✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाश - कथा - भाग १

स
सिरुसेरि यांनी
Fri, 09/25/2015 - 22:38  ·  लेख
लेख
"जन्या , ए जन्या , आरं ती रीळं आली का न्हाई अजुन ?" राजाभाउ आपल्या मदतनीसावर खेकसले . "न्हाई मालक . सदू गेलाय तालुक्याच्या गावाला , पन अजुन आला न्हाई" जन्याने उत्तर दिले . राजाभाउ चिंतेत पडले . त्यांचा फिरत्या टूरींग टॉकीजचा व्यवसाय होता. खेडेगावांमध्ये जत्रेच्या दिवसांमध्ये मोकळी जागा पाहुन ओपन एअर तंबु ठोकायचा आणी रात्री चित्रपटांचे खेळ दाखवायचे असे या व्यवसायाचे स्वरुप होते . चार बाजुंनी कापडाच्या भिंती , आतमध्ये एका टोकाला सिनेमाचा पडदा आणी दुसरया टोकाला प्रोजेक्टर . मधे प्रेक्षकांसाठी बसायला मोकळी जागा. त्यातही एक बाजु स्त्री प्रेक्षकांसाठी आणी दुसरी बाजु पुरुष प्रेक्षकांसाठी . मागच्या बाजुला गावातील स्थानिक , इतर व्हिआयपी लोकांसाठी बसायला दोन चार बाकडी ठेवत असत . कधी पाउस पडु लागला तरच या तंबुला वरुन कापडाचे आच्छादन घालत असत . पण त्यांचा हा व्यवसाय पावसाळा संपल्यावरच चालु होत असल्यामुळे ती वेळ क्वचितच येत असे . आजही राजाभाउंनी एका खेडेगावामध्ये जत्रेचा दिवस बघुन तंबु उभारला होता . रात्रीच्या खेळाची माहिती एका फळ्यावर लिहुन तो फळा तंबुपाशी तिकीटविक्रीच्या टेबलाजवळ ठेवला होता . खेळ रात्री साडेनवाला चालु होणार होता . राजाभाउंचा दुसरा मदतनीस सदु हा एका नव्या सिनेमाची रीळे आणायला तालुक्याच्या गावी दुपारीच गेला होता. तिथल्या वितरकाच्या एजन्सीकडुन रीळे घेउन तो रात्री आठ वाजेतो परत येईल असा राजाभाउंचा कयास होता . पण रात्रीचे साडेनउ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता . इकडे तिकीटविक्री तर चालु केली होती . बरेच पब्लिक तंबुमध्ये जाउन बसले होते . राजाभाउंनी आपल्या स्टॉकमधील दोन , तीन इतर सिनेमांचे ट्रेलर्स , दोन , चार फिल्म डिवीजनच्या डॉक्युमेंटरीस , थोड्या स्थानीक तर थोड्या नेहमीच्या जाहिराती दाखवुन सव्वादहा होईतो वे़ळ काढला. शेवटी स्पीकरवर गाणी सुरु केली . पण रात्रीचे साडेदहा वाजायला आले तरी सदु अजुन आला नव्हता . आत बसलेले प्रेक्षकही आता वाट पाहुन कंटाळु लागले होते . त्यांनीही ओरडा सुरु केला . "आरं ए टाकीवाल्या , आम्ही काय इथं आकाशातल्या चांदण्या मोजायला आलोय काय ? आनं त्यापायी तुला रं कशाला पैका द्यायचा ? गुमान खेळ चालु कर आता " "कुठाय तो तिकीटवाला ? टकुरंच फोडतो त्याचं " एक दोन जणं बाह्या सरसावत उठुही लागले . "आनं हि गाणी कसली रं रडकी लावलीयास ? आम्ही काय हकडं मर्तिकाला आलोय काय ? जरा धिन च्याक गाणी लाव ती जुम्मा जुम्मा नाही तर मिठु मिठु . नाही तर तुझंच दहावं घालतो पग आता ." राजाभाउंनी लगेच गाणी बदलली . त्यांची चिंता वाढु लागली होती . तेवढ्यात त्यांच्या ओळखीतला एक गाववाला धावत त्यांच्यापाशी आला , आणी त्याने माहिती दिली - " राजाभाउ , तालुक्याच्या रोडवर आरगिडे फाट्याजवळ लई मोठा ट्रॅफीकजाम झाला आहे . दोन्ही बाजुला गाड्यांची पार मोठी लाईन लागलीय .तुमचा सदु जर पलिकडच्या बसमध्ये असेल तर समदा गुंता सुटुन इथं यायला त्याला निदान दीड तास तरी लागतोय बघा." सदुला यायला अजुन निदान दीड तास तरी लागेल हे ऐकुन राजाभाउंना चांगलाच घाम फुटला . --------------काल्पनीक-----------------क्रमशः---------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
4193 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

पुभाप्र.

एस
Fri, 09/25/2015 - 22:46 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

सुरुवात छान आहे

एक एकटा एकटाच
Fri, 09/25/2015 - 23:14 नवीन
सुरुवात छान आहे
  • Log in or register to post comments

सहमत!!! जुने दिवस आठवले!!!

मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 08:36 नवीन
सहमत!!! जुने दिवस आठवले!!! बाकी कथा मस्त!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

सुरुवात तर छानच आहे.

बाबा योगिराज
Sat, 09/26/2015 - 08:40 नवीन
सुरुवात तर छानच आहे. आण द्येओ, आण द्येओ.....
  • Log in or register to post comments

छान सुरूवात!

चांदणे संदीप
Sat, 09/26/2015 - 11:32 नवीन
सिरूसेरि भारी लिहिता! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

छान सुरूवात झालीय. पु.भा. प्र

पद्मावति
Sat, 09/26/2015 - 13:27 नवीन
छान सुरूवात झालीय. पु.भा. प्र.
  • Log in or register to post comments

सुरूवात आवडली

बहुगुणी
Sun, 09/27/2015 - 05:46 नवीन
लवकर पुढचा भाग येउ द्या.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर येऊ द्या...

शित्रेउमेश
Wed, 09/30/2015 - 13:50 नवीन
पुढचा भाग लवकर येऊ द्या...
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर येऊ द्या...

शित्रेउमेश
Wed, 09/30/2015 - 13:50 नवीन
पुढचा भाग लवकर येऊ द्या...
  • Log in or register to post comments

छान सुरुवात.

सस्नेह
गुरुवार, 10/01/2015 - 10:54 नवीन
फारच छोटा भाग आहे. पुढचा थोडा मोठा टाकावा.
  • Log in or register to post comments

चांगली सुरुवात

पैसा
Sun, 11/15/2015 - 17:35 नवीन
चांगली सुरुवात
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा