Skip to main content

सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन

लेखक विक्रान्त कुलकर्णी यांनी सोमवार, 12/10/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

वाचने 30876
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by chetanlakhs

हे भेळ प्रकरण गाणगापुरला जाताना ट्रेनमधे खायला मिळाले , काही पदार्थ जे मुम्बईची स्पेशालिटी आहेत उदा. भेळ , पावभाजी , बटाटावडा , ईडली ई ती बाहेर काही केल्या चव येत नाही हे माझे वैयक्तीक मत. प्रत्येक ठीकाणी चव बदलते.

वर ज्या काहि लोकानि सोलापुर रेल्वे स्टेशन च्या अस्वछ्तेबाबत लिहिलय ते सगळ खोट आहे आपण या सोलापुर ला मग कळेल किति स्वछ आहे ते. स्वछ्तेबाबत सोलापुर स्टेशन कायम जागरुक आहे अणि कायम सोलापुर ला त्याचि ट्रोफि मिळते आपण सोलापुर ला या अणि पाहा.

अक्कलकोट्ला गेलात तर एस. टी. स्टॅड जवळचा राजवाडा आणि छोटेखानी म्युझिअम पाह्ण्यास विसरु नका. स्टॅडपासून १० मिनीटावर आहे. मासनूरला गेलात तर जवळच असणारा औरन्ग्जेबाने बान्धलेला किल्ला जरुर पहा. नळ्दुर्ग किल्ला हि असेच न चुकवता येणारी जागा.

सोलापुरात सात रस्त्याजवळ डॉमिनोज आहे. भागवत पाशी अ‍ॅडलॅब आहे. मॅक्डी अन केएफसी तिथेच होतेय. बिगबाझार अन तळवलकर जवळ जवळ आहेत. चोकोलेड लै ठिकाणी आहे. ली रँग्लर लिनन क्लब वूडलँड पीएनजी अन लीवाईस एका लैनीत व्हीयापी रोडवर आहेत. वोल्व्होच्या लोफ्लोअर सिटीबस आहेत. बाकी उरलेले सोलापूर जरासे गलिच्छ आहे. ;)

In reply to by प्यारे१

मिरची भजी अर्धवट तळून बाहेर काढायची. त्याचे उभे काप करायचे. (मिरची सुध्दा विभागली जाईल.) आणि ती परत तळायची. यात थोडा चाट मसाला सोबत खायची. बहुतेक दोनदा तळतात म्हणुन डिस्को असे म्हणतात.

In reply to by मांत्रिक

जे मिरची भजी खावू शकतात त्यांना डिस्को भज्यानी काहीही होणार नाही..सोलापुरकारांसाठी मिरची भजी ही तिखट प्रकारात मोडत नाहीत..तिथली माणसे जास्त तिखट आहेत

कविता१९७८ फार उपयोगी माहिती दिली आहे.जो कोणी पुढे जाईल त्यास ट्रीप ठरवायला फारच उपयोगी पडेल.प्रवासाचा वेळ आणि सोयी कळल्याने तिथे मुक्काम करायचा अथवा पाहून परत यायचं यासाठी बारीकसारीक तपशील महत्त्वाचा असतो. नरेन,कुठे गेल्यावर मी उगाच चौकशा करतो त्यामुळे सोलापूर रिटाइरिंग रूमबद्दल त्या डॅाक्टरकडून समजले.ते विजापुरात हेरिटेज हॅाटेलमध्ये (मयुरा अदिलशाही अनेक्स )राहिले होते रु अडिच हजारात हेरिटेज चांगले होते असे त्यांचे म्हणणे होते

यांच्याशी पूर्ण सहमत. सोलापूर रेल्वे स्थानक अतिशय स्वच्छ आहे. रेल्वे फलाटावर पिचकाऱ्या अजिबात दिसत नाही.खाण्यासाठी अजुन एक ठिकाण म्हणजे कन्ना चौकातील पाणी पुरी..पवार बंधू यांचे साड्यांचे दुकान मोठे आहे. तसेच सोलापूर महापालिका कार्यालय इंद्र भुवन पाहणे पण चुकवू नका. बाकी अजून काही मदत हवी असल्यास सांगा.

In reply to by मनिमौ

सोलापूर शहरात सिद्धेश्वर मन्दीर, तलाव व किल्ला या व्यतिरिक्त पहाण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत ?

कडक भाकरी हा प्रकार तर सांगायचा राहूनच गेला..अफलातून चीज आहे..

नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. चकोले मटन भाजनालयातले (भोजनालयातले नव्हे). शाकाहारीसाठी कडक भाकरी, शेंगा भाजी, घट्ट दही, मटकी फ्राय, पेंडपाला, हुग्गी, शेंगा पोळी, खवा पोळी हे सर्व हॉटेलात मिळतात. ब्राह्मणी जेवणासाठी (तसा बोर्ड आहे) अनादी च्या दोन शाखा. पूर्व भागात आंध्रा लोणचे, रायचूर (आंध्रा) भजी, चारु बोवा, हिरवे मटण, दालचा हे पण मिळते. नाश्त्याला अगदी ५ रु डिशपासून ८० रु. पर्यंत ईडलीच्या व्हरायटी डिशेस मिळतात. पुरी भाजी ही वेगवेगळ्या ४-५ प्रकारात मिळते. पंजाबी खाऊ घालायला भरपूर ठिकाणे आहेत. तिथे जात नाही.

वेळ असेल तर पद्मशाली चौकात मिळणारी पाणी पुरी ट्राय करू शकता .

बाब्बौ! चौकशीचा धागा शंभरीकडे वाटचाल करतोय.. विक्रांतकाका शेंगा चटणी आणा हो येताना ;) @धन्या, कवा जायचं बे सोलापूरला?

शतकी धागे ही काय फक्त पुण्या-मुंबईची मक्तेदारी आहे काय? खादाडी बाबतीत पुण्यापेक्षा जास्त विविधता आहे सोलापुरात..

मंगळवार पेठेतील डोसा विविध प्रकारात मिळतो.सेट डोसा,कट डोसा,दावणगिरी डोसा इत्यादी.खान्याच्या बाबतीत सोलापूर एक नंबर आणि इतर ठिकानंपेक्षा स्वस्त आहे.

बिजापुरला १ दिवसापेक्षा जास्त वेळ देउ नका. बिजापुर जवळ १८ किमि वर कुमुटगी म्हणुन जागा आहे तिला नक्कि भेट द्या. तिथे राजाचे विश्राम ग्रुह आहे, शेजारीच तलाव आहे. त्याकाळची शॉवर पद्धत बघता येईल.ए.एस.आय. चा कर्मचारी उत्तम माहिती देईल (तिथे गाईड नाही). बाकि कुठेही गाईड करु नका, फसवतात आणि काहिही विशेश माहिती देत नाहीत. उप्पुळी बुरुज वर एक म्हातारे आजोबा १०० घेउन बर्‍यापैकी चांगली माहिती देतात.बिजापुरला राहणार असाल तर हॉटेल पर्लचा विचार करु शकता तिथुन गोल घुमट पायी जाण्याइतपत जवळ आहे. ११०० रु/नाईट (आम्हाला सवलतित ७०० रु मध्ये मिळाली. अजुन काही मदत असल्यास नक्की विचारा. बदामि, ऐहोळे पट्टडकल जाणार असाल तर तिथली माहिती देऊ शकेन. ह्या भागात जाण्यापुर्वि कंजुस काकांचा हा धागा नीट वाचुन काढा... http://www.misalpav.com/node/28762

In reply to by भुमन्यु

तुम्ही सन्गितल्याप्रमाणे हॉटेल पर्लचा नक्की विचार करेन.मला एक दिवस नळदुर्गला पण जायचे आहे. त्यासाठी कसे जावे लागेल ?

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

१. जेवणात जर तिखट कमी खात असाल तर तशी पुर्व कल्पना द्या. ओव्हरऑल उत्तर कर्नाटकात तिखट जास्त खातात. २. पर्ल हॉटेल जवळ कामत हॉटेल आहे, तिथेही जेवण चांगले मिळते.

अबे अभ्या.... लईच दंगा झाला बे इथं..असो, विक्रांत, या सोलापुरला जरुर या, स्वागत आहे. पुर्वीपासुनच सोलापुर हे एक तुम्ही लिहिलेल्या धार्मिक ठिकाणांचं केंद्र म्हणुन सोयीचं आहे. सोलापुरात येताय तर खाणंपिणं मजेत करा.. जमल्यास, दातेंच्या गणपतीचं दर्शन घेउन या, देवळाच्या बाहेरुन देखील दर्शनाची सोय आहे, आणि त्यांचं ऑफिस तिथं मागंच आहे, विनंती केल्यास ते देऊळ उघडुन दर्शन घेउ देतात. पुर्वभागातलं, म्हणजे अक्कलकोटलनाक्याच्या अलीकडं बालाजीचं मंदिर आहे, तिथं जाउन या. बा़ळीवेशीतलं मल्लिकार्जुन मंदिर आणि माणिकचॉकाजवळ्चं जैनमंदिर ही जस्ट ५-१० मिनिट जाउन यायची ठिकाणं आहेत. सिद्धेश्वर तलावाच्या बाजुचा घाटावरचा गणपती देखील असाच आहे. अजुन ह.दे.प्रशाला बघा, आजकालचे शिक्षणसम्राट तेवढ्या जागेत १२-१४ संस्था उभ्या करतील खाण्यापिण्याचं म्हणाल तर खरंच सोलापुरसारखी ओरिजनल जागा नाही... सातरस्त्याजव़ळ राजमहाल मध्ये इडली खायला जा, तिथं तेलमसाला वेगळा मिळ्तो चटणीवर घालुन खायला, तिथुन रंगभवनकडं येताना इंडिया टि हाउस आहे, फक्त चहा घेउन जरा लांब जावं लागतं. पुढं विजापुर वेशीत २-३ पायनापल कोल्डिंकची दुकानं आहेत ती ट्राय करा. सावरकर मैदानावर पैलवान कडचं आइस्क्रिम खा, तिथुन पुढं बागेच्या गेटसमोर सिद्धेश्वरमध्ये चहा प्या इथं केटी घ्या, नुसता चहा नको. वर सांगितलेली भैयाची भेळ हा आमच्या शाळेच ऑफिशियल पाणीपुरी वाला होता, अगदी शाळेच्या कॅम्पसमध्ये होता तो. डिस्कोभजी हा प्रकार ओरिजनल साखर पेठ आणि भवानी पेठेत मिळेल्,पार्कवर ठिक आहे. चादरी बद्दल सगळ्यांनी सांगुन झालंय, पुर्वभाग राम मंदिराच्या जवळ चाटलांच शोरुम् आहे तिथं जाउन या. व्हेज जेवणासाठी स्टेशनच्या थोडंसं पुढं सुगरण आहे, सोलापुरी शेंगाच्या पोळ्या आणि खवाच्या पोळ्या खाउन या तिथं. नाश्ट्याला, मधला मारुतीच्या जवळ अप्पा हलवाई कंडं एक पुरी भाजी आणि एक प्लेट कुंदा खाउन या. स्वताचया गाडीनं जाणार असाल तर, सोलापुरच्या अलीकडं लांबोटीला चिवडा, कुंदा आणि बाकरवड्या घेउन या. फक्त दुधातला चहा ही तिथली स्पेशलिटि आहे. अजुन उद्या...

In reply to by ५० फक्त

एवढे सगळे पदार्थ खायचे म्हणजे सोलपूरातील मुक्काम वाढवावा लागेल असे दिसते. नळदुर्गला कसे जायचे व प्रवास किति वेळाचा लागेल याबद्दल काही माहिती मिळेल का ?

सोलापूर म्हंजे मजाच मजा. भरपूर खाणं आणि चित्रपट बघणं. जर का सुभाष चौकातल्या कुठल्या हॉटेलात राहिलात तर बर्याच गोष्टी पायी फिरून बघता येतील. किल्ला समोरच आहे. बाजारपेठा, पार्क मैदान, सिद्धेश्वर देऊळ, ह्दे प्रशाला, संगमेश्वर कॉलेज, वारद बंगला अर्थात ईंद्रभुवन अर्थात सोलापूर (म्?)न.पा.कार्यालय, आणि भरपूर टॉकिजेस. सोलापूर म्हंजे खायला पर्वणी. सुप्रजा, स्वाद,नट्स चाट चा ठेला पण मस्त. त्याच्यानंतर दत्ताच्या देवळाजवळ आलं की आनंदाश्रम होतं. तिथला डोसा उर्फ दोसाई अफलातून होता.किल्ल्यासमोर रस्त्यावर्च्या गाड्यांवर चटणी सँडवीच प्रचंड भारी!!! आता मिळतं का कल्पना नाही. पूर्वी हाटेलातली जेवणं पण मस्त होती, अजूनही बर्यापैकी घरगुती चव टिकून आहे. अर्थात मागच्या ३ वर्षातले बदल माहीत नाहीत. पार्क मैदानाजवळ दूध पंढरीचे पेढे आणि फ्लेवर्ड दूध जरूर प्या.बाजारपेठेत दाणे खात खात भटका. लक्ष्मी मंडईत जा. माणिक चौक, सहकार पेठपर्यंत पायी फिरा. पूर्वी मी लकी (बंद झालं),गदग ग्रँड (मजा गेली आता), मुक्ताई मिठाई इ. ठीकाणी मनमुराद खाल्ले आहे. तेंव्हा सकाळी सकाळी गरम गरम ईडली, द्वाशी आणि वडा सांबार देणारी एक गाडी लागायची. तूफान मजा यायची सकाळी सकाळी ते खाताना. मस्त शहर आहे आणि मस्त लोकं आहेत.

सोलापुरकरांनो चांगली माहिती सांगितलीन की.असं आहे की जोरदार प्रमोशन झालं पाहिजे एकेका जिल्ह्याचं.एक सांगायचं राहिलंच की चादरी इतकंच महत्त्वाची शाळूची ( पांढराशुभ्र चमकदार मऊ जोंधळा , यावरूनच शेतं पिकली मोत्यावानी कल्पना आली ) भाकरी,तीन चार सुक्या चटण्या.कारळे शेंगदाणे तीळ. वर करडईचं तेल. मला मनपा इमारत फार आवडली होती.

In reply to by दुर्गविहारी

नळदुर्ग -तुळजापूर असा रस्ताही आहे व बस ही पुष्कळ आहेत. पावसाळ्यात नळदुर्ग च्या किल्यात धबधबा असतो आता माहिती नाही. जाताना अणदूर येथेही खंडोबा मंदिर आहे. सोलापूर -हैदराबाद रोड -नळदुर्ग - तुळजापूर असे पण जाऊ शकता.

सोलापुरकर मन्ड्ळी बरीच आहेत मिपावर. छान कट्टा होइल सोलापुरात.अभ्याभाऊ घ्या पुढाकार.