मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टर्की चिली

स्वाती२ · · पाककृती
गेल्या आठवड्यात लेकाच्या हाऊसमेटने बनवलेली चिली लेकाला फार आवडली. लेकाने चिली हाणली कळल्यापासून नवर्‍याची भुणभुण सुरु होती, आपण पण करुया म्हणून. तेव्हा या विकेंडला चिली आणि कॉर्नब्रेड असा बेत केला. आमच्याकडे नेहमी व्हाईट चिकन चिली केली जाते. हाऊसमेटची रेसीपी बीफवाली आणि बेताच्या मसाल्याची. तेव्हा त्यात आमच्या चवीला रुचणारे बदल करुन टर्की चिली बनवली. मस्त झाली म्हणून इथे रेसीपी टाकतेय. टर्की चिली साहित्य १ पाउंड टर्की खीमा ३/४ कप राजमा रात्रभर पाण्यात भिजवून कुकरमधे शिजवून घेतलेला ( साधारण १५ औस कॅन्ड किडनी बिन्स ) १ मोठा कांदा बारीक चिरुन १ मोठी बेलपेपर बारीक चिरुन ५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरुन १ १/२ टे स्पून तेल डाईस्ड टोमॅटोचे दोन कॅन,१४.५ औस वाले ( साधारण ३ कप बारीक चिरलेले टोमॅटो ) १/२ टी स्पून मीठ तिखट चवी नुसार चेडर चीज वरुन भुरभुरवण्यासाठी ( वापरले नाही तरी चालेल) मसाला: १ हलापिनो पेपर बीया काढून चिरुन (नसल्यास तिखट्/कायान पेपर १ टीस्पून) १ टे स्पून वुस्टरशायर सॉस १ टी स्पून पाप्रिका १ टेस्पून ड्राइड ओरॅगानो १ टे स्पून जीरे पावडर १/२ टी स्पून पोल्ट्री सिझनिंग (नसले तरी चालेल) १/२ टी स्पून भरड मिरे पावडर १/२ टीस्पून कोको पावडर(नसल्यास चालेल ) chili कृती मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की बारीक चिरलेला कांदा घालून परतायला लागा. दोन मिनीटे परतून मीठ घाला आणि अजून २-३ मिनिटे परता. कांद्याचा रंग थोडा बदलू लागला की त्यात चिरलेली बेलपेपर आणि लसूण घालून परता. लसूण करपू नये म्हणून सतत ढवळत रहा. २-३ मिनीटे परतून मिश्रण पातेल्यातच एका बाजूला सारून त्यात टर्कीचा खीमा घाला. टर्कीचा रंग लगेच बदलायला लागेल. खीमा साधारण ३-४ मिनीटे मोडून परता आणि कांद्याचे मिश्रण त्यात नीट मिसळून घ्या. आता त्यात मसाल्याचे सर्व घटक घालून परता. कॅन्ड टोमॅटो घाला. ताजे टोमॅटो घालणार असाल तर जोडीला साधारण १ कप पाणी घाला. नीट ढवळून आच वाढवा. मिश्रणाला उकळी आली की त्यात शिजवलेला राजमा घालून ढवळा. झाकण ठेवून ३०-४० मिनीटे मंद आचेवर ठेवा. झाकण उघडून ढवळा आणि चव बघा. आता त्यात चवीप्रमाणे तिखट घाला आणि गरज वाटल्यास अजून थोडे मीठ घाला. झाकण लावून अजून ५ मिनीटे स्वाद मुरला की आच बंद करा. बोलमधे गरम गरम चिली वाढून त्यावर आवडत असल्यास वरुन चमचाभर चीज घाला. सोबत कॉर्नब्रेड. यम्मी! chili

वाचने 9673 वाचनखूण प्रतिक्रिया 24

रेवती Tue, 10/06/2015 - 01:02
कालच व्हेज. चिलीची आठवण आली आली होती. मला काही तो प्रकार करता येत नाही पण सानिकेच्या कृतीनं रिफ्राईड बीन्स टाकोज साठी राजमा भिजत घातला आहे. तुमची कृती व फोटू दोन्ही आवडले. कॉर्न ब्रेड मी एकदाच खाल्लाय. अवांतर- २ दिवसांपूर्वी ४ मोठे टर्कीज इथे आसपास भटकून परत जंगलात निघून गेले.

ह्या रेसिपी आम्हाला सत्यनारायण कथे सारख्या असतात, समुग्री ते विधी कळत शष्प नाही पण खवैय्ये असल्यामुळे भक्तिभाव पुर्ण असतो! असा हा आमचा बिन शिर्याचा खाद्यनारायण आउटलुक

स्वाती२ Tue, 10/06/2015 - 16:55
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार. या पाकृत चिकन वापरणार असाल तर - बोनलेस, स्किनलेस चिकनचे तुकडे राजमा घालतो त्या स्टेजला घालायचे. किंवा बोनइन, स्किनवाले चिकन ब्रेस्ट अर्धा तास ओवनमधे बेक करुन मग त्याचे बोस, स्किन काढून तुकडे राजमा बरोबर घालायचे. ग्राउंड चिकन वापरणार असाल तर नुसत्या बोनलेस ब्रेस्टचे नको, खूप ड्राय होते. मला स्वतःला चिकनची व्हाइट चिली आवडते.

In reply to by टवाळ कार्टा

दिपक.कुवेत Wed, 10/07/2015 - 15:04
पण खायचा आणि करायचा अनुभव शुन्य असल्याने एका गोवन मित्राला दिली. त्याचा ख्रिसमस जोरदार झाला.

In reply to by वैभव.पुणे

रॉजरमूर गुरुवार, 10/08/2015 - 18:36
टर्की ची रिप्लेसमेंट … पाककृतीत जिथे म्हणून टर्की चा उल्लेख येईल तिथे "दुधी भोपळा " वापरून बघा.