माणसांना पालवी नाही ..
चेहर्यावर टवटवी नाही
वाटते,माझी छवी नाही
दूरवर नुसतेच रण आहे
माणसांना पालवी नाही
बालकांचे अर्भकांचेही
हास्य आता लाघवी नाही
हाक देवाला नका मारु
भाव त्याचा वाजवी नाही
तू कधी येशील तेव्हा ये
ही प्रतिक्षाही नवी नाही
हा कुणाचा चेहरा आहे
आज काही चौदवी नाही
डॉ.सुनील अहिरराव
डॉ. साहेब!
आभार संदीपजी !
+१११
खूप खूप धन्यवाद.
आवडली
हो, ही गझल आहे. खूप खूप आभार.
मस्त!!!
खूप खूप आभार मांत्रिकजी!
चांगली कविता, आवडली.
धन्यवाद सौंदर्य!
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्रखूप खूप आभार !
एक सूचना.
क्लास! मस्त जमलीय.
हेच नि असेच म्हणायचेय.
@एस, आपल्या सुचनेचे मनापासून
छवी नाही; पण छबी ऐकलाय मी