अवधूत (भाग-४)
बैराग्यानं सल्ला देऊन बरेच दिवस लोटले होते. त्यानं त्र्यंबकेश्वरला जायचा विचार फारसा काही केला नव्हता. पण एके दिवशी मात्र त्याची इच्छा नसून देखील पावले त्र्यंबकेश्वरकडे वळली. काय घडू शकेल, ही उत्सुकता आणि कदाचित काही घडणार देखील नाही, ही निराश करणारी भावना.
भर दुपारच्या वेळेस तो निघाला. हिवाळ्याचे दिवस. पण आज सूर्य फारच त्रासदायक वाटत होता. त्याच्या अंगात देखील थोडासा ताप जाणवत होता. सकाळपासून त्यानं काही खाल्लेलं सुद्धा नव्हतं. विचार करण्यातच बराचसा वेळ वाया गेलेला होता.
संध्याकाळ होईतो, आभाळ चांगलंच भरून आलं. लालसर जांभळ्या रंगांचे अवकाळी पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले. पानगळ झालेल्या झाडांच्या पार्श्वभूमीला ते काळे ढग अजूनच भयकारी दिसत होते. अभद्र शिट्ट्या वाजवत वारा देखील धूळ उडवत घुमू लागला. एक खिन्न, उदासवाणं वातावरण सर्वत्र निर्माण झालं. थोड्याच वेळात तडतड करत पाऊस जोराने कोसळू लागला. असा मोठा मोठा थेंब! जवळच्या एका झाडाखाली आश्रय घेईपर्यंत तो पुरता भिजलेला होता. बराच वेळ झाडाखाली उभं राहून देखील पाऊस काही थांबण्याची लक्षणं दिसेनात. अंगात ताप जाणवत होताच. जवळपास एखादं गाव असेल तर रात्रीपुरता निवारा तरी शोधता येईल, या हेतूने पडत्या पावसात तो निघाला.
काही अंतरावरच एक दमछाक करणारा उंचवटा लागला. वरती पोहोचल्यावर थोड्याच अंतरावर एक गाव आहे, असं त्याच्या लक्षात आलं. भराभर पाय उचलत तो चालू लागला. संपूर्ण रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. गावाच्या बाहेरच एक काळोखात बुडालेलं, थोडंसं एकाकी असं छोटंसं घर त्याला दिसलं. खिडकीच्या गजातून आतला मंद पिवळसर प्रकाश बाहेर येत होता. त्या घराच्या आश्रयाला थंडीने थरथर कापत तो उभा राहिला. आता फार वाईट अवस्था झालेली होती त्याची. अंगात ताप भलताच चढला होता. अचानक दार खडखड वाजवीत एक प्रौढ स्त्री बाहेर डोकावली
“कुणाचा रे तू? कुठून आलास?”
“मी त्र्यंबकेश्वरला चाललोय. सप्तशृंगीवरून आलोय.”
“संन्यासी दिसतोस!”
“हं!”
“ये, आत ये बाबा. भिजलायस बराच”.
थोडा विचार करून तो आत घरात शिरला. बाहेरील थंडीच्या तुलनेत आत बर्यापैकी उबदार वाटत होतं. तीन-चार दिवे लावल्यामुळे अंधार असा आत वाटतच नव्हता. एका कोपर्यात मस्तपैकी शेगडी फुललेली होती. तिच्या उबेला तो चटकन जाऊन बसला. त्या स्त्रीनं त्याला अंग पुसायला एक कोरडं कापड दिलं आणि परत आतल्या खोलीत ती निघून गेली. कदाचित स्वयंपाकघर असावं. घरात दोनच खोल्या दिसत होत्या.
त्यानं खसाखसा अंग कोरडं करुन घेतलं. आणि शेगडीच्या उबेला अंग शेकत बसला. थोडंसं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तापाने परत उचल खाल्ली. सगळ्या शरीरातील शक्ती गळून गेल्यासारखं झालं. भेलकांडत एखाद्या गर्दुल्यासारखा तो भिंतीला जाऊन टेकला. तेवढ्यात ती स्त्री बाहेर आली. तिच्या हातात दुधाचा पेला होता. हळद आणि आलं घातलेला.
“हे पी. तुला थोडं बरं वाटेल.”
थरथरत्या हाताने त्याने तो पेला घेतला. तापाने जिभेला चव काही कळतच नव्हती, पण तो उष्ण कढत द्रव पिल्यावर त्याला खरंच खूप बरं वाटलं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं. अचानक तेव्हाच कडाडदिशी एक वीज चमकली. खिडकीच्या गजातून तिचा प्रकाश आत आला असेल-नसेल त्या क्षणार्धात तिचा चेहेरा उजळून निघाला. क्षणभर त्याला असा भास झाला की त्या चेहेर्याच्या जागी काहीच नव्हतं. पण क्षणभरच! पुन्हा तिचा खानदानी, आदबशीर तरीही अनामिक दुःखांनी भरलेला चेहरा त्या जागी दृग्गोचर झाला.
(क्रमशः)
वाचने
16227
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
मांत्रिक भौ
In reply to मांत्रिक भौ by बाबा योगिराज
+1111
त्रोटक.
In reply to त्रोटक. by द-बाहुबली
नवरात्रीसाठी पण दोन लेख तयार
लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर . पण
In reply to लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर . पण by पद्मावति
पुढचा भाग थोडा मोठा आहे,
भाषेचा बाज अत्यंत सुरेख आहे.
In reply to भाषेचा बाज अत्यंत सुरेख आहे. by प्यारे१
धन्यवाद प्यारे१!!!
मागचे भाग वाचले नाहीत.
पुभाप्र! सुंदर लिहताय!
काय नेम्क्या ठिकाणी थांबवलंत.
दिनु खुश झाला
सुंदर!
खूप वाट पाहायला लावलीत...
सुरेख
In reply to सुरेख by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद पैजारबुवा! अगदी बरोबर
मस्त. पण छोटा झालाय . मागच्या
In reply to मस्त. पण छोटा झालाय . मागच्या by तुडतुडी
तेवढंच जमत नाही अजून! आता बघू
वर्णनशैली खूपच छान आहे.
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट,
मी या पुर्वीचे भाग वाचले नाही
सुरेख!
मस्त भाग, पुढच्या भागाच्या
छान!! वाचतोय..
चारी भाग एकदम वाचून काढले...
पुढील भाग लवकर येऊ द्या
मी आतापर्यंतचे सगळे
In reply to मी आतापर्यंतचे सगळे by चांदणे संदीप
???
In reply to ??? by मांत्रिक
गंमतीत
सर्व वाचक व प्रतिसाद
सर्व भाग एकदम वाचले. खुप
जरा जास्तच त्रोटक वाटला हा
In reply to जरा जास्तच त्रोटक वाटला हा by बॅटमॅन
धन्यवाद!!! वाल्गुदनरजी!!!
In reply to जरा जास्तच त्रोटक वाटला हा by बॅटमॅन
सहमत आणि सहमत.
मस्त. छान लिहितायत तुम्ही.
मस्तय
भाग लहान होता पण उत्सुकता
वाचतिये.
पु भा प्र