✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फॉल कलर्स

श
श्रीरंग_जोशी यांनी
Tue, 09/29/2015 - 09:02  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, अमेरिकेत आल्यावर निसर्गाची मला सर्वाधिक आवडणारी किमया म्हणजे फॉल (पानगळ) सीझनमधली रंगाची मुक्त उधळण. गेल्या काही वर्षात मी माझ्या कामचलाउ छायाचित्रण कौशल्याने जे काही दृश्यानुभव टिपू शकलो ते आज इथे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. माझा हा प्रयत्न कृपया गोड मानून घ्या. फोटोज मोठ्या आकारमानामध्ये पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे. अमेरिकेत नवा असताना बरोबरच्या मित्रांनी ऑरगन राज्यातली फॉल कलर्स पाहण्याचा बेत आखून सर्व बुकींग केले. आमच्या दुर्दैवाने त्या वर्षी फॉल कलर्स अंमळ उशीराने सुरू झाले व प्रत्यक्ष फारसे काही पाहायला मिळू शकले नाही. एका ठिकाणी जरा वाळकी पाने दिसली त्यापैकी एक पान कारच्या बॉनेटवर ठेवून फोटो काढला. माझ्या हापिसच्या इमारतीमागच्या परिसरातले काही फोटोज पुढचे दोन फोटोज मेपल ग्रोव्ह मिनेसोटा येथील राइस लेकच्या परिसरातले. वुडबरी मिनेसोटा मधला एक गोल्फकोर्स फॉल कलर्सने नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरापासून लांबवर डोंगराळ भागात जावे लागते. आमच्या शहरापासून चार साडेचार तासांच्या अंतरावर ल्युटसन माउंटेन्स हे ठिकाण आहे. फॉल कलर्सचा तीन चार आठवड्यांच्या जो कालावधी असतो त्यात दोन तीन दिवस जेव्हा नारिंगी रंग दिसतो तो सर्वोत्तम काळ असतो. चाकरमान्यांचे सुदैव असेल तर तो शनिवार रविवारी येतो. अन्यथा दोन विकांतांच्या दरम्यान संपून जातो. तसेच आभाळी वातावरणही रसभंग करते. एके वर्षी गुरुवार व शुक्रवारी झालेल्या वादळामुळे अधिक वाळलेली नारिंगी रंगाची पाने उडून गेली अन तेव्हा शनिवारी आम्हाला दिसलेले ल्युटसन माउंटेन्स येथील फॉल कलर्स. त्याच्या पुढल्या वर्षी नेमके शनिवार पर्यंत नारिंगी रंगाची पाने नाहीशी होऊन गडद तांबडा रंग दिसू लागला. नागरी वस्तीच्या परिसरातही एखादे सुंदर झाड दिसते. मेपल ग्रोव मिनेसोटा येथील वीव्हर लेकच्या परिसरातले एका संध्याकाळचे हे दृश्य. सेंट पॉल मिनेसोटा येथील कॅपिटॉल ग्राउंड्सच्या परिसरातल्या काही फोटोजने समारोप करतो.  पाच दिवसांपूर्वीच उत्तर अमेरिकेतला फॉल सीझन सुरु झालेला आहे. उत्तर अमेरिकेतल्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी काढलेले फॉल कलर्सचे फोटोज या धाग्यावर किंवा स्वतंत्र धाग्याच्या स्वरुपात प्रकाशित करावे. पुढच्या काही आठवड्यांत मला संधी मिळाली तर मी देखील नवे फोटो काढून इथे प्रकाशित करीन. अवांतरः आमच्या राज्याचे मॅप बेस्ड फॉल कॅलेंडर.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11068 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

वा!!! अप्रतीम फोटो!!

संजय पाटिल
Tue, 09/29/2015 - 09:07 नवीन
वा!!! अप्रतीम फोटो!!
  • Log in or register to post comments

गोल्फकोर्स भन्नाट.

कोमल
Tue, 09/29/2015 - 09:25 नवीन
गोल्फकोर्स भन्नाट. फोटू आवडेश.
  • Log in or register to post comments

माझ्या मोबाइलवर सर्व फोटो लोड

एस
Tue, 09/29/2015 - 09:25 नवीन
माझ्या मोबाइलवर सर्व फोटो लोड व्हायला एक दिवसतरी लागेल. तूर्तास फक्त प्रतिसाद दिल्याची नोंद देऊन ठेवतो.
  • Log in or register to post comments

सु्ंदर फोटो

मित्रहो
Tue, 09/29/2015 - 09:30 नवीन
फोटो छान आहेत
  • Log in or register to post comments

गरेट!

खेडूत
Tue, 09/29/2015 - 09:46 नवीन
गरेट! या असल्या वातावरणाचं नेहेमीच अप्रूप वाटत आलंय. अनेक वर्षे विदेशात प्रवास केला, पण अमेरिका राहिलीच. आता टूरिस्ट म्हणून नक्की येईन.
  • Log in or register to post comments

बापरे..

ब़जरबट्टू
Tue, 09/29/2015 - 09:57 नवीन
किती सुन्दर फ़ोटो.. हे सर्व खरच असते,, आतापर्यंत फ़ोटो एडिटींग वाटायचे.. अप्रतिम आहे.. प्रत्येक फ़ोटो वालपेपर आहे..
  • Log in or register to post comments

वा जोशीकाका! काय नशीबवान आहात

मांत्रिक
Tue, 09/29/2015 - 10:20 नवीन
वा जोशीकाका! काय नशीबवान आहात! अप्रतिम फोटो!
  • Log in or register to post comments

सुरेख

सर्वसाक्षी
Tue, 09/29/2015 - 10:57 नवीन
सुंदर चित्रं. एक विनंती. शेवटुन तिसर्‍या चित्राच्या स्थळाला आणखी दहा पंधरा दिवसांनी अवश्य भेट द्या आणि हेच चित्र टिपा, खाली लाल नारिंगी पानांनी झाकलेली हिरवळ फार छान दिसेल.
  • Log in or register to post comments

वॉव...मस्तं.

पद्मावति
Tue, 09/29/2015 - 11:06 नवीन
वॉव...मस्तं. राइस लेकही फारच सुंदर दिसतोय, आरश्यासारखा.
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Tue, 09/29/2015 - 11:09 नवीन
मस्त... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Ashai Mugam" ft. Vidya Vandana :- Shankar Tucker
  • Log in or register to post comments

काय सुंदर आहेत सर्वच फोटो

अजया
Tue, 09/29/2015 - 11:14 नवीन
काय सुंदर आहेत सर्वच फोटो.प्रत्यक्ष बघणे म्हणजे आनंदसोहळाच असेल!
  • Log in or register to post comments

+१ अप्रतिम फोटो

इशा१२३
Wed, 09/30/2015 - 18:31 नवीन
+१ अप्रतिम फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

+१ अप्रतिम फोटो

इशा१२३
Wed, 09/30/2015 - 18:31 नवीन
+१ अप्रतिम फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

निसर्गाची रंगपंचमी आहे ही तर...

नीलमोहर
Tue, 09/29/2015 - 11:22 नवीन
केशरी, लाल, पिवळा, हिरवा, अबोली, प्रत्येक रंगाच्या किती त्या वेगवेगळ्या छटा आहेत, नशीबवान आहात खरंच !!
  • Log in or register to post comments

अल झक्कास

बाबा योगिराज
Tue, 09/29/2015 - 11:28 नवीन
भेष्ट.
  • Log in or register to post comments

आणखी काही

तिमा
Tue, 09/29/2015 - 11:39 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वॉsssssव!!!! नेत्रसुखद!

अनिता ठाकूर
Tue, 09/29/2015 - 11:46 नवीन
वॉsssssव!!!! नेत्रसुखद! नयनरम्य!!
  • Log in or register to post comments

सुंदर!!

मधुरा देशपांडे
Tue, 09/29/2015 - 12:57 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

सुंदर !

सस्नेह
Tue, 09/29/2015 - 13:04 नवीन
फारच रम्य परिसरात राहता बॉ तुम्ही !
  • Log in or register to post comments

सास्काच्वेन

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 09/29/2015 - 13:41 नवीन
हा आमच्या रजायनामधील फॉल सीझनचा फोटो Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी

श्रीरंग_जोशी
Tue, 09/29/2015 - 20:31 नवीन
सर्व वाचकांना व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद. फॉल कलर्स प्रत्यक्ष पाहायला मिळणे ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. मला अशी संधी दर वर्षी मिळते यासाठी मी नशिबाचे आभार मानतो. खेडूत - अमेरिकेला अवश्य भेट द्या. सर्वसाक्षी - हो, नक्की प्रयत्न करीन त्या ठिकाणी यंदाचा फॉल भरात असताना जाण्याचा. तिमा - दोन्ही फोटोज न्रेत्रसुखद आहेत. नेमके ठिकाण कोणते? राजेंद्र मेहेंदळे - वाह, तुम्ही वर टाकलेला कॅनडातला हा फोटो अप्रतिम आहे. या धाग्यावर यापुढे येणार्‍या फॉल कलर्सच्या फोटोजची प्रतीक्षा आहे. संपादकांना विनंती - या प्रतिसादातला फोटो मूळ प्रतिसादात टाकावा व रुंदी ही प्रमाणात आणावी.
  • Log in or register to post comments

ठिकाण

तिमा
Wed, 09/30/2015 - 16:57 नवीन
तिमा - दोन्ही फोटोज न्रेत्रसुखद आहेत. नेमके ठिकाण कोणते? न्यू इंग्लंड हाय ते! आम्ही बोस्टनहून गेलो होतो, २००९ साली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

छानच

श्रीरंग_जोशी
Wed, 09/30/2015 - 19:49 नवीन
न्यू इंग्लंड या बाबतीत एकदम श्रीमंत प्रदेश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हाय हाय! मोहोब्बतें शिणुमाची

आदूबाळ
Tue, 09/29/2015 - 20:43 नवीन
हाय हाय! मोहोब्बतें शिणुमाची आठवण होऊन डोले पाणाव्ले...
  • Log in or register to post comments

वाह मस्तच , छान प्रकाशचिञणे

कविता१९७८
Tue, 09/29/2015 - 21:16 नवीन
वाह मस्तच , छान प्रकाशचिञणे
  • Log in or register to post comments

मस्त पिक्स

Jack_Bauer
Tue, 09/29/2015 - 21:34 नवीन
श्रीरंग, छान आहेत पिक्स. न्यूयॉर्क च्या जवळ fall colors साठी काही ठिकाणे माहित असतील तर कृपया सुचवशील का?
  • Log in or register to post comments

न्यु हॅम्पशर

श्रीरंग_जोशी
Tue, 09/29/2015 - 22:06 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे फॉल कलर्सचा आस्वाद घेण्यासाठी न्यु हॅम्पशर राज्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. New Hampshire Foliage Tracker परंतु जवळ जवळ सर्वच राज्यांत (अर्थात दक्षिणेकडली सोडून) आपल्या तारखा जुळून आल्यास ऐन भरातले फॉल कलर्स पाहायला मिळतात. न्यु यॉर्क राज्यात नायागरा व बफेलो सोडल्यास कुठे फिरलो नाहीये. जालावर शोधले असता हे काही उपयुक्त दुवे मिळाले.
  • New York Fall Foliage Report
  • New England Foliage Map
  • New York Foliage
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer

वाहव्वा..... केवळ नेत्रसुख..

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 22:33 नवीन
वाहव्वा..... केवळ नेत्रसुख.. पण मला मात्र पाण्याजवळ असलेलेच सगळे फोटो जास्त भावले.
  • Log in or register to post comments

एकाहून एक वरचढ फोटो पाहून

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/30/2015 - 02:13 नवीन
एकाहून एक वरचढ फोटो पाहून डोळे निवले !!! तिमा आणि राजेंद्र मेहेंदळे यांचेही फोटो अप्रतिम आहेत !!!
  • Log in or register to post comments

आमच्याकडे अजून म्हणावे असे

रेवती
Wed, 09/30/2015 - 02:27 नवीन
आमच्याकडे अजून म्हणावे असे रंग सुरु झाले नाहीयेत. आज एक झाड किंचित गुलाबी दिसतय. जरा रंगपंचमी सुरु झाली की फोटू देते.
  • Log in or register to post comments

कल्पक आणि समयोचित धागा, पंत.

स्रुजा
Wed, 09/30/2015 - 07:24 नवीन
कल्पक आणि समयोचित धागा, पंत. तुमचे आणि प्रतिसादात आलेले फोटो छान आहेत. हा माँट्रीअल चा एकः Image removed. पानगळ व्हर्माँट : Image removed. Image removed. गॅटिनो पार्कः Image removed. व्हर्माँटः Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वाह

श्रीरंग_जोशी
Wed, 09/30/2015 - 08:10 नवीन
वाह, क्या बात हैं!! हे फोटोज तर स्वतंत्र धाग्यासाठी उपयुक्त होते (आहेत) :-) . अगोदरच्या प्रतिसादात एक लिहायचे राहून गेले. बरेचदा शहरातही हायवेशेजारच्या टेकड्यांच्या उतारावर अप्रतिम फॉल कलर्स दिसतात. परंतु त्या ठिकाणी पोचून फोटोज काढणे शक्य नसते. रस्त्याने जाता येता ते दृश्य जमेल तेवढे डोळ्यांत साठवून घ्यावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

मस्तं फोटो. एक आणि तीन नंबरचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/13/2015 - 06:44 नवीन
मस्तं फोटो. एक आणि तीन नंबरचा भयानक आवडण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

वा वा वा ! डोळे निवले फोटो

मितान
Wed, 09/30/2015 - 08:18 नवीन
वा वा वा ! डोळे निवले फोटो बघून :)
  • Log in or register to post comments

असेच म्हण्तो

सुबोध खरे
Wed, 09/30/2015 - 11:57 नवीन
असेच म्हण्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

खुप सुंदर रंगांची उधळण.

जागु
Wed, 09/30/2015 - 12:01 नवीन
खुप सुंदर रंगांची उधळण.
  • Log in or register to post comments

सुंदर..

लाल टोपी
Wed, 09/30/2015 - 13:53 नवीन
रंगाजी, रंगांची सुरेख उधळण आवडली.
  • Log in or register to post comments

झाडांची संख्या

कपिलमुनी
Wed, 09/30/2015 - 20:01 नवीन
तिथे असलेली भरपूर झाडे हा कौतुकाचा विषय आहे. एवढ्या संख्येने झाडे असल्याने फॉल कलर छान दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर!! सगळेच फोटो आवडले.

सानिकास्वप्निल
Wed, 09/30/2015 - 21:04 नवीन
सुंदर!! सगळेच फोटो आवडले. विविध रंगछटा पाहून मन प्रसन्न झाले :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

कवितानागेश
Wed, 09/30/2015 - 21:26 नवीन
अप्रतिम !
  • Log in or register to post comments

किती सुंदर! एकदा पहायलाचं हवे

रातराणी
Fri, 10/02/2015 - 23:44 नवीन
किती सुंदर! एकदा पहायलाचं हवे फॉल कलर्स!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
गुरुवार, 10/08/2015 - 11:22 नवीन
फारच सुंदर! इतरांचे फोटोही खूप सुंदर आलेत! पानगळती म्हणजे उदासवाणा ऋतु खरे तर! पण एवढा रंगीत, सुंदर असेल तर बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

हा धागा कस काय सुटला ? असो एक

पियुशा
गुरुवार, 10/08/2015 - 11:30 नवीन
हा धागा कस काय सुटला ? असो एक नम्बर फोटो आहेत सगळे अजुन्ही भर घाला :)
  • Log in or register to post comments

(No subject)

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सर्व चित्रे व्हाईट माउंटन

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:36 नवीन
सर्व चित्रे व्हाईट माउंटन नॅशनल फॉरेस्ट.
  • Log in or register to post comments

रंगाण्णा फोटो खुप सुंदर आलेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/13/2015 - 06:43 नवीन
रंगाण्णा फोटो खुप सुंदर आलेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा