बॉलीवूड, टीवी आणि स्टिरियोटाइप.
एकदा माझी तामिळ मैत्रीण तावातावाने मला सुनवत होती होती...'यू नॉर्थ इंडियन पीपल'...हो, ती अशी हमरीतुमरी वर आली की मला नेहमी यू नॉर्थ इंडीयन्स वगैरे म्हणते न चुकता. आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत. उत्तर आणि दक्षिण. तामीळनाडू, केरळ पासून वरती साधारणपणे हैदराबाद पर्यंत साऊथ इंडिया आणि हैदराबाद च्या वरती सगळा नॉर्थ इंडिया. बाकी महाराष्ट्र, गुजरात तिकडे बंगाल हे असले कॉंप्लिकेशन्स नकोच आपल्याला.
असो. पण तिचा मुद्दा असा होता की आपल्या हिंदी चित्रपटांमधे दक्षिण भारतीय पात्रांना फारच विनोदी दाखवतात. विनोदी म्हणजे छान नाही पण काहीतरी विचित्र. ओढून ताणून यम, यन, वो, पी असे इंग्रजी बोलणारे, बायका कायम कान्जिवरम मधे. केसांमधे भलामोठा गजरा आणि वाक्यावाक्याला अय्ययो असे उद्गार. तिचं म्हणणं एकच की असे का? एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना का नाही दाखवू शकत तुम्ही लोक ? आमच्या लकबींवर, भाषेवर तुमची विनोद निर्मिती का?
नंतर मी विचार केला तेव्हा जाणवलं की हे अगदी खरंय. म्हणजे मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर तिचं म्हणणं खरंय. आपल्या हिंदी चित्रपटांमधे आणि हिंदी मालिकांमधे पात्रांचं, प्रसंगांचं फारच स्टिरियो टायपिंग, एक अती सरसकटीकरण होतं.
आता हे बघा, उदाहरणार्थ मराठी बाई ही एकतर कामवाली नाहीतर भाजीवाली नाहीतर कोळीण. ती कशी बोलणार? ' मै बोलती तेरेकू, मेरेको ईतना पैसा मंगता म्हणजे मंगता' अरे....काय...? आणि मराठी पुरूष म्हटला की तो एकतर पोलिस पण तोही कमिशनर नाही - हवालदार. दुसरं म्हणजे एखादा भ्रष्ठ नेता- अमका तमका भाऊ आणि तिसरा प्रकार म्हणजे गॅंग्स्टर. हा तिसरा प्रकार जरा नवीन आहे. थोडाफार राम गोपाल वर्मा च्या सत्या पासून याची बहुतेक सुरूवात झाली असावी.
आता पंजाबी खानदान. या समाजाला प्रचंड ग्लॅमर द्यायचं काम आधी चोप्रा आणि नंतर करण जोहर या मंडळींनी केलं. पण तिथेही अतिशयोक्ती. या लोकांच्या रीतीभाती, खाणं-पिणं, बोलणं याचं अती सिंप्लिफाइड चित्रण. एखादा सरदारजी मिनिटा मिनिटाला मित्राच्या पाठीवर दणादण बुक्के घालणार, गडगडाटी हसणार. मग हा स्वभावाने भयंकर विनोदी, मदतीला तत्पर आणि डोक्याने गरम अशा टाइप चा असणार. त्याची बायको पण तेव्हडीच विनोदी. कानात झुमके, वेणीला जरीचा गोन्डा आणि अधून मधून ' छड्डोजी 'वगैरे म्हणणे मस्ट आहे. हे पब्लिक एरवी घरात व्यवस्थित हिंदी बोलत असते पण मधेच यारा तुस्सी, गड्डी चला रहा हू, चल ओये असे शब्द सटासट वापरणे त्यांच्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे.
या घरातली आजी म्हणजे 'बीजी' हे पात्र. या बीजी एकीकडे खानदान की इज़्ज़त का काय ते सांभाळत असतातच पण साइड बाय साइड आपली 'कूल' इमेज सिद्ध करण्याच्या दृष्टीने जरा डान्स फ्लोर वर नाचून बिचून पण घेतात. मग लाडका नात किवा नातू येऊन तिला माय सेक्सी दादी वगैरे म्हणतो. मग बीजी पण त्याला लाडाने ओये खोत्या (का खोते?) म्हणत त्याचा कान पीरगाळतात. हा सीन फक्त चित्रपटात नाही तर आजकाल टीवी वर सुद्धा अगदी कॉमन झालाय.
तिसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे गोवेकर मंडळी. हा तिसरा प्रकार सत्तर, ऐंशी च्या दशकामधे भलताच फॉर्मात होता. चर्चातले शांत वातावरण. मग तिथे छान स्वच्छ इस्रीचा पोशाख केलेले आणि सात्विक हावभाव तोंडावर असलेले धर्मगुरू असतात. ते नेहमी माय चाइल्ड, माय चाइल्ड असे म्हणतात आणि दारात कोणीतरी टाकलेल्या बाळाला नियमीतपणे आसरा देत असतात. आता येते नायिका. ही फार सुंदर आहे. पण त्याचबरोबर गूढ रम्य, उदासरम्य आणि भाविक अशी मल्टिटेलेंटेड सुद्धा आहे. ती कॅण्डल घेऊन चर्च मधे गंभीरपणे बसलेली आहे. तिचा तो भावीक, प्रकाशात उजळलेला चेहरा पाहून हीरो तिच्या अजुन प्रेमात पडतोय ( आठवा--दिलवाले दुल्हनिया, मुझसे दोस्ती करोगे, खामोशी-मनीषा कोइरलाचा).
आणखी एक छानपैकी ' वॉट मॅन ' किंवा 'यू नॉटी बॉय' असे वारंवार म्हणणारी मिसेस डिसूझा असते. ही बाई हमखास आपल्या चित्रपटाच्या हीरोची घरमलकीण असते आणि अधून मधून आठवणीने आपल्या हीरोला घरातून बाहेर काढण्याची धमकी देत असते. ही तोंडाने खूप फटकळ जरी असली तरी मनाने बाय डीफॉल्ट प्रेमळ. काटेरी फणस, नारळासारखी टणक, वरुन कडक आतून मायेचा झरा, वरुन काटे आत पिकलेला गर वगैरे, वगैरे.
हिंदी चित्रपट आणि मालीकांमधे ब्रेकफास्ट हा पण टिपिकल प्रकार. जूस म्हणून ठेवलेले पण शेंदरी रसना नी भरलेले ग्लास, प्लेट मधे असलेली ब्रेड स्लाइसस ची थप्पी आणि बटर. ' चलो बेटा नाश्ता करलो' म्हणताच तो बेटा बसणार आणि ब्रेड बटर खाणार. सोप्पं काम. बरेच वेळा बेटा किवा बेटीला नाश्ता करायला वेळच नाहीये. मग आई बिचारी सो कोल्ड जूस चा ग्लास घेऊन मागे धावणार..'बेटा जूस तो पिलो'.....अगं बाई...रिकम्यापोटी ऑरेंज जूस? अॅसिडिटी नाही का होणार?
दुसरं म्हणजे अल्लड कॉलेज कन्यका येणार आणि ब्रेकफास्ट न करता टेबलवरचं एक सफरचंद घेऊन खात खात पळणार. इथे सफरचंद हे फळ फारच डिमांड मधे आहे. कधीही चिकू, पेरू अशी फळं नाहीच ओन्ली सफरचंद.
अर्थात सरसकट सगळ्याच हिंदी चित्रपटांमधे हे असे स्टिरियोटाइप असतात अस नाहीये. काही अपवाद आहेतच. पण असे अपवाद दुर्दैवाने खूप कमी असतात हे सत्य आहे. हे कबूल आहे की या वरच्या सगळ्या उदाहरणात थोडेफार तथ्य असतेच. नाही असे नाही. पण म्हणून काय आपण त्या इतक्याश्या चौकटीतच राहून विचार करायचा? बरेच गुणी दिग्दर्शक हे स्टिरियो टाइप्स टाळण्याचा प्रयत्न करतात. हे आशादायी आहेच पण आजकाल तर मला असही वाटतं की चित्रपटांच्या पेक्षा जास्तं हा प्रकार हिंदी मालिकांमधून होतो. खरंतर एखादे अस्खलित हिंदी बोलणारे सुब्रमण्यम स्वामी , एखादे पाटील, देशमुख किंवा देशपांडे आडनावाचे बडे उद्योगपती (मला वाटतं अशी एक हिंदी मालिका आहे सध्या) किंवा मग चष्मा लावणारे एखादे डॉ.कर्तारसिंग नावाचे सरदारजी अशी पात्रं दाखवायला काय हरकत आहे?
याद्या
17063
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
कणेकरटाइप
मनोरंजक लेख!
हाहाहा लेख आणि तुझा प्रतिसाद
In reply to मनोरंजक लेख! by रेवती
कव्वाल्ल्यांना +१११११११११११
In reply to मनोरंजक लेख! by रेवती
रेवती, खूप मस्तं प्रतिसाद.
In reply to मनोरंजक लेख! by रेवती
हॅहॅहॅ!!
In reply to मनोरंजक लेख! by रेवती
हाहाहाहाहाहहा
In reply to मनोरंजक लेख! by रेवती
रच्याकने
येतं हो काही काही लोकांना.
In reply to रच्याकने by रामपुरी
हा हा
नुसता गाजर का हलवा देऊन नाही भागत
In reply to हा हा by चिरोटा
आणि आलू के प्राठे :)
In reply to नुसता गाजर का हलवा देऊन नाही भागत by ट्रेड मार्क
दुसर काही
In reply to आणि आलू के प्राठे :) by टवाळ कार्टा
दडपे पोहे र्हैले :)
In reply to दुसर काही by नाखु
कर्रेक्ट.....
सौधींडियन लोकांचं कायमचं
हाहा. मस्त लिहिलंय.
लेख आवडला
अग्गाग्गाग्गाग्गा काय पंचनामा
सौदिंडियन डब मुव्ही आम्ही नाही का बघत गपचुप ?
मद्रासी आणि पंजाबी
भन्नाट!
सही आहे लेख!
कामवाली बाई कायम मराठीच का
In reply to सही आहे लेख! by जुइ
हं याचाच राग येतो. ह्यांचे
In reply to कामवाली बाई कायम मराठीच का by जडभरत
नक्कि काय हवयं ?
अनुल्लेखानी मारल्यामुळे
In reply to नक्कि काय हवयं ? by द-बाहुबली
मस्ताड लेख
कुठल्या तरी मराठी सिनेमात
In reply to मस्ताड लेख by नाखु
आयत्या घरात घरोबा
In reply to कुठल्या तरी मराठी सिनेमात by जडभरत
छान लिहिलय
In reply to मस्ताड लेख by नाखु
आवडला ! अतिशय खुसखुशीत खमंग लेख
पद्मावतींना ड्यु रिस्पेक्ट
In reply to आवडला ! अतिशय खुसखुशीत खमंग लेख by पगला गजोधर
पारसी अंकल
मस्त लेख
कायतरीच!!
मस्त लेख आवडला.
जाम राग येतो हं विचार केला तर
बॉलीवूड, टीवी आणि स्टिरियोटाइप.
मस्त जमलाय लेख .
पंजाब हा भारतातील एकुणातच दहा
बॉस मुसलमान अस्तो भौतेक
In reply to पंजाब हा भारतातील एकुणातच दहा by विजुभाऊ
माझे विधान कोणत्याही प्रकारे
इथे अमेरिकेत
हाहाहा!
ते काहीही असलं तरी
हा हा
अत्यंत व्यावहारिक कारण आहे.
भन्नाट विनोदी लेख पद्मावती
भन्नाट
हिंदी सिनेमातली मराठी माणसे
हिंदी चित्रपटात रिपीटेड
हिंदी चित्रपटात रिपीटेड
सूजी का हलवा,सरसों का साग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॉय फ्रेंड... गर्ल फ्रेंड... Na Na Na Na... :- J Starमस्त!
जुन्या पिच्चरात हिरो/हिरॉईन
झक्कास लेख...
आयला हे कसं राहिलं बुआ??
ह्या लेखासाठी एक प्रदिर्घ
सोन्याबाप्पू व
सोन्याबाप्पू व डांगेअण्णांच्या अभ्यासू दीर्घ प्रतिसादाच्या प्रति
In reply to सोन्याबाप्पू व by विजय पुरोहित
न्यूनगंडाचा सिनेमॅटीक परिणाम
बायदवे,बाहुबलीसारख्या
In reply to न्यूनगंडाचा सिनेमॅटीक परिणाम by ए ए वाघमारे
नाही हो डांगे अण्णा!
In reply to बायदवे,बाहुबलीसारख्या by संदीप डांगे
तुम्ही म्हणताय तेही बर्याच
In reply to नाही हो डांगे अण्णा! by बोका-ए-आझम
कमर्शियल सिनेमा आणि आर्टफिल्म
In reply to तुम्ही म्हणताय तेही बर्याच by संदीप डांगे
प्रत्येक कलाप्रकारात 'काहीतरी
In reply to कमर्शियल सिनेमा आणि आर्टफिल्म by ए ए वाघमारे
मान्य
In reply to प्रत्येक कलाप्रकारात 'काहीतरी by संदीप डांगे
धन्यवाद
In reply to बायदवे,बाहुबलीसारख्या by संदीप डांगे
वाघमारे काकांशी पूर्ण सहमत.
In reply to धन्यवाद by ए ए वाघमारे
वाघमारे काका ?..
In reply to वाघमारे काकांशी पूर्ण सहमत. by बॅटमॅन
ही जनरेशनची स्टीरिओटायपिंग
In reply to वाघमारे काका ?.. by ए ए वाघमारे
त्याचं असं आहे की काका हे सेफ
In reply to वाघमारे काका ?.. by ए ए वाघमारे
आर्ट( की आर्त) फिल्म काढली
त्या अर्थाने नुकताच आपटलेला
In reply to आर्ट( की आर्त) फिल्म काढली by सुबोध खरे
यात आपल्याला शंका आहे का?
In reply to त्या अर्थाने नुकताच आपटलेला by संदीप डांगे
खरे साहेब, दिलवाले पडण्यामागे
In reply to यात आपल्याला शंका आहे का? by सुबोध खरे
डांगेसाहेब असहिष्णुता हे एक
In reply to खरे साहेब, दिलवाले पडण्यामागे by संदीप डांगे
दिलवाले आपटलाय ?
In reply to त्या अर्थाने नुकताच आपटलेला by संदीप डांगे
असहिष्णूते मुळे हि आर्त फिल्म
दिलवाले आपटल्यावर लै आनंद
प्रश्नच नाही
In reply to दिलवाले आपटल्यावर लै आनंद by प्रदीप साळुंखे
असं काही उत्खनन करून काढलं की
एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी