✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवधूत (भाग-४)

म
मांत्रिक यांनी
Tue, 09/22/2015 - 18:11  ·  लेख
लेख
बैराग्यानं सल्ला देऊन बरेच दिवस लोटले होते. त्यानं त्र्यंबकेश्वरला जायचा विचार फारसा काही केला नव्हता. पण एके दिवशी मात्र त्याची इच्छा नसून देखील पावले त्र्यंबकेश्वरकडे वळली. काय घडू शकेल, ही उत्सुकता आणि कदाचित काही घडणार देखील नाही, ही निराश करणारी भावना. भर दुपारच्या वेळेस तो निघाला. हिवाळ्याचे दिवस. पण आज सूर्य फारच त्रासदायक वाटत होता. त्याच्या अंगात देखील थोडासा ताप जाणवत होता. सकाळपासून त्यानं काही खाल्लेलं सुद्धा नव्हतं. विचार करण्यातच बराचसा वेळ वाया गेलेला होता. संध्याकाळ होईतो, आभाळ चांगलंच भरून आलं. लालसर जांभळ्या रंगांचे अवकाळी पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले. पानगळ झालेल्या झाडांच्या पार्श्वभूमीला ते काळे ढग अजूनच भयकारी दिसत होते. अभद्र शिट्ट्या वाजवत वारा देखील धूळ उडवत घुमू लागला. एक खिन्न, उदासवाणं वातावरण सर्वत्र निर्माण झालं. थोड्याच वेळात तडतड करत पाऊस जोराने कोसळू लागला. असा मोठा मोठा थेंब! जवळच्या एका झाडाखाली आश्रय घेईपर्यंत तो पुरता भिजलेला होता. बराच वेळ झाडाखाली उभं राहून देखील पाऊस काही थांबण्याची लक्षणं दिसेनात. अंगात ताप जाणवत होताच. जवळपास एखादं गाव असेल तर रात्रीपुरता निवारा तरी शोधता येईल, या हेतूने पडत्या पावसात तो निघाला. काही अंतरावरच एक दमछाक करणारा उंचवटा लागला. वरती पोहोचल्यावर थोड्याच अंतरावर एक गाव आहे, असं त्याच्या लक्षात आलं. भराभर पाय उचलत तो चालू लागला. संपूर्ण रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. गावाच्या बाहेरच एक काळोखात बुडालेलं, थोडंसं एकाकी असं छोटंसं घर त्याला दिसलं. खिडकीच्या गजातून आतला मंद पिवळसर प्रकाश बाहेर येत होता. त्या घराच्या आश्रयाला थंडीने थरथर कापत तो उभा राहिला. आता फार वाईट अवस्था झालेली होती त्याची. अंगात ताप भलताच चढला होता. अचानक दार खडखड वाजवीत एक प्रौढ स्त्री बाहेर डोकावली “कुणाचा रे तू? कुठून आलास?” “मी त्र्यंबकेश्वरला चाललोय. सप्तशृंगीवरून आलोय.” “संन्यासी दिसतोस!” “हं!” “ये, आत ये बाबा. भिजलायस बराच”. थोडा विचार करून तो आत घरात शिरला. बाहेरील थंडीच्या तुलनेत आत बर्‍यापैकी उबदार वाटत होतं. तीन-चार दिवे लावल्यामुळे अंधार असा आत वाटतच नव्हता. एका कोपर्‍यात मस्तपैकी शेगडी फुललेली होती. तिच्या उबेला तो चटकन जाऊन बसला. त्या स्त्रीनं त्याला अंग पुसायला एक कोरडं कापड दिलं आणि परत आतल्या खोलीत ती निघून गेली. कदाचित स्वयंपाकघर असावं. घरात दोनच खोल्या दिसत होत्या. त्यानं खसाखसा अंग कोरडं करुन घेतलं. आणि शेगडीच्या उबेला अंग शेकत बसला. थोडंसं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तापाने परत उचल खाल्ली. सगळ्या शरीरातील शक्ती गळून गेल्यासारखं झालं. भेलकांडत एखाद्या गर्दुल्यासारखा तो भिंतीला जाऊन टेकला. तेवढ्यात ती स्त्री बाहेर आली. तिच्या हातात दुधाचा पेला होता. हळद आणि आलं घातलेला. “हे पी. तुला थोडं बरं वाटेल.” थरथरत्या हाताने त्याने तो पेला घेतला. तापाने जिभेला चव काही कळतच नव्हती, पण तो उष्ण कढत द्रव पिल्यावर त्याला खरंच खूप बरं वाटलं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं. अचानक तेव्हाच कडाडदिशी एक वीज चमकली. खिडकीच्या गजातून तिचा प्रकाश आत आला असेल-नसेल त्या क्षणार्धात तिचा चेहेरा उजळून निघाला. क्षणभर त्याला असा भास झाला की त्या चेहेर्‍याच्या जागी काहीच नव्हतं. पण क्षणभरच! पुन्हा तिचा खानदानी, आदबशीर तरीही अनामिक दुःखांनी भरलेला चेहरा त्या जागी दृग्गोचर झाला. (क्रमशः)

Book traversal links for अवधूत (भाग-४)

  • ‹ अवधूत (भाग-३)
  • Up
  • अवधूत (भाग-५) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
16203 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

मांत्रिक भौ

बाबा योगिराज
Tue, 09/22/2015 - 18:16 नवीन
किती वाट बघायला लावलीत
  • Log in or register to post comments

+1111

दमामि
Tue, 09/22/2015 - 19:32 नवीन
+1111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

त्रोटक.

द-बाहुबली
Tue, 09/22/2015 - 18:31 नवीन
  • Log in or register to post comments

नवरात्रीसाठी पण दोन लेख तयार

मांत्रिक
Tue, 09/22/2015 - 19:43 नवीन
नवरात्रीसाठी पण दोन लेख तयार करतोय. आई जगदंबेच्या भक्तांना मोठीच भेट ठरेल अशी आशा आहे. खूप आव्हानात्मक आहेत. त्यासाठी देखील वेळ द्यावा लागतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर . पण

पद्मावति
Tue, 09/22/2015 - 19:16 नवीन
लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर . पण हा भाग फारच लहान झालाय. मागचा भाग पण असाच लहान होता. प्लीज़ जरा मोठे भाग टाका.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग थोडा मोठा आहे,

मांत्रिक
Tue, 09/22/2015 - 19:19 नवीन
पुढचा भाग थोडा मोठा आहे, विस्तृत संवादरूपात आहे, त्यामुळे आज इथेच ब्रेक घ्यावा लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

भाषेचा बाज अत्यंत सुरेख आहे.

प्यारे१
Tue, 09/22/2015 - 20:09 नवीन
भाषेचा बाज अत्यंत सुरेख आहे. पु भा प्र.
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्यारे१!!!

मांत्रिक
Tue, 09/22/2015 - 21:40 नवीन
धन्यवाद प्यारे१!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मागचे भाग वाचले नाहीत.

जव्हेरगंज
Tue, 09/22/2015 - 23:49 नवीन
मागचे भाग वाचले नाहीत. हाच भाग पहिल्यांदा वाचला. तरीही आवडला. शब्द कसे अगदी कसुन वापरलेत. सकस कसदार लेखन. आता पहिले तीन भाग वाचायलाच हवे.
  • Log in or register to post comments

पुभाप्र! सुंदर लिहताय!

रातराणी
Wed, 09/23/2015 - 00:35 नवीन
पुभाप्र! सुंदर लिहताय!
  • Log in or register to post comments

काय नेम्क्या ठिकाणी थांबवलंत.

असंका
Wed, 09/23/2015 - 07:11 नवीन
काय नेम्क्या ठिकाणी थांबवलंत...! मानलं आपल्याला!!! ;-) सुरेख सुरु आहे गोष्ट...! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

दिनु खुश झाला

दिनु गवळी
Wed, 09/23/2015 - 08:46 नवीन
खरचं खुप छान लिहीताय आज पहाटेपासुनच वाचत होतो राव मस्त आहे आमच्या कडचे वातावरण लयच भारी तयार केलय
  • Log in or register to post comments

सुंदर!

बोका-ए-आझम
Wed, 09/23/2015 - 08:50 नवीन
वाचायला सुरूवात नाही केली तोच संपला हा भाग. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

खूप वाट पाहायला लावलीत...

शित्रेउमेश
Wed, 09/23/2015 - 11:20 नवीन
खूप वाट पाहायला लावलीत... पुढचा भाग लवकर येवुदेत.... आणि मोठा पण....
  • Log in or register to post comments

सुरेख

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/23/2015 - 11:29 नवीन
हा भागही आवडला. तुमचे भाषेवरचे प्रभुत्व लाजवाब आहे. संथलयीतल्या ओघवत्या वर्णनांमुळे वाचायला मजा येते आहे. पुढचे भाग लवकर प्रकाशित करा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैजारबुवा! अगदी बरोबर

मांत्रिक
Wed, 09/23/2015 - 20:17 नवीन
धन्यवाद पैजारबुवा! अगदी बरोबर! कथेतील नाट्य, भव्यता, वेडीवाकडी वळणे यापेक्षा मला बारीक डिटेलिंगवर भर देऊन वाचकाला तेथे प्रत्यक्ष न्यायला आवडतं. मात्र दुसर्या लेखांच्या तयारीत असल्याने अवधूतकडे जरासं दुर्लक्ष झालं असं मलाही आता वाटू लागलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मस्त. पण छोटा झालाय . मागच्या

तुडतुडी
Wed, 09/23/2015 - 17:09 नवीन
मस्त. पण छोटा झालाय . मागच्या भागाची लिंक देत जावा कि राव वरती .
  • Log in or register to post comments

तेवढंच जमत नाही अजून! आता बघू

मांत्रिक
Wed, 09/23/2015 - 20:35 नवीन
तेवढंच जमत नाही अजून! आता बघू सं.मं.नी केलं तरच! आपल्याला तर नै जमणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

वर्णनशैली खूपच छान आहे.

प्रचेतस
Wed, 09/23/2015 - 17:24 नवीन
वर्णनशैली खूपच छान आहे.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट,

नीलमोहर
Wed, 09/23/2015 - 17:40 नवीन
वातावरण निर्मिती खरंच सुरेख जमते तुम्हाला, स्वतः त्याप्रसंगी उपस्थित राहून सर्व पहात असल्यासारखं वाटलं...
  • Log in or register to post comments

मी या पुर्वीचे भाग वाचले नाही

Sanjay Uwach
Wed, 09/23/2015 - 18:09 नवीन
मी या पुर्वीचे भाग वाचले नाही आहेत. आपली भाषा एखाद्या विशिष्ट लेखना साठी फार ओजस्वी आहे. छान लेखन आवडले
  • Log in or register to post comments

सुरेख!

पैसा
Wed, 09/23/2015 - 22:25 नवीन
छान लिहिताय!
  • Log in or register to post comments

मस्त भाग, पुढच्या भागाच्या

कविता१९७८
गुरुवार, 09/24/2015 - 09:21 नवीन
मस्त भाग, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

छान!! वाचतोय..

संजय पाटिल
गुरुवार, 09/24/2015 - 10:39 नवीन
छान!! वाचतोय.. मोठ्या भागाची प्रतीक्षा..
  • Log in or register to post comments

चारी भाग एकदम वाचून काढले...

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2015 - 11:11 नवीन
चारी भाग एकदम वाचून काढले... छान लिहीताय. पुभाप्र !
  • Log in or register to post comments

पुढील भाग लवकर येऊ द्या

gogglya
गुरुवार, 09/24/2015 - 13:00 नवीन
इतकी प्रतिक्षा करणे जीवावर येतेय...
  • Log in or register to post comments

मी आतापर्यंतचे सगळे

चांदणे संदीप
गुरुवार, 09/24/2015 - 13:05 नवीन
मी आतापर्यंतचे सगळे भाग वाचलेत पण प्रतिक्रिया देणार नाहीच्च! शेवटाच्या भागाला छान लां…बलचक्क प्रतिक्रिया देणार आहे ;) आर्र गंडलो बहुतेक :(
  • Log in or register to post comments

???

मांत्रिक
गुरुवार, 09/24/2015 - 14:06 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

गंमतीत

चांदणे संदीप
गुरुवार, 09/24/2015 - 14:17 नवीन
जरा गंमतीत लिहिलेला प्रतिसाद होता तो! वाचतोय! सगळेच भाग आवडलेत! पुभाप्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

सर्व वाचक व प्रतिसाद

मांत्रिक
Fri, 09/25/2015 - 13:03 नवीन
सर्व वाचक व प्रतिसाद कर्त्यांचे आभार!!! भाग मोठा करणे फारसे शक्य नाही. पाणी टाकून फजिती होईल. पण २ भाग एकत्र करुन टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
  • Log in or register to post comments

सर्व भाग एकदम वाचले. खुप

राजाभाउ
Fri, 09/25/2015 - 16:13 नवीन
सर्व भाग एकदम वाचले. खुप सुंदर !!! तुमची शैली जबरदस्त आहे. पुभाप्र
  • Log in or register to post comments

जरा जास्तच त्रोटक वाटला हा

बॅटमॅन
Fri, 09/25/2015 - 16:26 नवीन
जरा जास्तच त्रोटक वाटला हा भाग, वर्णन मस्त आहे हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!! वाल्गुदनरजी!!!

मांत्रिक
Fri, 09/25/2015 - 22:05 नवीन
धन्यवाद!!! वाल्गुदनरजी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सहमत आणि सहमत.

यशोधरा
Fri, 09/25/2015 - 22:10 नवीन
सहमत आणि सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्त. छान लिहितायत तुम्ही.

अभ्या..
Fri, 09/25/2015 - 22:11 नवीन
मस्त. छान लिहितायत तुम्ही. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्तय

एक एकटा एकटाच
Fri, 09/25/2015 - 22:30 नवीन
मस्तय नेहमीप्रमाणेच पुढील लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

भाग लहान होता पण उत्सुकता

निनाद मुक्काम …
Sat, 09/26/2015 - 23:39 नवीन
भाग लहान होता पण उत्सुकता अजून चाळवल्या गेली आहे पुढे काय होणार कथेला काय वळण लागणार पुढचा भाग मोठा येऊ दे मालक
  • Log in or register to post comments

वाचतिये.

रेवती
Tue, 11/24/2015 - 02:55 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments

पु भा प्र

रुस्तम
Wed, 02/03/2016 - 22:24 नवीन
मांत्रिक भाऊ, पु भा कुठे आहे?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा