Skip to main content

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

लेखक संदीप ताम्हनकर यांनी शुक्रवार, 25/09/2015 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले. सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल. हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल. धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील. १. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी. २. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा - जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन, ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके, हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी. ३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे. ४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार. ५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी. (सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल) संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.

वाचने 30658
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

TJ साहेब लष्करात सर्वांचा रंगीतच चष्मा असतो आणि ते रंग फक्त तिरंग्याचे असतात आणि मध्ये अशोक चक्र हि असते. फक्त भगवा किंवा हिरवा नसतो. तेथे सर्वाना एकच न्याय असतो. तो काय असतो हे मी मिपावर बर्याच ठिकाणी लिहिले आहे. आपणाला शोधायची तसदी घ्यायची असेल तर शोधा. तुम्हाला कशात मौज वाटते ते तुम्ही पहा. एकाक्ष झाल्याने फक्त कोणत्याही विषयाची खोली लक्षात येत नाही किंवा त्रिमिती समजत नाही. बाकी आमचा पास आहेच त्याचे कौतुक कुणीहि का करावे? मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी.

In reply to by तर्राट जोकर

लष्कराची "आठवण" करून द्यायची आपल्याला गरज नाही. आयुष्याची २३ सोनेरी वर्षे मी लष्करात काढलेली आहेत. तेथे एकच न्याय सर्वाना आहे. मुसलमान असलात तरी आपल्याला चारच काय दोन लग्ने करायची परवानगी नाही. आपल्याला दाढी वाढवायची परवानगी नाही. नौदलात दाढी वाढवण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते( कारण आज वाटले दाढी ठेवली आणी उद्या काढली असे चालत नाही. ओळख पत्रावरील फोटो बदलावा लागतो). तेथे मशिदिवरच काय पण मंदिरावरही बोम्बल्या( लाउड स्पीकर लावण्याची परवानगी नाही). आपला धर्म आपल्या घरातच ठेवावा लागतो.शाकाहारी हिंदू किंवा जैन असेल तरीही तुम्हाला कर्तव्याचा भाग म्हणून मांस हाताळावे लागेल असे लिहून द्यावे लागते. तेथे कधीही अशी धार्मिक भांडणे होत नाहीत. अकारविल्हे असल्याने माझा सहभागी साडे पाच वर्षे (माजीद) खान होता. असो. लष्करात धर्मांधाना किंवा निधर्मांधाना थारा नाही. आणी असेच सिव्हील आयुष्यात असावे असे मला ठामपणे वाटते. मग आपण त्याला रंगीत म्हणा किंवा रंगान्ध्ता म्हणा इति लेखनसीमा.

In reply to by सुबोध खरे

बापरे या गोष्टी माहीतच नव्हत्या.
असेच सिव्हील आयुष्यात असावे असे मला ठामपणे वाटते.
+१००

In reply to by सुबोध खरे

चला तर तुम्ही आता सिविल आयुष्यात आहात याची तरी आठवण करून द्यावी. तर लष्करी कायदे व त्याचे उपयोग, औचित्य लष्कराच्या अखत्यारीत. तिथल्या प्रत्येक अटी-शर्ती-कायद्याला योग्य असे उपयुक्त कारण आहे. कुणाला सहज वाटले म्हणून तिथले नियम बनत नसतील. पण कुणाची कितीही वैयक्तिक हुकुमशाहीची इच्छा असली तरी सर्व देश लष्करी कायद्याप्रमाणे चालणार नाही कारण इथे लोकशाही आहे. इथे आपआपले रंग उधळायला सर्वांना सूट आहे जोवर हे रंग आपल्यालाच त्रासदायक ठरत नाहीत. कोल्हापूरच्या गणेशमंडळांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने डीजेबंदी केली. कारण स्वतःलाच त्रास होतो हे लक्षात आले म्हणून. असो. निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी जनतेत परत आल्यावर 'प्रहार'च्या नानाच्या भूमिकेत राहून उपयोग नाही. तरी माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सातत्याने टाळत आहात ते का समजले नाही. भारतातल्या तेरा टक्के मुस्लिमांनी बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला तर ऐंशी टक्के हिंदूंच्या नेमक्या कुठल्या संवैधानिक हक्कांवर गदा येते? हा माझा मूळ प्रश्न तुमच्या नो-एन्ट्रीच्या उदाहरणासाठी.

In reply to by तर्राट जोकर

मी माझ्याच अगोदर दिलेल्या प्रतिसादातील वाक्ये आपल्या निरीक्षणासाठी परत आपल्यापुढे ठेवत आहे. पटत असेल तर घ्या नाही तर सोडून द्या. जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने लोक आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो. दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे? आपले म्हणणे--- बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला. याने काहीच फरक पडत नाही कारण हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि त्यात कोणीही दखल देऊ नये याबद्दल दुमत नाही. पण "चार बायका ठेवल्या"--- बायकाना आपण गायी आणि बकरे यांच्या पातळीवर आणत आहात याची खंत वाटते. मुस्लिम वैयक्तिक कायद्यात स्त्रियांची काय परिस्थिती आहे हे आपण जाणता. एकदा धार्मिक बाबतीत "कोणालाच"(यात न्यायालये सुद्धा आली) दखल देता येणार नाही असे म्हटले कि त्यात सुधारणा करण्याचा मार्गच खुंटला. ५० टक्के लोकसंख्येला श्रुन्खलात बंदिस्त करून एखाद्या समाजाची प्रगती कशी साधता येणार? आणि समाजाच्या एका घटकाची प्रगती खुंटली असेल तर राष्ट्राची पण प्रगती खुंटते. हे विचार उदात्त आणि अव्यावहारिक आहेत असे आपले म्हणणे असेल तर काय बोलावे? शिवाय तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे? त्यांचे त्यांनी बघून घ्यावे. असे असेल तर मग --एखाद्या शेतकर्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. आपण मी काय म्हणतो यावर विचार करून पहा. राहिली गोष्ट प्रहार मधील नाना पाटेकर ची उपमा देण्याची. आपल्याला माझ्याबद्दल किती माहिती आहे? तशी नसताना आपण या पातळीवर उतरला याबद्दल काय म्हणणे? संवाद व्यक्तिगत पातळीवर आला नसता तर बरे झाले असते असे वाटते. असो आपली मते आपल्यापाशी.

त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
बाबा रे संदीपा, समजा तू सुचवलेले बदल भागवतांनी,संघाने स्वीकारले व देशातल्या नागरिकांना आवाहन केले तर लोक ऐकतील का? की वागळे,सरदेसाई पुन्हा 'व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी' म्हणणार? म्हणजे गंगेत निर्माल्य टाकू नये असे संघाने सुचवले तर किती पत्रकार व लोक ते ऐकतील? सरकार असो वा संघटना , धार्मिक चालीरिती ह्या हळूहळू मर्यादित स्वरूपातच बदलाव्या लागतात असे ह्यांचे मत.

अधिकांश लोकांना संघ आणि त्याच्या कामांबाबत माहित नाही. संघाचे स्वयंसेवक सुरवातीपासूनच अंधविश्वास इत्यादींवर विश्वास ठेवीत नाही. सकारात्मक रीतीने अंधविश्वास निर्मूलाचे जेवढे कार्य संघाने केले आहे तेवढे कार्य इतरांनी कधीच केले नाही. बाकी केवळ चर्चा, सेमिनार इत्यादी करतात.

>>हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =))

In reply to by नितिन थत्ते

हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =)) हे लिहीणारा आणि सनातन प्रभातचे दुवे देणारा (पक्षी: जाहीराती करणारा) आयडी, हा परात्पर गुरू डॉ. आठवले यांचा ड्युप्लिकेट आयडी तर नसावा ना असे सनातन प्रभातची आर एस एस बद्दलची मते माहीत असल्याने वाटू लागले आहे.... =))

मोहन भागवत ह्यांनी आव्हान केले आहे आदेश दिलेला नाही आता ब्रह्मवृदांची दावे उजवे सगळे मिळून काय शास्त्रीय व काय असाष्ट्रीय त्याची एक यादी बनवला माझ्यापुरते हे तत्व मी कधीच अंमलात आणले आहे , तातायारावंचे विचार काही अंशी तरी आता जनमानसात रुजतील अशी एक आशा करतो , डोंबिवली मधील स्मशानात विद्युत वाहिनी आहे तिच्याबद्दल बोंबाबोंब झालेली ऐकवत नाही मात्र असे काशी वाराणसी येथे सक्तीने लागू केल्यास गहजब होईल तेव्हा अनेक रूढी व परंपरा ह्यांच्यातील अश्या अनके अनावश्यक रूढी लोकजागृती करून समाजातून हद्द पदर कराव्यात काही ठिकाणी सरकारने कायद्याने हस्तषेप करावा , जशी सतीची चाल साहेबाने बंद केली .

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद शेट विद्यूत दाहिनी न येऊ देण्याची कारणे "वेगळी"असतात. आमचे सासरे CSIR मध्ये शास्त्रज्ञ होते. ते एल पी जी वर चालणारी विद्युतदाहिनी विना नफा तत्वावर बसवून देतात.लातूर महापालिकेच्या क्षेत्रात अशी वाहिनी बसविण्यासाठी त्यांना पाचारण केले. परंतु प्रत्यक्षात तेथे गेल्यावर आमच्या धर्मावर गदा येते असे राजकारण केले. तेथे कांग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत आहे. पण अंदरकी बात तेथे स्मशानात लाकडे पुरवणारा कान्ग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याच्या धन्द्यावर टाच येते. "अडचणीत सापडले कि धर्म आठवतो" या उक्ती प्रमाणे आमच्या सासर्यांना ते काम करू दिले नाही. शेवटी धर्म हा निधर्माचे गोडवे गाणारे लोकांच्याही कामाला येतोच कि. त्यांनी लातुरलाच ग्यासची शवदाहिनी बसवली पण ती मारवाडी समाजाची खाजगी आहे. आणि तेथे जास्त लोक जातात असे ऐकून आहे. हीच कहाणी इतर बर्याच ठिकाणी आहे. त्यांनी पनवेल महापलिकेच्या शवदाहीनीत अशी दोन उपकरणे बसविली आहेत. त्यामध्ये एका माणसाचे शव जाळण्यासाठी एका सिलिंडरचा खर्च येतो. या सिलिंडरला सरकारी सबसिडी मिळावी असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. याठिकाणी गरीब माणसाला ८०० रुपयात अंत्यसंस्कार करता येतात.ते ४५० रुपयात काम होईल. तेवढेही पैसे नसतील तर पनवेलचा रोटरी क्लब तेही पैसे पुरवतो. शिवाय धूर नाही घाण नाही आणि पर्यावरणाची हानी हि नाही. तेंव्हा मुद्दा लक्षात घ्या.

"प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते ", अहो, इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, स्पेस रिसर्च इ. विसरलात की!. तसंच modern apllied enginnering आणि टेक्नोलॉजी शी संबंधित पाण्याखालील जोडकाम ( वेल्डिंग ), पाण्याखालील रासायनिक रंगकाम इ. गोशी पण आहेत. अजून सांगू का?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

तर काय ....मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे काय त्यासाठी अभ्यास थोडाच करावा लागतो? अजून काही concept फेकायच्या असल्या तर सांगा. टाकू आपण.

In reply to by दत्ता जोशी

मोहन भागवतांचं सोडा हो. ते संघाचे म्हणजेच पुराणमतवादी, खोटारडे, दांभिक, प्रतिगामी, संकुचित विचारांचे, जातीयवादी इ. इ. पण पद्मभूषण पुरस्कार मिळालेले इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर काय म्हणतात ते पहा. http://www.firstpost.com/living/aryabhatta-discovered-gravity-newton-sa… One of the country's leading scientists and former ISRO chairman G Madhavan Nair today propounded the theory that some shlokas in the Vedas mentioned about presence of water on the moon and astronomy experts like Aryabhatta knew about gravitational force much before Issac Newton. The 71-year-old Padma Vibhushan awardee said the Indian vedas and ancient scriptures also had information on metallurgy, algebra, astronomy, maths, architecture and astrology way before the western world knew about them. peaking at an international conference on Vedas, he however, added that the information in vedas was in a "condensed format" which made it difficult for the modern science to accept it. "Some sholkas in one of the Vedas say that there is water on the moon but no one believed it. Through our Chandrayaan mission, we could establish that and we were the first ones to find that out," Nair said, adding that everything in Vedas could not be understood as they were in chaste Sanskrit. He also talked very highly about fifth century astronomer- mathematician Aryabhatta saying, "We are really proud that Aryabhatta and Bhaskara have done extensive work on planetary work and exploration of outer planets. It was one of the challenging fields. "Even for Chandrayaan, the equation of Aryabhatta was used. Even the (knowledge of) gravitational field... Newton found it some 1500 years later... the knowledge existing (in our scriptures)," he said. Nair, who was ISRO chairman from 2003 09, also claimed geometry was used to make calculations for building cities during the Harappan civilisation and the Pythagorean theorem also existed since the vedic period.

In reply to by अमृतेश सराफ

पण डोळ्यावर आणि बुद्धीवर पिवळे पण चढलेल्या काही लोकांना ते दिसत नाहीत ना! ते संदर्भ वाचायला लागतात. विकी आणि आंजावर अनेक paper आहेत, संदर्भ आहेत. जे verified आहेत. ४थ्या शतकापासून भारतात बनत असलेले wootz स्टील बनवण्याचे प्रयत्न आजही जगभरात सुरु आहेत. याची माहिती सहज उपलब्ध आहे. दिल्लीचा न गन्ज्णारा खांब अजूनही न गंजता सुमारे १६०० वर्षांपासून उभा आहे. गणितातील भारतीय गणितज्ञांच्या कार्य बद्दल माहिती https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics वरपाहायला मिळेल. आपल्याच गणितज्ञांनी या गोष्टी जगासमोर आणली आहेत. अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे आणि ते भारतीयांनीच करायचे आहे. सुरवात तर काही दशकांपासून झाली आहे अजून बर्याच गोष्टी हळूहळू समोर येतील अर्थात त्याला वेळ लागेल. काही लोक आपल्या डोळ्यावरचा चष्मा ना काढता वाद करत राहणारच पण निंदकाचे घर असावे शेजारी या उक्ती प्रमाणे त्यांचे स्वागतच आहे. गाईच्या शेणाविषयी: १९८६ साली चेर्नोबिल येथे झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या अणु अपघातानंतर एक धक्कादायक बाब समोर आली होती - पूर्व युरोपात सगळी जमीन अन्नधान्य, चार, गुरे, दुध दुभते radioactive झाले असताना एका सक्तीच्या सरकारी तपासणीत ऑस्ट्रिया येथील एक फार्म वरील दुध आणि चार्यात धोकादायक पातळीपेक्षा कमी radioactivity सापडली होती . Karin Heschl नावाच्या बाईंचे ते फार्म होते. सरकारी अधिकाऱ्यांनी यामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फार्म वर केरिन बाई सूर्योदय आणि सूर्यास्ताला न चुकता अग्निहोत्र करीत होत्या इतकाच त्यांच्या आणि इतर फार्म ( जिथे दुध आणि चाऱ्याची radioactivity धोकादायक पातळीवर होती ) मध्ये फरक होता हे समोर आले. पण अर्थात मेडीयात त्याची जास्ती वाच्यता झाली नाही. पण अग्निहोत्र आणि गोमया विषयी त्या भागात बरीच चर्चा झाली. चेर्नोबिलच्या बाजूच्या सोविएट रशियाच्या सर्व लोकांनी आपापल्या घरांच्या भिंती गोमयाने सारवल्या होत्या अशी नोंद आहे. केरिन बाई अजूनही जगभर अग्निहोत्राच प्रचार आणि प्रसार करत आहेत. अर्थात याविषयी जास्ती बोलायला कोणी तयार नाही. आन्जावर याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. आता हे जर खरे असेल तर यावर अधिक संशोधन व्हावे लागेल आणि ते संशोधन आपणच करणे आणि छातीठोकपणे जगासमोर आणणे क्रमप्राप्त आहे.

In reply to by श्रीगुरुजी

त्येच तर मी म्हणतोय श्रीगुरुजी , आमच्याकडे वेदातल्या ज्ञानाची फारच उपेक्षा झाली आहे.त्यात हे पुरोगामी लोक वेदांवर टिका करायला आघाडीवर. calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे, फक्त ती सांकेतीक स्वरुपात आहे, म्हणजे बघा हा कसे, एका झाडावर दहा पक्षी बसले आहेत, तिथे एक पारधी आला, त्याने तिथे फटाका फोडला ,तर झाडावर कीती पक्षी शिल्लक राहतील?????? आता हे उदाहरण जरी बाळबोध वाटले तरी या उदाहरणात मागाल ते शास्त्र आहे , काय समजलात?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

झाड म्हणजे मिसळपाव. पक्षी म्हणजे आयडी. पारधी म्हणजे अ‍ॅडमिन. ... उडतो आता.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

"calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे" आहेच. आणि गुप्त सांकेतिक वगैरे काही नाही. फक्त आपल्याला माहिती नाही म्हणजे तसे नाहीच हि वृत्ती सोडून स्वयंघोषित विद्वानांनी डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे. https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

फुलबॉटल डबियस, तुझ्यासारख्या पारध्याने तुझ्यासारखेच कितीही सादळलेले आणि फुसके फटाके फोडले तरी नुसती वात जळून जाईल. पण आवाज होणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि धूरही येणार नाही. त्यामुळे झाडावरचे सगळे पक्षी शिल्लक राहतील.

एष ढर्म: टन्नाटन: टनाटन फ्राय डर्म की ज्जय! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

एष ढर्म: टन्नाटन:
हे इतकं दिव्य संस्कृत वाचून डोळे पाणावले. हे बळंच की धर्मसुधारणेचाच एक भाग?

मोहन भागवतांना अधुन मधून पुडी सोडायचा नाद लागलेला आहे, पण जे काही मत मांडलं आहे त्याचं ब्वा मी स्वागत करतो. बोलणे आणि वर्तन यात सारखेपणा यावा व संघाचा आधुनिक विचाराकडे पावलं पडावीत यासाठी संघाला मी शुभेच्छा देतो. -दिलीप बिरुटे

मुख्य विषय बाजूलाच राहिला. हिंदू धर्मातील वाईट प्रथा आणि रूढी या पुर्ण सोडल्याच पाहिजेत. हे त्यांचे म्हणणे आहे पण उगीच विषयांतर केले गेले आहे. आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- काय गम्मत आहे बघा - आज एकही सेलेब्रिटी आला नाही ईद कशी साजरी करावी हे सांगायला. आज एकही पर्यावरणवादी आला नाही रक्तविरहित ईद साजरी करा असं सांगायला. एकही प्राणी प्रेमी आला नाही कापल्या जाणाऱ्या करोडो बकऱ्यांविषयी कणव व्यक्त करायला. ईद चा 'खरा अर्थ' काय आहे हे सांगायला एकही बुद्धिवादी आला नाही. आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. पण कसे येणार म्हणा, आपण तर भारतात राहतो ना. त्यामुळे फक्त रक्षाबंधन, वटपौर्णिमा, दिवाळी, गणपती, मकर संक्रांत, पाडवा हे उत्सव कसे साजरे करावेत हेच आपल्याला शिकवलं जाणार.

In reply to by दत्ता जोशी

>>> आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो. जबरी पोस्ट! >>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. बादवे, बकरी ईदसाठी ज्या घटनेचा संदर्भ दिला जातो ती घटना महंमदाच्या काळात १४०० वर्षांपूर्वी घडलेली नसून त्यापूर्वी अनेक शतके घडलेली आहे असे मुस्लिम सांगतात. ज्या काळात फक्त हिब्रू (ज्यू) धर्म होता व ख्रिश्चन व मुस्लिम धर्म जन्माला आले नव्हते त्या काळातील ही घटना आहे असे सांगितले जाते.

In reply to by दत्ता जोशी

दत्ता जोशी, तुम्हाला बकरी ईद दिवशी दालच्याची दावत मिळाली नाही म्हणुन मुसलमानांना काहून हो टार्गेट करता.????

In reply to by दत्ता जोशी

>>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. व्याख्या - ज्याला/जिला अगदी दूरच्या अंतरावरून हिंदूंच्या डोळ्यातील कुसळ दिसते आणि अगदी जवळून सुद्धा इतर धर्मियांच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही त्यालाच/तिलाच "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" असे म्हणतात.

In reply to by दत्ता जोशी

दुर्दैवाने हा धागा उशिरा उघडला त्यामुळे खुपच उशिरा प्रतिसाद देतोय. अंनिस ने इतर धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दलची आपली भुमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय. परंतु तरीही काही सनातनी लोक मुद्दाम असा प्रचार करुन बुद्धीभेद करतात आणि काही फेक्युलर लोकही हिंदूंवर टोकाची टिका करुन सर्वसामान्य हिंदूधर्माभिमानी लोकांच्या मनात किंतु निर्माण करतात. आपण अशा दोन्ही प्रवृत्तींपासून दूर राहिले पाहिजे. या वर्षी बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक समाजाने बकरी कापण्याऐवजी रक्तदान करा (त्यागाचे प्रतिक म्हणून) असा उपक्रम राबवला होता. अंनिसने त्याला सक्रिय पाठिंबा दिला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यात रक्तदान केले. आपण अशा उपक्रमांना उत्तेजन दिले पाहिजे. अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये. वरील प्रतिसाद केवळ अनिसचा हितचिंतक या नात्याने दिलेला आहे.

In reply to by गुलाम

या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! काही स्वयंघोषीत हिंदूधर्मरक्षक ह्या धाग्यावर असाच उच्छाद मांडत आहेत. त्यांना सणसणीत चपराक आहे हा प्रतिसाद.

In reply to by गुलाम

ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय.
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो. म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.

In reply to by सूड

याचे उत्तर यॉर्कर यांनी खाली दिले आहे. प्रश्न गट्सचा नाही, औचित्याचा आहे. उद्या क्रिश्चनांनी हिंदूंमधल्या अंधश्रद्धांबद्दल अंनिससारखे काम हाती घेतले तर हिंदूंची काय प्रतिक्रिया असेल याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? इतर धर्मिय कट्टर आहे म्हणून अंनिसची फाटते असा गोड गैरसमज असणार्‍यांनी अंनिस एखाद्याची खरोखर फाटेल अशा वातावरणात काम करत आहे हे माहित नसते. पूर्ण माहिती व ज्ञानाशिवाय अंनिसला तुच्छ टोमणे मारणे हे अंनिससारखे काम स्वत: करून पाहण्यापेक्षा लाख पटीने सोपे आहे. संबंध नसलेले निरर्थक प्रश्न विचारण्यासही खास बुद्धीमत्ता लागत नाही.

In reply to by सूड

याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो.
तुम्हाला पाहिजे तो अर्थ काढायला तुम्ही मोकळे आहात. परंतु हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. तशी ती मुस्लिम धर्मामध्ये दुर्दैवाने नाही. हिंदूंना या परंपरेचा अभिमान वाटायला हवा. पण आजकालचे काही कट्टर हिंदू उलट चिकित्सा करणार्‍यावरच तुटून पडतात. ते असो.
म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.
पीके चित्रपटाच्यावेळी झालेला गदारोळ आठवत असता तर तुम्ही असं म्हणलं नसतं. त्यावेळी पीकेला विरोध करणार्‍या लोकांचा (अगदी मिपावरदेखील) मुख्य आक्षेप होता की अमीर खान मुस्लिम आहे. म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.

In reply to by गुलाम

@ट्ज काका आणि गुलामभाऊ एखादी गोष्ट केवळ आपल्याला पटतेय म्हणून तिच्यातील त्रुटींवर पांघरुण तुम्हा दोघांची घालायची कला शिकण्यासारखी आहे. बाकी चालू द्या!!

In reply to by सूड

एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे. तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे.

In reply to by तर्राट जोकर

एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे.
अरे वाह!! तुम्हालाही पटलं तर!!
तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे
तुमच्या वरील वाक्यातच उत्तर आहे. वाद घालण्यात आम्हाला शष्प रस नाही. आणि अचानक एखाद्या धाग्यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवून ऊर बडवत बसणार्‍या आयडींना आम्ही फाट्यावर मारण्यायोग्यही समजत नाही. तुमचे रणकंदन असेच उत्तरोत्तर बहरत जाऊन धाग्याला ५०० प्रतिसाद मिळवून द्याल ही शुभेच्छा!! तुम्हाला गळे काढायला मिळतील असे आणखी धागे मिपावर येवोत ही त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो. इति लेखनसीमा!!

In reply to by गुलाम

म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.
हा हा हा, हा बाकी एकदमच बिनतोड मुद्दा आहे. मान गये.

In reply to by गुलाम

हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. ......... हो . आणि असे अनेक चार्वाक व अनेक तुकाराम लबाड धर्मवाद्यानी सदेह स्वर्गालाही धाडले आहेत. आमचेही कितीतरी आयडी धर्मयुद्धातच नष्ट केले गेलेले आहेत.

In reply to by dadadarekar

यादी द्या की. मिपा हे तुमचे धर्मयुद्ध आहे का? ब्वार्र.

In reply to by dadadarekar

हा हा ! म्हणजे, आपल्या अनेक डूआयड्या असल्याची कबुली दिलीच शेवटी ! चोर स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी कोणते तरी धागेदोरे मागे सोडतो ते असे =)) =)) =))

In reply to by गुलाम

ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले. हमीद आठवला :) अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये आणि विरोधक नाही सनातनी नाही ! माताय्य , मी कुणीच नाही :(

In reply to by कपिलमुनी

अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले.
हा विरोधकांचा आणखी एक आवडता शब्दच्छ्ल. अंनिस धर्म मानत नाहिच. पण समाजात त्याचा प्रभाव आहे हे तर मान्य करावेच लागेल. तो न मानण्याची शहामृगी भुमिका सामाजिक संघटनेला घेऊन चालत नाही. हिंदू सुधारकांनी मुस्लिम धर्मासाठी पण काम करावं ही आदर्शवत परिस्थिती झाली. पण सध्या तरी ते प्रॅक्टीकली शक्य नाही.

In reply to by गुलाम

तुमचाच प्रतिसाद परत वाचा. पहिल्या वाक्यात लिहिलंत त्याच्या नेमकं उलट शेवटच्या वाक्यात लिहीलंय. अता मात्र हद्द झाली. =))

पण त्यासाठी अश्या रूढी कोणत्या याची सूची तयार झाली तर आपल्याला ठरवता येईल ना! किमान कोणत्या रूढी कशा समाजात आल्या आणि त्या का टाकावू आणि निरर्थक आहेत याचा विचार तरी होईल. बाय द वे, तुमच्या प्रमाणेच मी हि बळी प्रथा, बुवाबाजी इत्यादीच्या विरूद्धच आहे.

विनोद म्हणून ठीक आहे पण तर्क किंवा निष्कर्ष असेल तर परत एकदा साफ चुकीचा. कारण मी बाय चोइस शुद्ध शाकाहारी आहे शिवाय मला स्वतःला अनेक मुसलमान मित्र आहेत. त्यांच्या घरी मी शिरकुर्मा खायला जातो कि. इतका काही ओर्थोडोक्स नाहीये हो मी. गेली १३ वर्षे मध्यापूर्व, आफ्रिका आणि युरोपात काम करतोय तेव्हा अनेक राष्ट्रीयत्वाचे आणि धर्माचे ( तसेच जातीचे) मित्र आहेत. त्यांच्या घरी जेव्हा जेवायला बोलावतात तर माझ्यासाठी खास शाक बनवले जाते. :-)

पहिला ते कुठले देऊळ आहे तिथे नवस पूरा करायला म्हणून पोरे मंदिराच्या छतावरुन खाली ताणलल्या चादरीत सोडतात तो मूर्खपणा बंद करायला हवा राव!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ती प्रथा एका देवळात होती. तिथे मुलांना छतावरून सोडत नाहीत, पहिला मजल्यावरून खाली उभे असलेल्यांच्या चादरीत टाकतात. अर्थात छतावरून किंवा पहिल्या मजल्यावरून टाकणे हा पराकोटीचा मूर्खपणा असून अत्यंत क्रूरपणाचे लक्षण आहे. आता बहुतेक ती प्रथा बंद झाली असावी कारण मागील २-३ वर्षांपासून त्याबद्दल ऐकलेले/पाहिलेले नाही. बादवे, एका मशिदीतही तीच प्रथा होती. वृत्तवाहिन्यांवर देऊळ व मशीद अशा दोन्ही ठिकाणी हे पाहिलेले आहे.

पण दोन्ही बाजू समजून घ्यायला आवडतील. म्हणजे हि प्रथा का बंद व्हावी आजपर्यंत किती अपघात घडले इ. इ. तसेच असे नवस का बोलले जातात, ते पूर्ण होतात का , लोकांचे अनुभव का आहेत, अशा नवसांनी झालेल्या तान्हुल्यांना असे निर्दयीपणे का फेकले जाते इ.

त्यामुळे काय होईल, की सगळ्या ज्या रूढी,परंपरा आहेत त्या बंद होण्यास मदत होईल.'निराकार'(निर्गुण), 'एकेश्वरवाद' याबद्दल वेंदांमध्येही उल्लेख आहे.कारण 'साकार'(सगुण), परमेश्वराचे रूप आले कि विधी-विधान,अनुष्ठान,व्रत-वैकल्य हे सारे येणारच म्हणून हिंदूनी आता एकेश्वरवादाकडे वळले पाहिजे,त्यामुळे बर्यापैकी प्रश्न सुटतील जसे कि धर्मकार्यांमुळे होणारे प्रदूषण वगैरे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव,दुर्गा उत्सव,दहीहंडी,नवस करणे,आणि इतर बरेच या गोष्टींची आताच्या अधुनिक काळामध्ये काही गरज नाही असे वाटते. ---(मी हिंदूच आहे गैरसमज नसावा)

In reply to by याॅर्कर

देवाला निराकार, निर्गुण असे समजल्याने रूढी, परंपरा बंद होणार नाहीत. उलट नवीन रुढी, परंपरा निर्माण होतील. मुस्लिमांमध्ये देवाला निर्गुण, निराकार समजले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यात मूर्तीपूजा नाही व देवाचे चित्र काढण्यास परवानगी नाही. मशिदीत कोठेही मूर्ती, तस्बीर, चित्र इ. नसते. तिथे सर्वजण मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थना म्हणतात. तरीसुद्धा त्यांच्यात अनेक रूढी, परंपरा, उपासतापास, विधी इ. निर्माण झालेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दहीहंडी इ. धार्मिक कमी आणि सामाजिक व सांस्कृतिक जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ते सुरू राहणारच. फक्त त्यात शिरलेल्या उपद्रवी गोष्टी कमी करण्याची आवश्यकता आहे. नवस वगैरे आता फारसे कोणी करीत असेल असे वाटत नाही. जरी वैयक्तिक पातळीवर कोणी नवस केला तरी जोपर्यंत त्याचा समाजाला उपद्रव नाही तोपर्यंत त्याला आक्षेप घेता येणार नाही.

मोहन भागवतांच्या या विधानाचं मनापासून स्वागत. जर संघाने आपली शक्ती विघातक रूढी नष्ट करण्यासाठी पणाला लावली तर खरोखरच अनेक लोकांचं भलं होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कायद्याने उघड होणाऱ्या अशा काही प्रकारांना थोडाफार आळा बसेल, पण समाजात जो बदल व्हायला हवा तो कायद्याने होत नाही. त्यासाठी संघासारखी ग्रासरूट्स पातळीवर काम करणारी संघटना प्रचंड प्रभावी ठरते. त्यांचं हे विधान संघाची भूमिका ठरो, आणि त्यातून काही सकारात्मक बदल दिसून येवो ही सदीच्छा.

चीनमध्ये कोणताही धर्म न मानणारे सुमारे 52.2% लोक आहेत,म्हणजे बहुमतच झालं की? आणि अमेरिकेमध्ये 22.8% लोक कोणताही धर्म मानत नाहीत.म्हणूनच कि काय? हे दोन देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत.

In reply to by याॅर्कर

वाईड बॉलवर यॉर्कर पडला :) चीन आणि अमेरीकेची प्रगती तिथल्या धर्म न मानणार्‍या लोकांच्या संख्येमुळे झाली हे नवीनच लॉजीक कळलं =))

In reply to by अर्धवटराव

धर्म न माननार्यांचे तर योगदान आहेच त्यांच्या प्रगतीमध्ये. शिवाय, धर्म माननारे देखील काम सोडून 'भिक्षाम देही' करत फिरत नाहीत. --(क्लीन Bowled मिडल stump)

In reply to by याॅर्कर

एका हाती स्टंप, एका हाती बॉल. बॉलवर स्टंप आदळायचा आणि क्लीन बोल्ड ओरडायचं. छान चाललाय वर्ल्डकप.

या निष्कर्षाचा पाया काय? प्रगतीचा मापदंड काय? पर कैपिटा/ दर डोई उत्पन्न का? चीन मध्ये गरिबी नाही म्हणून कोणी सांगितलं? मग युरोप,जपान विषयी काय म्हणावे बुवा? यु ए इ , सौदी, कुवेत, कतार या इस्लामिक स्टेट्स मध्ये पण प्रचंड सुबत्ता आहे. पर कैपिटा उत्पन्नाचा विचार केला तर आफ़्रिकेतिऎल बोट्स्वाना या छोटेखानी देशाचे पर डोई उत्पन्न चीनच्या बरोबरीचे आहे कि. याची सांगड धर्माशी काही काय घालता येईल बरं? आधार : http://data.worldbank.org/indicator/NY.GDP.PCAP.CD

मिपावर अनेक दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे, अगदी राहवत नाही म्हणून ! संघाचे नाव आले की मिपावरचे काही आय डी चवताळून उठतात हा आता नेहमीचा अनुभव झाला आहे, संघावर टिका करणार्‍या कोणीही संघ ना जवळून पाहिला ना स्वतः कधी अनुभव घेतला. कुणीतरी सांगितले म्हणून यांचा संघद्वेष! बरे, संघाचे काम पटत नाही म्हणून काही अन्य विधायक करतात का? ते ही नाही , तिथेही बोंबच , मिपासारखे व्यासपीथ उपलब्ध आहे म्हणून सतत विखारी ओकत राहायचे, मराथीत अशा वागण्याला क्रियानश्ट्पणा म्हणतात ! संघात कधीकाळी गेला आहे आणि त्याला त्यात प्रामाणिक सुधारणा व्हावी असे वाटते, त्याला हे पक्के माहीत आहे की तक्रार करण्याची ही जागाच नव्हे ! अशा न पटलेल्या मुद्द्यांसाठी संघात योग्य ते च्यानेल उपलब्ध आहे , तेव्हढा मोकळा संवाद तिथे करता येतो हा माझा गेल्या ३८ वर्षांचा अनुभव आहे. याचा दुसरा अर्थ असा की - ज्यांना टिका करायची आहे त्यांना फक्त टिका करायची आहे आणि त्यातून राळ उडवायची आहे , चालू द्या ! सरसंघचालकांचे हे विधान हीच संघाची भूमिका १९२५ पासून आहे , संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात कसल्याही कर्मकांडाचे अवडंबर नसते, त्यामुळे कोणत्याही स्वंयसेवकाला त्यांच्या या विधानाचे अप्रूप वाटणारच नाही , हा संघाचा सहज भाव आहे , त्याचा अभिनिवेश देखील नाही ! १९२५ पासून संघ केवळ हिन्दूसमाज सुधारणेचेच काम करतो, यांत विशेष काहिही नाही. आणि संघ , संघ आणि समाज हे द्वैत मानतच नाही, संघ समाजापेक्शा वेगळा नाही , समाज संघापेक्षा वेगेळा नाही, त्यामुळे सरसंघचालक बोलताना समाजाचाच व्यापक संदर्भ घेतात. १९६५ साली विश्व हिन्दू परिषदेची स्थापना करताना द्वितीय सरसंघचालकांनी सर्व शंकराचार्य आणि धर्माचार्याच्या उपस्थितीत न हिन्दू पतितो भवेत | अशी घोषणा केली होती आणि संघाने तत्पूर्वीच ते आचरणातही आणले होते ! आज दुर्दैवाने मिडियाचे वलय संघाला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची घटना होते, विरोधक चवताळतात , आणि मदार्‍याचा खेळ होतो. आपल्याकडेही ( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !) संघ / हिन्दु धर्म हा विषय निघाला की ब्याटमन, जिनियस मंडळीना चेव चढतो, दुर्दैवाने हे सारे हिन्दु=भारतीय आहेत, त्यांना परके तरी कसे म्हणू ? सावरकरांचा " सदगुण विकृती " हा शब्द इथे चपखल बसतो ! आमच्याच बाजूल गोल मारण्याची आमची जयचंदी अवसानघातकी वृत्ती आम्हाला आणखी किती वेळा रसातळाला नेणार आहे , हे तो सृष्टीकर्ताच जाणो ! हिन्दूंचा हिन्दूंचा जितका घात केला तितका आक्रमकांनी देखील केला नाही. यांना आपल्याच डोळ्यातील कुसळ मुसळाएवढे दिसते...! र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?

In reply to by विटेकर

लेखातील बहुअंशी बाबींशी सहमत पणः ब्याटमन ला विचारजंताचे यादीत बसविल्याबद्दल तीव्र निशेध आणि जोरदार आक्षेप. स्वगतः तुमको बॅट्या सम्झ्याच नही (जितके त्याच्याशी संवाद साधाल तितके तुम्हाला तो सम्जत जाईल) बॅट्या १/२५ सम्जला आहे तरीही अश्या समजुतीतही आनंद मिळविणारा नाखु.

In reply to by नाखु

अहाहा काय हा बंधुभाव ! स्वमतांध दांभिकतेच्या युगात असले निर्व्याज्य प्रेम पाहुन डोळे पाणावले की आमचे =)) ऐसी जिव्हाळ्याची जाती | करी लाभेविण प्रीती || अहाहा , सलाम नाखु सलाम ! __________________________________/\______________________________________

In reply to by विटेकर

( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !)र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?
एवढ्यापुरतेच बोलते. तसे काही लोक बोलतात, ती मिपाची अधिकृत भूमिका आहे का? नाही. कोणाला काय वाटते ते बोलतात. त्यात आक्षेपार्ह म्हणजे बदनामीकारक, असभ्य काही असेल तर त्यावर कारवाई केली जाते. जर संपादकांनी पाहिले नाही तर कोणीही सदस्य लक्षात आणून देऊ शकतो. पण मिपा या अशा बोलण्याहून खूप काही आहे. केवळ तेवढ्यासाठी, २/४ लोकांच्या बोलण्यावरून इथून निघून जाणे हे काही मला पटत नाही. तुम्ही असे निघून गेलात की मग इथे फक्त एका बाजूने लिहिणारे शिल्लक राहतील. ते तुम्हाला आवडेल का? बरे दुसर्‍या बाजूने बोलणारे तुम्ही चूक होतात म्हणून पळून गेलात असे ओरडतील, तेही तुम्हाला आवडेल का? त्यापेक्षा श्रीगुरुजी असे काही असेल तर ती लिहायला चांगली संधी आहे असे समजून लिहितात. ते मला आवडते. वाद प्रतिवाद तर होणारच!

In reply to by पैसा

वाद प्रतिवाद तर होणारच!
एवढ्यापुरतेच विचारतो काही व्यक्ती जाणीवपुर्वक दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारे लेखन करीत असतात आणि सतत त्या धर्माचा चेष्टेत उलेख करीत असतात (ह्या धाग्यावरही केलेला आहेच पहा ), आणि अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ? ह्यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे . कारण सदर व्यक्ती ज्या गटातील आहेत त्या गटातील अतिअत्यल्प लोकंच असे विचित्र वागतात म्हणुन त्या गटावर टीका टिप्पण्णी करणे योग्य नाही आणि जर समजा त्या व्यक्तीवर टिप्पण्णी केली तर सदर व्यक्ती " व्यक्तिगत आरोप केले " असे रडगाणे गात संपादक मंडळामागे लपते आणी धागे / प्रतिक्रिया संपादित करुन घेते असा अनुभव आहे . प्रश्न असा की अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सगळे मिपाकर तेवढे हुशार आहेतच! काहीही लिहिताना ते मिपाच्या धोरणाच्या चौकटीत असले की झाले. कोणी कोणाच्या मागे लपण्याचा प्रश्नच नाही. वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.

In reply to by पैसा

वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.
असे असेल तर मग सदर व्यक्तीने सनातन धर्माची सतत उडवलेली टर मुख्यबोर्डावर का रहाते ? "धार्मिक शेरेबाजी चालेल पण वैयक्तिक शेरेबाजी चालणार नाही" असे काही धोरण आहे का ? असे असल्यास सदर व्यक्तीचा प्रतिवाद करावा तरी कसा ??? - ( अत्यंत विनम्रपणे आणि तितक्याच गांभीर्याने प्रश्न विचारत आहे )