Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्नेहसंमेलने.

क
कलंत्री यांनी
Tue, 12/16/2008 - 19:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8021 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

स
सुनील Tue, 12/16/2008 - 20:09 नवीन

माझा अनुभव

चैतन्याचा आणि स्नेहाचा खरोखर एक वाहता झरा म्हणून मला माझी सर्व स्नेहसंमेलने डोळ्यासमोर तरळून गेली. मी चौथीत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनात मावळ्याची भूमिका केली होती. आजोबांनी झकास पुठ्ठ्याची तलवार बनवून दिली होती. संवाद बोलता बोलता म्यानातून ती काढायची असा काहीसा प्रसंग होता. आवेशात तलवार काढली आणि तिचे पुढचे टोक किंचित वाकले. मी आणि माझा मावळा वर्गमित्र कसेबसे हसू दाबत उभे राहिलो. नशिबाने आमच्या चिकटवलेल्या मिशा सुटल्या नाहीत!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 12/16/2008 - 21:32 नवीन

स्नेह्संमेलन-

त्यानंतर एक दिवस अल्पोपहाराचा कार्यक्रम होतो आणि या उत्सवाची सांगता होते. स्नेहसंमेलनाचा एकमेव नावडता कार्यक्रम !
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 12/17/2008 - 03:35 नवीन

अल्पोपहार

अल्पोपहार एक मजेदार कार्यक्रम असे . कारण अल्पोपहारात आमच्या भावे प्राथमिक शाळेत तरी अगदी पोटभर जिलब्या आणि मसालेभात असे. आमचे एक सर आग्रहाने वाढताना मुलाना म्हणत "सगळ्यानी पोटभर खा". त्यावर कोण म्हणले सर पोट भरले आहे सर तर त्यावर म्हणत "खालती बोट लावून खा". :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदेश
ए
एक Wed, 12/17/2008 - 07:28 नवीन

पेशवे शाळेतून कधी बाहेर पड्लात? आम्ही पण तिथलेच.

मसालेभात / साखरभात आणि जिलब्या अजून आठवत आहेत. शेवटच्या (वर्षी बहुतेक) प्लॅस्टिकच्या पुड्यातून अल्पोपहार दिला होता तेव्हा खूप वाईट वाटलं (एकाला एकच पिशवी मिळत होती ना.. :''( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
आ
आजानुकर्ण गुरुवार, 12/18/2008 - 01:06 नवीन

अच्छा

अच्छा म्हणजे नंतर पिशवीचीही सोय केली होती तर. बोट लावायची गरज नाही. ;) आपला (स्वच्छ) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/17/2008 - 13:19 नवीन

+१

सहमत ! अजुन ही त्या जुन्या आठवणी ताज्या आहेत :) सेंट भावेचा अजुन एक इद्यार्थी (१ली ते १२ वी ) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मुक्तसुनीत Wed, 12/17/2008 - 03:41 नवीन

"अल्पोपहार"

हे मिपा आहे, व्याकरणाच्या चुका काढू नयेत हे मला मान्य आहे. पण इतक्यांदा हा शब्द वापरला गेला आहे म्हणून नमूद करतो : अल्पोपहार नव्हे , अल्पोपाहार. :-) सर्वानी ह. घ्या. !
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 12/17/2008 - 04:07 नवीन

अगदी बरोबर...

अल्पोपाहारच बरोबर आहे. पण शाळेत असताना आम्ही पण तसं म्हणत नव्हतो आम्ही त्याला अल्पोप्रहार पासून अल्पोपोहार पर्यंत काहीही म्हणत असू. आमच्या ताडफळे बाईंनी एकदा अल्पोपाहारच कसे बरोबर आहे हे समजावूनही सांगितले होते. :) पण काय आहे वाईट सवई(सवयीच लिहायचे आहे पण काय करणार? सवय) लवकर सुटत नाही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मृण्मयी Wed, 12/17/2008 - 05:21 नवीन

आमच्या शाळेचं स्नेहसंमेलन....

पोटेटो - पोटाटो.. काय फरक पडतो? खाण्याशी मतलब! :) आमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन जोरदार गाजायचं. तीन अंकी नाटकं तर कार्यक्रमाचा हायलाईट! दिवा जळू दे सारी रात, वाहतो ही दुर्वांची जुडी, संगीत मानापमान वगैरे नाटकं व्हायची. अख्खा सांस्कृतिक कार्यक्रम दोनदा व्हायचा. आदल्या दिवशी फक्त विद्यार्थिनींसाठी आणि दुसर्‍या दिवशी पालकांसाठी तिकिट लावून. समाजात मान्यता मिळालेल्या , फेमस माजी विद्यार्थिनींना आमंत्रण करायला शिक्षकांबरोबर जायची चढाओढ लागायची. (तेव्हडंच शाळेतून राजरोस बाहेर पडायला मिळायचं.) स्पर्धा, बक्षिसं, रोज खाणीपिणी, मग मोठ्ठं भोजन हे आनंदाचे दिवस. उद्घाटनाचे पाहुणे मात्र बोर करायचे. लांबलचक भाषणं द्यायचे. एकदा ऍड. मनोहरांना (सिनियर) आमंत्रित केलं होतं . काही कारणानं त्यांना यायला जमलं नाही. बरं वाटलं २ मिनिटं. पण कसलं काय, त्यांच्या पत्नीनं त्यांचं अख्खं भाषण वाचून दाखवलं. :( भरपूर गमती लिहायला आवडतील. विस्तारभयानं आवरतं घेते. :) एक आठवण : एका गॅदरिंगच्या वेळी आंध्रात चक्रीवादळानं बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावर्षी सगळ्यांनी ठरवून संमेलनाची सगळी रक्कम मदत म्हणून पाठवली होती.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 13:03 नवीन

शाळेतल्या

शाळेतल्या स्नेहसंमेलनात अल्पोपाहार समितीवर माझी नेहमी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक व्हायची! :)
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 12/18/2008 - 01:01 नवीन

वर्स्ट केस एस्टिमेशन का मिनीमम एस्टिमेशन म्हणून?

ह. घ्या हं तात्या माझी वर्स्ट केस एस्टिमेशन साठी निवड झाली होती इंजिनियरींग ला.. शेवटी मलाच फुड डिपार्टमेंट सेक्रेटरी केलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा