✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विखुरलेलं चांदणं

र — रातराणी, गुरुवार, 09/24/2015 - 13:23
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं, मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं, त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं. हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं, मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं. हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं, तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं? (नाव सुचलंच नाही कवितेला.)

प्रतिक्रिया द्या
6605 वाचन

💬 प्रतिसाद (20)

पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ

वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 14:07 नवीन
पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ झालाय. बाकी काव्यातले भाव उत्तम.
  • Log in or register to post comments

+१

चांदणे संदीप
गुरुवार, 09/24/2015 - 14:15 नवीन
अगदी हेच वाटले मलाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

कविता मस्त.

सस्नेह
गुरुवार, 09/24/2015 - 14:41 नवीन
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत चाललं आहे हळव्या समुद्राचं उधाण.
असे चालेल का ? ..कविता मस्त. 'विखुरलेलं चांदणं' हे नाव चालेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अर्रर घोळ घातला का मी!

रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 18:11 नवीन
अर्रर घोळ घातला का मी! ताई शीर्षक आणि बदल दोन्ही आवडले हळवा + समुद्र + उधाण हे कोम्बिनेश्न्च जबरा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

उधाणलेल्या समुद्राला आता हळू

मांत्रिक
गुरुवार, 09/24/2015 - 14:23 नवीन
उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं असं केलं तर? बाकी १ नं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! हाही बदल छानच आहे!

रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 18:16 नवीन
धन्यवाद! हाही बदल छानच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

+१

एस
Sat, 09/26/2015 - 14:26 नवीन
उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं
माझ्यामते असेच हवे होते. यमकही जुळेल आणि चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्यात्मकता आणखी वाढेल. क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराची मात्रा लुप्त दाखवायचा असल्यास तिथे अनुस्वार देतात. उदा. येणे/येणं. ह्याला अपवाद म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता स्त्रीलिंगी असेल तर शेवटची मात्रा लुप्त होत नाही. उदा.ती आंबा खाते. इथे 'खाते' चं 'खातं' होत नाही. हा नियम काही विशेषणांनाही लागू पडतो. उदा. कसेबसे/कसंबसं. ह्यामुळेच येणं आणि उधाण हे यमकात बसत नाही. त्याऐवजी उधाणणं असे क्रियापद वापरले तरी चालू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

Surekh.

निनाव
गुरुवार, 09/24/2015 - 20:25 नवीन
Kavita khoop aavadli. Chhaanach vtakta jhaale aahe.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

विवेकपटाईत
गुरुवार, 09/24/2015 - 20:52 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 23:22 नवीन
धन्यवाद! मला बदल करून देतील का कुणी सासं पहिल्या कडव्याची दूसरी ओळ ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण अशी करायची आहे आणि शिर्षक विखुरलेल चांदण द्यायच आहे. स्नेहाताई खूप खूप आभार इतके छान बदल सुचवल्याबद्दल!
  • Log in or register to post comments

डन

वेल्लाभट
Fri, 09/25/2015 - 00:10 नवीन
डन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

अरे वा! कुणी बदललं? मनापासून

रातराणी
Fri, 09/25/2015 - 00:06 नवीन
अरे वा! कुणी बदललं? मनापासून धन्यवाद सा सं !
  • Log in or register to post comments

सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे

प्यारे१
Fri, 09/25/2015 - 01:15 नवीन
सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे काम त्याच संपादिकेचं दिसतंय ज्यांनी चांदणं बिखरवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

'डन'

एस
Fri, 09/25/2015 - 01:21 नवीन
एक मजला सोडून वरती बघा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मायला. आय माय स्वारी बरका.

प्यारे१
Fri, 09/25/2015 - 02:06 नवीन
मायला. आय माय स्वारी बरका. कोण सं, कोण सा सं, कोण स्व सं आणि कोण काय करतंय काही कळत नाही राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सुरेख रचना

एक एकटा एकटाच
Fri, 09/25/2015 - 00:16 नवीन
सुरेख रचना
  • Log in or register to post comments

सुंदर !

मनीषा
Tue, 10/06/2015 - 14:27 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण

माहीराज
Fri, 10/09/2015 - 18:01 नवीन
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, तुझ्या स्वप्नातलं माझं ते तुझ्यात हरवुन जाणं.. हे कसं वाटतंय. .
  • Log in or register to post comments

मस्त!

रातराणी
Sat, 10/10/2015 - 01:46 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहीराज

वा! छान कविता.

रेवती
Sat, 10/10/2015 - 01:49 नवीन
वा! छान कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा