✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोडी सोडवा

_
_मनश्री_ यांनी
Sun, 09/20/2015 - 18:28  ·  लेख
लेख
दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी १ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ? तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत कमी किंवा जास्त नाही तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?... (प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
54389 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

हे बर नव्हं

दिवाकर कुलकर्णी
Wed, 09/23/2015 - 11:51 नवीन
आमासनी टायपायला येल लागतोय, तर दिपोटी साब तुमी आदिच जबाब दिवून मोकला जालाचा व्हय.
  • Log in or register to post comments

:-))

असंका
Wed, 09/23/2015 - 12:29 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

:))

दिपोटी
Wed, 09/23/2015 - 12:54 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

बरोबर !!!

राजाभाउ
Wed, 09/23/2015 - 13:30 नवीन
बरोबर !!!
  • Log in or register to post comments

अजुन एक

राजाभाउ
Wed, 09/23/2015 - 13:56 नवीन
अजुन एक तुम्हाला काही महत्वाचे कागदपत्र तुमच्या मित्राला एका सुटकेस /ट्रंक मधून पाठवायचे आहेत. सुटकेसला नेहमीचे कुलूप (म्हणजे नंबर लॉक नाही) असून त्याची फक्त एकच किल्ली आहे व ती तुच्या कडे आहे. तुम्ही ती किल्ली कधीही कोणालाही देऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वता: मित्राकडे जाऊन कुलूप उघुडून देऊ शकत नाही (अर्थात तुम्ही जाऊ शकत नाही म्हणूनच तर ती सुटकेस मधून पाठवत आहात). सुटकेस साधी असून त्या मध्ये चोरकप्पा वगैरे असली काहीही ट्रिक नाही. तर काय करावे लागेल कि ज्या मुळे ती कागदपत्र मित्राला मिळतील
  • Log in or register to post comments

सुट्केस अशीच कुलुप लावुन

कानडा
Wed, 09/23/2015 - 14:11 नवीन
सुट्केस अशीच कुलुप लावुन मित्राला पाठवा. मित्र त्याच्याकडील अजुन एक दुसरे कुलुप लावुन व चावी स्वतःकडे ठेवुन ती सुटकेस परत पाठवेल. आता तुमचे कुलुप काढुन घ्या आणि सुटकेस परत मित्राला पाठवा. मित्र त्याचे कुलुप उघडुन कागदपत्रे मिळवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

बरोबर आहे.

राजाभाउ
Wed, 09/23/2015 - 14:21 नवीन
बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा

बरोबर..

योगी९००
Wed, 09/23/2015 - 16:55 नवीन
बरोबर उत्तर...!! सुट्केस अशीच कुलुप लावुन मित्राला पाठवा याऐवजी सुटकेस मध्ये पहिल्यांदा महत्वाची कागदपत्रे टाका आणि आणि मग आपले कुलुप लावा...असे हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा

मित्राला तुम्हाला एक कुलुप

अमेरिकन त्रिशंकू
गुरुवार, 09/24/2015 - 23:33 नवीन
मित्राला तुम्हाला एक कुलुप आणि त्याची किल्ली पाठवायला सांगा. कुलपाची दुसरी किल्ली मित्राकडेच असेल. तुमच्या बॅगमध्ये कागद्पत्रं घाला. मित्राचे कुलूप बॅगला लावा आणि बॅग पाठवून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

ब्रोबर आहे

राजाभाउ
Wed, 09/23/2015 - 14:21 नवीन
ब्रोबर आहे
  • Log in or register to post comments

६४ चेंडंू चं कोडं ७१ वजनात मी

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2015 - 21:28 नवीन
६४ चेंडंू चं कोडं ७१ वजनात मी सोडवू शकतो,६८ वेला वर विचार चालू आ हे नक्की येइल थोडा वेल लागोल
  • Log in or register to post comments

वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे.

दिपोटी
Fri, 09/25/2015 - 05:27 नवीन
वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

मनरंगजी

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2015 - 21:35 नवीन
मनरंगजी व्यनी करतो थोडा वेल द्या,
  • Log in or register to post comments

गणेश उत्सव वर्गणी कोडया चे

दिवाकर कुलकर्णी
Fri, 09/25/2015 - 16:31 नवीन
गणेश उत्सव वर्गणी कोडया चे काय झाल?
  • Log in or register to post comments

६४ चेडूचे उत्तर चूक आहे ,समजा

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/27/2015 - 12:12 नवीन
६४ चेडूचे उत्तर चूक आहे ,समजा पहिल्यांदा २ चेंडूचे वजन करतानाच सर्वात जड व त्या नंतरचा जड हे कॉंबि. आल्यास,दोन नंबरचा जड चेडू पहिल्याच खेपेलै बाहेर जाईल जो पुन: मोजणीत कधीच येणार नाही उत्तर समजवावे सविस्तर
  • Log in or register to post comments

येथे पहा!

दिपोटी
Sun, 09/27/2015 - 15:45 नवीन
दिवाकर कुलकर्णी, http://www.misalpav.com/comment/746272#comment-746272 येथे कानडाऊ योगेशु यांनी दिलेले दोन प्रतिसाद दिले आहेत, ते पहा ... दोन्ही प्रतिसाद मिळून उत्तर तयार होते. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

७७ मनी असतात

सीमा ज. निघोट
Tue, 09/29/2015 - 00:20 नवीन
७७ मनी असतात
  • Log in or register to post comments

मनी

सीमा ज. निघोट
Tue, 09/29/2015 - 00:26 नवीन
७७ मनी ७ जनात ११ मनी प्रतेकी वाट्तात
  • Log in or register to post comments

आणखीन् एक नवीन कोडे

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 10/01/2015 - 22:02 नवीन
आणखीन् एक नवीन कोडे एका हेअर कटिंग सलून मध्ये तीन न्हावी आहेत,सात माणसे एकदम केस कापायला आली, त्यांच्या केसाच्या वाढीवरून त्याना केस कापायला १०,११,१०,१९,११,१०,१८ मिनिटे वेल लागेल, कोणत्या क्रमाने केस कापल्यास कमीतकमी वेल लागेल? हे कोडे वाटते तीतके सोपे नाही,
  • Log in or register to post comments

केस कापायचा वेल १० , ११

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 10/01/2015 - 22:07 नवीन
केस कापायचा वेल १० , ११ ,१० ,१९ १२, १० ,१८ असा वाचावा
  • Log in or register to post comments

एकुण वेळ ३० मिनिटे

कानडा
Fri, 10/02/2015 - 18:25 नवीन
क्रम :- १. १० २. ११ ३. १२ ४. १० ५. १९ ६. १८ ७. १०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

बरोबर !

दिवाकर कुलकर्णी
Fri, 10/02/2015 - 19:23 नवीन
बरोबर !
  • Log in or register to post comments

अजून एक नवीन कोडे

दिवाकर कुलकर्णी
Sat, 10/03/2015 - 14:47 नवीन
अजून एक नवीन कोडे खरं तर हे जास्त गणित आहे,थोडे कोडे आहे, कांही विद्यार्थि एस् टी ने सहलास जात होते,भाड्या साठी त्यानी प्रत्येकाने नऊ नोटा कंडक्टरला दिल्या ,या नऊ नोटापैकि दोन नोटा,प्रत्येकि दोन रु. च्याहोत्या,त्या सर्व विद्यार्थांचे एकूण भाडे ८४१ रु. झाले,तर कंडक्टरला मि ळालेल्या भाड्यात १० रू. च्या किती नोटा होत्या?
  • Log in or register to post comments

३०१ मोती

मराठी कथालेखक
गुरुवार, 09/15/2016 - 12:36 नवीन
३०१ मोती
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा