्यनंच हात धुतलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, मग माज्या बी पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु.
छपरातनं पाणी गळायला लागलं. वाकळंवरच. म्या वाकळं एका बाजुला वढुन घीतली.
ऊठुन दिवळीतलं भगुणं घेतलं, आन टपकणाऱ्या पाण्याखाली आदानाला ठिवलं. मग ऊखळापाशी बी टपकाय लागलं, तिथं फुलपात्र ठिवलं, शिक्क्याच्या खाली पाटी ठिवली, चुलीम्होरं तांब्या ठिवला. सगळं घरबार फिरुन म्या भांडीच भांडी केली. पर आय कायच बुलली न्हाय, नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली.
कोपऱ्यात बसून म्या ठिबकणाऱ्या पाण्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ.
दुपारच्याला आमच्या शेताचा बांध कोरताना सदू पाटलाला आयशीनं बघीतलं हुतं. ह्यो सदू पाटील दादा माणुस. संध्याकाळी जवा बाप घरी आला, तवा टिकाव घीऊनच त्येच्या घरी गेलता. आजुन परत आला नव्हता.
"आयं, आण्णा कदी येत्यालं गं?" म्या पाय हालवत रडकुंडीला यीवुन ईचारलं. पर आय कायच बुलली नाय. भाकऱ्याचा आवाज माझ्या मनात घुमत ऱ्हायला. रातभर.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरदस्त लिहिलंय!
जव्हेरभाऊ. लिव्हताय खरं पन
मस्त लिहताय! अभ्या.. ला
तुम्ही फार ताकदीने लिहिता !
जव्हेर भौ
हेच म्हणतोय....
:(
जबरदस्त!
.
जबरदस्त कथा.
भारीच!
तुमच्या ब-याच कथा वाचल्या.
जव्हेरगंजभो अभ्याशी शतप्रतिशत
फार छान
कथा आवडली नाही.
चांगली आहे .
भारी लिखाण. बरेच जण म्हणत
आवडली बुवा आपल्याला..
मायेव. कसं जाणतं झालं माय
मला ही पाणी घातलेली कढी आवडली
हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत
हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत
हा... हा... हा
व्यनि करा मालक :)
लिखाण आवडल. पण पहिल्या कथेत
मूळ कथाच मस्त....
ऑ. एवढूसच व्हय ? जरा मोट्ट
काहूर (संपुर्ण)http://www