कोकणातली फुलं.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
“फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”---अरूण
अरूणला फुलांविषयी विशेष वाटतं हे मला माहित होतं.त्यादिवशी असाच फुलांवरून विषय निघाला. त्याला मी म्हणालो तुला फुलं आणि फुलांचे प्रकार पहायचे असतील तर ह्या वेळी तू माझ्या बरोबर कोकणात ये.अरूणने कोकण कधीच पाहिलं नव्हतं.मुंबईला जन्माला आला आणि मोठा झाला.
“आमची -सिकेपी लोकांची-वसाहत फारफारतर ठाण्यापर्यंत पसरली आहे.एकवीरा आमची देवी. माणिकप्रभू आमचे गुरू.कोकणातून येणारे आंबे आणि फळफळावळ जी मुंबईत येते त्यावरून आमचा कोकणाशी संबंध येतो.”
अरूण मला म्हणाला.
“पण फुलांसाठी तुला मे महिन्यात कोकणात यावं लागेल.आंबे गरे आणि इतर फळं तुला त्यावेळी तिथे मिळतीलच,पण अनेक तर्हेची फूलं पहायला तुला निश्चीतच मिळतील.”
मी असं म्हणाल्यावर माझ्याबरोबर ह्या मे महिन्यात अरूण कोकणात यायला कबूल झाला.
अशी निरनीराळ्या जातीची फूलं अरूणने पहिल्यांदाच पाहिली.वेंगुर्ल्याच्या बाजारात नेऊन मी त्याला विकायला आलेल्या फुलांच्या जाती दाखवल्या.
पुस्सट लाल रंगाची आणि भडक लाल रंगाची आबोली,पांढरी आणि सफेद रंगाची शेवंती, सुरंगीचे वळेसार, सफेद पाकळ्या आणि मधे पिवळं जर्द फूल,असलेला नागचाफा, नाग चाफ्याला तर एव्हडा सुगंधी वास असतो की मिळेल त्या ठिकाणाहून माश्या गोळा होवून फुलाभोवती भूंग्या सारख्या गुंजन करीत रहातात.खरं म्हणजे त्यांच्या फुलाभोवतीच फिरण्याने त्यांच्या पंखाचा आवाज गुंजन कसा वाटतो. सुरंगीच्या वळेसाराचीपण तिच गत आहे.कोकणात फुलांच्या वेणीला वळेसार असं म्हणतात.वळेसार आणि वेणी यांच्या बनावटीत थोडा फरक असतो.
चाफ्याचा आणखी किती जाती आहेत-पांढरा चाफा,सोन चाफा,हिरवा चाफा,पिवळा चाफा,कवठी चाफा, त्यानंतर आणखी दुसरी फूलं म्हणजे ओवळं,सुरंगी,लालआबोली,मोगरा,जाई,जूई,तगडीची फुलं-ही तगडीची फुलं थेट जाई-जुई सारखी दिसतात पण ह्यांना कसलाही सुवास नसतो.मुंबईत ही फुलं खूप स्वस्त मिळतात म्हणून फुलवाले जाईच्या वेणीमधे तगडीचीच फुलं जास्त ओवून जाईची वेणी म्हणून विकतात आणि फसणारे फसतात.प्राजक्ताची फुलं,रात्रराणी,कृष्णकमळ,साधं कमळ कण्हेरीची फुलं,निशीगंधाची फुलं, बकुळीची फूलं,झेंडूची फूलं,घाणेरीची फुलं-ह्या फुलांना- खूप मोहक वास येतो.जास्वंदीची फूलं-ही फुलं जास्त करून देवाला वाहतात, ह्यांना सुगंध मुळीच नसतो पण दिसायला रंगाने लालबूंद आणि छान दिसतात.
दुसरी कोकणातच दिसणारी फुलांची जात म्हणजे ओवळं.
ओवळ्याची फूलं वेली वरून जमिनीवर पडतात आणि ती वेचावी लागतात.ओंजळभर फूलं हातात घेऊन वास घेतल्यास Elizabeth perfumeचा वाससुद्धा फिका वाटेल. केवड्याच्या फूलाची तर एव्हडी महती आहे की असं म्हणतात, ह्या फूलाच्या झुडपात सापाचे वास्तव्य असतं ते त्या फुलाच्या वासासाठी.त्या फुलाच्या वासामुळे की अन्य काही कारणामुळे त्याचं वास्तव्य असतं हे मात्र कळलं नाही.गुलाबाच्या असंख्य जाती आहेत पण अरूणला मी लाल गुलाब,पिवळा गुलाब,सफेद गुलाब,काळा गुलाब दाखवू शकलो.
मी अरूणला म्हणालो,
“ही फुलं मला आढळलेली आणि मला माहित असलेली आहेत.यापेक्षा खूप जातीची फुलं कोकणात असतील.”
ही तर्हेतर्हेची फूलं पाहून झाल्यावर मला अरूण म्हणाला,
“मला फुलांविषयी विशेष वाटतं.मला वाटतं फूलं, एकमेकाशी दुवा साधायला चांगलं साधन आहे. देवांना तर आपण त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करीत असतो.गणपतीला लाल रंगाचं फूल वाहतात. कृष्णाला, लक्ष्मीला कमळाचं फूल आवडतं.
फुलांच्या रंगावरून ते कशाचं प्रतीक आहे हे सांगता येतं.
गुलाबाचं फूल आनंद आणि मनोहरता दाखवतं, पांढरं-सफेद फूल दिलासा देतं.
फूलं देण्या-घेण्याने आनंद तर मिळतोच शिवाय देणार्या व्यक्तीची वृत्ति दिसून येते.व्हॅलेंनटाईन दिवशी- तरूण-तरूणीच नव्हे- तर कुणीही कुणाला फूलं देत-घेत असतं.अशावेळी फूलं देऊन एकमेकावरचं प्रेम दाखवता येतं.”
मी अरूणचं हे ऐकून भुतकाळात गेलो.मी त्याला म्हणालो,
“फुलांमधून आठवणी जागवल्या जातात.मला आठवतं आमच्या लहानपणी आमचे आजोबा आमच्या गावात आले की आम्हाला शेवंतीचे रोप आणून द्यायचे.लागलीच आम्ही ते आमच्या बागेत लावायचो. आता आमचे आजोबा हयात नाहीत पण पिवळी जर्द आणि पांढरी शुभ्र शेवंती बहराला आल्यावर आम्हाला आमच्या आजोबांची निक्षून आठवणी येतात.
आमच्या आजीला जाई-जुई खूप आवडायच्या.माझ्या आजोळी तिने घराच्या पुढच्या पडवीत आणि मागच्या अंगणात जाई-जुईचे वेल लावले होते.आता आमची आजी नाही.पण आजोळाला गेल्यावर पडवीत बसल्यावर वार्याच्या झोतीबरोबर जेव्हा त्या फुलांचा वास नाकात शिरतो तेव्हा त्या वासाबरोबर आजी डोळ्यासमोर येऊन जाते.
मला वाटतं फूल एखाद्याच्या व्यक्तीत्वाला प्रेरीत करतं.मला असं वाटण्याचं कारण सर्व फूलं वेगळी वेगळी असतात.त्यांचा सुवास,बनावट,आकार,विस्तार आणि रंग हे त्यांचं वैशिष्ट असतं आणि त्यात खूबी असते. एव्हडच नाहीतर सारख्याच जातीची फूलंसुद्धा थोडी वेगळी असतात. गुलबहाराची फुलं पाहिलीत तर त्यात विभिन्नता जाणवते.ह्या फुलात रंग आणि छटा वेगळ्या असतात तसंच,पाकळ्यांचा आकार आणि पाकळ्यांची संख्या वेगळ्या असतात. निरनीराळी फूलं एकाच ठिकाणी उगवली तरी नव्या वातावरणात ती सामावून जातात.”
मला अरूण म्हणाला,
“माझ्या मनात येतं,फूलं कधी कधी काहितरी सांगून जातात.
एखाद्या घराच्या समोर उत्तम फुलांचा, रंगीबेरंगी फुलांचा बगीचा दिसला की चटकन घरमालकाच्या व्यक्तित्वाचं लक्षण दिसतं.बगीचा नीट आणि अनोखा दिसला की समजावं माळीच तसा असणार. बगीच्यात जरका झगझगीत रंगाची फूलं दिसली आणि असाधारण रोपं असली की समजावं त्या बगीच्याचा मालक गमतीदार आणि धाडसी असावा.
थोडक्यात,माझ्या दृष्टीने फुलं माणसाच्या जीवनात विशिष्ट स्थान ठेवून असतात.म्हणूनच फुलांची आणि बगीच्याची कदर केली पाहिजे.फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात. म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”
मी अरूणला म्हणालो,
“मी लहानपणापासून कोकणातली ही फुलं पहात गेलो आहे.पण तुझं फुलांबद्दलचं तत्वज्ञान ऐकून ह्या सर्व फुलांकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन आता मी बदलला आहे.आता मिळेल त्या फुलाकडे बघून नुसतं त्याचा वास घेऊन मी रहाणार नाही,प्रत्येक फूल काय संदेश देईल का हे कुतूहलाने पाहिन.मात्र निसर्गाबद्दल मला एकच कौतूक वाटतं आणि ते कौतूक मला सुचलेल्या कवितेच्या ओळीतून जास्त अर्थपूर्ण सांगता येईल.
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊनी सर्वां उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे”
नाग-चाफा
केवडा
सोनचाफा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
नाग-चाफा
केवडा
सोनचाफा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
पुष्पमुक्तक आवडले !
सकाळ सुगंधी झाली. :)
+१
माझ्या घरी होता..अजून आहे का
भूईचाफा मी पाहिला नाहीये,
भुईचाफा
फोटो चढवायला काही जमेना!
लिंक पण ओपन होत नाहीय.
http://www.tarunbharat.com/wp
झाली, कसलं भारी फूल आहे.
+१
काय देखणं फूल आहे हे!
मराठी विश्वकोषाचा दुवा
फुलासारखा प्रसन्न लेख! आवडला.
छान लेख. फुलांच्या
सुंदर लेख. नागचाफा माहित
सुंदर लेख
सुंदर लेख!
खूप छान लेख. प्रसन्न वाटलं
कोकणातली फुलं कशी दिसतात
अपूर्ण प्रतिसाद
कोकणातली फुलं कशी दिसतात
ती २ नंबरची अबोली तीच ती
सोनचाफा म्हणून मला माहित
+१
त्या फोटोतल्याला देवचाफा
मी ही तेच सांगणार होतो
फोटो
मस्त सुगंधी लेख
सोन चाफ्याच्या फुलाचा फोटो देवचाफ्या फुलात चुकून बदलला गेला
मस्त
सामंतजी अतिशय सुंदर लेख. खुपच
ओवळी म्हणजे बकुळी.
तुम्ही वर अबोलीच्या गजर्याचे
ते बहुधा मीच काढलेले असावेत
आहो लिंक कसली मी स्वतः
:-)
=))
फार फार सुंदर लेख
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार
सुंदर ..........
सुंदर फुल.सुरेख लेख.काहि फुल
सुंदर लेख!