लहानपण दे रे देवा असे काहीसे आपण नेहमीच म्हणतो. अशा लहानपणाच्या आनंदाचा उत्कर्ष आपापल्या स्नेहसंमेलनात होत असतो. लहानपणी याला विविधगुणदर्शन असेही म्हणत असत.
आज माझ्या मुलीच्या स्नेहसंमेलनात जाण्याचा योग आला. पूर्वी कार्यक्रमाला सूत्र असे नसायचे. आजचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्र या कल्पनेभोवती विणला होता.
गणेशवंदना, कोळी नृत्य, ज्ञानेश्वर-चांगदेव संवादाचे नाट्यकरण, गणपती मिरवणूक, वासुदेव, जात्यावरच्या ओव्या आणि शिवराज्याभिषेक असा सर्वांग सुंदर कार्यक्रम होता.
सर्वसाधारण नाताळाच्या १ ते १ १/२ महिने अगोदर स्नेहसंमेलनाची तयारी सुरु होते.
पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद तयारीसाठी कामाला लागतो. खेळ, कविता, अभिनयकौशल्य, सादरीकरण इत्यादीसाठी गुणवंताचा शोध सुरु होतो. तालमी सुरु होतात. ( कधी तालीम चालु असताना शिवाजीच्या पाठीत धपाटाही बसतो, शिवाजी आणि औरंगजेबाची मैत्रीही होऊ शकते). शेवटी स्नेहसंमेलनाचा दिवस ठरतो. अगोदर पारितोषिक वितरण आणि नंतर गुणदर्शन असा कार्यक्रम होतो. लहानपणी शाळेच्या मैदानावर संध्याकाळी हा कार्यक्रम होत असे, आता चांगल्या नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होतो.
त्यानंतर एक दिवस अल्पोपहाराचा कार्यक्रम होतो आणि या उत्सवाची सांगता होते.
मलाही माझे लहानपण आठवले. चैतन्याचा आणि स्नेहाचा खरोखर एक वाहता झरा म्हणून मला माझी सर्व स्नेहसंमेलने डोळ्यासमोर तरळून गेली.
ज्या कोणी या कल्पनेचा शोध लावला आणि या कल्पनेचा विकास केला त्याला खरोखर दंडवतच घातला पाहिजे.
(वृतांत लेखक) द्वारकानाथ कलंत्री.
वाचने
8063
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा अनुभव
स्नेह्संमेलन-
अल्पोपहार
In reply to स्नेह्संमेलन- by विदेश
पेशवे शाळेतून कधी बाहेर पड्लात? आम्ही पण तिथलेच.
In reply to अल्पोपहार by llपुण्याचे पेशवेll
अच्छा
In reply to पेशवे शाळेतून कधी बाहेर पड्लात? आम्ही पण तिथलेच. by एक
+१
In reply to अल्पोपहार by llपुण्याचे पेशवेll
"अल्पोपहार"
अगदी बरोबर...
In reply to "अल्पोपहार" by मुक्तसुनीत
आमच्या शाळेचं स्नेहसंमेलन....
शाळेतल्या
वर्स्ट केस एस्टिमेशन का मिनीमम एस्टिमेशन म्हणून?
In reply to शाळेतल्या by विसोबा खेचर