द वॉक - एक अप्रतिम अनुभव
जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील.
अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक".
न्यूयॉर्क. ध्येयवेड्या लोकांचं शहर. आणि पॅरिस स्वप्नाळू आर्टिस्ट लोकांचं ठिकाण. आपल्या ध्येयवेड्या आर्टिस्ट चा प्रवास चालू झाला पॅरिस पासून न्यूयॉर्ककडे. गोष्ट काही फार नवीन नाही पण अगदीच जुनी पण नाही आणि अप्रचलित तर अगदीच नव्हे. न्यूयॉर्कवासीयांना, या ना त्या कारणाने न्यूयॉर्क सफ़र घडवलेल्यांना, न्यूयॉर्क बद्दल ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या सगळ्यांना फिलिप पेटी (पेटिट) बद्दल माहिती असतेच. हि फिलिपची सत्यकथा रॉबर्ट झेमेकीसने दिग्दर्शित केलेल्या "द वॉक" मध्ये आहे.
फ्रान्स मध्ये फिलिपला हाय वायर वॉकर होण्याचा नाद लागतो. ज्या सर्कशीतील कलाकाराला बघून त्याच्या डोक्यात हे खूळ शिरतं तोच पापा रुडी फिलिपचा वायर वॉकर मधला गुरु. चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतसे हे गुरुशिष्याचे नाते पण बदलत जाते.
"मी सर्कशीत काम करणारा जोकर नाहीये" हे ठरवून फिलिप पॅरिस मध्ये रस्त्यावर आपल्या कलागुणांना सादर करू लागतो. आणि पॅरिस मध्ये त्याला त्याचं ध्येय गवसतं; न्यूयॉर्क मधल्या अतिप्रचंड, आयफेल (तेव्हाचे उंच वास्तुंशी तुलना करण्याचे परिमाण :) ) पेक्षा २७५ मीटर उंच अशा ट्वीन टॉवर वर वायर वॉक करायचं. पॅरिस मध्येच फिलिपला त्याची पहिली गोड साथीदार अॅनी भेटते. मात्र अॅनीची साथ त्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंतच असते. एका पाठोपाठ एक फिलिप आपले साथीदार गोळा करत, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत जातो.
फिलिपच स्वप्न पूर्ण होत, पण ते नक्की कसं, आलेल्या अडचणींवर तो कसा मार्ग काढत जातो हे पाहायला चित्रपट गृहाची पायरी चढावीच लागेल. मलाही फिलिपची गोष्ट चित्रपट पहायच्या आधीपासून माहिती होती. "अरे एक रोप वॉकर होता है. ट्वीन टॉवर के बीच रोप बांधके वो उसपे वॉक करता है, वीच इस इललिगल. फिर एन.वाय.पि.ड़ि वाले पहून्च जाते है ट्वीन टॉवर पे उसको उठानेके लिये. ये सब देखने क्युं जाना थियेटर?" असं स्टोरीला गुंडाळून, आमच्या मूवीच्या प्लानला सुरुंग लावायचा माझा विचार दोस्त लोकांनी खोडून काढला. आणि जेव्हा मी चित्रपट गृहातून बाहेर पडले तेव्हा एका अप्रतिम अनुभवाची साक्षीदार होऊनच.
चित्रपटातील काही प्रसंग बऱ्यापैकी मोठे असूनही चित्रपट कधीच कंटाळवाणा होत नाही. विनोदी प्रसंगांची पण खूबीने पेरणी केलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या चौकटी पासून शेवटच्या चौकटीपर्यंत ट्वीन टॉवर आपल्याला भेटतच राहतो. आयफेल टॉवर सुद्धा अधून मधून दर्शन देतो. पण फिलिपची रोप/वायर कायम आपल्या सोबत राहते. आणि ट्वीन टॉवर सध्या नसल्याची हुरहूर पण.
कास्ट अवे, फॉरेस्ट गम्प, फ्लाईट सारखे अप्रतिम चित्रपट घडवलेल्या रॉबर्टने याही चित्रपटात प्रत्येक दृश्य काळजीपूर्वक आणि वैशिष्ट्यपूर्ण रीतीने हाताळले आहे. कित्येक प्रसंगांमधल्या थराराने प्रेक्षकाला गोठवून ठेवण्यात दिग्दर्शक आणि कॅमेरा यशस्वी झाला आहे. रूपांतरण अर्थात ट्रांसफॉर्मेशन हा दिग्दर्शकाचा कळीचा मुद्दा आहे. फिलिपचा आयुष्यातला पहिला वॉक आणि चित्रपटातील शेवटचा वॉक यात ट्रांसफॉर्मेशनचा वापर जबरदस्त आहे. जोसेफ गॉर्डन-लेविटने सुरेख एक्श्प्रेशन्स वापरून फिलिपला उत्तम वठवले आहे. एका कलाकारासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते प्रशंसा. अॅप्रिसिएशन. त्याला पैसे भलेही कमी मिळोत पण केलेल्या कामांची प्रशंसा झाली हे फार महत्त्वाच असत त्याच्यासाठी. फिलिपसाठीही हेच महत्त्वाचं होतं आणि जोसेफने त्याच्या अभिनयातून या फिलिपच्या भावना हुबेहूब उतरवल्या आहेत.
इथे बर्याच गोष्टी मांडायच्या राहिल्या आहेत. बर्याच गोष्टी शब्दांपलिकडल्या आहेत.
या चित्रपटातील शेवटची ३० मिनिटे तर मी कितीही वेळा पाहिली तरी मनाचे समाधान नाही होणार अशी आहेत.
चित्रपट तर नक्की पहाच. आणि तोही चित्रपट गृहात जाऊनच. क्योंकी वहाँ का माहौल ही कुछ अलग बन जाता है. तूर्तास हा ट्रेलर बघा :
वाचने
10237
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
+१
"अरे एक रोप वॉकर होता है.
काल एक मित्र भेटला. संवाद बघा
सह्ही
वा! चित्रपट छान असणार. उत्तम
नक्की बघणार !
In reply to नक्की बघणार ! by जॅक डनियल्स
हाहाहा..
In reply to नक्की बघणार ! by जॅक डनियल्स
फ्लाइट अतिशय बकवास निराशावादी
In reply to फ्लाइट अतिशय बकवास निराशावादी by द-बाहुबली
हो, माझी ग्रहाची स्थिती अगदीच
वाह खूट छान ओळख. उत्सुकता
नक्कीच बघणार...
उत्तम परिचय.
ट्रेलर बघितला. हा प्रकार थ्री
ओळख छानच आहे, बघावासा वाटतोय.
निव्वळ अप्रतिम.
सहज जायला मिळाल्यास पाहीन व
छान लिहिलय. मस्त एकदम.
In reply to छान लिहिलय. मस्त एकदम. by अभ्या..
:)
In reply to छान लिहिलय. मस्त एकदम. by अभ्या..
गप की बे. आपण खेळायचं का बोल!
In reply to गप की बे. आपण खेळायचं का बोल! by प्यारे१
प्यार्या तुझी जीभ काळी हाय.
In reply to प्यार्या तुझी जीभ काळी हाय. by अभ्या..
हा हा हा हा!
In reply to हा हा हा हा! by प्यारे१
हाहाहाहा मलाही नव्हतं वाटलं
In reply to हाहाहाहा मलाही नव्हतं वाटलं by कोमल
मीनी कं केला? :/
In reply to हाहाहाहा मलाही नव्हतं वाटलं by कोमल
षाप येगळा. भविष्यवानी येगळी.
In reply to षाप येगळा. भविष्यवानी येगळी. by अभ्या..
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात...
In reply to छान लिहिलय. मस्त एकदम. by अभ्या..
+११११११११
In reply to +११११११११ by बॅटमॅन
(No subject)
In reply to (No subject) by कोमल
:)
In reply to :) by नीलमोहर
अभ्याचा रोख कंपूच्या
In reply to अभ्याचा रोख कंपूच्या by प्यारे१
प्यारे (जी),
सुंदर परिचय. मी बघेन हा
छान ओळख कोमल.जरुर बघेन हा
Not for the faint-hearted.... :)
ओळख आवडली
आता यावर हींदीवाले चित्रपट
मागच्याच आठवड्यात हा चित्रपट
In reply to मागच्याच आठवड्यात हा चित्रपट by सव्यसाची
अति अवांतर:
In reply to अति अवांतर: by द-बाहुबली
ब्रिज ऑफ स्पाईस खतरा नाही? :(
चित्रपटाची ओळख आवडली.
ओळख आवडली.
चित्रपट ओळख आवडली.
परीक्षण आवडले.
बांधलीस मित्रा (तार)