गेल्या आठवड्यात लेकाच्या हाऊसमेटने बनवलेली चिली लेकाला फार आवडली. लेकाने चिली हाणली कळल्यापासून नवर्याची भुणभुण सुरु होती, आपण पण करुया म्हणून. तेव्हा या विकेंडला चिली आणि कॉर्नब्रेड असा बेत केला. आमच्याकडे नेहमी व्हाईट चिकन चिली केली जाते. हाऊसमेटची रेसीपी बीफवाली आणि बेताच्या मसाल्याची. तेव्हा त्यात आमच्या चवीला रुचणारे बदल करुन टर्की चिली बनवली. मस्त झाली म्हणून इथे रेसीपी टाकतेय.
टर्की चिली
साहित्य
१ पाउंड टर्की खीमा
३/४ कप राजमा रात्रभर पाण्यात भिजवून कुकरमधे शिजवून घेतलेला ( साधारण १५ औस कॅन्ड किडनी बिन्स )
१ मोठा कांदा बारीक चिरुन
१ मोठी बेलपेपर बारीक चिरुन
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
१ १/२ टे स्पून तेल
डाईस्ड टोमॅटोचे दोन कॅन,१४.५ औस वाले ( साधारण ३ कप बारीक चिरलेले टोमॅटो )
१/२ टी स्पून मीठ
तिखट चवी नुसार
चेडर चीज वरुन भुरभुरवण्यासाठी ( वापरले नाही तरी चालेल)
मसाला:
१ हलापिनो पेपर बीया काढून चिरुन (नसल्यास तिखट्/कायान पेपर १ टीस्पून)
१ टे स्पून वुस्टरशायर सॉस
१ टी स्पून पाप्रिका
१ टेस्पून ड्राइड ओरॅगानो
१ टे स्पून जीरे पावडर
१/२ टी स्पून पोल्ट्री सिझनिंग (नसले तरी चालेल)
१/२ टी स्पून भरड मिरे पावडर
१/२ टीस्पून कोको पावडर(नसल्यास चालेल )
कृती
मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की बारीक चिरलेला कांदा घालून परतायला लागा. दोन मिनीटे परतून मीठ घाला आणि अजून २-३ मिनिटे परता. कांद्याचा रंग थोडा बदलू लागला की त्यात चिरलेली बेलपेपर आणि लसूण घालून परता. लसूण करपू नये म्हणून सतत ढवळत रहा. २-३ मिनीटे परतून मिश्रण पातेल्यातच एका बाजूला सारून त्यात टर्कीचा खीमा घाला. टर्कीचा रंग लगेच बदलायला लागेल. खीमा साधारण ३-४ मिनीटे मोडून परता आणि कांद्याचे मिश्रण त्यात नीट मिसळून घ्या. आता त्यात मसाल्याचे सर्व घटक घालून परता. कॅन्ड टोमॅटो घाला. ताजे टोमॅटो घालणार असाल तर जोडीला साधारण १ कप पाणी घाला. नीट ढवळून आच वाढवा. मिश्रणाला उकळी आली की त्यात शिजवलेला राजमा घालून ढवळा. झाकण ठेवून ३०-४० मिनीटे मंद आचेवर ठेवा. झाकण उघडून ढवळा आणि चव बघा. आता त्यात चवीप्रमाणे तिखट घाला आणि गरज वाटल्यास अजून थोडे मीठ घाला. झाकण लावून अजून ५ मिनीटे स्वाद मुरला की आच बंद करा.
बोलमधे गरम गरम चिली वाढून त्यावर आवडत असल्यास वरुन चमचाभर चीज घाला. सोबत कॉर्नब्रेड. यम्मी!

वाचन संख्या
9674
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह छानच
वाह, मस्तं पाककृती.
नावावरून मला वाटलं दोन
+१
In reply to नावावरून मला वाटलं दोन by सायकलस्वार
वाचून गेलो आहे.
कालच व्हेज. चिलीची आठवण आली
ह्या रेसिपी आम्हाला
करून पाहण्याजोगी सुरेख
करून पाहण्याजोगी सुरेख
छान आहे पाककृती, चिकन वापरुन
सर्व प्रतिसादकांचे आणि
वावा..
वाचून गेलो
टर्की कुठे सापडेल?
जसं काय सापडल्यावर
In reply to टर्की कुठे सापडेल? by टवाळ कार्टा
खिक्क....रच्याकने मी टर्की
In reply to जसं काय सापडल्यावर by दिपक.कुवेत
इथे मला एकदा मागे एका सप्लायर ने दिली होती
In reply to खिक्क....रच्याकने मी टर्की by टवाळ कार्टा
माई मोड .....
In reply to जसं काय सापडल्यावर by दिपक.कुवेत
माई आज्जी मग
In reply to माई मोड ..... by प्यारे१
त्याबाबतीत "टर्की म्हणजे
In reply to माई मोड ..... by प्यारे१
बाळ टका
In reply to त्याबाबतीत "टर्की म्हणजे by टवाळ कार्टा
never underestimate me
In reply to बाळ टका by दिपक.कुवेत
वेज तुर्की चिल्ली आहे का हो??
टर्की ची रिप्लेसमेंट …
In reply to वेज तुर्की चिल्ली आहे का हो?? by वैभव.पुणे