Skip to main content

तिला काट्यात घर सापडले

लेखक सिध्दार्थ यांनी रविवार, 27/09/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
तिला काट्यात घर सापडले बाभळ तिथे गवसतो म्हणे... गिधाडांची काळी ज्वाला सतत असतो लचक्याचा घाला.... तिचा आत्मा गुहेत अडकून राहिला काळ सरून देऊळ पडून गेला... तिने हाती मग फुल उजळले त्यात आत्मीक अत्तर गवसले… सोडविना तो गंध नेई चंद्रापलीकडे तेथे असतो राणा सांगती सगळे…. ती निघाली लाटेच्या हाकेवरती जो घेऊन गेला कमळ डोईवरती… तिच्यात आला निघून काळ आडोश्याला पाझर फुटला चंद्र माखला आज वसुंधरेला…
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1107
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काही ओळी लक्षवेधी आहेत. पण एकूण कविता कशाबदल आहे वगैरे नीटसे कळले नाही.