✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फॉल कलर्स

श
श्रीरंग_जोशी यांनी
Tue, 09/29/2015 - 09:02  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, अमेरिकेत आल्यावर निसर्गाची मला सर्वाधिक आवडणारी किमया म्हणजे फॉल (पानगळ) सीझनमधली रंगाची मुक्त उधळण. गेल्या काही वर्षात मी माझ्या कामचलाउ छायाचित्रण कौशल्याने जे काही दृश्यानुभव टिपू शकलो ते आज इथे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. माझा हा प्रयत्न कृपया गोड मानून घ्या. फोटोज मोठ्या आकारमानामध्ये पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे. अमेरिकेत नवा असताना बरोबरच्या मित्रांनी ऑरगन राज्यातली फॉल कलर्स पाहण्याचा बेत आखून सर्व बुकींग केले. आमच्या दुर्दैवाने त्या वर्षी फॉल कलर्स अंमळ उशीराने सुरू झाले व प्रत्यक्ष फारसे काही पाहायला मिळू शकले नाही. एका ठिकाणी जरा वाळकी पाने दिसली त्यापैकी एक पान कारच्या बॉनेटवर ठेवून फोटो काढला. माझ्या हापिसच्या इमारतीमागच्या परिसरातले काही फोटोज पुढचे दोन फोटोज मेपल ग्रोव्ह मिनेसोटा येथील राइस लेकच्या परिसरातले. वुडबरी मिनेसोटा मधला एक गोल्फकोर्स फॉल कलर्सने नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरापासून लांबवर डोंगराळ भागात जावे लागते. आमच्या शहरापासून चार साडेचार तासांच्या अंतरावर ल्युटसन माउंटेन्स हे ठिकाण आहे. फॉल कलर्सचा तीन चार आठवड्यांच्या जो कालावधी असतो त्यात दोन तीन दिवस जेव्हा नारिंगी रंग दिसतो तो सर्वोत्तम काळ असतो. चाकरमान्यांचे सुदैव असेल तर तो शनिवार रविवारी येतो. अन्यथा दोन विकांतांच्या दरम्यान संपून जातो. तसेच आभाळी वातावरणही रसभंग करते. एके वर्षी गुरुवार व शुक्रवारी झालेल्या वादळामुळे अधिक वाळलेली नारिंगी रंगाची पाने उडून गेली अन तेव्हा शनिवारी आम्हाला दिसलेले ल्युटसन माउंटेन्स येथील फॉल कलर्स. त्याच्या पुढल्या वर्षी नेमके शनिवार पर्यंत नारिंगी रंगाची पाने नाहीशी होऊन गडद तांबडा रंग दिसू लागला. नागरी वस्तीच्या परिसरातही एखादे सुंदर झाड दिसते. मेपल ग्रोव मिनेसोटा येथील वीव्हर लेकच्या परिसरातले एका संध्याकाळचे हे दृश्य. सेंट पॉल मिनेसोटा येथील कॅपिटॉल ग्राउंड्सच्या परिसरातल्या काही फोटोजने समारोप करतो.  पाच दिवसांपूर्वीच उत्तर अमेरिकेतला फॉल सीझन सुरु झालेला आहे. उत्तर अमेरिकेतल्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी काढलेले फॉल कलर्सचे फोटोज या धाग्यावर किंवा स्वतंत्र धाग्याच्या स्वरुपात प्रकाशित करावे. पुढच्या काही आठवड्यांत मला संधी मिळाली तर मी देखील नवे फोटो काढून इथे प्रकाशित करीन. अवांतरः आमच्या राज्याचे मॅप बेस्ड फॉल कॅलेंडर.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11068 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

(No subject)

रेवती
Tue, 10/13/2015 - 06:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वा,

चित्रगुप्त
Tue, 10/13/2015 - 07:00 नवीन
वा, खूपच छान फोटो. नुक्तेच नव-हंप-शहरातील मा-ऊंट वास-हिंग-तन पर्वतराजीत पानगळीचे रंग बघून आलो.
  • Log in or register to post comments

रेवतीतै सुंदर आहेत फोटोज

श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 07:54 नवीन
रेवतीतै सुंदर आहेत फोटोज. नयनरम्य ठिकाणे आहेत तुमच्या अवतीभवती. फॉल कलर्सचा आस्वाद घेण्यासाठी नेमके कुठे जावे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. आमच्याही शहरात यंदा फॉल कलर्स छान रंगत आहेत. हापिसच्या खिडकीतून दिसणारे हे दृश्य Image removed. हापिससमोरचा रस्ता Image removed. हापिसातून घरी जाताना एका गल्लीतले हे झाड. वीजेचा खांब नेमका मध्ये येतोय. Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

जे.जे.
Tue, 10/13/2015 - 08:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दुव्याची दुरुस्ती

श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 08:05 नवीन
जे.जे. साहेब अप्रतिम फोटो आहे. तुम्ही पिकासा पेजचा दुवा वापरला आहे. त्याऐवजी त्या चित्राचा दुवा वापरायला हवा. संपादकांना विनंती आहे की वरचा प्रतिसाद संपादित करून हा दुवा जोडावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.जे.

धन्यवाद

जे.जे.
Tue, 10/13/2015 - 08:17 नवीन
धन्यवाद योग्य दुवा सुचवल्या आणि दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

एक व्हिडिओ प्रयत्न

श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 08:12 नवीन
लेखात विव्हर लेकचा एक फोटो आहे. त्याशेजारच्या गल्लीत फोन कॅमेर्‍याने काढलेला हा व्हिडिओ.
  • Log in or register to post comments

मौसम रंगीबेरंगी!

अजया
Tue, 10/13/2015 - 08:35 नवीन
रेवती,श्रीरंग अगदी नेत्रसुखद फोटो.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर फोटो श्री..

खटपट्या
Tue, 10/13/2015 - 09:45 नवीन
खूप सुंदर फोटो श्री..
  • Log in or register to post comments

खूप सुंदर फोटोज श्रीरंग,

प्रीत-मोहर
Tue, 10/13/2015 - 15:13 नवीन
खूप सुंदर फोटोज श्रीरंग, रेवाक्का आणि स्रुज. डोळे निवले अगदी
  • Log in or register to post comments

सॉलिड

इन कम
Tue, 10/13/2015 - 19:11 नवीन
सगळे फोटो मस्त आहेत.नयनरम्य उष्ण रंगसंगती
  • Log in or register to post comments

रंगाभाऊ,रेवाक्का मस्त मेजवानी

नूतन सावंत
Wed, 10/14/2015 - 17:56 नवीन
रंगाभाऊ,रेवाक्का मस्त मेजवानी.
  • Log in or register to post comments

आणखी काही निसर्ग रंग

इडली डोसा
Wed, 10/14/2015 - 21:21 नवीन
ईन्डीयानातील ब्राउन कौंटी Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अजुन एक

इडली डोसा
Wed, 10/14/2015 - 21:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

स्वर्गीय सौंदर्य

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 10/15/2015 - 20:16 नवीन
हे फोटोज खूपच आवडले. प्रत्यक्ष फोटो पाहून इतकं भारावल्यासारखं वाटतय की प्रत्यक्षात जी अनुभूती मिळत असेल ती स्वर्गीयच म्हणायला हवी. माझ्या दुर्दैवाने अमेरिकेत इतकी वर्षे राहूनही एकदाही दोन दिवसांची रजा काढून निवांतपणे फॉल कलर्स नारिंगी असताना शहरापासून लांबवरच्या निसर्गाच्या सानिध्यात घालवता आले नाहीत. भविष्यात ठरवून हे करणार हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

घरा जवळच आहे

इडली डोसा
Sat, 10/17/2015 - 08:12 नवीन
हे स्टेट पार्क आमच्या गावाजवळच आहे त्यामुळे वरचेवर चक्कर मारता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाह ! सुरेख !! हा रंग

स्रुजा
Wed, 10/14/2015 - 21:48 नवीन
वाह ! सुरेख !! हा रंग अप्रतिम दिसतो फॉल कलर्स मध्ये.
  • Log in or register to post comments

सुरेख रंग इडली डोसा.

रेवती
Wed, 10/14/2015 - 22:04 नवीन
सुरेख रंग इडली डोसा.
  • Log in or register to post comments

एक्सलंट !

सौन्दर्य
गुरुवार, 10/15/2015 - 00:05 नवीन
सर्वच फोटो एकापेक्षा एक सरस असे आहेत. मी ह्यूस्टनला (टेक्सास स्टेट) राहतो, इथे इतके विविध रंग बघायला मिळत नाहीत, कारण थंडीच फारशी नसते. संधी मिळाल्यास अमेरिकेच्या उत्तर भागाचा फेरफटका मारण्याची इच्छा आहे. श्रीरंग, इतक्या चांगल्या पोस्ट बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो मस्त....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/15/2015 - 08:30 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

काय फोटो आहेत आहाहाहाहा!!!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/15/2015 - 14:45 नवीन
काय फोटो आहेत आहाहाहाहा!!!! हुकलं हो माझं थोडक्यात.... असो.. वापस कभी फॉलमे हामेरिका जायेंगे तो और भी देखेंगे!!
  • Log in or register to post comments

पुनश्च धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 10/16/2015 - 09:39 नवीन
सर्व वाचकांचे, प्रोत्साहन देणार्‍या प्रतिसादकांचे तसेच एकाहून एक फोटोज टाकून या धाग्याला प्रेक्षणीय बनवणार्‍यांचे पुनश्च धन्यवाद. आज माझ्या हापिसच्या परिसरात काढलेला हा एक फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/17/2015 - 01:30 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अतिशय सुंदर

फारएन्ड
Sat, 10/17/2015 - 07:07 नवीन
अतिशय सुंदर फोटो आहेत. जबरी!
  • Log in or register to post comments

माझे पण काही.......

किल्लेदार
Sat, 10/17/2015 - 09:12 नवीन
अल्गॉन्॑॑क्विन पार्क, कॅनडा Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अजून काही....

किल्लेदार
Sat, 10/17/2015 - 18:53 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अरे वा ! अल्गाँक्विन याही

स्रुजा
Sat, 10/17/2015 - 20:47 नवीन
अरे वा ! अल्गाँक्विन याही वर्षी समर ला हुकलं , पण तुमचे फोटो बघुन चुटपुट वाढते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

क्विन्सटाऊन, न्युझिलंड

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/17/2015 - 20:33 नवीन
क्विन्सटाऊन, न्युझिलंड Image removed.
  • Log in or register to post comments

ब्ल्यू माऊंटन्स (ऑस्ट्रेलिया)

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/17/2015 - 20:39 नवीन
ब्ल्यू माऊंटन्स (ऑस्ट्रेलिया) कडे जाणारा रस्ता... Image removed.
  • Log in or register to post comments

वाह

श्रीरंग_जोशी
Mon, 10/19/2015 - 22:29 नवीन
किल्लेदार व डॉ. म्हात्रे यांनी टाकलेले नवे फोटोजही नेत्रसुखद आहेत. हा एक फोटो ६ नोव्हेंबर २०१३ रोजी काढलेला आहे. त्या दिवशी मोसमातला पहिला दखल घेण्याजोगा हिमवर्षाव झाला होता. खरं तर नोव्हेंबर सुरु होण्यापूर्वीच पानगळ पूर्ण होऊन (रंग बदलणारी) झाडे निष्पर्ण झालेली असतात. पण एखादे झाड इतरांपेक्षा मंद गतीने बदलत असते. तसेच हे एक झाड, इतरांच्या काड्या झालेल्या असतानाही याची पाने अजून पिवळीच (त्यानंतर नारिंगी व गदड लाल होणे अपेक्षित). Image removed. दोन ऋतूंच्या खुणा स्पष्टपणे एकत्रित पाहायला मिळणे हा तसा दुर्मिळ योग :-) .
  • Log in or register to post comments

वा!

जुइ
Mon, 10/19/2015 - 23:43 नवीन
डोळ्यांचे पारणे फिटले! एक से एक फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा