Skip to main content

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 08/10/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मॅनेजमेन्टच्या क्षेत्रात "SWOT analysis" ही एक संकल्पना आहे. SWOT म्हणजे Strengths (सामर्थ्यक्षेत्रे), Weaknesses (कमकुवत क्षेत्रे), Opportunities (संधी) आणि Threats (धोके) यांचे विश्लेषण. यातील सामर्थ्यक्षेत्रे आणि कमकुवत क्षेत्रे या दोन गोष्टी अंतर्गत असतात तर संधी आणि धोके या दोन गोष्टी बाह्य असतात. पहिल्या लेखामध्ये नितीश कुमारांच्या आघाडीचा परामर्श घेतला त्यावेळी सर्व मुद्दे त्या आघाडीशी अंतर्गत होते.याचे कारण या आघाडीला बाह्य कोणते मुद्दे हे संधी असतील आणि कोणते मुद्दे धोकादायक ठरतील याचा विचार केला तर खरोखरच तसे मुद्दे मिळाले नाहीत. कदाचित माझ्याकडून काही मुद्दे निसटले असतील. पण भाजप आघाडीबाबत मात्र संधी आणि धोके हे बाह्य मुद्देही तितक्याच प्रमाणावर मला सापडले. म्हणून या लेखाचे शीर्षकही तसेच दिले आहे.तेव्हा सुरवात करू SWOT याच क्रमाने. भाजप आघाडीची Strengths (सामर्थ्यक्षेत्रे) १. ही आघाडी नितीश कुमारांच्या आघाडीच्या मानाने अधिक सुसंगत आहे.बिहारमधील निवडणुक म्हटली की जातीपातींचा विचार अनिच्छेने का होईना पण करावाच लागतो. त्यामुळे हा मुद्दा जातीच्या आधारेच स्पष्ट करतो. या आघाडीचे मतदार नक्की कोणते गट आहेत? उच्चवर्णीय, बनिया आणि सुशीलकुमार मोदींच्या ओ.बी.सी मधील जातींचे मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.त्यापैकी कोणीही भाजपला सोडून जायची शक्यता नाही. महादलितांमधील पासवान, मल्या (नावाडी) या समाजातले मतदार रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीचे पारंपारिक मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही व्होटबॅंक पासवानांनी आपल्याबरोबर ठेवली आहे. ओ.बी.सींमधील कुशवाह समाज उपेन्द्र कुशवाहांबरोबर तर महादलितांपैकी मुसहार आणि इतर जातींचे मतदार जीतनराम मांझींबरोबर असतील असे म्हणायला हरकत नसावी. जीतनराम मांझींचे निवडणुकीतील सामर्थ्य अजून स्पष्ट झालेले नाही.यापूर्वी ते तितके महत्वाचे आणि मोठे नेते नव्हतेच.पण नितीशकुमारांनी त्यांना मुख्यमंत्रीपद खाली करायला सांगितल्यावर मात्र त्यांनी आपले पत्ते योग्य प्रकारे खेळले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले.तेव्हा त्या समाजातील मते त्यांच्यामागे जातील असे म्हणायला हरकत नसावी. हे मतदार परस्परविरोधी नाहीत.म्हणजे नितीशकुमारांच्या आघाडीत यादव विरूध्द कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार आहेत. कुर्मी-कोयरींना लालूंच्या राज्यात डावलले जाते आणि सगळा फायदा यादवांनाच होतो या मुख्य कारणामुळे नितीशकुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले होते.त्या कारणाने यादव आणि कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार झाले. तशा प्रकारे परस्परविरोध भाजप आघाडीत नाही.जीतनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे आणि नितीश-लालू युती असल्यामुळे लालूंच्या काळातील यादवीचा त्रास झालेले महादलित मतदार मोठ्या अक्कलहुशारीने भाजप आघाडीने आपल्याकडे वळवले आहेत. भाजप आघाडीचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थान हेच आहे. २. भाजप आघाडीमध्ये भाजप १६०, लोकजनशक्ती ४०, उपेन्द्र कुशवाहांचा पक्ष २३ तर जीतनराम मांझींचा पक्ष २० जागा लढवत आहे. त्यामुळे अर्थातच स्थैर्याच्या दृष्टीने ही आघाडी अधिक विश्वसनीय आहे.आघाडीचा विजय झाल्यास भाजप स्वबळावर बहुमताच्या बऱ्याच जास्त जवळ असेल आणि इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागले तरी त्याप्रमाणात कमी असेल.मतदारांनी सरकारचे स्थैर्य हा मुद्दा लक्षात घेतल्यास नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी ही मतदारांना अधिक आकर्षक असेल. ३. भाजप आघाडीचा प्रचार हा एकत्रितपणे चालला आहे असे अजूनपर्यंतचे तरी चित्र आहे. नरेन्द्र मोदींच्या दोन सभांना सर्व पक्षांचे नेते हजर होते.कदाचित भविष्यातल्या काही सभांनाही असतील. यातून मतदारांपुढे ऐक्याचा संदेश नक्कीच जात आहे. भाजप आघाडीचा Weaknesses (कमकुवत क्षेत्रे) १. भाजप आघाडीचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा अभाव. नितीशकुमारांना तोड देईल असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप आघाडीकडे नाही. आजही सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या कोणाही संभाव्य उमेदवारापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. भाजप आघाडीच्या Opportunities (संधी) १. या निवडणुकांमध्ये एका बाजूला भाजप आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला नितीशकुमार-लालू आणि कॉंग्रेस आहेत. दुसऱ्या बाजूच्या पक्षांनी स्वातंत्र्यापासून बिहारमध्ये सरकार चालवले होते-- सर्वाधिक काळ कॉंग्रेसने, त्याखालोखाल लालूंनी १५ वर्षे आणि त्याखालोखाल नितीशकुमारांनी १० वर्षे!! त्यामुळे अन्य कोणाला एक संधी द्यायला हवी असे वाटणारे मतदारांना नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी अधिक आकर्षक आहे हे नक्कीच. ही भाजप आघाडीसाठी मोठी संधी आहे. २. २०१४ च्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही ३५ पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तरूण मतदारांनी २०१४ मध्ये नरेन्द्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मते दिली होती. लालू बरोबर नसते तर त्याच मुद्द्यावर यातील बहुसंख्य मते नितीश कुमारांकडे जायची शक्यता होती.पण नितीशकुमारांनी लालूंचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यामुळे ही मते परत एकदा आपल्याकडे आकर्षित करणे भाजपला सोपे जाईल. भाजप आघाडीसाठीचे Threats (धोके) १. अजूनही भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये लोकप्रिय असतीलही पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत.तसेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मतदारांनी २०१४ मध्ये मते दिली.आता परत त्याच नावावर मते मागण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. शेवटी अर्थशास्त्रातला Law of diminishing marginal returns हा प्रकार सर्वत्र असतोच. एका कारणावरून मागच्या वेळी जितकी मते मोदी फिरवू शकले तितक्या प्रमाणावर यावेळी आणि त्यातही विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी फिरवू शकतील का? एकाच मुद्द्यावर किती काळ अवलंबून राहायचे याचा विचार भाजपने करायलाच हवा. २. बिहारमधील जातीपातींचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत एकाच आघाडीत रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी हे दोन एकाच समाजातील नेते असणे हे धोकादायक ठरू शकते. शेवटी रामविलास पासवान हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम १९६९ मध्ये राज्य विधानसभेवर निवडून गेले होते.आणि १९७७ पासून १९८४ आणि २००९ चा अपवाद वगळता ते सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्या तुलनेत जीतनराम मांझी हे बऱ्यापैकी उपऱ्यासारखे आले आणि आपल्याला मिळाल्या त्याच्या अर्ध्या जागा मिळवून गेले असे पासवानांना वाटणारच.त्यातून पासवानांचे आपल्याच समाजातील नेत्यांबरोबर कसे वाकडे असते याविषयी माझ्या मिसळपाववरील पूर्वजन्मात या प्रतिसादात लिहिले होते. याला मिटिगेटींग फॅक्टर म्हणजे मायावतींचा जसा पासवानांना एकदा नाही तर दोनदा स्वत:ला फटका बसला तसे मांझी करू शकतील असे वाटत नाही.तसेच एकदा निवडणुका झाल्या की नंतर मांझींना फारसे कोणी विचारेल असे वाटतही नाही.मायावतींमुळे पासवानांच्या मतांवर जसे गंडांतर आले तसे मांझी करतील याची शक्यता कमी.आणि दुसरे म्हणजे मांझी हे पासवानांचे मतदार-- पासवान आणि मल्या या जातींचे मतदार पळवतील याची शक्यता त्या मानाने कमी. म्हणून बहुदा पासवान गप्प बसले असावेत. पण समजा भविष्यात या दोघांमध्ये मतभेद उफाळून आले तर मात्र तो भाजप आघाडीसाठी मोठा धोका असेल. आता यापुढच्या लेखामध्ये या निवडणुकांसाठीच्या "x-factors" चा परामर्श घेईन.

वाचने 35629
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

युपी मध्ये लोकसभेआधी दंगे पेटवून, भडकावू विधाने करून धार्मिक ध्रुवीकरण होवून फायदा कुणाचा झाला?लोकांनी लोकसभेत एकदा बहुमत दिले म्हणजे त्या पक्षाच्या हो मध्ये हो मिसळला पाहिजे असे तुमचे मत दिसते आहे. यालाच अंधभक्त म्हणतात आम्ही नागरिक आहोत आम्हाला जे दिसेल ते बोलतो तुम्हाला त्यात नकारात्मकता दिसते. विरोधाला वैचारिक कावीळ असे बरळून आपला आंधळेपणा सिद्ध होतो बाकी काही नाही.

In reply to by दुश्यन्त

जसा तुम्हाला मतं मांडायचा अधिकार आहे, तसा आम्हालाही तुमच्या मतांवर टीका करायचा अधिकार आहे. म्हणूनच वैचारिक कावीळ असं म्हटलंय. एकदा वृत्ती सिनिकल झाली की मग माणसाला वैचारिक कावीळ, वैचारिक सर्दी आणि वैचारिक अतिसारपण होतो. तुमचा दोष नाही. तुमच्या सिनिकल आणि प्रत्येक गोष्टीत नकारात्मक बाजू शोधण्याच्या वृत्तीचा दोष आहे. Cynic is the one who questions the price of everything but doesn't realize value of anything असं म्हटलं जातं, तेच तुम्ही सिद्ध करत आहात, बाकी काही नाही. पुरावे नसताना बोलण्याला काय म्हणावं? तरी बरं, तुम्ही मिपावर आहात. दिल्लीत असतात तर नक्कीच आम्ही तुम्हाला अरविंद केजरीवाल म्हटलं असतं!

In reply to by बोका-ए-आझम

बोका- तुम्ही काहीही बरळाल हो तुमच्या अश्या प्रमाणपत्रांना कोण महत्व देत. बाकी वर सांगितलेली लक्षणे कधीपासून आहेत तुम्हाला. विरोधी मत दिसले कि त्याला कपोकल्पित आजार वगैरे म्हणणे म्हणजे तुमच्यातच काही केमिकल लोच्या असल्याचे निदर्शन आहे. लवकर चांगला डॉक्टर गाठा. शुभेच्छा!

In reply to by दुश्यन्त

पहिले स्वतःचा आयडी नीट लिहायला शिका आणि मग इतरांवर टीका करा. मी तुमच्या नकारात्मक विचारांवर टीका केली होती, तुमच्यावर नाही पण तुम्हीच माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहात. आणि माझ्या प्रमाणपत्रांना तुम्ही जर महत्व देत नाही तर नाव घेऊन प्रतिसाद द्यायची काय गरज होती? विरोधी मतावर आम्ही तुटून पडणारच. ते शेवटी विरोधी मत आहे. आणि बरळायची सवय ही तुम्हाला आहे. पुरावे नसताना वाटेल ती विधानं करणं याला बरळणं हाच शब्द आहे. हे असे नकारात्मक विचार आहेत तुमचे त्यामुळेच जरा कोणी विरूद्ध मत मांडलं की तो बरळतोय असं म्हणून त्याच्यावर हल्ला चढवता. मुद्दे नसले की माणूस वैयक्तिक टीकेवर उतरतो आणि अशांना आम्ही इतके दिवस आपटार्ड म्हणायचो. आता दुश्यंत म्हणायला लागू. हाकानाका!

In reply to by बोका-ए-आझम

झोंबला दिसतोय सल्ला!आमचा आयडी आम्ही कसाही लिहू तुम्हाला काय पंचाईत.आम्ही विचारतो का तुमच्या आयडीबद्दल कारण माहित आहे काय लोच्या आहे ते. आणि तुमच नाव लिहिल कारण तुम्हाला कळावं म्हणून. आधीच गैरसमज/ भ्रम कमी नाहीत तुमचे त्यात अजून भर नको. पुरावे काय हे तुम्ही संगांर होय. सगळ्या अकलीचा मक्ता तुमच्याकडेच ना. वर सांगितल आहेच इलाज करा!

In reply to by दुश्यन्त

तुम्हाला मेंदू नसावा अशी शंका होतीच, पण आता खात्री पटली. कसं आहे, तुमचा दोष नाहीच आहे पण. एकदा मनाला वैचारिक काविळीचा संसर्ग झाला की आपलं चुकीचं, पुराव्याशिवाय दिलेलं मतही बरोबर असल्याचे साक्षात्कार भल्याभल्यंना होतात. मग तुम्ही तर एक क्षुद्र मानव (नक्की ना?) आहात. अशा लोकांची आम्ही नेहमीच कीव करतो. यापुढेही करु. काळजी करु नये. किंवा मिपाच्या स्टाईलमध्ये - कल्जी क्रू नये.

In reply to by दुश्यन्त

युपीतील दंगे जाट-मुस्लिम यांच्यात पेटले होते. जाट मुलीच्या छेडछाडीवरून तिच्या भावांनी छेडछाड करणार्‍या मुस्लिम तरूणांना जाब विचारल्यावर त्या दोन भावांचा खून झाला व त्यातून दंगल पेटली. दंगलीत मृत झालेल्या हिंदूंना २ लाख रू. नुकसानभरपाई व मृत झालेल्या मुस्लिमांना ५ लाख रू. नुकसानभरपाई असा पक्षपात अखिलेश यादव सरकारने केला. त्यामुळे दंगलीत तेल ओतण्याचे काम झाले. दुर्दैवाने बोकोबांनी लिहिल्याप्रमाणे वैचारिक कावीळ आणि सिनिकल वृत्ती यामुळे प्रत्येक गोष्टीत, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तुम्हाला भाजपच दिसतो. जसे मोगलांना संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे किंवा इंदिरा गांधींना प्रत्येक घटनेत सीआयए चा हात दिसायचा किंवा काँग्रेसला सर्वत्र संघ दिसतो, तसेच इथेही झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नाण्यातच खोट आहे हे मान्य करायला हवे.
बरं, तसं समजा.
निवडणुकांच्या संदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे. मला नेहमी वाटते की सत्ताधारी पक्षाच्या बाजूने/विरोधात मते देताना मतदार दोन गोष्टींचा विचार करतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाकडून असलेल्या अपेक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाने नक्की किती अपेक्षांची पूर्तता केली. समजा सत्ताधारी पक्षाने १०० गोष्टी कराव्या अशी अपेक्षा असेल पण प्रत्यक्षात केल्या केवळ २० तर त्या सत्ताधारी पक्षाविरूध्द लोकांचा असलेला क्षोभ हा १० गोष्टी कराव्या अशी अपेक्षा असलेल्या पण प्रत्यक्षात ८ गोष्टी केलेल्या सत्ताधारी पक्षाविरूध्दच्या क्षोभापेक्षा जास्त असतो. मतदार मत देताना पर्याय ८ पेक्षा जास्त गोष्टी करूच शकत नाही त्यापेक्षा सध्याच्या सत्ताधारी पक्षाने २० गोष्टी केलेल्या आहेत-- भले त्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्या तरी विरोधी पक्ष देऊ शकेल त्यापेक्षा जास्त आहेत हा विचार करत नाहीत. म्हणजेच माझ्या हायपोथिसिसप्रमाणे सत्ताधारी पक्षाविरूध्द मते बनविताना पर्यायी पक्ष किती चांगला आहे/वाईट आहे हा विचार मतदार करत नसतात. इतके दिवस या हायपोथिसिसच्या पुष्ट्यर्थ मतदार खरोखरच असा विचार करतात याचा समाधानकारक पुरावा मला मिळालेला नव्हता. तो काही प्रमाणात मिळताना दिसत आहे. नाण्यात खोट आहे की नाही हे ज्याचेत्याचे मत झाले. त्याविषयी इतरांनी भाष्य करून काही अर्थ नाही. पण या नाण्यात खोट आहे म्हणून पर्यायी नाण्याच्या बाजूने मत बनविण्यापूर्वी पर्यायी नाणे किती रद्दड आहे याचा विचार कोणी करताना दिसत नाही. एन.डी.ए हरेल तर बरेच होईल (पक्षी लालू-नितीश आघाडी जिंकेल तर बरेच होईल) असे मिसळपाववरच एका सदस्याने म्हटलेले आहे. कुठलाही सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस लालू जिंकावा अशी इच्छा करणार नाही अशी माझी भाबडी समजूत होती.पण ती पार चुकीची होती हे मिसळपाववरच बघायला मिळाले. उच्चशिक्षित मतदार असा विचार करत असतील तर सामान्य मतदार त्यापेक्षा वेगळा विचार कसा करणार?

In reply to by गॅरी ट्रुमन

नाण्यात खोट आहे की नाही हे ज्याचेत्याचे मत झाले. त्याविषयी इतरांनी भाष्य करून काही अर्थ नाही.> सहमत. पण यालाच काही लोक कावीळ वगैरे बरळू लागतात. आपल्या विरोधी मत मांडले कि कावीळ असा यांचा सोपा फंडा असतो. आता तुम्ही लालू आणि सुशिक्षित मतदार याबद्दल बोलत आहात त्यावर माझे मत असे आहे कि काँग्रेस जसे मुस्लिमांना भाजपची भीती दाखवून मते मिळवायची तसे भाजपवाल्यांचे लालू वगैरे बद्दल मत आहे काय? म्हणजे आम्हाला निवडून द्या नाहीतर लालू येईल हेच लोकांना गृहीत धरणे झाले. आपण काहीही करू लोक आपल्यालाच निवडून देतील यातच काँग्रेस गेली भाजपही तसेच करत आहे. आपल्याला (मराठी लोक) लालूची जेवढी घृणा/ तिटकारा असतो तेवढा बिहारी लोकांना नसतो. आपले पवार, ठाकरे वगैरेंना तिकडे असे पाण्यात पाहणारे खूप आहेत. सुशिक्षित किंवा इतरही लोकांत साधारणपणे सगळेच राजकारणी चोर /भ्रष्ट असा समज असतो, त्यात लालू सापडले बाकी सापडले नाहीत एवढाच फरक अशी धारणा असते. लालू सोबत आले म्हणून काही सुशिक्षित नाराज असू शकतात पण तरीही नितीश मुख्यमंत्री आणि लालूंचा पक्ष त्यात सामील हे समीकरण भाजप+ मांझी + पासवान यांच्या पेक्षा बरेच असे समजू शकतात. दुसरे म्हणजे महाआघाडीचा चेहरा नितीश आहे. आज बिहारमध्ये त्यांचा तोडीचा स्वच्छ चेहरा कुणाकडेच नाही , भाजपकडे तर चेहराच नाही. मोदींच्या नावावर मते मागून दिल्लीत झाले तेच होईल हे भाजपच्या उशिरा लक्षात आले असावे म्हणून आता सभा रद्द होणे , पोस्टरवर लोकल चेहऱ्यांना स्थान देणे वगैरे होत आहे. लोकसभेत बिहारमध्ये कधी नव्हे जातीय समीकरणे मागे पडून लोकांनी भाजप/ मोदींना कौल दिला १.५ वर्षात अच्छे दिन , महागाई , काला धन १५ लाख यांच काय झाल हा लोकांना पटकन पडणारा प्रश्न आहे शेवटी हे पब्लिक परसेप्शन असते. लालूच्या भीतीपेक्षा लोकांना ते महत्वाचे वाटले तर तो त्यांचा प्रश्न आहे. लोकसभेत मोदींना मत देणाऱ्या लोकांनी आपले परसेप्शन बदलून विधानसभेत वेगळा विचार केला कि भक्त लोकांना आता देशाचे नुकसान होणार, घात वगैरे प्रश्न पडू लागतात आपल्या लाडक्या पक्षाने खरच विकास केला असता तर हे घडलेच नसते हे ते मान्य करत नाहीत.

In reply to by दुश्यन्त

आणि तुमचा आधीचा प्रतिसाद आणि तुमची भाषा यात केवढा फरक आहे! तुम्ही जर कालचा प्रतिसाद अशा भाषेत दिला असतात, तर तुम्हाला एवढा मनस्ताप झाला नसता. पण आधी कांगावा केल्यावर घसा दुखतोय म्हणून ओरडणे आणि समोरच्याने ते दाखवून दिल्यावर त्याच्यावरच डाफरणे हा काही जणांचा स्वभाव असतो. काय करणार?

In reply to by बोका-ए-आझम

नीट वाचा. कावीळ वगैरे मुक्ताफळे कोण उधळत होत आधी ते. दुसर्याचे दोष दाखवायच्या गप्पा मारायच्या आधी स्वताची भाषा आणि नजर सुधारा. मनस्ताप ? मनोरंजन झाल मस्त पैकी, अंधभक्तांच्या एकेक करामती पाहून. भाजपवर कुणी टीका केली कि चवताळून स्वतःच अंगावर ओढवून घ्यायचं आणि नंतर दुखल म्हणून विव्हळत बसायचं. भाजपला विरोध केला कि केजरीवाल , कधी शिवसेनेचा ठरवायचे.असल्या नमुन्यांची घरे भाजप चालवतो कि काय असा प्रश्न पडतो. आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ हे भाजपचे नेते एकवेळ खाजगीत स्वतः मान्य करतील पण हे राजाहून जास्त राजनिष्ठ ते मान्य करणार नाहीत.

In reply to by दुश्यन्त

आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ नाही हे भाजपचे नेते एकवेळ खाजगीत स्वतः मान्य करतील पण हे राजाहून जास्त राजनिष्ठ ते मान्य करणार नाहीत.

In reply to by दुश्यन्त

कांगावा करायची सवय नाहीये हो दुश्यंतराव. आणि तुम्हाला वैचारिक कावीळ झालेलीे आहेच पण आता तर वैचारिक अतिसारही झालेला दिसतोय. त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरवण्याचं तुमचं निसर्गदत्त कार्य संपणार कधी? बरं, भाजपचा पाठीराखा असणं यात चुकीचं काय आहे? आणि जखमा तर तुम्हाला झाल्या आहेत. तुमच्या विव्हळण्यावरनं कळतं आहेच की ते. आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघा जरा. आम्हाला नडाल तर याहून जास्त जखमा होऊ शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

जबरी भ्रम आहेत तर स्वतःबद्दलचे. असले म्यावू म्यावू करणारे खूप पाहिले आहेत. आणि पाठीराखे कि पेड शिपाई ? असो लवकर बरे व्हा!

In reply to by दुश्यन्त

अच्छा! म्हणजे आता लक्षात आलं. भाजपच्या पाठीराख्यांना पैसे मिळतात असा समज आहे तर. आता तर कावीळ हेपॅटायटीस बी च्या लेव्हलला गेली हो. काहीतरी करा. प्राणघातक आजार असतो हा. फुल डोक्यात गेलेला आहेच, पण रिकव्हरीचा चान्स आहे.

In reply to by बोका-ए-आझम

कुठवर आलाय इलाज ?आम्हाला तुमच्यासारखा वेळच वेळ नाही ना इथे यायला. आपली रोगाची लक्षणे दुसर्यावर ढकलण अजून सुरूच आहे.अरेरे झटके वाढले दिसतेय.आजार जुना दिसतोय कि अच्छे दिनाची वाट पाहून अस अस झालंय ?असो. लवकर आपल्या प्रकृतीला आराम मिळो.

In reply to by दुश्यन्त

बिहार मध्ये दुसऱ्या चरणाचे मतदान १२ ऑक्टोबर ला झाले व तिसऱ्या चरणाचे मतदान २८ ऑक्टोबर ला आहे. मधल्या काळात मोदींच्या सभा झल्या नाहीत.याचा खोडसाळ अर्थ मतदार त्यांच्या सभाना फारसा प्रतिसाद देत नाहीत आणि म्हणून त्या रद्द कराव्या लागत आहेत असा नितीश आणि त्यांच्या समर्थकांनी लावला. क़ेन्द्र सरकार व भाजपा पक्ष यांच्यात महत्वाचे स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनीही तत्सम विधान केले आहे. त्यावर केंद्रीय मंत्री आणि बिहार मधील भाजपा चे वरिष्ठ नेते रवि शंकर प्रसाद यांनी खुलासा केला आहे.ते म्हणतात की मधल्या काळात मोदींच्या कुठल्याही सभेचे आयोजनच केले नाही. तर मग त्या रद्द कशा करणार ? सभा का आयोजित केल्या नाही याचे स्पष्टीकरण त्यानी दिले आहे. http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bihar-poll…

In reply to by दुश्यन्त

दुष्यंत साहेब, बाकी गोष्टींवर सध्या तरी प्रतिसाद देत नाही. पण
मोदींच्या सभा रद्द होत आहेत.
याच्याशी सहमत नाही. ज्या सभेच्या रद्द होण्याबद्दल बातम्या पसरल्या ती सभा १६ ऑक्टोबर ची होती असेही सांगण्यात आले. त्याबद्दल बीजेपी कडून सांगण्यात आले कि १६ ते २४ च्या दरम्यान कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नव्हती. २५ तारखेपासून परत पंतप्रधान प्रचाराला सुरुवात करतील. (जे कि आज आपल्याला दिसले आहे. ) थोड्या वेळासाठी असे समजून चालू अशी काही सभा होती. ती रद्द होण्याचे कारण बिहार मध्ये होते असे मला वाटत नाही. १३ तारखेपर्यंत पंतप्रधान माहिती कायद्याला १० वर्षे पूर्ण होण्याप्रीत्यार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाणार नव्हते. परंतु, शेवटी त्यांनी या कार्यक्रमास होकार कळवला. तो कार्यक्रम १६ तारखेला दिल्ली येथे होता. त्यामुळे सभा रद्द झालीय हेच तितकेसे खरे वाटत नाही आणि सभा रद्द जरी झाली असली तरी तिचे कारण बिहार मध्ये आहे असे तर वाटत नाही. धन्यवाद.

In reply to by दुश्यन्त

मी याच्या वरच दिलेल्या प्रतिसादात रवि शंकर प्रसाद यांची लींक दिली आहे. ते म्हणतात कि त्यांनी १६ तारखेला सभा घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्या कडून परवानगीही मागितली नव्हती .

कसले डोंबलाचे SWOT Analysis घेऊन बसला आहात, यांची एकेक मुक्ताफळे ऐकली की असे वाटते
आधी होता पाग्या, दावूनी स्वप्ने झाला वाघ्या त्याचा येळकोट राहीना, मुळ विचार जाईना
.

कि आपण इथे निपक्षपाती चर्चा करायला हवी. काहीजण भाजपप्रति फारच सहानभूती दाखवतात,आणि काहीजण भाजपला फारच पाण्यात बघतात.आपण इथे कोण्या एका पक्षाचे समर्थक म्हणून चर्चा करणे उचित ठरणार नाही.

In reply to by याॅर्कर

कोण्या एका पक्षाचे समर्थक म्हणून चर्चा करणे उचित ठरणार नाही. करु द्या कि समर्थक लोक पक्षाच्या चांगल्या बाजू समोर मांडतात आणि विरोधक वाईट बाजू. दोन्ही कडच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या तर वाईट काय? टीका किंवा स्तुती विधायक असली आणि सभ्य शब्दात असली म्हणजे झालं.

नितीशबरोबर लालू असल्याने बिहारमधील काही घटकात आतापासूनच भीति पसरायला सुरूवात झाली आहे. त्याबद्दल हा एक वृत्तांत - http://indianexpress.com/article/india/india-news-india/why-bjp-is-goin…

पुरूषांपेक्षा ५ ते ७ टक्के इतका जास्त सहभाग स्त्रियांचा आहे. त्याचा अर्थ काय असावा? कारण हा जास्तीचा सहभाग काही हजार मतांचा होतो व तो निवडणूक निकालावर नक्कीच परिणाम करतो. इतकेच नव्हे तर जातीच्या समीकरणावर हे मतदान मातही करू शकेल असे वाटते. जिथे राजद असेल तिथे राजदाच्या विरोधात आणि इतरठिकाणी नितिशकुमारांना पाठिंबा असा त्याचा अर्थ असेल काय? नितिशकुमारांच्या मंत्रीमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांची कामगीरी चांगली असेल तर असे होऊ शकेल असे वाटते. जरी नितीशकुमार व भाजप यांना एकत्र यायचे नसेल पण मतदारांना ते एकत्र यावेत असे वाटत असेल तर मात्र मतदार ते मतपेटीतून नक्कीच दाखवतील का? मला राजकारणातले फारसे कळत नाही म्हणून फक्त माझी शंका विचारतोय.

वॉट्स अ‍ॅप वर सध्या एक प्रचंड विनोदी मेसेज फिरतोय. खोडसाळ आहे की उपरोधात्मक आहे की प्रामाणिक अंदाज आहे काही कळत नाही. प्रणव मुकर्जींची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढल्या वर्षी संपते आहे. त्या वेळी शरद पवारांना ते पद देऊ केले जाईल अशी बातमी त्यात आहे.

In reply to by राही

वॉट्स अ‍ॅप वर सध्या एक प्रचंड विनोदी मेसेज फिरतोय.
व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारे मेसेजेस बाय डिफॉल्ट प्रचंड विनोदीच असतात. डिसेंबर २०१४ मध्ये असाही एक मेसेज फिरत होता की मोदींनी व्लादिमिर पुतिनबरोबर तेल विकत घ्यायचा करार केला म्हणून तेलाचे दर कोसळले. केवळ भारतीयांनी स्वीस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाचे व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारे आकडे म्हणाल तर हे ५००-१००० लोक जगातील ६५० कोटी लोकांकडे असतील त्यापेक्षा कैक पटीने जास्त पैसे कॅशमध्ये राखून आहेत असे कोणाला वाटायचे. कोणाची इतकी कल्पनाशक्ती अफाट दौडते आणि मुख्य म्हणजे इतका वेळ कोणाला असतो असले काहीतरी कल्पना करून लिहायला कुणास ठाऊक. इतरांचे ठिक आहे. फॉरवर्ड करायला फार कष्ट पडत नाहीत. पण मुळात कोणीतरी असे मेसेज तयार करत असलेच पाहिजे ना. त्यांना अशा कल्पना सुचतातच कशा आणि इतका वेळ त्यांच्याकडे कसा असतो कुणास ठाऊक. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेज हे एवढे क्वालिफिकेशन एखाद्या मेसेजला फाट्यावर मारायला पुरेसे आहे.

In reply to by राही

प्रणव मुकर्जींची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढल्या वर्षी संपते आहे प्रणव मुखर्जींची मुदत जुलै २०१७ पर्यंत आहे.

या निवडणुकीमुळे मला १९९० मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आठवण होत आहे. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने फक्त १९५ जागा जिंकून सत्ता गमाविली होती. बोफोर्स प्रकरण, शहाबानो प्रकरण, श्रीराम जन्मभूमी इ. चा फटका काँग्रेसला बसला होता. महाराष्ट्रात १९८५ मध्ये ४८ पैकी ४३ जागा जिंकणार्‍या काँग्रेसला १९८९ मध्ये २८ जागा मिळाल्या होत्या. नंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीने मोठे आव्हान उभे केले होते. परंतु पवारांनी अतिशय चतुराईने आपले पत्ते खेळले. प्रथम त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले व गवई गटाबरोबर युती करून काही दलित मतांची बेगमी केली. त्यावेळी प्रचारात बाळासाहेब ठाकरे अत्यंत आक्रमक भाषेत प्रचार करीत होते. पवारांनी अनेक वृत्तपत्रांना हाताशी धरून बाळासाहेबांवर टीकेची झोड उठविली. बाळासाहेब आपल्या भाषणातून महिलांचा अपमान करीत आहेत, आदरणीय पत्रकारांचा अपमान करीत आहेत असे वारंवार लिहून येऊ लागले. सध्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना झोडपले जात आहे. अगदी तसेच त्यावेळी बाळासाहेबांच्या भाषणातील प्रत्येक वाक्याचा कीस काढला जाऊ लागला. ते अगदी ऑफ द रेकॉर्ड बोललेले सुद्धा माध्यमांना लीक केले गेले. त्याचवेळी दादा कोंडके सेनेच्या बाजूने प्रचार करताना काही वेळा बिलो द बेल्ट बोलत होते. त्यावरही प्रचंड टीका झाली. असे चित्र निर्माण केले गेले की या मंडळींनी महाराष्ट्राची संस्कृती, महिलांची सभ्यता धोक्यात आणली आहे. पुष्पा भावे यांच्या सारख्या साहित्यिकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. आपल्या आयाबहिणींची निंदानालस्ती करणार्‍यांचा, असभ्य वक्तव्ये करणार्‍यांचा पराभव करा असा जोरदार प्रचार काँग्रेसने सुरू केला. त्याबरोबरीने पवारांनी जातीय प्रचार सुरू केला. आज लालू जे करीत आहे त्याचेच जरा सभ्य स्वरूप म्हणजे तो प्रचार होता. सेना-भाजप सत्तेवर आले तर पुन्हा एकदा पेशवाई येईल, यांना पेशवाई आणायची आहे अशा तर्‍हेच्या सूचक जातीयवादी जाहिराती रोज वृतपत्रात येऊ लागल्या. शेवटी निकाल लागल्यावर काँग्रेसला २८८ पैकी १४१, भाजप ४२ + सेना ५२ अशा ९४ जागा व जनता दल २५ अशा जागा मिळाल्या. भाजप-सेनेचा प्रचार बघता व काँग्रेसविरोधी वातावरण बघता सेना-भाजपला अजून किमान २०-२५ जागा मिळायला हव्या होत्या. बिहार निवडणुकीत साधारणपणे असेच चित्र आहे. लालू जोरदार जातीयवादी प्रचार करीत आहे, ढोंगी साहित्यिक पुरस्कार परत करून निषेधाची नाटके करीत आहेत, नितीशकुमारांनी बिहारची अस्मिता हा मुद्दा केला आहे. आणि त्याचवेळी भाजपमधील वाचाळवीर प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतत आहेत. एकंदरीत चारही बाजूने भाजप घेरला गेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्याचवेळी दादा कोंडके सेनेच्या बाजूने प्रचार करताना काही वेळा बिलो द बेल्ट बोलत होते
भाषण ऐकले आहे दादा कोंडकेंचे. एकेकाला काय फोडुन काढलं आहे. हसुन हसुन बेजार झालो होतो. दादांचा पहिला निर्मिती केलेला चित्रपट - 'सोंगाड्या' मुंबईतल्या कोहीनुर चित्रपट्गृहात लावायचे ठरले होते. तेव्हा चित्रपट्गृहे निर्मात्याला ठराविक रक्कम देऊन बुक करावी लागत त्याप्रमाणे दादांनी बुकींग केले होते. पण अचानक एक तिकडे दादांचा चित्रपट डावलुन हिंदी चित्रपट (देव आनंदचा - जॉनी मेरा नाम) लावायचे ठरले. दादा चित्रपट्गृहाच्या मालकाकडे गेले पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच वेळी कोणीतरी दादांना बाळासाहेबांना भेटायचा सल्ला दिला. शिवसेना त्यावेळी नुकतेच बाळसे धरत होती. दादा बाळासाहेबांना भेटल्यावर ताबडतोब बाळासाहेब स्वतः काही शिवसैनिकांना बरोबर घेऊन गेले आणि त्यांच्या खास शैलीत त्या चित्रपट्गृहाच्या मालकाला 'समजावले'. शेवटी तिकडे दादांचा सोंगाड्याच प्रदर्शित झाला आणि रौप्यमहोत्सवी ठरला. त्यावेळेपासुन दादा आणि बाळासाहेबांचा स्नेह जुळला आणि पुढे कित्येक वर्षे टिकला. (दादांचे चरित्र 'एकटा जीव' मधे हे वाचले होते)

भाजप हरली तर पाकिस्तानात फटाके वाजतील- इति जुमला सम्राट अमित शहा. आले हे फेकू आपल्या लाइनिवर. लालू यादव आपल्या करणीने बदनाम आहे आणि ते बरेच आहे पण हे शहा आणि मोदी जे काही बरळतात त्यावर भक्तलोक आणि काही शहाणेपण मुग (किंवा अन्य काही) गिळून गप्प बसलेले असतात.मागे पण हरियानामध्ये अमित शहाच्या मंचावर डीपी यादव उपस्थित होता तेव्हा भाजपेयिन साधनशुचिता आठवत नव्हती. एका तडीपार गुंडाला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवणार्यांना काश्याची आलीय म्हणा साधनशुचिता. भाजपला निवडून द्या नाहीतर लालू यादव येईल हे विधान किंवा भाजपला निवडून द्या नाहीतर पाकिस्तानात फटाके वाजतील हे विधान यात जास्त फरक नाही.असो. पब्लिक याला जास्त महत्व देत नसते.

In reply to by दुश्यन्त

क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकला तर भारतात फटाके वाजवणार्‍यांच्या अवलादींना यातला अर्थ कळणार नाहीच.

In reply to by जॅक द रिपर

+ १ असल्या लोकांना फक्त मोदींना अपशकुन करायचा आहे. मग त्यासाठी लालूसारख्या गुन्हेगाराला पाठिंबा द्यावा लागला तरी हरकत नाही, पण मोदींना अपशकुन व्हायला पाहिजे अशी यांची मानसिकता आहे.

In reply to by दुश्यन्त

पब्लिक याला जास्त महत्व देत नसते.
इथे हे वाक्य टाकून थयथयाट करावासा वाटला यातच या वाक्याचं महत्त्व दिसून येत आहे!

In reply to by श्रीगुरुजी

पब्लिकने कशाला महत्व दिले हे २०१४ च्या मे महिन्यात स्पष्टपणे दिसून आले आहे. अद्यापही त्या मानसिक आघातातून बाहेर न आलेल्यांचा या वैचारीक डान्सबार सुरु आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे सट्टेबाज नक्की किती विश्वासार्ह असतात? फेब्रुवारी २०१५ च्या दिल्ली निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसबरोबरच या सट्टेबाजांचाही प्रचंड पराभव झाला होता . डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांमध्ये सट्टेबाजांनी दिल्लीमध्ये केजरीवाल ८ ते १० जागा घेऊन तिसर्‍या क्रमांकावर येतील असे म्हटले होते. प्रत्यक्षात जागा मिळाल्या २८ आणि क्रमा़ंक होता दुसरा. याच सट्टेबाजांनी भाजपला मध्य प्रदेशात १२२ ते १२४ तर काँग्रेसला ७८-८० जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपला १६३ तर काँग्रेसला ६५ जागा मिळाल्या. राजस्थानात सट्टेबाजांनी भाजपला ११४ ते ११६ तर काँग्रेसला ६२ ते ६४ जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपला १६२ तर काँग्रेसला २३ जागा मिळाल्या. दुवा मला वाटते की बिहारमध्ये चुरस मतांच्या टक्केवारीमध्ये असेल. ज्या आघाडीला एखादा टक्का मते जास्त मिळतील ती आघाडी १४०-१५० जागा मिळवून अगदी आरामात विजय मिळवेल आणि दुसर्‍या आघाडीला ७०-८० जागांवर समाधान मानावे लागेल. माझ्या मते नितीश कुमार आघाडीला विजयाची शक्यता जास्त आहे. प्रत्यक्षात काय होते ते पुढच्या रविवारी कळेलच.

In reply to by गॅरी ट्रुमन

गुदस्ता साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सट्टेबाजांचा खालील अंदाज होता. भाजप - ११०+, शिवसेना - ५०, काँग्रेस - ४०-४५, राकॉं - ४५-५०, मनसे - १५-२०, अपक्ष व इतर - १२-१५ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bookies-predi… यापैकी भाजप व दोन्ही काँग्रेसच्या बाबतीत सट्टेबाजांचे अंदाज बरेचसे खरे ठरले. मनसेच्या बाबतीत अंदाज पूर्ण चुकला. शिवसेनेच्या बाबतीत काही फरकाने चुकला.

In reply to by गॅरी ट्रुमन

सट्टेबाजांचे अंदाज बरोबरसुद्धा येतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सट्टेबाजांनी रालोआला ३१७ जागांचा अंदाज दिला होता. रालोआला त्याच्या जवळपास म्हणजे ३३६ जागा मिळाल्या होत्या. http://zeenews.india.com/news/general-elections-2014/lok-sabha-polls-bo…

In reply to by श्रीगुरुजी

सट्टेबाजांचा अंदाज - संजद+ : १२९ भाजप+ : ११० http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bihar-polls-grand-alliance...
बिहारमध्ये मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. अजून २ टप्प्यातील १०७ जागांचे मतदान व्हायचे आहे. वरील बातमीनुसार पहिल्या २ टप्प्यात भाजप मागे पडल्याने सट्टेबाजांनी संजद+ ला १४५ जागांचा अंदाज दिला होता. परंतु ३ र्‍या टप्प्यात भाजपची परिस्थिती सुधारल्याने सट्टेबाजांनी तो अंदाज १२९ पर्यंत खाली आणला. जर उर्वरीत २ फेरीत भाजपची स्थिती अशीच सुधारली,तर हा आकडा अजून कमी येईल.

या निवडणुकांमध्ये एक गोष्ट समजत नाही. भाजप जर बॅकफूटवर असेल तर नरेंद्र मोदींना संभाव्य पराभवाच्या दोषापासून वाचविण्यासाठी एक तर त्यांच्या सभा न आयोजित करणे आणि पराभवाचे खापर फोडायला स्थानिक पातळीवरील एखादा बकरा शोधणे हे प्रकार झाले असते (जसे दिल्लीमध्ये झाले). तसे यावेळी झालेले दिसत नाही. दिल्ली निवडणुकांच्या वेळी आपण जिंकणार हा दावा भाजपने केला होता (तसा तो करायलाच हवा) पण तो दावा फार वेळा केलेला नव्हता. पण यावेळी मात्र आपण दोन-तृतीयांश बहुमत घेऊन येणार असा दावा अमित शहा जवळपास दररोज करत आहेत.भाजपने मतदानाच्या चौथ्या फेरीनंतरच निवडणुका जिंकलेल्या असतील असे अमित शहांनी कालच म्हटले आहे. प्रत्यक्ष भाजप बॅकफूटवर आहे की नाही हे कळत नाही पण निदान भाजपची देहबोली तरी तसे दर्शवत नाही. दिल्ली निवडणुकांच्या वेळी पोस्चरींग इतके नव्हते हे तर नक्कीच. इंडिया टुडेमध्ये या चौकटीत एन.डी.ए चे नेते दावा करत आहेत की महादलित मते दूर गेलेली नाहीत.पण ही मते नेहमी "मूक मते" असतात त्याप्रमाणे यावेळीही तशीच मूक आहेत. हे मतदार राजदच्या गुंडांना घाबरून आपण मत कंदिलालाच (राजदचे चिन्ह) असे म्हणत आहेत पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी मते आम्हालाच दिलेली आहेत असा त्यांचा दावा आहे. बसपची मते मुख्यत्वे अशी मूकमते असतात.त्यामुळे प्रत्येक मतकल चाचणीमध्ये बसपला दिलेल्या असतात त्यापेक्षा प्रत्यक्षात जास्त जागा मिळतात. तसे एन.डी.ए विषयी होणार असा त्यांचा दावा दिसत आहे. प्रत्यक्षात काय होते हे पुढच्या रविवारीच कळेल.

एन.डी.टि.व्ही. वर दाखविलेल्या कार्यक्रमात कोसी नदीच्या भागात पप्पू यादवलाही बराच पाठिंबा आहे असे दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पप्पू यादवने खुद्द शरद यादव यांचा त्यांच्याच मधेपुरा मतदारसंघात पराभव केला होता.त्यानंतर ते राजदमधून बाहेर पडले. कोसी नदीच्या भागात त्यांचा पक्ष काही प्रमाणात राजदची यादव मते खाईल ही भाजपची अपेक्षा नक्कीच असेल. पण मधेपुरा भागात भाजपला फारसे स्थान नाही त्यामुळे पप्पू यादवने मते फोडून भाजपला फार फायदा होईल असे नाही. तसेच झंझारपूर भागात राजदचे माजी नेते देवेन्द्रप्रसाद यादव यांचा पक्ष मुलायमसिंग यादव यांच्या तिसऱ्या आघाडीचा सदस्य आहे. २०१४ मध्ये देवेन्द्रप्रसाद यादव यांनी राजद सोडून संजदमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुक लढवली.ही जागा भाजपने जिंकली.पण देवेन्द्रप्रसाद यादव झंझारपूरमधून पूर्वी पाचवेळा निवडून गेले आहेत त्यामुळे त्यांची स्वत:ची काही मते त्या भागात असतील ती राजद-संजदपासून फोडली जातील अशी भाजपची नक्कीच अपेक्षा असेल. प्रत्यक्षात काय होते हे पुढच्या रविवारीच कळेल. मी बिहार निवडणुकांविषयी एक्स-फॅक्टर हा तिसरा लेख लिहिणार होतो त्यातील इतर सगळे मुद्दे पहिल्या दोन लेखांमध्ये चर्चेत किंवा प्रतिसादात आले आहेत.म्हणून तिसरा लेख स्वतंत्र लिहित नाही.पण त्या लेखात लिहायचे पण अन्य कुठल्याच प्रतिसादात किंवा चर्चेत न आलेले हे दोन मुद्दे इथे लिहित आहे.

जयपूर, इंदूर, दिल्ली आणि मुंबई येथील सट्टेबाजांचे नवीन अंदाज - भाजप+ : १२७-१५०, संजद+ : ७०-१०९ रविवारीच समजेल हे अंदाज किती बरोबर येतात आणि कोणत्या शहरातल्या सट्टेबाजांचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जातात ते..