तेव्हा तू कुठं होता?
लंचटाईमला कळलं मला
डब्यात लाडू होता दिला
तिरीमिरीने झटक्यात उचलून
खिडकीबाहेर फेकून दिला
आठवड्यापूर्वी तरसलो होतो जेव्हा
भुकेने कासावीस झालो होतो जेव्हा
ए रासभग्रासा
तेव्हा तू कुठं होता?
घरी येता संध्याकाळला
टॉमी कुत्रा फार आनंदला
घातली कमरेत लाथ त्याच्या
शेपूट हलवत जेव्हा आला
लहान होतो मी जेव्हा
दोन कुत्री चावली जेव्हा
ए दगाबाज कुत्र्या
तेव्हा तू कुठं होता?
बाबा मी पडलो मी गाडीवरून
सांगे मुलगा जवळ येऊन
मोडक्या हाताकडे न पाहता
ओरडलो त्यालाच मी उलटून
शाळेत जायचो मीही जेव्हा
सायकलवरून पडायचो मी जेव्हा
ए सैतानाच्या पोरा
तेव्हा तू कुठं होता?
फाटका माणूस होता मार खात
फिरायला होतो जेव्हा मी जात
मारले मीही दोन-चार दगड
ठेचला सामील होऊन जमावात
गेल्या वर्षी घडलं असंच जेव्हा
गरिबालाच ठेचलं होतं जेव्हा
ए कमनशिबी जनावरा
तेव्हा तू कुठं होता?
आत्ता थोड्यावेळापूर्वी..
हिंदी कविता मिसळपावच्या
हिंदीतली वाचली होती पण काहीच
कविता आवडली.
हिंदी मधली राष्ट्रीय पातळीवर
आंधळ्यांच्या जगात कंदील
बरोबर.
सुपर लाईक !
कविता आवडली.
दारु पिल्यानंतर म्हणावेसे
चांगली आहे कविता ..
असामान्य कविता !