सांज वेडी रंगताना याद यावी का तुझी
आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।।
राग जुळता या मनाचे दुर होती अंतरे
गीत फुलवी जिवनाचे सुर देती पाखरे
स्वप्न फुलता हे उद्याचे रात वाटे पाहुणी
आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।।
चिञ माझे अंतरीचे रंग भरती ही फुले
गंध ओले चंदनाचे अंतरंगी दरवळे
याचवेळी ही अबोली प्रित दाटे या मनी
आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।।
सांज वेडी रंगताना याद यावी का तुझी
आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3254
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१११
आवडली!
धन्यवाद
माहीराज
सैंडी भौ
In reply to माहीराज by चांदणे संदीप
नक्कीच
In reply to माहीराज by चांदणे संदीप
माहिराज, आवड्यास.
धन्यवाद
छान कविता!
आवडेश!
लवकरच या कवितेचे गाण्यात
वाह!!!
आज पुन्हा वाचली पुन्हा आवडली
In reply to वाह!!! by एक एकटा एकटाच
सुरेख....