बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
मॅनेजमेन्टच्या क्षेत्रात "SWOT analysis" ही एक संकल्पना आहे. SWOT म्हणजे Strengths (सामर्थ्यक्षेत्रे), Weaknesses (कमकुवत क्षेत्रे), Opportunities (संधी) आणि Threats (धोके) यांचे विश्लेषण. यातील सामर्थ्यक्षेत्रे आणि कमकुवत क्षेत्रे या दोन गोष्टी अंतर्गत असतात तर संधी आणि धोके या दोन गोष्टी बाह्य असतात. पहिल्या लेखामध्ये नितीश कुमारांच्या आघाडीचा परामर्श घेतला त्यावेळी सर्व मुद्दे त्या आघाडीशी अंतर्गत होते.याचे कारण या आघाडीला बाह्य कोणते मुद्दे हे संधी असतील आणि कोणते मुद्दे धोकादायक ठरतील याचा विचार केला तर खरोखरच तसे मुद्दे मिळाले नाहीत. कदाचित माझ्याकडून काही मुद्दे निसटले असतील. पण भाजप आघाडीबाबत मात्र संधी आणि धोके हे बाह्य मुद्देही तितक्याच प्रमाणावर मला सापडले. म्हणून या लेखाचे शीर्षकही तसेच दिले आहे.तेव्हा सुरवात करू SWOT याच क्रमाने.
भाजप आघाडीची Strengths (सामर्थ्यक्षेत्रे)
१. ही आघाडी नितीश कुमारांच्या आघाडीच्या मानाने अधिक सुसंगत आहे.बिहारमधील निवडणुक म्हटली की जातीपातींचा विचार अनिच्छेने का होईना पण करावाच लागतो. त्यामुळे हा मुद्दा जातीच्या आधारेच स्पष्ट करतो.
या आघाडीचे मतदार नक्की कोणते गट आहेत? उच्चवर्णीय, बनिया आणि सुशीलकुमार मोदींच्या ओ.बी.सी मधील जातींचे मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.त्यापैकी कोणीही भाजपला सोडून जायची शक्यता नाही. महादलितांमधील पासवान, मल्या (नावाडी) या समाजातले मतदार रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीचे पारंपारिक मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही व्होटबॅंक पासवानांनी आपल्याबरोबर ठेवली आहे. ओ.बी.सींमधील कुशवाह समाज उपेन्द्र कुशवाहांबरोबर तर महादलितांपैकी मुसहार आणि इतर जातींचे मतदार जीतनराम मांझींबरोबर असतील असे म्हणायला हरकत नसावी. जीतनराम मांझींचे निवडणुकीतील सामर्थ्य अजून स्पष्ट झालेले नाही.यापूर्वी ते तितके महत्वाचे आणि मोठे नेते नव्हतेच.पण नितीशकुमारांनी त्यांना मुख्यमंत्रीपद खाली करायला सांगितल्यावर मात्र त्यांनी आपले पत्ते योग्य प्रकारे खेळले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले.तेव्हा त्या समाजातील मते त्यांच्यामागे जातील असे म्हणायला हरकत नसावी.
हे मतदार परस्परविरोधी नाहीत.म्हणजे नितीशकुमारांच्या आघाडीत यादव विरूध्द कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार आहेत. कुर्मी-कोयरींना लालूंच्या राज्यात डावलले जाते आणि सगळा फायदा यादवांनाच होतो या मुख्य कारणामुळे नितीशकुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले होते.त्या कारणाने यादव आणि कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार झाले. तशा प्रकारे परस्परविरोध भाजप आघाडीत नाही.जीतनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे आणि नितीश-लालू युती असल्यामुळे लालूंच्या काळातील यादवीचा त्रास झालेले महादलित मतदार मोठ्या अक्कलहुशारीने भाजप आघाडीने आपल्याकडे वळवले आहेत. भाजप आघाडीचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थान हेच आहे.
२. भाजप आघाडीमध्ये भाजप १६०, लोकजनशक्ती ४०, उपेन्द्र कुशवाहांचा पक्ष २३ तर जीतनराम मांझींचा पक्ष २० जागा लढवत आहे. त्यामुळे अर्थातच स्थैर्याच्या दृष्टीने ही आघाडी अधिक विश्वसनीय आहे.आघाडीचा विजय झाल्यास भाजप स्वबळावर बहुमताच्या बऱ्याच जास्त जवळ असेल आणि इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागले तरी त्याप्रमाणात कमी असेल.मतदारांनी सरकारचे स्थैर्य हा मुद्दा लक्षात घेतल्यास नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी ही मतदारांना अधिक आकर्षक असेल.
३. भाजप आघाडीचा प्रचार हा एकत्रितपणे चालला आहे असे अजूनपर्यंतचे तरी चित्र आहे. नरेन्द्र मोदींच्या दोन सभांना सर्व पक्षांचे नेते हजर होते.कदाचित भविष्यातल्या काही सभांनाही असतील. यातून मतदारांपुढे ऐक्याचा संदेश नक्कीच जात आहे.
भाजप आघाडीचा Weaknesses (कमकुवत क्षेत्रे)
१. भाजप आघाडीचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा अभाव. नितीशकुमारांना तोड देईल असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप आघाडीकडे नाही. आजही सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या कोणाही संभाव्य उमेदवारापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत.
भाजप आघाडीच्या Opportunities (संधी)
१. या निवडणुकांमध्ये एका बाजूला भाजप आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला नितीशकुमार-लालू आणि कॉंग्रेस आहेत. दुसऱ्या बाजूच्या पक्षांनी स्वातंत्र्यापासून बिहारमध्ये सरकार चालवले होते-- सर्वाधिक काळ कॉंग्रेसने, त्याखालोखाल लालूंनी १५ वर्षे आणि त्याखालोखाल नितीशकुमारांनी १० वर्षे!! त्यामुळे अन्य कोणाला एक संधी द्यायला हवी असे वाटणारे मतदारांना नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी अधिक आकर्षक आहे हे नक्कीच. ही भाजप आघाडीसाठी मोठी संधी आहे.
२. २०१४ च्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही ३५ पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तरूण मतदारांनी २०१४ मध्ये नरेन्द्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मते दिली होती. लालू बरोबर नसते तर त्याच मुद्द्यावर यातील बहुसंख्य मते नितीश कुमारांकडे जायची शक्यता होती.पण नितीशकुमारांनी लालूंचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यामुळे ही मते परत एकदा आपल्याकडे आकर्षित करणे भाजपला सोपे जाईल.
भाजप आघाडीसाठीचे Threats (धोके)
१. अजूनही भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये लोकप्रिय असतीलही पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत.तसेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मतदारांनी २०१४ मध्ये मते दिली.आता परत त्याच नावावर मते मागण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. शेवटी अर्थशास्त्रातला Law of diminishing marginal returns हा प्रकार सर्वत्र असतोच. एका कारणावरून मागच्या वेळी जितकी मते मोदी फिरवू शकले तितक्या प्रमाणावर यावेळी आणि त्यातही विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी फिरवू शकतील का? एकाच मुद्द्यावर किती काळ अवलंबून राहायचे याचा विचार भाजपने करायलाच हवा.
२. बिहारमधील जातीपातींचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत एकाच आघाडीत रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी हे दोन एकाच समाजातील नेते असणे हे धोकादायक ठरू शकते. शेवटी रामविलास पासवान हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम १९६९ मध्ये राज्य विधानसभेवर निवडून गेले होते.आणि १९७७ पासून १९८४ आणि २००९ चा अपवाद वगळता ते सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्या तुलनेत जीतनराम मांझी हे बऱ्यापैकी उपऱ्यासारखे आले आणि आपल्याला मिळाल्या त्याच्या अर्ध्या जागा मिळवून गेले असे पासवानांना वाटणारच.त्यातून पासवानांचे आपल्याच समाजातील नेत्यांबरोबर कसे वाकडे असते याविषयी माझ्या मिसळपाववरील पूर्वजन्मात या प्रतिसादात लिहिले होते.
याला मिटिगेटींग फॅक्टर म्हणजे मायावतींचा जसा पासवानांना एकदा नाही तर दोनदा स्वत:ला फटका बसला तसे मांझी करू शकतील असे वाटत नाही.तसेच एकदा निवडणुका झाल्या की नंतर मांझींना फारसे कोणी विचारेल असे वाटतही नाही.मायावतींमुळे पासवानांच्या मतांवर जसे गंडांतर आले तसे मांझी करतील याची शक्यता कमी.आणि दुसरे म्हणजे मांझी हे पासवानांचे मतदार-- पासवान आणि मल्या या जातींचे मतदार पळवतील याची शक्यता त्या मानाने कमी. म्हणून बहुदा पासवान गप्प बसले असावेत. पण समजा भविष्यात या दोघांमध्ये मतभेद उफाळून आले तर मात्र तो भाजप आघाडीसाठी मोठा धोका असेल.
आता यापुढच्या लेखामध्ये या निवडणुकांसाठीच्या "x-factors" चा परामर्श घेईन.
याद्या
35615
प्रतिक्रिया
116
वर्गीकरण
मिसळपाव
वीकनेसमध्ये राहिलेला मुद्दा
भाजपमधील संगीत सोम, साक्षी महाराज
भाजप व एनडीए साठी आज वाईट
कॉंंग्रेस - २०?????
In reply to भाजप व एनडीए साठी आज वाईट by श्रीगुरुजी
अगदीच अशक्य नाही
In reply to कॉंंग्रेस - २०????? by सव्यसाची
मला वाटते की देशात लोकशाही
In reply to अगदीच अशक्य नाही by गॅरी ट्रुमन
क्लिंटन सर,
In reply to अगदीच अशक्य नाही by गॅरी ट्रुमन
बरोबर आहे
In reply to क्लिंटन सर, by सव्यसाची
विडिओ पाहीला. एक वाटुन गेले
In reply to अगदीच अशक्य नाही by गॅरी ट्रुमन
भाजप व एनडीए साठी आज वाईट
In reply to भाजप व एनडीए साठी आज वाईट by श्रीगुरुजी
सर्व्हेंची विश्वासार्हता
In reply to भाजप व एनडीए साठी आज वाईट by श्रीगुरुजी
असल्या सर्व्हेंवर फार विश्वास
In reply to सर्व्हेंची विश्वासार्हता by गॅरी ट्रुमन
सर्वेक्षणे
In reply to असल्या सर्व्हेंवर फार विश्वास by श्रीगुरुजी
इंडिया टीवीचं हे नेहमीचच आहे
In reply to भाजप व एनडीए साठी आज वाईट by श्रीगुरुजी
लेख मस्त!
पासवान विरूध्द मायावती
In reply to लेख मस्त! by बोका-ए-आझम
दादरी घटनेचा बिहारवर आणि
ओवेसीचा उल्लेख तिसर्या भागात
In reply to दादरी घटनेचा बिहारवर आणि by निनाद मुक्काम …
अहो शिवसेनेचा ही विचार करा
In reply to ओवेसीचा उल्लेख तिसर्या भागात by गॅरी ट्रुमन
बाळराजे
बाळराजे आदित्य ठाकरे
लालूजी मुलायम सिंहाला भेटून
हे उमगले नाही
माझा अंदाज मी काही दिवसांनी
कालच संपलेल्या
शक्य आहे
In reply to कालच संपलेल्या by बोका-ए-आझम
तसंही बायपोलर निवडणूक
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
शक्य आहे
In reply to तसंही बायपोलर निवडणूक by अन्या दातार
बिहारमध्ये आतापर्यंत आलेल्या
सहमत आहे
In reply to बिहारमध्ये आतापर्यंत आलेल्या by श्रीगुरुजी
भाजप मधिल/मागिल व्यक्ती
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
या तथाकथित "प्रो-बीजेपी"
In reply to भाजप मधिल/मागिल व्यक्ती by डॉ सुहास म्हात्रे
१००% सहमत
In reply to भाजप मधिल/मागिल व्यक्ती by डॉ सुहास म्हात्रे
सहमत आहे
In reply to भाजप मधिल/मागिल व्यक्ती by डॉ सुहास म्हात्रे
संगीत सोम, साक्षी महाराज,
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
संगीत सोम, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती यासारखी मंडळी नरेंद्र मोदींशी सत्तासंघर्ष करायच्या परिस्थितीत नक्कीच नाहीत.बुद्धीबळात आणि राजकारणात दर वेळेस भारी मोहरे भरीला घातली जातील असे नाही... प्याद्यांकरवी केलेल्या चाली कमी खर्चात/धोक्यात जास्त फायदे/संदेश देऊन जातात.विषेशतः स्वतःचे महत्व दाखवून
In reply to संगीत सोम, साक्षी महाराज, by डॉ सुहास म्हात्रे
उत्तर प्रदेशात बसपा
In reply to बिहारमध्ये आतापर्यंत आलेल्या by श्रीगुरुजी
या पार्श्वभूमीवर बसपा आपला
In reply to उत्तर प्रदेशात बसपा by गॅरी ट्रुमन
आवडले!
सहमत +१००
In reply to आवडले! by पैसा
जसजसे मतदानाचे टप्पे पार
व्हि.के.सिंगांचे वक्तव्य
+१
In reply to व्हि.के.सिंगांचे वक्तव्य by गॅरी ट्रुमन
ते काहीही असलं तरी
मुद्दा
In reply to ते काहीही असलं तरी by बोका-ए-आझम
+११११
In reply to मुद्दा by गॅरी ट्रुमन
यात लोकांची काही चूक नाही.
In reply to +११११ by नया है वह
फडणवीस चांगले / बरे काम करत
In reply to यात लोकांची काही चूक नाही. by दुश्यन्त
भाजपवाले मात्र त्यांच्यावर
In reply to यात लोकांची काही चूक नाही. by दुश्यन्त
वरील प्रतिसाद जरा गंडला आहे.
In reply to भाजपवाले मात्र त्यांच्यावर by श्रीगुरुजी
यांनी सांगाव आणि लोकांनी
In reply to वरील प्रतिसाद जरा गंडला आहे. by श्रीगुरुजी
मुलायम मंडळींना बिहारमध्ये
In reply to यांनी सांगाव आणि लोकांनी by दुश्यन्त
तुम्हाला अंधपणामुळे
In reply to मुलायम मंडळींना बिहारमध्ये by श्रीगुरुजी
मोदी तसे म्हणाले म्हणून काय
In reply to तुम्हाला अंधपणामुळे by दुश्यन्त
आणखी एक मुद्दा
In reply to ते काहीही असलं तरी by बोका-ए-आझम
भाजपला सत्ता कशी राबवायची ते
+११११११११११११११११
In reply to भाजपला सत्ता कशी राबवायची ते by दुश्यन्त
+२२२२२२२२२२२२२२२२२
In reply to +११११११११११११११११ by बॅटमॅन
गयी भैंस पानी में!
In reply to भाजपला सत्ता कशी राबवायची ते by दुश्यन्त
यांचे प्रतिसाद पूर्वीपासून
In reply to गयी भैंस पानी में! by बोका-ए-आझम
श्रीगुरुजी - मी कुठली
In reply to यांचे प्रतिसाद पूर्वीपासून by श्रीगुरुजी
वरील ३ प्रतिसादात अनेक भाकिते
In reply to श्रीगुरुजी - मी कुठली by दुश्यन्त
अंदाज नि भाकिते
In reply to वरील ३ प्रतिसादात अनेक भाकिते by श्रीगुरुजी
बंडखोरी झाली पण युती तुटली
In reply to अंदाज नि भाकिते by सुनील
हाहा.. असे खूप आहेत भाकित.
In reply to अंदाज नि भाकिते by सुनील
भाकित एखाद्यावेळी चुकलं
In reply to हाहा.. असे खूप आहेत भाकित. by दुश्यन्त
तुमचा गोंदीसारखा चिकटपणा आणि
In reply to भाकित एखाद्यावेळी चुकलं by श्रीगुरुजी
वा! छान!! असेच लिहीत चला. अशा
In reply to तुमचा गोंदीसारखा चिकटपणा आणि by दुश्यन्त
पण श्रीगुरुजींनी
In reply to अंदाज नि भाकिते by सुनील
माझे प्रतिसाद नकारात्मक. हाहा
In reply to यांचे प्रतिसाद पूर्वीपासून by श्रीगुरुजी
युपी मध्ये लोकसभेआधी दंगे
In reply to गयी भैंस पानी में! by बोका-ए-आझम
हे पहा
In reply to युपी मध्ये लोकसभेआधी दंगे by दुश्यन्त
बोका- तुम्ही काहीही बरळाल हो
In reply to हे पहा by बोका-ए-आझम
हे पहा दुष्यंत
In reply to बोका- तुम्ही काहीही बरळाल हो by दुश्यन्त
झोंबला दिसतोय सल्ला!आमचा आयडी
In reply to हे पहा दुष्यंत by बोका-ए-आझम
आमच्या आयडीबद्दल काहीच लोचा नाहीये हो.
In reply to झोंबला दिसतोय सल्ला!आमचा आयडी by दुश्यन्त
युपीतील दंगे जाट-मुस्लिम
In reply to युपी मध्ये लोकसभेआधी दंगे by दुश्यन्त
नाण्यातच खोट आहे हे मान्य
In reply to भाजपला सत्ता कशी राबवायची ते by दुश्यन्त
माझ्या हायपोथिसिसला पुष्ट्यर्थ पुरावा
In reply to नाण्यातच खोट आहे हे मान्य by श्रीगुरुजी
सहमत. पण यालाच काही लोक कावीळ
In reply to माझ्या हायपोथिसिसला पुष्ट्यर्थ पुरावा by गॅरी ट्रुमन
हा प्रतिसाद आणि यातली तुमची भाषा
In reply to सहमत. पण यालाच काही लोक कावीळ by दुश्यन्त
नीट वाचा. कावीळ वगैरे
In reply to हा प्रतिसाद आणि यातली तुमची भाषा by बोका-ए-आझम
आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ
In reply to नीट वाचा. कावीळ वगैरे by दुश्यन्त
आम्हाला तुमच्यासारखं
In reply to नीट वाचा. कावीळ वगैरे by दुश्यन्त
जबरी भ्रम आहेत तर
In reply to आम्हाला तुमच्यासारखं by बोका-ए-आझम
पेड शिपाई? आय विश!
In reply to जबरी भ्रम आहेत तर by दुश्यन्त
कुठवर आलाय इलाज ?आम्हाला
In reply to पेड शिपाई? आय विश! by बोका-ए-आझम
अपप्रचार
In reply to भाजपला सत्ता कशी राबवायची ते by दुश्यन्त
दुष्यंत साहेब,
In reply to भाजपला सत्ता कशी राबवायची ते by दुश्यन्त
ओके ठीक आहे. आपण म्हणता तसेही
In reply to दुष्यंत साहेब, by सव्यसाची
तसेच आहे.
In reply to ओके ठीक आहे. आपण म्हणता तसेही by दुश्यन्त
कसले डोंबलाचे SWOT Analysis
मला काय वाटते
कोण्या एका पक्षाचे समर्थक
In reply to मला काय वाटते by याॅर्कर
नितीशबरोबर लालू असल्याने
स्त्रियांचा मतदानातील सहभाग
शरद पवार राष्ट्रपती?
लोल
In reply to शरद पवार राष्ट्रपती? by राही
प्रणव मुकर्जींची
In reply to शरद पवार राष्ट्रपती? by राही
या निवडणुकीमुळे मला १९९० मधील
त्याचवेळी दादा कोंडके
In reply to या निवडणुकीमुळे मला १९९० मधील by श्रीगुरुजी
भाजप हरली तर पाकिस्तानात
क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकला
In reply to भाजप हरली तर पाकिस्तानात by दुश्यन्त
+ १
In reply to क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकला by जॅक द रिपर
पब्लिक याला जास्त महत्व देत
In reply to भाजप हरली तर पाकिस्तानात by दुश्यन्त
पब्लिकने कशाला महत्व दिले हे
In reply to पब्लिक याला जास्त महत्व देत by श्रीगुरुजी
+१
In reply to पब्लिकने कशाला महत्व दिले हे by जॅक द रिपर
सट्टेबाजांचा अंदाज -
सट्टेबाज विश्वासार्ह असतात का?
In reply to सट्टेबाजांचा अंदाज - by श्रीगुरुजी
गुदस्ता साली झालेल्या
In reply to सट्टेबाज विश्वासार्ह असतात का? by गॅरी ट्रुमन
सट्टेबाजांचे अंदाज
In reply to सट्टेबाज विश्वासार्ह असतात का? by गॅरी ट्रुमन
सट्टेबाजांचा अंदाज -
In reply to सट्टेबाजांचा अंदाज - by श्रीगुरुजी
सट्टेबाजांचे तर्क
In reply to सट्टेबाजांचा अंदाज - by श्रीगुरुजी
भाजपची देहबोली
एक्स-फॅक्टरमधील राहिलेले दोन मुद्दे
जयपूर, इंदूर, दिल्ली आणि