✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टीव्ही वरची धूळ

स — समीर_happy go lucky, Sun, 10/04/2015 - 10:11
टीव्ही वरची धूळ नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या अन त्या रोजच्या भांडणात आमच भांडण विरलं तीच वाढत वजन आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली अन आमच भांडण विरलं फिरायला जाऊया म्हणे गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली नेहमीचं भांडणाला कारण बनलं अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला त्या क्षीण प्रकाशात आमच भांडण विरलं आमच्या भांडणाच सदाहरित कारण तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट पुन्हा एकदा कारण बनल पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं तिचा नि माझा स्वयंपाक घरातला प्रवेश दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक त्यांनी सगळीकडे धाबे काढले त्या प्लान मध्ये आमचं भांडण विरलं -समीर

प्रतिक्रिया द्या
4701 वाचन

💬 प्रतिसाद (26)

च्यायला कुठला कुठला माल डंप

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 12:12 नवीन
च्यायला कुठला कुठला माल डंप व्हायलाय कोण जाणे. द्या प्रोत्साहन अजून नवलेखकांना. . मस्त हो भऊ अप्रतिम लिहिलेय जबरदस्त एकच नंबर
  • Log in or register to post comments

तुच का रे तो भ्रूणहत्या

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 12:16 नवीन
तुच का रे तो भ्रूणहत्या कर्णारा छुपा संपादक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

डिमोशन करु नकोस सांगितले ना.

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 12:17 नवीन
डिमोशन करु नकोस सांगितले ना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 12:21 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छे छे, आपला अभ्या टोप्या

दमामि
Sun, 10/04/2015 - 12:19 नवीन
छे छे, आपला अभ्या टोप्या घालतो (नवकवींना).:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टोप्या नाय रे...टी-शर्ट :)

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 12:22 नवीन
टोप्या नाय रे...टी-शर्ट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

दमामि, तुम्ही खास माझ्यासाठी

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 12:23 नवीन
दमामि, तुम्ही खास माझ्यासाठी कविता लिहिलीत. इस खुशीमें अगले टीशर्ट के पार्ट मे आपको २ शर्ट. सिर्फ आपको ये मौका मिल रहा है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अरे वा!!! धन्यवाद हो!

दमामि
Sun, 10/04/2015 - 12:45 नवीन
अरे वा!!! धन्यवाद हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रोत्साहण रे मेल्या

सस्नेह
Sun, 10/04/2015 - 12:37 नवीन
प्रोत्साहण रे मेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

च्यामायला खातरजमा न करता

समीर_happy go lucky
Sun, 10/04/2015 - 18:47 नवीन
च्यामायला खातरजमा न करता फक्त तोंड वाजवणे म्हणजे पुरुषार्थ असे लोक का समजतात कोण जाणे!!! हि वेगळी आहे जी तुम्ही बघितली ती वेगळी असेल मला असा माझ्या नावाने माल खपवण्याची कधी गरज आजपर्यंत वाटली नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शांत गदादारी भीम . शांत .

अद्द्या
Sun, 10/04/2015 - 20:47 नवीन
शांत गदादारी भीम . शांत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खिक्क

दमामि
Mon, 10/05/2015 - 07:34 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

समीर्भाऊ, खूप प्रयत्न करूनही

आदूबाळ
Sun, 10/04/2015 - 17:18 नवीन
समीर्भाऊ, खूप प्रयत्न करूनही कवितेसारखं वाचायला जमलं नाही. जरा रेकार्डिंग टाकता का?
  • Log in or register to post comments

शुभ बोल रे.. ही म्हण ऐकून तरी

यशोधरा
Sun, 10/04/2015 - 17:20 नवीन
शुभ बोल रे.. ही म्हण ऐकून तरी म्हायती आहे का नाय हो? नस्त्या आयड्या देताय ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

=))

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 17:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आधी मला आमंत्रण दाखवा मी

समीर_happy go lucky
Sun, 10/04/2015 - 18:49 नवीन
आधी मला आमंत्रण दाखवा मी पाठवलेले कि "प्लीज ब्वा माझी कविता वाचाच" हे तुम्हाला कधी मिळाले? मग बघेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ओपन फोरम वर तुम्ही काहीही

अद्द्या
Sun, 10/04/2015 - 20:46 नवीन
ओपन फोरम वर तुम्ही काहीही टाकलं कि ते आमंत्रण च असतं . असो . चांगली कविता हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

तुम्ही लोकांनी वाचावी म्हणून

आदूबाळ
Sun, 10/04/2015 - 20:55 नवीन
तुम्ही लोकांनी वाचावी म्हणून मिपावर कविता टाकली असावी असा माझा ग्रह झाला. कविता + आमंत्रण अशी सिस्टिम असल्याचं ठाऊक नव्हतं. क्षमा असावी. बाकी आमंत्रित लोकांचे प्रतिसाद कुठे वाचायला मिळतील? की त्यासाठी शेप्रेट आमंत्रण लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

समीर भौ, मस्त लिहिलंय.

प्यारे१
Sun, 10/04/2015 - 19:09 नवीन
समीर भौ, मस्त लिहिलंय. आवडलं आपल्याला.
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 19:57 नवीन
+१ अत्यंत सुंदर काव्य. शृंगारमिश्रित मिश्किल कवितेत तरल भावना अगदी फळाफळा उतरल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

"फ़ळाफ़ळा" या द्वयर्थीउपमेसाठी

समीर_happy go lucky
Sun, 10/04/2015 - 20:02 नवीन
"फ़ळाफ़ळा" या द्वयर्थीउपमेसाठी विशेष आभार पण वाचल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

आवडली

पैसा
Sun, 10/04/2015 - 20:37 नवीन
कविता आवडली. पण नवी कविता जरा थांबून थांबून टाका. नाहीतर लोकांना कन्फ्युज व्हायला होतं.
  • Log in or register to post comments

राजे!!! जे सांगायचं ते पोचलं!

मांत्रिक
Sun, 10/04/2015 - 20:45 नवीन
राजे!!! जे सांगायचं ते पोचलं!!! थोडंसं अजून मेहनत घ्या!!! नक्कीच आवडेल मिपाकरांना!!! काही त्रुटी आहेत त्या दुरूस्त करा हे हक्काने सांगेन. मी पण एक नवीन मिपाकर आहे म्हणून!!! बाकी थोडंसं लेखनात अंतर ठेवा. अतिपरिचयादवज्ञा!!!
  • Log in or register to post comments

च्छ्या.....

नाखु
Mon, 10/05/2015 - 09:16 नवीन
एक मिपाकर म्हणून : निषेध .. नवसाहित्य उन्मेषी लेखकांना प्रोत्साहन (भत्ता) द्यायचा सोडून त्यांचे मानसीक्+वैचारीक खच्चीकरण करून

मिपाला एक साहित्यसूर्याला मुकण्याचे जे पाप करीत आहात त्याबद्दल तीव्र त्रीवार (+रवीवार) निषेध .

आमचाच एक जुना(ट) प्रीतीसाद इथे चोप(डा) पेस्त(वा) करीत आहोत. फक्त या वेळेला पदावर नवीण नेमणूक केली आहे इशारा... नाद खुळा - Sat, 28/02/2015 - 14:54 नवौन्मेषी साहित्यकांना भाकड प्रतिसादप्रभूंचा आणि मिपा लेखकूंचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या प्रतिसादप्रभूंचा, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर घराच्या उंबर्यापासून उसगावापर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) सवंग लोकप्रियतेची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे काढे नवौन्मेषी साहित्यकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही नवौन्मेषी साहित्यकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना दोन साहित्यप्रसवात (हो साहित्यच उगा गैरसमज नको) योग्य अंतर ठेवायला सांगतो , दुसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना अर्थपूर्ण आणी अ-पाल्हाळीक लिहायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना प्रतिसादावर चिंतन आणि जमले तरच मनन करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे नवौन्मेषी साहित्यक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने नवौन्मेषी साहित्यकांना ते वापरायचा प्रयत्न केल्यास नवौन्मेषी साहित्यकंची उर्मी आणि उर्जा दबली जाते. (त्या दबलेल्या साहित्याचा सर्वांनाच त्रास होतो ते वेगळे) त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली क्षुब्ध नवकविता टंकली पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. साहित्य स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. नवौन्मेषी साहित्यकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त नवौन्मेषी साहित्यक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. नवौन्मेषी साहित्यक स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त नवौन्मेषी साहित्यकाचे धाग्यावरून उठा. तुम्ही साहित्यकाचे धाग्यावरून उठलात तर नवौन्मेषी साहित्यक स्वतःच स्वतःचा (बहिर्गमनाचा) मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही. सुमार बालक चिट(क्)वणीस भुसभसा भुस्काट साहित्याचा भरमार साठा

नवौन्मेषी साहित्यकांच्या हिताची आभासी काळजी घेणारी एक्मेव संघटना

  • Log in or register to post comments

=))

पैसा
Mon, 10/05/2015 - 09:57 नवीन
फक्त उंटावरचा 'शहाणा' या जमातीबद्दल बोलून 'शहाणी' या प्रजातीला अनुल्लेखाने टाळल्याबद्दल समस्त उंट आणि शहाण्यांतर्फे नाखुंचा तीव्र णिशेढ. याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली. जाहीर निशेधाची सभा आणि मोर्चा लकडी पुलावर आयोजित केला आहे. पूस्प्गूच घेऊन येणेचे करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 09:22 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा