सुखद श्रावणसरी
गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,,
व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी
आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी,
भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात ,
व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात..
पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे
गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने
ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात
व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
छान आहे कविता
बरं आसतय ह्या असल्या कवितांचं
आमच्या ओळखीचे एक कवी वेगळंच