Skip to main content

तेव्हा तू कुठं होता?

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 17/10/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
लंचटाईमला कळलं मला डब्यात लाडू होता दिला तिरीमिरीने झटक्यात उचलून खिडकीबाहेर फेकून दिला आठवड्यापूर्वी तरसलो होतो जेव्हा भुकेने कासावीस झालो होतो जेव्हा ए रासभग्रासा तेव्हा तू कुठं होता? घरी येता संध्याकाळला टॉमी कुत्रा फार आनंदला घातली कमरेत लाथ त्याच्या शेपूट हलवत जेव्हा आला लहान होतो मी जेव्हा दोन कुत्री चावली जेव्हा ए दगाबाज कुत्र्या तेव्हा तू कुठं होता? बाबा मी पडलो मी गाडीवरून सांगे मुलगा जवळ येऊन मोडक्या हाताकडे न पाहता ओरडलो त्यालाच मी उलटून शाळेत जायचो मीही जेव्हा सायकलवरून पडायचो मी जेव्हा ए सैतानाच्या पोरा तेव्हा तू कुठं होता? फाटका माणूस होता मार खात फिरायला होतो जेव्हा मी जात मारले मीही दोन-चार दगड ठेचला सामील होऊन जमावात गेल्या वर्षी घडलं असंच जेव्हा गरिबालाच ठेचलं होतं जेव्हा ए कमनशिबी जनावरा तेव्हा तू कुठं होता?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3397
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आत्ता थोड्यावेळापूर्वी हीच कविता हिंदीत होती ना इथे?? असो, हिंदीतली जास्त आवडली होती! काहीतरी गडबड आहे, धागा नीट प्रकाशित झाला नाहिये बहुतेक. या कवितेसोबत अजून काही होत का??

हिंदी मधली राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषकांसाठी तर ही राज्य पातळीवर मराठी लोकांसाठी. नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा या आधुनिकोत्तर कवितेशी काही संबंध असावा बहुतेक.

कविता आवडली. लिहित जा जरा जास्त फ्रिक्वन्सीने.

चांगली आहे कविता .. खरं आहे हे.. एकदा वेळ टळून गेली कि मिळणार्‍या कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ रहात नाही.

नगरी निरंजन सुंदर कविता तुमची मागे पण एक असामान्य कविता वाचलेली आठवतेय अंधुक अंधुक वेब लाइफ नॅरेट करणारी जबरदस्त प्रतिभा धन्यवाद या कवितेसाठी