✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तांत्रिक रात्रिसूक्तम् (भाग-१)

म
मांत्रिक यांनी
Mon, 10/05/2015 - 17:27  ·  लेख
लेख
॥ तांत्रिक रात्रिसूक्तम् ॥ (भाग-१) श्री दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणांतर्गत येणारा हिंदु धर्मशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ. दुर्गा सप्तशती किंवा नुसता सप्तशती हा शब्द ज्याने ऐकला नाही, असे हिंदु फार कमी असतील. आज श्रीमद्भग्वद्गीतेपेक्षा देखील फार मोठ्या प्रमाणात या ग्रंथाची उपासना होते. महर्षी मार्कंडेयांनी या दिव्य, प्रासादिक ग्रंथाची रचना केली. त्यावेळीस ते नाशिकमधील वणी येथील मार्कंडेय पर्वतावर साधना करीत होते व त्यांचा हा पाठ श्री भगवती लक्षपूर्वक ऐकत होती, असा पुराणांत उल्लेख आहे. त्यामुळेच श्री सप्तशृंगी देवीची मूर्ती काहीतरी लक्षपूर्वक ऐकत असल्यासारखी दिसते. या सप्तशती ग्रंथामध्ये रात्रिसूक्त, शक्रादी स्तुती, देवीसूक्त आणि नारायणी स्तुती या अत्यंत महत्वपूर्ण व श्री भगवतीला अत्यंत प्रिय अशा ४ स्तुति समाविष्ट आहेत. त्यापैकी रात्रिसूक्त या प्रथम स्तुतीची आपण आज ओळख करून घेणार आहोत. ओळख हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. कारण मी काही कुणी अंतिम अधिकारी सत्पुरुष नाही जो यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल. हे रात्रिसूक्त दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायात श्लोक क्रमांक ७० ते ८७ (गीता प्रेस, गोरखपूर आवृत्तीप्रमाणे, अन्य अनेक आवृत्त्या आहेत व त्यात थोडीफार भिन्नता आढळते)मध्ये समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे आणखी एक वैदिक रात्रिसूक्त म्हणून ऋग्वेदात आहे. परंतु ते येथे अपेक्षित नाही. आज सर्वाधिक प्रचलित असणारे सूक्त म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत येणारे सूक्तच होय. त्यालाच तांत्रिक रात्रिसूक्त असेही नाव प्रचलित आहे. कारण एकूणातच श्री भगवतीची उपासना प्रामुख्याने तंत्रमार्गाने केली जाते, आणि रात्रिसूक्त तर अशा प्रयोगांतील एक महत्वपूर्ण भाग आहे. असो, आता या रात्रिसूक्तामागील मुख्य कथानक काय आहे ते पाहू या. पौराणिक कथाः- कल्पाच्या शेवटी, सृष्टीच्या महाप्रलयाच्या वेळीस विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णु क्षीराब्धीमध्ये अनंत नामक शेषावर निद्राधीन झाले, तेव्हा त्यांच्या कर्णमलातून मधु व कैटभ हे दोन असुर उत्पन्न झाले. त्या असुरांनी विष्णुंच्या नाभीकमळातील ब्रह्मदेवास पाहिले, तेव्हा त्याला मारून टाकण्याच्या हेतूने ते दोघे आपली शस्त्रे परजीत त्यांच्यावर धावून गेले. हे पाहून घाबरलेल्या ब्रह्मदेवाने भगवान विष्णुंना निद्राधीन करणा-या योगनिद्रेचे स्तवन सुरु केले. हेच ते १५ श्लोकांचे प्रसिद्ध रात्रिसूक्त होय. या स्तुतिमुळे प्रसन्न झालेल्या योगनिद्रेने भगवान विष्णुंची मायेच्या आच्छादनातून मुक्तता केली. तेव्हा जागे झालेल्या ईश्वराने मधु व कैटभ यांच्याशी पाच सहस्र वर्षेपर्यंत युद्ध केले. परंतु ते दोघेही असुर त्याला दाद लागू देईनात. तेव्हा महामायेने त्यांना आपल्या मायाशक्तीने भ्रमित केले. मग त्या दोघांनी भगवान विष्णुंना “तुझा पराक्रम पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला जो इच्छित वर असेल तो माग” असा शब्द दिला. तेव्हा भगवान विष्णुंनी त्यांना, माझ्या हातून तुम्हाला मृत्यु येऊ दे, असा वर मागितला. तेव्हा जलमय असलेली पृथ्वी पाहून, जेथे पाणी नसेल तेथे आम्हाला मार, असा त्यांनी वर दिला. तेव्हा भगवान विष्णुंनी तत्काळ त्यांना स्वतःच्या मांडीवर घेऊन स्वचक्राने त्यांचे शिर छेदून टाकले. गूढार्थः- इथे भगवान विष्णु जीवाच्या मायेने आवृत्त अवस्थेचे प्रतीक आहेत. तर मधु व कैटभ म्हणजे नाम व रूपात्मक माया होय. (कर्णमलात ते उत्पन्न होतात याचा अर्थ इतकाच घ्यावयाचा की, आपली पंच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही सातत्याने बाहेरून मिळणा-या stimuli (याला योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा) किंवा प्रलोभनांमुळे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी संपर्क करण्याच्या आपल्या प्रयत्नांत मोठाच अडथळा निर्माण करतात. एक सोपे उदा. म्हणजे सकाळी जप करायला तुम्ही बसलात आणि अचानक कुणीतरी मोठ्या आवाजात गाणी लावली तर ५ मिनिट देखील तुम्ही शांत बसू शकणार नाही. अशा वेळेस त्या आदिमायेलाच आळवणी करावी लागते की माझे प्रयत्न अपुरेच पडणार, तूच मला आता आधार दे.) ही माया किंवा अविद्या जीवातील परब्रह्माला आवृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हां दुर्बल जीवाने या मायेच्या साम्राज्ञीचा केलेला धावा म्हणजेच रात्रिसूक्त होय. 1) ॐ ब्रह्मोवाच - ब्रह्मदेवाने स्तुती आरंभ केली. इथे ब्रह्मदेव म्हणजे कुणी देवता अपेक्षित नाही, तर मायेच्या साम्राज्यातील संकटे, अडचणी व दुःखांनी गांजलेला जीव अपेक्षित आहे. या जीवाने श्री भगवतीला अशा आणीबाणीच्या प्रसंगी मारलेली हाक म्हणजे रात्रिसूक्त. 2) विश्वेश्वरीम् जगद्धात्रीम् स्थितीसंहार कारिणीम् । स्तौमि निद्राम् भगवतीम् विष्णोरतुल तेजसः ॥ “विश्वाची स्वामिनी, जगाची उत्पत्ती, स्थिती व संहार करणारी, भगवान विष्णुंच्या अतुलनीय अशा त्या तेजस्वी निद्रेचे मी स्तवन करतो.” विश्व - जड आणि जीव यांचे अस्तित्व असो किंवा नसो, तरीदेखील अस्तित्वात असणारी प्रचंड अथांग प्रकाशहीन पोकळी, तिची स्वामिनी ती विश्वेश्वरी. जगद्धात्री - आपण पाहतो त्या जड व चैतन्याने युक्त अशा जगाची उत्पत्ती करणारी स्थिती संहार कारिणी - जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हाच जगताची धारणा टिकून राहू शकते, म्हणून एक प्रकारे तीच विश्वाची स्थिती टिकवायला कारणीभूत आहे. तसेच जेव्हा परब्रह्म अविद्येच्या आवरणातून बाहेर येते तेव्हा आपोआपच पंचमहाभूतात्मक विश्वाचा नाश होतो. म्हणून संहारकारिणी. आता येथे कुणी प्रश्न विचारेल की, जर अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? त्याला माझे उत्तर असे, की काही झालं तरी शेवटी सर्वांनाच, पुण्यवान आणि महापापी, दोघांना देखील त्याच ठिकाणी परत जायचे आहे, तर त्याला कारणीभूत घटना हा महत्वाचा निकष होऊ शकत नाही. हां, आता येथे कुणी असे म्हणेल की सर्वांना परब्रह्माकडेच परत जायचे आहे तर मी एखाद्याचा खून केला तर काय बिघडेल? अशा माणसाला प्रश्न करावा की त्याच न्यायाने पहिले तुला मारले तर चालेल काय? म्हणूनच बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने Golden Rule सांगितलेला आहे की, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही देखील त्यांच्याशी वागावं. स्तौमि - मी स्तुति करतो निद्रां भगवतीं – या देवतेला भगवान विष्णुंची योगनिद्रा म्हटलेलं आहे. निद्रा याचा अर्थ जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हां ते आपोआपच आपल्या ईश्वरत्वाविषयी निद्रिस्त असते, तर जेव्हां मायेपासून मुक्त असते तेव्हां आपोआपच नामरूपात्मक जगताविषयी निद्रिस्त असते. उदाहरण म्हणजे सामान्य मनुष्य मायेने भ्रांत परब्रह्म असल्याने तो प्रपंचात अगदी रममाण असतो. दुःख, आजारपण, वेदना, मृत्यु, विषमता इ. जगातील कटकटी समजून देखील तो जगाला घट्ट चिकटून बसतो. त्याच वेळेस रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे सत्पुरुष मात्र या भ्रामक जगातून स्वतः बाहेर पडतात आणि इतर अनेक लोकांनाही त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवतात. तर अशा या योगनिद्रेचे सर्वात सुस्पष्ट रूप म्हणजे नवदुर्गांपैकी सप्तमी दुर्गा भगवती श्री कालरात्रि होय. भगवतीचे या प्रकारे ध्यान करतच सूक्ताचा पाठ करणे अपेक्षित आहे. विष्णोरतुलतेजसः - भगवान विष्णूंची अत्यंत तेजस्वी आणि अतुलनीय अशी. 3) त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार-स्वरात्मिका । सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥ खरे सांगायचे तर मला या श्लोकाचा समाधानकारक अर्थ अजूनपर्यंत समजलेला नाही. स्वाहा म्हणजे देवतांच्या मंत्रांद्वारे देवतांप्रीत्यर्थ केले जाणारे हवन होय. उदा. ॐ गं गणपतये स्वाहा। स्वधा या मंत्राने पितरांच्या मंत्रांद्वारे पितरांप्रीत्यर्थ हवन केले जाते. उदा. ॐ अर्यमाये नमः स्वधा। आज पितरांप्रीत्यर्थ फारसे हवन कुठे होत असेल असे वाटत नाही. वषट् या मंत्राद्वारे देखील देवतांप्रीत्यर्थ विशिष्ट हवन केले जाते. पण वषट् माझ्या वाचनात फारसे कुठे आलेले नाही. (जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.) पण इतका वरवरचा अर्थ सप्तशतीकारांना अपेक्षित असेल असे वाटत नाही. माझ्या मनात दोनच दिवसांपूर्वी सहज आलेली कल्पना सांगतो. (हा लेख लिहिण्यापूर्वी मला या श्लोकाचा अर्थ काहीही करुन पाहिजे होताच. आणि लेख तर नवरात्रापूर्वी टाकावयाचा होताच. आणि अचानक जणू स्वर्गीय मदतच मिळाली.) स्वाहा म्हणजे बाह्य वस्तुंकडून कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आपणांस ज्ञान मिळवून देतात. ती प्रक्रियाही मायेच्या शक्तीमुळेच शक्य आहे. कारण केवळ ब्रह्माला. जो निर्गुण निराकार आहे, कसलेही ज्ञान होणे शक्य नाही. स्वधा म्हणजे बाह्य वस्तु उपस्थित नसतानाही आपले मन एखाद्या पदार्थाची चव चाखू शकते, रंग पाहू शकते, एखादे गाणे मनातल्या मनात ऐकू शकते. उदा. चिंचेच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटणे. मायेच्या या शक्तीला स्वधा म्हटले असावे. वषट् म्हणजे आंतर्बाह्य ज्ञानेंद्रियांचे व्यापार थांबून मन देखील जेथे न-मन होते, तेव्हां केवळ आत्मरूपाने आत्मरूपाबाबत जाणून घेतलेले ज्ञान होय. हे देखील मायेचेच सामर्थ्य होय. कारण जोपर्यंत माया जीवाला बंधन्मुक्त करीत नाही, तोपर्यंत हे शक्यच नाही. हे ज्ञान शब्दांत मांडता येत नाही. खुणेने सांगता येत नाही. (हा माझा अर्थ आहे. चुकलेला असू शकतो. कुणी व्यक्ती दुसरा दृष्टीकोण मांडत असेल तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.) स्वरात्मिका - अ पासून अः पर्यंत जे 16 स्वर आहेत ते तुझेच रूप आहेत कारण त्यांच्याशिवाय व्यंजनांना पूर्णत्व येऊच शकत नाहीत. अ ते अः यांचे अस्तित्व भाषेत स्वतंत्ररूपाने असे दिसून येत नाही. सहजपणे दिसतात ती व्यंजनेच. अगदी त्याचप्रमाणे या विश्वात अनेक सजीव-निर्जीव वस्तुंचे ज्ञान आपणांस होत राहते. परंतु त्यासर्वांमागे मायाशक्ती हीच प्रधान आहे. सुधा - अमृतस्वरूपी किंवा सु-धा, उत्तम प्रकारे जगताला किंवा शरीराला धारण करणारी, त्याचे पालन पोषण करणारी. आता श्री भगवती शरीराचे धारण करणारी कशी? आतमध्ये तर परमात्माच विराजमान आहे? तर याचे उत्तर असे की, जोपर्यंत अविद्येच्या आवरणाने परमात्मा भ्रमित होत नाही तोपर्यंत पंचभूतात्मक जगत् आकाराला येऊच शकत नाही. त्वम् अक्षरे - तू अ-क्षरा आहेस म्हणजे जी क्षय पावू शकत नाही, जिच्यावर काळाचा “व्यवस्थेकडून अव्यवस्थेकडे जाणे हा वस्तूचा गुणधर्म आहे” असा नियम लागू पडत नाही, किंबहुना काळच जिचा नम्र, पदशरण किंकर आहे अशी ती महाकाली. नित्ये - जिला सुरुवात देखील नाही व अंत देखील नाही. त्रिधा मात्रात्मिका स्थिता - ॐकाराच्या अ, ऊ, म या तीन व अ‍ॅ ही अर्धी अशा एकूण साडेतीन मात्रास्वरूपी जी आहे, म्हणजे ईश्वराचा वाचक शब्द जो प्रणव आहे, तो तीच आहे. (क्रमशः-1)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
21028 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

खरे तर नवरात्रीला लेख सुरु

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 17:33 नवीन
खरे तर नवरात्रीला लेख सुरु करायचा होता. पण मनात आलं की लेख आत्ताच टाकायला सुरुवात करावी म्हणजे ज्या कुणाला नवरात्रीच्या पवित्रतम मुहुर्तावर श्री भगवतीच्या उपासनेला सुरुवात करावयाची असेल त्यांना सोयीचे पडेल. म्हणून आजपासूनच सुरुवात केली. अजून फार तर दोन भाग होतील. तेवढ्यात विषय पूर्ण होईल. आणि हो! कुणाला स्वतःचा दृष्टिकोण मांडावयाचा असेल तर स्वागत आहेच. न्यास, ध्यान, विनियोग यांची माहिती कुणाला उपासनेसाठी आवश्यक असेल तर व्यनी करावा. तसेच आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ कोणते यांची माहिती देखील व्यनीद्वारे देईन.
  • Log in or register to post comments

अर्धचंद्र Ä ही सं.मं. कृपया

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 17:58 नवीन
अर्धचंद्र Ä ही सं.मं. कृपया इथे अर्धचंद्राचे चिह्न टाकावे. आणि हा प्रतिसाद उडवावा. मोजीसाहेबांना सतत प्रसन्न असणारं हे चिह्न माझ्यावर का रुसून बसलंय?
  • Log in or register to post comments

E = अ‍ॅ उदा: bEMk = बँक

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/05/2015 - 21:04 नवीन
E = अ‍ॅ उदा: bEMk = बँक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

आता येथे कुणी प्रश्न विचारेल

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 18:02 नवीन
आता येथे कुणी प्रश्न विचारेल की, जर अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? त्याला माझे उत्तर असे, की काही झालं तरी शेवटी सर्वांनाच, पुण्यवान आणि महापापी, दोघांना देखील त्याच ठिकाणी परत जायचे आहे, तर त्याला कारणीभूत घटना हा महत्वाचा निकष होऊ शकत नाही. हां, आता येथे कुणी असे म्हणेल की सर्वांना परब्रह्माकडेच परत जायचे आहे तर मी एखाद्याचा खून केला तर काय बिघडेल? अशा माणसाला प्रश्न करावा की त्याच न्यायाने पहिले तुला मारले तर चालेल काय? म्हणूनच बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने Golden Rule सांगितलेला आहे की, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही देखील त्यांच्याशी वागावं. मुळात लोकांनी माझ्याशी कसं वागावं हे ठरवणारा मी कोण ?
  • Log in or register to post comments

मला इतकचं म्हणायचे आहे की

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 18:12 नवीन
मला इतकचं म्हणायचे आहे की माझे नियंत्रण फक्त माझ्या आचार विचारवर असु शकते. लोकांच्या नाही. उदा:- अगदी याक्षणी या माझ्या प्रतिसादाला अतिशय हिन प्रतिसाद लिहायची माझी कोणालाही परवानगी आहे. कारण ही परवानगी देणे माझ्या (आचार वा विचारांच्या) नियंत्रणाखालील गोष्ट आहे. पण एखाद्याने आक्षेपहार्य प्रतिसाद लिहला तर माझे त्यावर नियंत्रण आहे का ? नाही ? समोरचा व्यक्ती चर्चेचा मुख्य विषय भरकटवुन थर्डक्लास मंद प्रतिसाद लिहायला मुक्त आहे. पण संपादक त्यांना वाटले तर हे होउ देणार नाहीत. थोडक्यात जर मला नको असलेले प्रतिसाद कोणी मला देउ नये असे वाटत असेल तर मी स्वतः तसे प्रतिसाद लिहणे टाळणे हा त्यावर उपाय नसुन मला विषेश अधिकार प्राप्त असणे हा यावर रास्त उपाय ठरतो. आणी हा उपाय आपण इठे सांगत आहात तो येशुचा सुवर्ण-नियम नक्किच भंग करत आहे.. असे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

थोडक्यात जर मला नको असलेले

आनन्दा
Mon, 10/05/2015 - 19:23 नवीन
थोडक्यात जर मला नको असलेले प्रतिसाद कोणी मला देउ नये असे वाटत असेल तर मी स्वतः तसे प्रतिसाद लिहणे टाळणे हा त्यावर उपाय नसुन मला विषेश अधिकार प्राप्त असणे हा यावर रास्त उपाय ठरतो.
हा तरी उपाय कसा होऊ शकतो? प्रतिसाद तर देऊन झालेला असतो. तुम्ही फक्त उडवू शकता. हे म्हणजे जखम केल्यावर मलमपट्टी करण्यासारखे आहे. आणि म्हणूनच तो उपाय सांगितलेला आहे. त्याहीपेक्षा त्याचा अर्थ अधिक सोपा करून सांगतो. "तुम्हाला इतरांकडून फक्त अश्याच गोष्टींची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे जे तुम्ही इतरांना देता." अजून कळले नसेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

अजून कळले नाही .

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 19:27 नवीन
अजून कळले नाही .
तुम्हाला इतरांकडून फक्त अश्याच गोष्टींची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे जे तुम्ही इतरांना देता.
मुळात मला अधिकार हवाच कशाला हा मुलभुत प्रश्न आहे. मग माझ्या अधिकाराचा माझ्याकडुनच भंग वगैरे जे नॉट मेकींग सेन्स मुद्दे उभे राहत आहेत आपल्या विवेचनातुन ते नंतर घेउ विचारात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

Treat other the way you want

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 20:11 नवीन
Treat other the way you want to be treated. सरळ अर्थ आहे. अधिकार वैगेरे काही नाही. जसे लोकांनी तुमच्याशी वागावे असे तुम्हास वाटते तसे तुम्ही इतरांशी वागा. मांडणी चुकते त्यामुळे घोळ होतो. इथे 'लोकांनी तुमच्याशी कसे वागावे' हा परिणाम साधण्यासाठी 'आपण कसे वागावे' हे कारण नाही. तर आपण इतरांशी कसे वागावे? ह्या प्रश्नाचं ते उत्तर आहे. आपण इतरांशी असेच वागावे जसे इतरांनी आपल्याशी वागावे असे आपणास वाटते. यात 'इतरांनी तुमच्याशी कसे वागावे' हे आपल्या वागण्यातून सूचित करणे अपेक्षित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

'इतरांनी तुमच्याशी कसे वागावे

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 20:16 नवीन
'इतरांनी तुमच्याशी कसे वागावे' हे आपल्या वागण्यातून सूचित करणे अपेक्षित नाही.
करेक्ट आपण मुद्यावर येउ लागलो आहोत. मला वादासाठी वाद अथव शब्दछ्चल करण्यात रस नाही. मला इतकेच म्हणायचे आहे मी ( अथवा एखादा व्यक्ती) कसा वागतो याच्यावर ना माझे नियंत्रण आहे ना माझ्या आचार विचारांचे.... एकदा हे वास्तव मान्य झाले की.. मग की.. मग (वादासाठी) पुढे येतो तो कर्माचा सिध्दांत :) बरेच लोक आपले आचरण व इतरांची वागणूक आणी कर्माचा सिध्दांत याची सॉलीड गल्लत करतात पण सध्याची चर्चा वर उल्लेखिलेला सुवर्ण-नियम पुरेसा (अप्लाय) नाही हे अध्यारुत होण्याइतपत मर्यादीत ठेउया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अध्यात्म हा अनुभूती नसणार्

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 20:39 नवीन
अध्यात्म हा अनुभूती नसणार्‍यांसाठी शब्द्च्छलच आहे. तर अनुभूती ही प्रचंड वैयक्तिक बाब असल्याने त्यावर चर्चाही शक्य नाही. एक योग्य गुरू शोधून त्याच्याद्वारे ज्ञानप्राप्तीचा मार्ग शोधणे हेच योग्य. आंतरजालीय संस्थळांवर अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. तुमची इच्छा असो वा नसो तो केवळ वाद-शब्दच्छलच असेल. ज्ञान कदापि नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

तुमची इच्छा असो वा नसो तो

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 21:50 नवीन
तुमची इच्छा असो वा नसो तो केवळ वाद-शब्दच्छलच असेल. ज्ञान कदापि नाही.
मी माझी इछ्चाच प्रकट केली आहे. त्याचे स्वरुप कोणाला काय भासत आहे याचे ज्ञान मागितले नाही. म्हणूनच आपले प्रतिसाद हे ज्ञानरुप नसुन फक्त शब्दछ्चल आहे हे माहीत असुनही मी चर्चेतील माझा भाव प्रकट केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

उल्का काय, जगदंबा काय,

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 22:52 नवीन
उल्का काय, जगदंबा काय, परब्र्हम काय, येशू ख्रिस्त काय, गोल्डन रूल काय, एकाच प्रतिसादात एवढे स्ग्ळे असंबद्ध लिहून धाग्याशी सूतराम संबंध नसलेला वाद उकरून काढून शब्दच्छल करायचा नाही असे म्हणून परत तीच इच्छा आहे असे सांगणे हे हिशोब करण्यास बसलेल्या व्यक्तीचे लक्षण वाटते असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

प्रतिसाद कुठे गेला?

तर्राट जोकर
Tue, 10/06/2015 - 09:34 नवीन
प्रतिसाद कुठे गेला? "....धाग्याशी सूतराम संबंध नसलेला कर्मसिद्धांताचा वाद उकरून काढून..." अस होतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

उल्का काय, जगदंबा काय,

द-बाहुबली
Tue, 10/06/2015 - 11:22 नवीन
उल्का काय, जगदंबा काय, परब्र्हम काय, येशू ख्रिस्त काय, गोल्डन रूल
हे सर्व मी न्हवे धागाकर्त्याने लिहलेल्या पॅरेग्राफमधे आलेले शब्द आहेत जो पमी मुळ धाग्यातुन जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला आहे. पण आपण मुळ धागाच वाचला नसल्याने ते शब्द माझे नाहीत याची आपल्याला जाणीवच नाही. तेंव्हा आपली वैयक्तीक मते प्रकट केल्यास त्यातु आपले अज्ञान व उतावीळपणाच उघडा पडला आहे.
"....धाग्याशी सूतराम संबंध नसलेला कर्मसिद्धांताचा वाद उकरून काढून..."
मराठी वाचता येतं ना ? मग मी कर्म सिध्दांतावर चर्चा टाळुया म्हटलेले लक्षात आलेच असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 18:57 नवीन
>>>>>अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? हो ! दुसरं कोणाची इच्छा चालते पृथ्वीवर ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

आता तरी बास करा!!!

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 19:28 नवीन
आता तरी बास करा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>अचानक पृथ्वीवर एखादी

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 20:24 नवीन
>>>>>अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय?
हा मला पडलेला प्रश्न नाही.
हो ! दुसरं कोणाची इच्छा चालते पृथ्वीवर ?
मला वाटतय आपण विषयाची खिल्ली उड्वत आहात. माझा हा समज चुकीचा असल्यास अवश्य दुरुस्ती करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथे थोडी गल्लत वाटते आहे

सटक
Mon, 10/05/2015 - 18:47 नवीन
इथे थोडी गल्लत वाटते आहे म्हणून लिहितो.... संपादकही प्रतिसाद उडवू शकतात लिहिण्यापासून थांबवू नाही शकत...control is an illusion! अधिकार ही तुम्ही समजताय तशी absolute गोष्ट नाही...अन्यथा शिक्षा या कृतीची गरजच (वरील उदाहरणात संपादन) पडायला नको! अधिकार मानण्यावर अवलंबून आहे.. अध्यात्मातील logical reversal हेच आहे की तुम्ही माना अथवा नका मानू "तो" आहेच..यत्र, तत्र, सर्वत्र, अनादी, अनंत! यामुळेच शास्त्रीय दृष्ट्या देवाचे अस्तित्व नाकारणे असंभव आहे.. राहता राहिला वागणुकीचा प्रश्न...त्यात तुम्ही एका सुवर्ण नियम पाळणार्‍याची तुलना एका न पाळण्यार्‍याशी करु पहात आहात...Apples and Oranges!! बाकी इथे अजूनही बरेच आहेत माझ्यापेक्षा योग्य प्रतिसाद देणारे... चू. भू. माफ असावी!
  • Log in or register to post comments

रोचक विवेचन आहे.

द-बाहुबली
Mon, 10/05/2015 - 19:15 नवीन
संपादकही प्रतिसाद उडवू शकतात लिहिण्यापासून थांबवू नाही शकत...control is an illusion!
संपादक कोणत्यासही प्रतिसाद लिहण्यापासुन थांबवु शकतात हे द्रुपलचे (ज्याधारे हे संस्थळ विकसीत केल्या आहे)वैज्ञानीक सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक

मला वाटले तुम्ही तुम्हाला नको

सटक
Mon, 10/05/2015 - 20:07 नवीन
मला वाटले तुम्ही तुम्हाला नको असलेले प्रतिसाद देणार्‍यांबद्दल बोलत आहात..एखाद्याला सरसकट थांबवणे शक्य आहेच..एखद्या विषयावर तुम्हाला नको असणारा प्रतिसाद तो द्यायच्या आधीच थांबवता येतो असे तुम्ही म्हणताय का? कारण त्यात तो प्रतिसाद नको असलेला असण्याची आधीच झालेली खातरजमा अभिप्रेत आहे...आणि ते तसे तुम्ही जरी ठरवलेत, तरी तुम्हाला तो मिळालेला असेलच...त्याशिवाय कसे ठरवणार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

च्यायला काय चाललं राव हे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 18:54 नवीन
तंत्रमार्गाने उर्फ़ रात्रिसूक्त म्हटल्याने मी प्राध्यापकाचा प्राचार्य किती दिवसात होऊ शकतो ? आणि कोणत्या महाविद्यालयात होऊ शकतो ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काय प्राडॉ? तुम्ही पण?

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 19:01 नवीन
काय प्राडॉ? तुम्ही पण? उत्तरे आहेत शून्य आणि कोणत्याही नाही. प्रयत्नांशिवाय काहीही शक्य होणार नाही पण काहीजणांना मनवी प्रयत्नांबरोबर देवता माझ्या पाठीशी आहे हा विचार/ विश्वास एक मानसिक बळ देतो, आयुष्य सकारात्मक बनवतो. काय हरकत आहे? टिंगल उडवायलाच हवी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद ताई!!! बाकी मी असा

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 19:04 नवीन
धन्यवाद ताई!!! बाकी मी असा कुठलाही दावा केला नसताना त्यांचे हे प्रतिसाद पाहून त्यांची प्राडाॅ ही पदवी एक टिंगल वाटू लागल्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

माफ करा! पण तुम्ही सं.मं. वर

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 19:11 नवीन
माफ करा! पण तुम्ही सं.मं. वर आहात. आणि तुम्हीच एक असे लेखन ज्यात कुणाचा अपमान नाही, कोणती जाहिरातबाजी नाही, कोणतेही चमत्कारांचे दावे नाहीत, केवळ फक्त एका प्राचीन संस्कृत स्तोत्राचे भाषांतर आहे, असे लेखन मी प्रसिद्ध होऊच देणार नाही अशा राणा भीमदेवी गर्जना करीत सुरंगी ताईंच्या धाग्यापासून थेट इथे आलात. नक्की म्हणायचंय काय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

प्राडॉची बांधिलकी आधुनिक विचारांशी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:24 नवीन
प्रा.डॉला असल्या तंत्रामंत्रावर अजिबात विश्वास नाही. आपलं लेखन माहिती म्हणुन वाचेल मी आणि वाचलंही आहे. आपल्या लेखनाचा मी आदर करतो. पण अशा मंत्रातंत्रामुळे आपलं आयुष्य बदलुन जाईल असं कोणी (तुम्ही नै) स्वप्न पाहात असेल तर त्यांना जागं केलं पाहिजे असे माझे मत आहे. म्हणुनच मी आपल्या लेखाबद्दल एक अवाक्षरही वाईट लिहिलेलं नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

"त्यांची प्राडाॅ ही पदवी एक

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/05/2015 - 19:30 नवीन
"त्यांची प्राडाॅ ही पदवी एक टिंगल वाटू लागल्ये. " त्यांनी तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाची वैयक्तिक टीका केलेली नाहीये. त्यांची मतं तुम्हाला (आणि त्यांना तुमची मतं) पटावीतच असं नाही, पटतीलच असं नाही. पण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर इतक्या पटकन घसरायची काय गरज आहे? अत्यंत चुकीचे वागणे आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

चलता है बिका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:37 नवीन
छोडो. महानतंत्र विद्येचे आद्य जालगुरु माननिय परासेठ म्हणायचं तुम्ही एकदा जाल खिडकीत बसलात की लोक कशावरुनही तुम्हाला शुकशुक करु शकतात. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तंत्रमार्गाने उर्फ़

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 19:38 नवीन
तंत्रमार्गाने उर्फ़ रात्रिसूक्त म्हटल्याने मी प्राध्यापकाचा प्राचार्य किती दिवसात होऊ शकतो ? आणि कोणत्या महाविद्यालयात होऊ शकतो ? हा दावा मी कुठे केलाय सांगा की मग? आणि देवीच्या मूर्तीविषयी त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्याविषयी काय सांगतात मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मला असं वाटलं की-

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:45 नवीन
रात्रिसुक्त म्हटल्याने काही प्रगती होते की काय असे वाटल्याने मी तसं विचारलं. माझं तसं विचारणं चुक आहे असं लेखन दोनदा तिनदा वाचल्याने माझं थोडं थोडं लक्षात आलं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

तुमचा वाद चालू दे. पण तुम्ही

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/05/2015 - 21:31 नवीन
तुमचा वाद चालू दे. पण तुम्ही वैयक्तिक स्तरावर उतरलात म्हणून बोलणे भाग पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

कोण करतंय टींगल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:22 नवीन
>>>> प्रयत्नांशिवाय काहीही शक्य होणार नाही. १०० टक्के सहमत. >>>> काहीजणांना मानवी प्रयत्नांबरोबर देवता माझ्या पाठीशी आहे हा विचार/ विश्वास एक मानसिक बळ देतो, हेही एक वेळा मान्य. पण, असल्या मंत्र तंत्रांनी कोणतंही पाठबळ लाभत नसतं. उलट माणुस त्याच भरवशावर जास्त राह्यला लागतो. यावरुन आठवण झाली. नाथपंथाच्या अगोदर तांत्रिक साधनेचं असंच पेव आठव्या नवव्या शतकात फुटलं होतं. गोरक्षनाथ नावाचे एक महान योगी सर्व भारतभर तांत्रिक साधनेच्या मागे लागलेल्या साधुंना या तांत्रिक वामाचारी मार्गापासून परावृत्त करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं होतं. याच गोरक्षनाथांनी मच्छिंद्राचीसुद्धा योगिनीच्या जाळ्यातून मुक्तता केली होती. गोरक्षनाथांच्या अंगी प्रज्ञा, मौलिक चिंतन, निष्कलंक चारित्र्य लोककल्याणाची तळमळ हे गुण उपजतच होते. असा समाज उभार करायचा की तंत्र मंत्र यावर विश्वास राहील असा समाज उभा राहीला पाहिजे. सांगायचं असं की असल्या गोष्टी थोतांड असतात आणि आपल्या डोक्यात एकदा की त्या भिनल्या त्यातून मग बाहेर पडता येत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आपले प्रयत्न सोडून मंत्र

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 20:29 नवीन
आपले प्रयत्न सोडून मंत्र तंत्र ह्यामागे लागावं हा माझ्या म्हणण्याचा अजिबात उद्देश नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन एक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:03 नवीन
>>>>>>सप्तशृंगी देवीची मूर्ती काहीतरी लक्षपूर्वक ऐकत असल्यासारखी दिसते. अजिबात तसं काही वाटत नै. हं आता भक्तिभावाने पाहिल्यास देवी आपल्याकडे पाहते आहे, आपल्याशी संवाद साधते आहे, देवी आपले सर्व संकट दूर करेल अशा अविर्भावात आशीर्वाद देत आहे असे काहीही वाटू शकते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे देवा! सप्तशृंगी मातेची

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 19:15 नवीन
अरे देवा! सप्तशृंगी मातेची मूर्ती तरी नीट पाहीलेत का? एक कान हातावर ठेवून मनुष्य लांबचं ऐकू पाहतो तशी मूर्ती घडवलेली आहे. आंजावर सर्च तरी मारा! यात चमत्कार कसला? मूर्तीकेरानंच मूर्ती तशी घडवलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:30 नवीन
>>>> अरे देवा! सप्तशृंगी मातेची मूर्ती तरी नीट पाहीलेत का ? खुप वेळा पाहिली आहे. जवळ जवळ दहा वेळा किंवा अधिक वेळा तरी. मला देवीचे डोळे पाहुन ती देवी नेहमी घाबरलेली, डचकलेली, थोडी टेन्शनमधे असल्यासारखीच वाटली आहे. (सर्व भक्तांची माझ्या मताबद्दल क्षमा मागतो) खुपच डोळे वटारुन कोणाला दमात घेत आहे अशीच वाटली आहे. मुर्तीकाराला तिच्यात प्रसन्नता भरता आली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. देवी आणि देवाला पाहुन मन कसं प्रसन्न झालं पाहिजे. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

देवीचा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:31 नवीन
दुवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत!

अजया
Mon, 10/05/2015 - 19:09 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments

मला या प्राचीन स्तोत्राचा जो

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 19:24 नवीन
मला या प्राचीन स्तोत्राचा जो गहन,आध्यात्मिक अर्थ आहे, त्यावर वाचकांनी चर्चा करणं अपेक्षित आहे. माझ्याही विवेचनात कुणाला काही योग्य-अयोग्य आढळून आल्यास तसे सुचवावे. मला यातून सप्तशती या ग्रंथाच्या खर्‍या रहस्याचा शोध घ्यावयाचा आहे. तुमचे विवेचनही नक्कीच मांडावे.
  • Log in or register to post comments

हं हे मान्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 19:33 नवीन
>>>> मला या प्राचीन स्तोत्राचा जो गहन,आध्यात्मिक अर्थ आहे, त्यावर वाचकांनी चर्चा करणं अपेक्षित आहे हं मग ठीक आहे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मग असे अगोदरच सांगायचे होतेत

बॅटमॅन
Mon, 10/05/2015 - 19:49 नवीन
मग असे अगोदरच सांगायचे होतेत की. उगीच लोकांनी मेगाबायटी विवेचने करेपर्यंत कशाला वाट पाहिलीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मला माझ्या वाचनातून,

असंका
Mon, 10/05/2015 - 20:22 नवीन
मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद. तरी डिस्क्लेमर

बॅटमॅन
Mon, 10/05/2015 - 20:39 नवीन
धन्यवाद. तरी डिस्क्लेमर स्पष्ट शब्दांत टाकला असता तर ही वेळच आली नसती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सप्तशती सातवाहन कालीन आहे.

जेपी
Mon, 10/05/2015 - 20:34 नवीन
सप्तशती सातवाहन कालीन आहे. असे आयकुन आहे. खखो.. वल्लीदा जाणे..
  • Log in or register to post comments

ती गाथा सप्तशती...

सूड
Mon, 10/05/2015 - 20:39 नवीन
ती गाथा सप्तशती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

काय हे जेपी. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 20:47 नवीन
=)) वर उल्लेख येतोय तो सप्तशती म्हणजे सप्तश्लोक. दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 20:50 नवीन
दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत) >> सातशे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

७०० श्लोक व १३ अध्याय आहेत

मांत्रिक
Mon, 10/05/2015 - 20:57 नवीन
७०० श्लोक व १३ अध्याय आहेत मूळ ग्रंथात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 21:17 नवीन
आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत

सूड
Mon, 10/05/2015 - 22:59 नवीन
दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत)
"कॅफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका" हा म्हैस मधला डायलॉग आठवला!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सातच श्लोक आहेत. (स्मॉल व्हर्जन)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/06/2015 - 07:31 नवीन
ॐ अथ सप्तश्लोकी दुर्गा (सप्तशती) शिव उवाच – देवी त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी । कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं त्रूहि यत्नतः ।। देव्युवाच – श्रृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनम् । मया तवैव स्नेहेनाप्यम्बास्तुतिः प्रकाश्यते ।। ॐ अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य नारायण ऋषि: अनुष्टुप् छ्न्द: श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यो देवता: श्री दुर्गा प्रीत्यर्थे सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग: । ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।। दुर्गे स्मृता हरसिभीतिमशेष जन्तो: स्वस्थै: स्मृता मति मतीव शुभां ददासि दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।। सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।। शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।। रोगान शेषा नपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलान भीष्टान् । त्वामाश्रितानां न विपन् नराणां त्वामाश्रिता ह्या श्रयतां प्रयान्ति ।।६।। सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि एकमेव त्वया कार्यमस्मद् वैरि विनाशनं ।।७।। इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम्पूर्णा ।। (जालावरुन साभार) बाकी, कॅफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका आणि म्हैस मधील डायलॉग आम्हाला माहिती नाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा