गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती . online जगतात तरुणांना भुरळ घालून त्यांना इसीसकडे आकर्षित करण्याचं हिचं मुख्य काम होतं .तिला अबुधाबीत कुटुंबासह अटक करून भारताकडे सोपवण्यात आलंय .भारतातील ३० पेक्षा अधिक तरुण इसीस मध्ये सामील होण्यासाठी आपल्या संपर्कात होते असं तिने चौकशीत दिलेल्या कबुलीत म्हणलं आहे .तिने 'इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनीटी फ्रेंडली डीस्कशन ' नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला होता आणि त्याला फोलो करणाऱ्यांची एकूण संख्या ५० हजार होती . हे account बंद करण्यात आलंय . ज्या दिवशी तिने हि कबुली दिली त्याच दिवशी अजून चार तरुणांना दुबीतून परत पाठवण्यात आलं होतं . तिच्या रूपाने इसीसमधील एका भारतीय महिलेचा सहभाग उघड झाला . अश्या अजूनही भारतीय मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
संपूर्ण जग 'इस्लामिक स्टेट 'बनवून आपल्या कायद्यानुसार जगणारा समाज निर्माण करण्यासाठी ,मुस्लिम तरुणींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यांच्यात सामील होण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची उत्तम बडदास्त ठेवली जाते . सर्व सोयी सुविधा फुकटात पुरवल्या जातात .त्यांना कोणतीही कमी करण्यास सांगितलं जात नाही. तरुणांना भुरळ घालून इसीस मध्ये आणण्यासाठी आणि दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत .
असंच काम करणाऱ्या दुसऱ्या इसमाचं नाव आहे सलमान मोइउद्दिन . ३२ वर्षांचा इंजिनिअर असलेला हा तरुण काही वर्षे नोकरी करत होता . US return होता . हैद्राबादी असलेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा US मध्ये नोकरी करण्यासाठी निघाला होता . खरं तर तो दुबईला जाणार होता . घरच्यांशी खोटं बोलून . तिथे जावून तो इसीस चं काम करणार होता . त्याचे अनेक महिन्यांपासून इसीस मध्ये सामील होण्याचे प्रयत्न चालू होते . त्यामुळे तो दुबईला जाणार होता . पण त्याला विमानतळावारच अटक करण्यात आली . चौकशी मध्ये त्याच्याकडून इतर अनेक लोकांची माहिती आणि पत्ते उघड झाले आहेत .
'अल्लाहसाठी काम करायला या . जन्नतमध्ये जायला हवं असेल तर इसीस मध्ये या ' अश्या भावनिक आवाहन करणाऱ्या भूलथापांना बळी पडून तरुण तरुणी संघटनेत सामील होत आहेत . भारतीय मुस्लिमांचा त्यात सहभाग योग्य आहे का ?भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोशल मिडीयावर वॉच ठेवणं , अंतर्गत सुरक्षा सांभाळणं हि महत्वाची कामे करावी लागणार आहेत . त्यांची जबाबदारी वाढली आहे . पण सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .
वर्गीकरण
वाचने
26174
प्रतिक्रिया
120
मिसळपाव
प्रतिक्रिया
टु बी होणेस्ट प्रीटीन वा टीन
एका गावाची गोष्ट!
बाबुदादा.... प्रचंड असहमत.
In reply to एका गावाची गोष्ट! by भीमराव
हेलावून टाकणारी गोष्ट ..!
In reply to एका गावाची गोष्ट! by भीमराव
पण अशा या अविकसीत भावनांचा
चला यादी बनवा..
In reply to पण अशा या अविकसीत भावनांचा by तुडतुडी
इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे
कधी नव्हे ते आज मुद्द्याचे
In reply to इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे by फुलथ्रॉटल जिनियस
लगोलग सत्कार करुन टाका जेपीस
In reply to कधी नव्हे ते आज मुद्द्याचे by टवाळ कार्टा
कशाच्या आधारावर म्हणत आहात?
In reply to इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे by फुलथ्रॉटल जिनियस
@हुप्प्या ,आपण आंतरराष्ट्रीय
In reply to कशाच्या आधारावर म्हणत आहात? by हुप्प्या
होय पुरेसा अभ्यास आहे
In reply to @हुप्प्या ,आपण आंतरराष्ट्रीय by फुलथ्रॉटल जिनियस
कुराणमध्ये जहाल आयते आहेत?
In reply to होय पुरेसा अभ्यास आहे by हुप्प्या
जहाल आयते आहेत ना.
In reply to कुराणमध्ये जहाल आयते आहेत? by फुलथ्रॉटल जिनियस
ब्याट्या असा डायरेक्ट पठाणी
In reply to जहाल आयते आहेत ना. by बॅटमॅन
precise..!!
In reply to जहाल आयते आहेत ना. by बॅटमॅन
वाचली बोवा !
In reply to जहाल आयते आहेत ना. by बॅटमॅन
एकतर तुम्हांला इंग्रजी धड येत नसावी
In reply to वाचली बोवा ! by dadadarekar
धन्यवाद बॅटमॅन. हे असं
In reply to एकतर तुम्हांला इंग्रजी धड येत नसावी by बॅटमॅन
कुराणः
In reply to कुराणमध्ये जहाल आयते आहेत? by फुलथ्रॉटल जिनियस
आता मनुस्मृतीचेही दाखले द्या
In reply to कुराणः by काळा पहाड
.
In reply to कुराणः by काळा पहाड
तसंच समजा. बाकी गुजरात बद्दल
In reply to . by dadadarekar
ओ हितेसराव
In reply to . by dadadarekar
इस्लाम हिंस्त्र आहे
In reply to होय पुरेसा अभ्यास आहे by हुप्प्या
.
In reply to इस्लाम हिंस्त्र आहे by गामा पैलवान
दरेकर तुम्ही डॉक्टर आहात ना?
In reply to . by dadadarekar
चिमणीभौ
In reply to दरेकर तुम्ही डॉक्टर आहात ना? by कॅप्टन जॅक स्पॅरो
.
In reply to चिमणीभौ by dadadarekar
दरेकर दिवसभर फेकाफेकी करुन
In reply to चिमणीभौ by dadadarekar
अच्छा..
In reply to इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे by फुलथ्रॉटल जिनियस
वरील लेख बहुतांश
तुमच्या सोयीनं वेळ भेटला त
शंभर पक्के ..कस सुचत कस ..
टाइम पास ला बरं हाय कि.
In reply to शंभर पक्के ..कस सुचत कस .. by जेपी
.
काडी क्र. १
In reply to . by dadadarekar
मला धागा
In reply to काडी क्र. १ by खटपट्या
ईडीस
डास आहे आणि त्याने डेंग्यू होऊ शकतो तेव्हा अखिल मिपा हिरवा ताप प्रतीबंध आणि ईडीस डास निर्मूलन समीतीचा संयुक्त, मिपा वाचक जागर.केवढा दुटप्पीपणा आणि अन्याव ..!
In reply to . by dadadarekar
=))शंभर मोजायच्या का?
आपली कृत्यं 'आपलं'
मोदीचाचानी उपाय कालच सांगितलाय.
In reply to आपली कृत्यं 'आपलं' by तुडतुडी
नरेंद्र मोदी यांनी जो
In reply to मोदीचाचानी उपाय कालच सांगितलाय. by dadadarekar
करा !
In reply to नरेंद्र मोदी यांनी जो by बाप्पू
किंवा उलटं..!
In reply to करा ! by dadadarekar
गणित कच्चं दिसतय.
In reply to किंवा उलटं..! by दत्ता जोशी
काडी क्र. दोन टाकण्याचा क्षीण
In reply to गणित कच्चं दिसतय. by dadadarekar
@ ....डादा डरेकरर्भॉय.........!!!!
In reply to करा ! by dadadarekar
लंबी कहानी है.
In reply to @ ....डादा डरेकरर्भॉय.........!!!! by विनोद१८
लिख्खो, लिख्खो । एक लेख
In reply to लंबी कहानी है. by dadadarekar
@....नाना.....!!!
In reply to लंबी कहानी है. by dadadarekar
ठरलं ! नाही जाणार आता मी इसिस
जन्नत मिस केली राव तुम्ही हा
In reply to ठरलं ! नाही जाणार आता मी इसिस by नाव आडनाव
:)
In reply to जन्नत मिस केली राव तुम्ही हा by बाप्पू
जा बे....तेव्हडीच ऑनसायीट =))
In reply to ठरलं ! नाही जाणार आता मी इसिस by नाव आडनाव
:)
In reply to जा बे....तेव्हडीच ऑनसायीट =)) by टवाळ कार्टा
हा शवार्मा अन कबाब्स मस्त
In reply to जा बे....तेव्हडीच ऑनसायीट =)) by टवाळ कार्टा
काय राव !
फिजि -
नै बाकी चालू द्या फकस्त
In reply to फिजि - by बाप्पू
हमीद दलवाई यांच्याबद्दल
In reply to नै बाकी चालू द्या फकस्त by अस्वस्थामा
.
In reply to हमीद दलवाई यांच्याबद्दल by बाप्पू
हमीद दलवाईंचे कार्य व अंनिस
In reply to नै बाकी चालू द्या फकस्त by अस्वस्थामा
+१११११११११११११११
In reply to हमीद दलवाईंचे कार्य व अंनिस by प्रदीप
हुसेन दलवाई हे हमीद दलवाईंचे
In reply to हमीद दलवाईंचे कार्य व अंनिस by प्रदीप
भाऊ
In reply to हुसेन दलवाई हे हमीद दलवाईंचे by खटपट्या
बरोब्बर......!
In reply to भाऊ by प्रदीप
हुसेन दलवाईंमधे भावाचा एकही
In reply to बरोब्बर......! by विनोद१८
मुद्दा
In reply to हुसेन दलवाईंमधे भावाचा एकही by खटपट्या
कै च्या कै !
In reply to फिजि - by बाप्पू