पल्याडचे गवत नेहेमीच अधिक हिरवे वाटणार्यांच्या गर्दीत, एकनिष्ठ सहजीवन अंगिकारणारे नेहेमीच अपवाद असणार.
आपले कोमल हात, विशाल पर्वताच्या गळयात लडिवाळपणे टाकून,
त्याच्याशी प्रियाराधन करणार्या नदीला,
सागराची धीर-गंभीर गाज मोह घालते
आणि ती पर्वताला सोडून, सागरात विलीन होण्यासाठी,
बेभान, बेधुंद होऊन धावत सुटते.
प्रियकराला सोडून आपल्या कुशीत आलेल्या पुष्ट सरितेला पाहून समुद्रही सुखावतो
पण तोही अधून्-मधून चकवा देणार्या चंद्रिकेच्या पाशात अडकतो.
पूर्ण यौवनाने मुसमुसलेल्या पौर्णिमेच्या रात्री तर तो धीर सोडून उचंबळू लागतो!
त्या एकाकी तळ्याच्या कोपर्यात ते हंसद्वय मात्र एकमेकांत गुंतलेले असते,
भोवतालच्या जगाची पर्वा न करता!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2259
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्डाम
कडाम कुडूम?
In reply to क्डाम by विनायक प्रभू
उत्तर
सुन्दर कविता
वाह वाह,
गंमत आहे
धनंजय शेठ
In reply to गंमत आहे by धनंजय
आवडली .
मुक्तक छान.
सर्व