Skip to main content

भुत असते(च) (एक्सटेंडेड भयशशक प्रयत्न)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 12/10/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आवरले एकदाचे, जरा लॉगिन करुया आता.. हम्म.... हॉटेलात आलेली माणसे, बॅटमॅन आहे ईए काका आहेत अरे वा जॅक हे आपले कॅप्टन जॅक स्पैरो आहेत... धागे कुठले बरं पेटले आहेत? 1 वर्षा नंतर...अर्र दादुमियां पेटले बहुदा! इकडे काय अहाहा मासे! सुरंगी तै न पोस्ट केलेली रेसिपी दिसते आहे... इथे आता कसले हिमालयात मासे!? असो! हा कुठला धागा 'भुत असतेच'आयला हसु आवरेना, कॉमेंट्स करण्यात मिपाकरांचा कीबोर्ड कोणी धरणारा नाही, हा कोण बॅटमॅन वह्य 'बापूसाब भुत वगैरे सब झुट हो कारण भूते नसण्यामागे ऐतिहासिक कारणे....' बाबो बॅट्या म्हणजे बॅट्या हाय म्हणाल त्याचा इतिहास देऊ शकेल खाली प्रतिसाद 'काही ही म्हणा गोथम नरेश पारलौकिक शास्त्र काहीतरी आहेच साले!' प्रत्येकाने असेच काही से सांगितले कॅप्टन स्पैरो ते ईए काका अन बोका ते पैसा ताई सगळे लिहून गेलेत 'भूते नसतात' प्यारे तर म्हणतो 'ससुरे थक गेस तुम जाओ थोडा मेस में 2 पेग लगा के आओ' मला विलक्षण हसु यायला लागले एकदम, भूते नसतात? खरेच? की कोणाला दिसली नाहीत म्हणून नसतात !? लॉगऑफ़ करून मी विचार करत लॅपटॉप बंद करत असतानाच माझ्या डोळ्यात चमक आली अन मी लॅपटॉप टेबल वर ठेवताना माझ्य चेहऱ्यावर माझे तेच ख़ास हसु. 'भूते असतात बे! नक्कीच असतात' मी ठामपणे म्हणलो डोळे चमकवत स्मित करता करता, 2 तासापासुन बेडिंगवर शांत झोपलेल्या बापुसाहेबाकड़े पाहात.... (समाप्त)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5052
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

भुते असतील तर मला बोलवा! स्वस्तात बंधन करुन देऊ. पुन्यांदा सुटणार नैत याची गैरंटी!! ;) बुवांच्या पेक्षा कमी रेटमंदी काम करून दीऊ!

ले बटे. तेरे वास्ते दो पेग रक्खे सच्ची मे मेस मे. और सुन वो पलंग का नीचे मुर्गी रखा है खाने के लिये मसाला मार के. (आणि हो मी पयला)

=)) =))

मग, काय काल बम बम भोले का? बरं बरं, केव्हापासून होतंय हे असं? ओह आय सी! खिक्क...कळ दाबून ठेवली तर.... (माझ्या एका धाग्यावर आलेले हे प्रतिसाद आठवले) ह घ्या.

In reply to by अभ्या..

काही ख़ास नाही अभ्या भाऊ लोड न घेणे, सहज टवाळपणा जरासा कीबोर्ड वर हात साफ़ केलान

काय हे!! भुते बीते नसतात. मी सांगतो, गेली दोन्शे वर्षे मी आणि चिमण्या भुते शोधतोय एक दिसले तर शप्पथ. उलटी पायवाट दिसली पण एकाचे पण पाय उलटे दिसले नाहीत. "भूत" दया अभियान मौजे पिंपळाचा पार भुताची वाडी, ता:चकवा जि:अलगद अल्ल़्ख.

हाहाहा . मस्त बापूसाहेब . मजा आला

काय रे हे! =)) मिपावर ५ वर्षे काढली की सगळे पाय उलटे दिसायला लागतात! भुतं असतात. माणसं असतात की नाही देवजाणे!