✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोडी सोडवा

_
_मनश्री_ यांनी
Sun, 09/20/2015 - 18:28  ·  लेख
लेख
दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी १ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ? तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत कमी किंवा जास्त नाही तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?... (प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
54389 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

१२-१५

प्यारे१
Sun, 09/20/2015 - 22:07 नवीन
१२-१५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

६,६,१ नसावीत

स्वप्नज
Sun, 09/20/2015 - 22:07 नवीन
६,६,१ नसावीत. कारण ती बाई म्हणते की मोठ्या मुलीला हार्मोनियम वाजवता येते. ६,६ मधील मोठी कोण मग?
  • Log in or register to post comments

बरोबर. म्हणून २ २ ९

अनुप ढेरे
Sun, 09/20/2015 - 22:37 नवीन
बरोबर. म्हणून २ २ ९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

९,४,१

चाणक्य
Sun, 09/20/2015 - 22:41 नवीन
९,४,१ ही असू शकतं की मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अब बस भी करो. ;)

प्यारे१
Sun, 09/20/2015 - 22:56 नवीन
अब बस भी करो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

तेच म्हणतो आता वरिल कोड्यात

प्रमोद देर्देकर
Wed, 09/23/2015 - 09:53 नवीन
तेच म्हणतो आता वरिल कोड्यात घरचा नंबर तेरा आहे हे कुठे सांगितले आहे. सगळेच जण तेरा नंबरच का अडुन बसलेत? गणत्याच्या अडत्या पम्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शेवटी सांगितलंय बघा एका

असंका
Wed, 09/23/2015 - 09:57 नवीन
शेवटी सांगितलंय बघा एका साहेबांनी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

९,४,१ असते तर अजून एका क्लु

वगिश
Sun, 09/20/2015 - 23:33 नवीन
९,४,१ असते तर अजून एका क्लु ची गरज नव्हती. म्हणून ९, ४,१ बाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु

संजय पाटिल
Sun, 09/20/2015 - 22:08 नवीन
७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु झाला..आता झोपतो..
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 22:19 नवीन
हाहाहाहा खरय हे माझ्या लहान भावाने टाकायला लावलं मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

बरोबर उत्तर कोणते?

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 23:20 नवीन
घराचा नंबर १३ आहे, पण १३ ची दोन कॉंबिनेशन येतात,६,६,१गुणाकार३६ बेरीज १३ व९,२,२ गुणाकार ३६व बेरीज १३ म्हणून विक्रेता गोंधलात पडतो,पण जेव्हां त्या बाईला एक मोठे अपत्य असल्याचा उल्लेख येतो तेव्हां नॉचरली ९,२,२ हे कॉंबि. ग्राह्य ठरते.(९ ,४ , १हे कॉंबि.अयोग्य कारण याची बरीज १४येते.)
  • Log in or register to post comments

घराचा नंबर असा आहे की

वगिश
Sun, 09/20/2015 - 23:39 नवीन
घराचा नंबर असा आहे की त्यावरुन उत्तर मिळवण्यासाठी अजून माहिती लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

ती माहिती कोड्यात आहे

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 23:49 नवीन
बाईला एक मोठी मुलगी(अपत्या) आहे.(हार्मो.वाजवणे हे गौण व दिशाभूल करणारेआहे)
  • Log in or register to post comments

आणखी एक कोडे

गॅरी ट्रुमन
Mon, 09/21/2015 - 16:15 नवीन
खाली दिलेले कोडे पूर्वी खरडफळ्यावर विचारले होते. तेच कोडे इथेही प्रतिसादात विचारत आहे. ज्यांना उत्तर माहित आहे (खरडफळ्यावर वाचल्यामुळे) त्यांनी ते फोडू नये ही विनंती. हे कोडे म्हणजे Mother of all puzzles असे आहे. लोकसभेत ५४५ सदस्य आहेत आणि त्या सदस्यांना लोकसभेचा अध्यक्ष निवडायचा आहे.खूप-साऱ्या बैठका घेऊनही नक्की कोणाला अध्यक्ष म्हणून निवडायचे यावर एकमत होईना.मग उपाय म्हणून प्रथम सर्व सदस्यांना एका गोलामध्ये उभे केले गेले.त्यानंतर एका सदस्याला १, त्याच्या clockwise लागून असलेल्या सदस्याला २, त्यानंतर clockwise असलेल्या सदस्याला ३ अशा प्रकारे सर्व सदस्यांना १ ते ५४५ असे क्रमांक दिले गेले. त्यानंतर every alternate सदस्याला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. म्हणजे सदस्य क्रमांक २,४,६...५४४ हे सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अजूनही रिंगणात असलेल्या सदस्यांपैकी every alternate सदस्याला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. म्हणजे दुसऱ्या फेरीत सर्वप्रथम १ क्रमांकाचा सदस्य बाहेर पडला. कारण ५४४ क्रमांकाचा सदस्य पूर्वीच बाहेर गेला.५४५ क्रमांकाचा अजूनही शर्यतीत आहेच.त्यानंतरचा पुढचा म्हणजे १ क्रमांकाचा सदस्य बाहेर पडला.त्यानंतर २ क्रमांकाचा पूर्वीच बाहेर पडला असल्यामुळे ३ क्रमांकाचा सदस्य शर्यतीत टिकला आणि ५ क्रमांकाचा सदस्य बाहेर पडला (कारण ४ क्रमांकाचा सदस्य पूर्वीच बाहेर पडला होता). मग ७ टिकला आणि ९ बाहेर पडला. अशा प्रकारे केवळ एकच सदस्य शिल्लक राहीपर्यंत हा खेळ चालू राहिला.त्या सदस्याला लोकसभेचे अध्यक्षपद मिळाले. या अध्यक्षाचा नक्की सदस्य क्रमांक काय?
  • Log in or register to post comments

९५

नया है वह
Mon, 09/21/2015 - 17:53 नवीन
९५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

सुधारणा

नया है वह
Mon, 09/21/2015 - 18:37 नवीन
६७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नया है वह

कोड्याचे उत्तर

गॅरी ट्रुमन
Tue, 09/22/2015 - 10:32 नवीन
धन्यवाद नया है वह. तुमचे उत्तर बरोबर आहे. योगी९०० यांनीही दोन उत्तरे दिली आहेत त्यातील एक उत्तर बरोबर आहे. पदम यांचे उत्तर बहुतेक एखादा आकडा इकडेतिकडे झाल्यामुळे चुकलेले दिसते. तेव्हा कालच्या कोड्याचे उत्तर पुढीलप्रमाणे-- हे कोडे जोसेफस फ्लॅव्हिअसच्या तत्वावर आधारीत आहे.त्या विषयाशी संबंधित लोक सोडून इतरांना (माझ्यासकट) हे तत्व माहित नक्कीच नसणार. तरीही हे कोडे सोडवता येईल.यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे लहान आकडे वापरून काही पॅटर्न दिसतो का हे बघायचे आणि तो पॅटर्न मोठ्या आकड्यांसाठी extrapolate करायचा. प्रत्येक alternate लोकसभा सदस्य शर्यतीतून बाहेर पडणार आहे हे लक्षात घेता २ च्या घाताशी काहीतरी संबंध असणार हे लक्षात येण्याइतका mathematical bent असल्यास उत्तर लवकर मिळेल. अन्यथा थोडा जास्त वेळ लागेल. सुरवात करू १ पासून. १ सदस्य: अर्थात सदस्य क्रमांक १ अध्यक्ष बनेल. २ सदस्य: पहिल्या फेरीत सदस्य क्रमांक २ बाहेर पडेल आणि सदस्य क्रमांक १ अध्यक्ष बनेल. ३ सदस्य: पहिल्या फेरीत स.क्र. २ बाहेर पडेल.मग स.क्र. १ बाहेर पडेल आणि स.क्र. ३ अध्यक्ष बनेल. ४ सदस्य: पहिल्या फेरीत स.क्र. २ आणि ४ बाहेर पडतील. मग स.क्र.३ बाहेर पडेल आणि स.क्र. १ अध्यक्ष बनेल. ५ सदस्य: पहिल्या फेरीत स.क्र. २ आणि ४ बाहेर पडतील. मग स.क्र. १ आणि ५ बाहेर पडतील आणि स.क्र. ३ अध्यक्ष बनेल. ६ सदस्य: पहिल्या फेरीत स.क्र. २, ४ आणि ६ बाहेर पडतील. मग स.क्र. ३ आणि १ बाहेर पडतील आणि स.क्र. ५ अध्यक्ष बनेल. ७ सदस्य: पहिल्या फेरीत स.क्र. २, ४ आणि ६ बाहेर पडतील. मग स.क्र. १, ५ आणि त्यानंतर स.क्र. १ बाहेर पडेल. आणि स.क्र. ७ अध्यक्ष बनेल. ८ सदस्य: पहिल्या फेरीत स.क्र. २, ४, ६ आणि ८ बाहेर पडतील. मग दुसऱ्या फेरीत स.क्र. ३ आणि ७ बाहेर पडतील. तिसऱ्या फेरीत स.क्र. ५ बाहेर पडेल आणि स.क्र. १ अध्यक्ष बनेल. म्हणजे आपल्याला पुढील पॅटर्न दिसतो-- सदस्यांची संख्या अध्यक्ष क्रमांक १ १ २ १ ३ ३ ४ १ ५ ३ ६ ५ ७ ७ ८ १ ८ पेक्षा जास्त सदस्य असल्यास काय होते हा exercise मी वाचकांवर सोडतो. पण ९,१०,११,१२,१३,१४,१५ आणि १६ सदस्य असल्यास अनुक्रमे ३,५,७,९,११,१३,१५ आणि १ क्रमांकाचे सदस्य लोकसभा अध्यक्ष बनतील हे पडताळून बघता येईल. म्हणजेच आपल्याला हवा असलेला पॅटर्न दिसतो. जर सदस्य संख्या २ चा घात असेल तर १ क्रमांकाचा सदस्य अध्यक्ष होईल. म्हणजे जर सदस्य संख्या २‍^न असेल तर १ क्रमांकाचा सदस्य अध्यक्ष बनेल. आणि जर सदस्य संख्या २‍^न+१ असेल तर ३ क्रमांकाचा सदस्य अध्यक्ष बनेल, जर सदस्य संख्या २‍^न+२ असेल तर ५ क्रमांकाचा सदस्य अध्यक्ष बनेल. म्हणजेच जर सदस्यांची संख्या २‍^न+म असेल तर १+२म क्रमांकाचा सदस्य अध्यक्ष बनेल. ५४५ ला सगळ्यात जवळचा २ चा घात ५१२ आहे. म्हणजे ५४५=२‍^९ + ३३ म्हणजेच म = ३३. म्हणून अध्यक्षाचा क्रमांक असेल २ गुणिले ३३ अधिक १ = ६७. धन्यवाद गॅरी ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नया है वह

दंडवत स्विकारा...!!

योगी९००
Tue, 09/22/2015 - 21:18 नवीन
दंडवत स्विकारा...!! मी सुद्दा असा पॅटर्न तयार केला (एक्सेल वापरून). बराच प्रयत्न केला पण फॉर्मुला काही गवसला नाही. (आपण दोघे एकाच कॉलेजमधून इंजिनीअरींग केले त्यामुळे आपण कदाचित सारखाच विचार केला पण तुम्ही आय आय एम असल्याने बाजी मारलीत आणि फॉर्मुला शोधलात...).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

.

_मनश्री_
Mon, 09/21/2015 - 17:22 नवीन
सदस्य क्रमांक ३१९
  • Log in or register to post comments

२७३

पदम
Mon, 09/21/2015 - 17:58 नवीन
२७३
  • Log in or register to post comments

२७३

पदम
Mon, 09/21/2015 - 17:58 नवीन
२७३
  • Log in or register to post comments

२७३

पदम
Mon, 09/21/2015 - 17:58 नवीन
२७३
  • Log in or register to post comments

२७३

पदम
Mon, 09/21/2015 - 17:58 नवीन
२७३
  • Log in or register to post comments

३२३

योगी९००
Mon, 09/21/2015 - 18:24 नवीन
३२३
  • Log in or register to post comments

६७

योगी९००
Mon, 09/21/2015 - 18:34 नवीन
एकदा ६७ आले आणि एकदा ३२३ आले. यातलेच एक उत्तर असावे.
  • Log in or register to post comments

काल एकानी आठवीच्या गणिताचा

दिवाकर कुलकर्णी
Mon, 09/21/2015 - 20:57 नवीन
काल एकानी आठवीच्या गणिताचा उल्लेख केला,हे घ्या खरोखरीच आठवीतील एक गणित अर्थात ऑंलिंपियाड मधील, वाटते तेव्हडे सोपे नक्कीच नाही. जास्तीत जास्त फक्त दोन वेला तराजूचा वापर तुम्हाला ६ एकसारखे चेंडू दिलेत प्रत्येकि २ लाल २ पांढरे २ निले. प्रत्येकि एकाचे वजन १५ ग्रॉम दुसर्याचे १६ग्रॉम, वजने कुठेहि छापलेली नाहीत, दोन पारड्याचा तराजू तुम्हाला दिला मात्र कोणतेहि वजन दिलेले नाही, तर जास्तीत जास्त फक्त दोन वेला तराजूचा वापर करून १६ ग्रॉमचे चेंडू वेगले काढायचे आहेत,--------- बघा जमयतं काय।?
  • Log in or register to post comments

सहा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर

दिपोटी
Tue, 09/22/2015 - 10:50 नवीन
प्रत्येक रंगाच्या दोन चेंडूंपैकी कोणत्याही एकाला १ व दुसर्‍याला २ असे क्रमांक द्या (वा त्यावर तसे लिहा). डाव्या पारड्यात निळा#१ व लाल#१, उजव्या पारड्यात निळा#२ व पांढरा#१ घ्या. डाव्या पारड्याच्या तीन शक्यता: वर, खाली किंवा समान --------------------- शक्यता एक: डावे पारडे वर. असे होण्यासाठी तीनच शक्यता आहेत : क्र. ---- निळा#१/लाल#१ (डावे पारडे) ---- निळा#२/पांढरा#१ (उजवे पारडे) १अ --------- १५/१५ ---------------------------- १६/१६ १ब ---------- १५/१५ --------------------------- १६/१५ १क --------- १५/१६ ---------------------------- १६/१६ (डावे पारडे वर गेल्यास निळा#१चे वजन १६ ग्रॅम्स व निळा#२चे वजन १५ ग्रॅम्स असणे शक्य नाही. प्रयत्न करुन पहा.) याचा अर्थ निळा#१ = १५ व निळा#२ = १६ एवढे कळले. आता मग दुसर्‍यांदा वजन तोलताना डाव्या पारड्यात लाल#१ व पांढरा#१ आणि उजव्या पारड्यात लाल#२ व पांढरा#२ घ्या. आता परत डाव्या पारड्यासाठी तीन शक्यता: वर, खाली किंवा समान. डावे पारडे वर गेल्यास लाल#१ = पांढरा#१ = १५ (म्हणजे १ब हे उत्तर), खाली गेल्यास लाल#१ = पांढरा#१ = १६ (म्हणजे १क हे उत्तर) आणि समान राहिल्यास लाल#१ = १५ व पांढरा#१ = १६ (म्हणजे १अ हे उत्तर) असा निष्कर्ष काढता येईल. (समान राहिल्यास लाल#१ = १६ व पांढरा#१ = १५ अशी दुसरी शक्यता नाही, कारण वर दिलेल्या तक्त्यात असे काँबिनेशन नाही आहे.) यावरुन १६ ग्रॅम्स वजनाचे तीन चेंडू शोधणे सहज शक्य आहे. --------------------- शक्यता दोनः डावे पारडे खाली. असे झाल्यास वरीलप्रमाणेच (पण नेमके उलटे लॉजिक वापरुन) उत्तर शोधून काढता येईल. --------------------- शक्यता तीनः दोन्ही पारडी समान. असे होण्यासाठी दोनच शक्यता आहेत : क्र. ---- निळा#१/लाल#१ (डावे पारडे) ---- निळा#२/पांढरा#१ (उजवे पारडे) ३अ --------- १५/१६ ---------------------------- १६/१५ ३ब --------- १६/१५ ---------------------------- १५/१६ आता सरळ लाल#१ डाव्या पारड्यात व लाल#२ उजव्या पारड्यात ठेवा. डावे पारडे वर गेल्यास लाल#१ = १५ (म्हणजे उत्तर ३ब / पांढरा#१ = १६) व डावे पारडे खाली गेल्यास लाल#१ = १६ (म्हणजे उत्तर ३अ / पांढरा#१ = १५) असा निष्कर्ष काढता येईल. (दोन्ही पारडी समान राहणे शक्य नाही कारण दोन्ही चेंडू एकाच रंगाचे आहेत.) यावरुन १६ ग्रॅम्स वजनाचे तीन चेंडू शोधणे सहज शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

काल एकानी आठवीच्या गणिताचा

दिवाकर कुलकर्णी
Mon, 09/21/2015 - 21:01 नवीन
काल एकानी आठवीच्या गणिताचा उल्लेख केला,हे घ्या खरोखरीच आठवीतील एक गणित अर्थात ऑंलिंपियाड मधील, वाटते तेव्हडे सोपे नक्कीच नाही. जास्तीत जास्त फक्त दोन वेला तराजूचा वापर तुम्हाला ६ एकसारखे चेंडू दिलेत प्रत्येकि २ लाल २ पांढरे २ निले. प्रत्येकि एकाचे वजन १५ ग्रॉम दुसर्याचे १६ग्रॉम, वजने कुठेहि छापलेली नाहीत, दोन पारड्याचा तराजू तुम्हाला दिला मात्र कोणतेहि वजन दिलेले नाही, तर जास्तीत जास्त फक्त दोन वेला तराजूचा वापर करून १६ ग्रॉमचे चेंडू वेगले काढायचे आहेत,--------- बघा जमयतं काय।?
  • Log in or register to post comments

जबरा..

योगी९००
Mon, 09/21/2015 - 21:14 नवीन
हे एक जबरा कोडं आहे. मला उत्तर येतेय पण टायपायचा कंटाळा... कोणीच नाही उत्तर दिलं तर मी देईन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

उत्तर ...

दिपोटी
Wed, 09/23/2015 - 11:30 नवीन
मी वर उत्तर दिले आहे, ते पहा ... - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हे नवं कोडं

_मनश्री_
Mon, 09/21/2015 - 21:46 नवीन
हे नवं कोडं माझ्या धाकट्या भावाने सांगितलय ५ माणस एस टी तिकिटासाठी रांगेत उभी आहेत प्रत्येकाच नाव , वय , आवडती मालिका , राहण्याच ठिकाण , केशभूषा , पोहचण्याच ठिकाण अशी ६ वैशिष्ट्ये आहेत १] नावं : बंटी , कौस्तुभ , राहुल , ईशान , अमित २]मालिका : ससुराल , पवित्र रिश्ता , उतरन , कबूल है , CID ३] पोहचण्याच ठिकाण: पुणे , औरंगाबाद , इचलकरंजी , सातारा , नाशिक ४]वय : १४, २१, ४६, ५२, ८१ ५]केशभूषा : लाल , लांब , सरळ , कुरळे , टक्कल ६]राहण्याच ठिकाण: तालुका ,महानगर , गाव , शेत , आश्रम ----------------------------------------------------- १) मध्यभागी असलेला माणूस कबूल है मालिका पाहतो २)बंटी रांगेत पहिला आहे ३) ससुराल मालिका पाहणारा माणूस हा आश्रमात राहणाऱ्या माणसाच्या पुढे आहे ४) साताऱ्याला जाणारा माणूस राहुलच्या मागे आहे ५) गावात राहणारा माणूस ५२ वर्षांचा आहे ६) औरंगाबादला जाणाऱ्या माणसाचे केस सरळ आहेत ७)साताऱ्याला जाणारा माणूस कबूल है पाहतो ८) १४ वर्षाचा माणूस रांगेत शेवटी आहे ९) अमित 'उतरन ' पाहतो १०) नाशिकला जाणाऱ्या माणसाचे केस लांब आहेत ११) कौस्तुभ खेडेगावात राहतो १२) ४६ वर्षाचा माणूस टकला आहे . १३) रांगेतला चौथा माणूस इचल करंजीला जात आहे . १४)' कबूल है ' व 'CID ' पाहणारे एकमेकांजवळ उभे आहेत . १५) 'पवित्र रिश्ता ' पाहणारा लाल केशभूषा असणाऱ्याच्या नंतर उभा आहे . १६) राहुलच्या पुढे असणाऱ्याचे केस लाल आहेत . १७) २१ वर्षाचा माणूस आश्रमात राहतो १८) पवित्र रिश्ता ' पाहणाऱ्याचे केस लांब आहेत . १९) ८१ वर्षाचा माणूस शेतात राहतो . २०) पुण्याला जाणारा माणूस तालुक्याच्या ठिकाणी राहतो . २१) इशान सरळ केस असणाऱ्याच्या पुढे नाहीये . आता सांगा महानगरात कोण राहतो ?
  • Log in or register to post comments

अजून एक कोडे-----एकूण वर्गणी किती जमा?

दिवाकर कुलकर्णी
Mon, 09/21/2015 - 22:31 नवीन
एका सोसायटीत गणेश उत्सवासाठी प्रत्येक पुरुषामागे १०० रु,प्रतयेक स्त्री मागे ५० रु व प्रत्येक मुलामागे २५ रु वर्गणी ठरवली, ५००एकूण व्यक्तिंच्या त्या सोसायटित फक्त एकचतुर्थांश पुरुषानी ,एक द्वितियांश स्त्रीयानी,पण मुलात मात्र सर्व मुलानी वर्गणी दिली, तर एकीण किती वर्गणी जमा?
  • Log in or register to post comments

टंकणे

दिवाकर कुलकर्णी
Mon, 09/21/2015 - 23:11 नवीन
टंकायचा टंकाला टाला
  • Log in or register to post comments

विषय:

दिवाकर कुलकर्णी
Tue, 09/22/2015 - 12:33 नवीन
विषय: काय सुंदर सोडवलय ! एव्हडं कसं लिहू शकता? मला ४ ओली लिहीताना घाम फुटतो,
  • Log in or register to post comments

नवीन कोडे!

दिपोटी
Tue, 09/22/2015 - 13:31 नवीन
हे घ्या एक नवीन कोडे ... तुम्हाला ६४ चेंडू दिले आहेत. आकारमानाने ते अगदी सारखे आहेत, मात्र वजनात प्रत्येक चेंडू निराळा आहे. तुम्हाला फक्त एक साधा दोन पारड्यांचा पण अचूक तराजू (त्याच्या बरोबर येणार्‍या प्रमाण वजनांशिवाय) दिला आहे. तराजूच्या प्रत्येक पारड्यात भरपूर (हवे तेवढे) चेंडू राहू शकतात. तर जास्तीत जास्त ६८ वेळा तराजू वापरुन (म्हणजे, एकदा तोलणे = एकदा वापर) या चेंडूंतील सर्वात वजनदार व त्यानंतरचा सर्वात वजनदार (heaviest & second-heaviest) चेंडू शोधून काढा पाहू.
  • Log in or register to post comments

सुंदर कोडे.

कानडाऊ योगेशु
Wed, 09/23/2015 - 18:04 नवीन
सुंदर कोडे. आता मला क्विक सोर्ट वगैरे अल्गोरिदम समजुन घ्यायला ह्या कोड्याची आता मदत होईल. उत्तर : ४६ चेंडु दोन दोन च्या जोड्यांमध्ये मांडा.एकुण ३२ जोड्या तयार होतील. प्रत्येक जोडीतील दोन चेंडुचे वजन करा व हलके चेंडु बाजुला काढा. आता एकुण ३२ वेळा तराजु वापरला व एकुण ३२ चेंडु शिल्ल्क राहीले. आता ह्या ३२ चेंडुसांठी पुन्हा हीच प्रक्रिया वापरा. एकुण प्रकार असा असेल. चेंडु जोड्या तराजुचा वापर ६४ ३२ ३२ ३२ १६ १६ १६ ८ ८ ८ ४ ४ ४ २ २ १ १ १ ---------------- तराजुचा वापर = ६३ वेळा. शेवटच्या वेळी जेव्हा तराजु वापरला जाईल तेव्हा सर्वात जड व दुसरा सर्वात जड चेंडु मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

उत्तर बरोबर नाही!

दिपोटी
Wed, 09/23/2015 - 18:37 नवीन
कानडाऊ योगेशु, उत्तराच्या प्रयत्नाबद्दल धन्यवाद! या पध्दतीने 'जड चेंडू' निश्चित मिळेट, मात्र 'दुसरा सर्वात जड चेंडू' मिळेलच याची खात्री नाही ... खरं तर शेवटच्या राऊंडमध्ये 'दुसरा सर्वात जड चेंडू' न येण्याचीच शक्यता जास्त आहे ... विचार करा ... जर, उदाहरणार्थ, पहिल्या वा दुसर्‍या वा चौथ्या (खरं म्हणजे, वर दिलेल्या सहा राऊंडस् पैकी पहिल्या पाचातील कोणत्याही एका) राऊंडमध्ये 'दुसर्‍या सर्वात जड चेंडू'ची लढत सर्वात जड चेंडूशी झाल्यास 'दुसरा सर्वात चेंडू' बाहेर फेकला जाईल व तो पुढल्या व, पर्यायाने, शेवटच्या (म्हणजेच सहाव्या) राऊंडमध्ये येणारच नाही. मात्र तुमची विचार करण्याची दिशा/पध्दत चांगली आहे. अजून प्रयत्न करा ... उत्तर मिळण्याची शक्यता वाढेल. हिंट : अजून थोडा 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करावा लागेल. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सेकंड हेविएस्ट चेंडुला

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 09/24/2015 - 20:58 नवीन
सेकंड हेविएस्ट चेंडुला हरवण्याची क्षमता फक्त हेविएस्ट चेंडु मधेय्च आहे. त्यामुळे जर सेकंड हेविएस्ट बाहेर पडला असेल तर तो हेविएस्ट सोबत लढुन्च बाहेर पडला असेल. इथे एकुण ६ राऊंड मध्ये लढती झाल्या. ह्याचा अर्थ प्रत्येक लढतीत हेविएस्ट सोबत लढुन एक चेंडु बाहेर गेला आपल्याकडे असे ६ चेंडु आहेत. त्यांच्यामध्ये पुन्हा अशी लढत घेतली तर एकुण ५ लढती होतील व आपल्याला त्यांच्यातुन विजेता मिळेल जो सेकंड हेविएस्ट असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

हां, अब ठीक हैं ... अब ठीकहैं ।

दिपोटी
Fri, 09/25/2015 - 05:25 नवीन
कानडाऊ योगेशु, आता मात्र (तुमचे दोन प्रतिसाद मिळून झालेलं) तुमचं उत्तर एकदम अचूक आहे ... एकूण लढती = ६३ + ५ = ६८. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

अजून उत्तर नाही?!

दिपोटी
गुरुवार, 09/24/2015 - 18:48 नवीन
मी वर दिलेल्या, ६४ चेंडूंच्या कोड्यांचे उत्तर अजून येथे मिळालेले नाही. मिळण्याची काही शक्यता? - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

1 ते 64 या क्रमानं 1-2,2-3

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 20:13 नवीन
1 ते 64 या क्रमानं 1-2,2-3 अशी वजनं करत गेलं तर? उदाहरणार्थ. पहिल्या दुसऱ्या मध्ये दुसरा जड़. पहिला बाहेर. दुसऱ्या तिसऱ्या मध्ये सुद्धा दुसरा जड़.... पण यात सगळ्यात जड़ चेंडू सापडेल. शेवटून दुसऱ्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे.

दिपोटी
Fri, 09/25/2015 - 05:28 नवीन
वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हे कोडो जरा अवघड आहे

दिवाकर कुलकर्णी
Tue, 09/22/2015 - 20:02 नवीन
अशा वेली खूप कॉंबिनेशन करावी लागतात, अशा वेली हिंट दिला जातो
  • Log in or register to post comments

अवघड आहे खरे ...

दिपोटी
Wed, 09/23/2015 - 04:35 नवीन
दिवाकर कुलकर्णी, कोडे थोडे अवघड आहे खरे पण प्रचंड अवघड वा अशक्य निश्चित नाही आहे. काँबिनेशन्स देखील (थोडा विचार केल्यास) समजण्याच्या आवाक्यात रहातील अशी आहेत. तेव्हा प्रयत्न करुन पहा तर खरं ... हिंट्ची गरज नाहीये ... - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

हार्मोनियम च्या कोड्याचे

असंका
Wed, 09/23/2015 - 08:12 नवीन
हार्मोनियम च्या कोड्याचे शेवटी काय झाले? चुक बरोबर उत्तर कुठले? घर नंबर १३ हे कसे ठरवले?
  • Log in or register to post comments

'हार्मोनियम'चे कोडे

दिपोटी
Wed, 09/23/2015 - 09:08 नवीन
गुणाकार ३६ होतो, म्हणजे तीन मुलांच्या वयांच्या आठ शक्यता आहेत, त्या अशा (पुढे कंसात प्रत्येक शक्यतेची बेरीज दिली आहे) ... ३६, १, १ (३८) १८, २, १ (२१) १२, ३, १ (१६) ९, ४, १ (१४) ६, ६, १ (१३) ९, २, २ (१३) ६, ३, २ (११) ४, ३, ३ (१०) तर आता शेजारच्या घराचा नंबर बघून त्याला वयांची बेरीज कळते व तरी देखील उत्तर देता येत नाही, म्हणजे ती बेरीज एकाहून अधिक शक्यतांसाठी लागू होते. म्हणजेच बेरीज १३ असून वयांच्या आता दोन शक्यता आहेत ... ६, ६, १ व ९, २, २. 'हार्मोनियम चांगली वाजवते' हा क्ल्यू महत्वाचा नसून त्यातील फक्त 'मोठी मुलगी आहे' हे महत्वाचे, जेणेकरुन ६ वर्षे वयांची दोन जुळी मुले नाही हे निश्चित झाले, तेव्हा ९, २, २ ही मुलांची वये व शेजारच्या घराचा नंबर १३ हे उत्तर येते. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

आत्ता कळलं....छानच सांगितलंत.

असंका
Wed, 09/23/2015 - 09:28 नवीन
आत्ता कळलं....छानच सांगितलंत. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

अजुन एक

राजाभाउ
Wed, 09/23/2015 - 10:53 नवीन
अजुन एक ७ प्लास्टिक कॉईन डिस्पेन्सेर आहेत. प्रतेक डिस्पेन्सेर मधून वेगवेगळ्या रंगाची कॉईन्स येतात. प्रतेक कॉईनचे वजन ५ ग्रॅम असले पाहीजे पण एका डिस्पेन्सेर मधील काही तांत्रिक बिघाडामुळे त्यातुन ४ ग्रॅमची कॉईन्स येत आहेत. सर्व कॉईन्सचा आकार सारखा आहे त्यामुळे केवळ बघून कमी वजनाचे कॉईन ओळखता येत नाही. तुम्ही प्रत्येक डिस्पेन्सेर मधून कितीही कॉईन घेऊ शकता. तुमच्या कडे एक अचूक वजनकाटा आहे, पण तो तुम्ही फक्त एकदाच वापरू शकता. कुठल्या डिस्पेन्सेरमधून कमी वजनाची कॉईन्स येतात हे कसे ओळखाल ?
  • Log in or register to post comments

उत्तर ...

दिपोटी
Wed, 09/23/2015 - 11:26 नवीन
पहिल्या डिस्पेन्सरमधून १ नाणे घ्या, दुसर्‍या डिस्पेन्सरमधून २ नाणी घ्या, तिसर्‍या डिस्पेन्सरमधून ३ नाणी घ्या ... असे करत ७व्या डिस्पेन्सरमधून ७ नाणी घ्या. एकूण आता तुमच्याकडे २८ नाणी आली. तांत्रिक बिघाड नसता तर (प्रत्येक नाण्याचे वजन ५ ग्रॅम प्रमाणे) एकूण वजन २८ गुणिले ५ = १४० ग्रॅम्स भरायला हवे. पण कोणत्यातरी एका डिस्पेन्सरमध्ये बिघाड असल्यामुळे एकूण वजन १४० ग्रॅम्सपेक्षा कमी भरेल. १४० ग्रॅम्सपेक्षा जेवढे ग्रॅम्स कमी एकूण वजन भरेल, त्या क्रमांकाच्या डिस्पेन्सरमध्ये बिघाड झाला आहे. (उदाहरणार्थ, १३६ ग्रॅम्स एकूण वजन भरल्यास, १४० ग्रॅम्स पेक्षा ४ ग्रॅम्स वजन कमी भरले, तेव्हा ४ क्रमांकाच्या डिस्पेन्सरमध्ये बिघाड आहे, कारण आपण या डिस्पेन्सरमधून ४ नाणी घेतली होती व बिघाड झालेल्या डिस्पेन्सरमधील नाण्यांचे वजन प्रत्येकी १ ग्रॅम कमी आहे.) - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

सर्व डिस्पेसरमधून १ ते ७ या

दिवाकर कुलकर्णी
Wed, 09/23/2015 - 11:43 नवीन
सर्व डिस्पेसरमधून १ ते ७ या संख्येची एकूण २८ कॉइन्स घ्यावीत जसे १+२+३+४+५+६+७ तत्वत: त्याचे वजन १४० ग्रॉम हवे पण ते १३९,१३८ १३७ १३६ १३५ १३४ १३३ असल्यास १ते७ क्रमांकाचा डिस्पेंसर ४ग्रॉम ची कॉइन्स बनवितो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा