Skip to main content

सांज वेडी रंगताना

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 09/10/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सांज वेडी रंगताना याद यावी का तुझी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।। राग जुळता या मनाचे दुर होती अंतरे गीत फुलवी जिवनाचे सुर देती पाखरे स्वप्न फुलता हे उद्याचे रात वाटे पाहुणी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।। चिञ माझे अंतरीचे रंग भरती ही फुले गंध ओले चंदनाचे अंतरंगी दरवळे याचवेळी ही अबोली प्रित दाटे या मनी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।। सांज वेडी रंगताना याद यावी का तुझी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3254
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

+१११

माहीराज... बस एक तुम ही तुम छाये हो तसव्वुरपे.. जरा हटिए कि, और भी खडे है राहोपे! (पुढल्या वेळी 'त्र' ही नीट काढायचा सराव करून या!) Sandy

गेयताही आहे या कवितेत! चाल लावण्याचा प्रयत्न करता येईल.

वाह!!!

मस्त आहे कविता....