✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोडी सोडवा

_
_मनश्री_ यांनी
Sun, 09/20/2015 - 18:28  ·  लेख
लेख
दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी १ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ? तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत कमी किंवा जास्त नाही तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?... (प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
54389 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

कोडी सोडवा

जयन्त बा शिम्पि
Sun, 09/20/2015 - 18:43 नवीन
फारसे कठीण नाही. ५० ची एक नोट,२० ची एक नोट,१० च्या दोन नोटा,२ च्या चार नोटा,आणि १ च्या दोन नोटा असे एकुण १०० रुपये , देता येतील.
  • Log in or register to post comments

४९ मोती. सातने भाग जाणारी अशी

एस
Sun, 09/20/2015 - 18:54 नवीन
४९ मोती. सातने भाग जाणारी अशी सर्वात लहान संख्या जिला २, ३, ४, ५ वा ६ ने पूर्ण भाग जात नाही.
  • Log in or register to post comments

हो पण ५ * ९ = ४५ मग १च मोती

मांत्रिक
Sun, 09/20/2015 - 19:09 नवीन
हो पण ५ * ९ = ४५ मग १च मोती राहण्याची अट पाळली जात नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मला वाटतं ५ जणांत वाटल्यावर १

मांत्रिक
Sun, 09/20/2015 - 19:11 नवीन
मला वाटतं ५ जणांत वाटल्यावर १ मोती कमी पडतो असं म्हणायचं असेल मूळ कोड्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

नाही ५ जणात समान वाटप

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 19:34 नवीन
नाही ५ जणात समान वाटप केल्यानंतर सुद्धा १ मोती शिल्लक राहतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

दहाच्या नोटा नाही चालत हो

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 18:54 नवीन
चलचलतनातून काढून टाकल्यात.तुमच्यातुमाला परत.
  • Log in or register to post comments

सोप्प आहे!

चांदणे संदीप
Sun, 09/20/2015 - 18:58 नवीन
मोती = ४९ १०० रू ची फोड = १) ५० २) २० ३)१० ४) ५ ५)५ ६)५ ७)२ ८)१ ९)१ १०)१ अजून येऊद्यात!
  • Log in or register to post comments

माझं चुकलं

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 19:01 नवीन
नोटा चालतात.मला वाटलं दहाची एकहि नोट चालत नाही.माफी।
  • Log in or register to post comments

हे घ्या अजुन एक

योगी९००
Sun, 09/20/2015 - 19:12 नवीन
एका माणसाला, त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे पैसे खर्च करण्याची सवय असते. (उदा. 18 तारखेला 18 रुपये.) एकदा त्याचे सलग 5 दिवसाचे 63 रुपये खर्च झाले, तर ते 5 दिवस कुठले होते ?(तारखा सांगा)
  • Log in or register to post comments

कायप्पाकडून साभार

चिगो
Mon, 09/21/2015 - 17:33 नवीन
२८, २९, १, २, ३.. कायप्पाकडून साभार.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मोत्याच्या कोड्यात गल्लत

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 19:17 नवीन
मोत्याचे वाटप प्रत्यक्शत शेवटी होते असे हवे
  • Log in or register to post comments

४९ मोती हे चुकीचे उत्तर

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 19:25 नवीन
४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे कारण ५ जणात मोत्याच वाटप सामान केल्यावर ४ मोती शिल्लक राहतात शोध अचूक उत्तर
  • Log in or register to post comments

४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 19:28 नवीन
४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे कारण ५ जणात मोत्याच वाटप सामान केल्यावर ४ मोती शिल्लक राहतात शोध अचूक उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

सोप्प!

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 19:30 नवीन
२८,२९फेब.1,2,3 मार्च (लीप वर्ष)
  • Log in or register to post comments

बरोबर..

योगी९००
Sun, 09/20/2015 - 21:04 नवीन
बरोबर..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

७२१ मोती. सोडऊन बघा आणि सांगा

संजय पाटिल
Sun, 09/20/2015 - 19:34 नवीन
७२१ मोती. सोडऊन बघा आणि सांगा....
  • Log in or register to post comments

बरोबर आहे. ३०१ पण चालतं जर

संजय पाटिल
Sun, 09/20/2015 - 19:41 नवीन
बरोबर आहे. ३०१ पण चालतं जर लहानात लहान संख्या हवी असेल तर ३०१ घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

बरोबर आहे तुमचं उत्तर

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 19:43 नवीन
बरोबर आहे तुमचं उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

कसे काय बरे? जर ४९ मोती

प्रमोद देर्देकर
Wed, 09/23/2015 - 09:45 नवीन
कसे काय बरे? जर ४९ मोती सांगितले तर तुम्ही सांगता की त्याला ३,४,५,३,भाग देवुन काही ना काही मोती शिल्लक उरतात मग ७२१ काय किंवा ३०१ काय त्यावेळी पण ३,४,५,६, ने भाग जावुन काही ना काही शिल्लक उरतेच की पण तिथेही १ च मोती राहण्याची अट पाळली जात नाही? गणत्याच्या अडत्या पम्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

मोत्याचे कोडे

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 19:43 नवीन
५ व्यक्ति असताना १ मोती कमी पडतो म्हटल्यास ४९ उत्तर चालेल
  • Log in or register to post comments

४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 19:44 नवीन
४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे कारण ५ जणात मोत्याच वाटप सामान केल्यावर ४ मोती शिल्लक राहतात
  • Log in or register to post comments

माझे कोडे

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 19:57 नवीन
एक खेलणी विक्रेता एका घरी जातो,'जर माझ्या तीन मुलांची वये सांगीतलीस तर मी खेलणी घेइन' मालकीण म्हणते. 'सांगा बाईसाहेब आपलं कोडं'विक्रेता 'माझ्या तीनहि मुलांच्या वयाचा गुणाकार ३६ होतो व त्यांच्या वयाची बेरीज शेजारच्या घराच्या नंबर एव्हडी होते.'विक्रेता शेजारच्या घराचा नबर बघून येतो, डोकं खाजवतो पण उ त्तर कांही येत नाही, 'अजून कांहितरी माहिति हवी बाईसाहेब' 'ठीक आहे,माझी मोठी मुलगी हार्मोनियम चांगली वाजवते' विक्रेता एकदम एक्साइट होतो,म्हणतो,'सांगतो बाईसाहेब मी!' बघा तुम्हाला येतं कां? मुलांची वयं व शेजारच्या घराचा नंबर? ब प्रतिसाद द्या
  • Log in or register to post comments

हे कोडं आहे की चेष्टा?

जव्हेरगंज
Sun, 09/20/2015 - 20:04 नवीन
हे कोडं आहे की चेष्टा? खरतर आवडलं, याचं उत्तर पण एक्सायटिंग असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

२ २ ९. घर नं १३

अनुप ढेरे
Sun, 09/20/2015 - 20:54 नवीन
२ २ ९. घर नं १३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

९२२ आणि ३१ पण चालेल काय?

प्यारे१
Sun, 09/20/2015 - 21:02 नवीन
९२२ आणि ३१ पण चालेल काय? आमच्याकडं १३ चालत नाय ओ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अहो पण "माझी मोठी मुलगी

जव्हेरगंज
Sun, 09/20/2015 - 21:29 नवीन
अहो पण "माझी मोठी मुलगी हार्मोनियम चांगली वाजवत" याचा काय संबंध आहे कोड्याशी?? ऊगाच किचकट वाटलं.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

९ वर्षांची मुलगी हार्मोनियम

प्यारे१
Sun, 09/20/2015 - 22:15 नवीन
९ वर्षांची मुलगी हार्मोनियम चांगली वाजवू शकते. ६ वर्षांची 'बहुतेक' नाही. (खाली कुणीसं म्हटलंय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

एकच मोठी मुलगी आहे(जुळ्या

वगिश
Sun, 09/20/2015 - 23:28 नवीन
एकच मोठी मुलगी आहे(जुळ्या नाहीत) हे दाखवून दिले. अगदी मोठी मुलगी सारखी झोपते हे ही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

घ्या आणखी १ कोड

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 19:59 नवीन
एका तीन अंकी संख्येतील मधला अंक ० आहे आणि बाकीच्या दोन अंकांची बेरीज ९ आहे जर १ल्या व ३ऱ्या अंकांची अदलाबदल केली तर तयार होणारी नवीन संख्या हि मूळ संख्येपेक्षा २९७ ने मोठी आहे तर मूळ संख्या शोधा
  • Log in or register to post comments

मुळ संख्या 104

लालगरूड
गुरुवार, 09/24/2015 - 21:14 नवीन
मुळ संख्या 104
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

३०६

नितिन५८८
Mon, 09/28/2015 - 11:02 नवीन
३०६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

पुन्हा सोप्प!

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 20:06 नवीन
४०१
  • Log in or register to post comments

नाही कारण बाकीच्या दोन

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 20:10 नवीन
नाही कारण बाकीच्या दोन अंकांची बेरीज ९ हवी पण ४+१ = ५ होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

चूक

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 20:10 नवीन
खरे३०६हे उत्तर
  • Log in or register to post comments

बरोबर

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 20:12 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

301 हे उत्तर आहे.

लालगरूड
गुरुवार, 09/24/2015 - 21:13 नवीन
301 हे उत्तर आहे. 301/2 बाकी 1 301/3 बाकी 1 301/4 बाकी 1 301/5 बाकी 1 301/6 बाकी 1 301/7 बाकी 0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

माझं कोडं

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 20:27 नवीन
जरा दडपण येइल मी सांगितल्यावर कि हे कोडे जयंत नारलिकर यांच्या एका पुस्तकातले आहे
  • Log in or register to post comments

..

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 20:30 नवीन
एका माणसाच वय त्याच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुप्पट आहे पाच वर्षांपुर्वी त्या माणसाच वय त्याच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या तिप्पट होत तर त्या माणसाच आताच वय किती ?
  • Log in or register to post comments

आत्ताचे वय माणुस 50

लालगरूड
गुरुवार, 09/24/2015 - 21:23 नवीन
आत्ताचे वय माणुस 50 मुले 16 व 9 *mech rockzz*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

मोत्याच्या कोड्यातच...

चांदणे संदीप
Sun, 09/20/2015 - 20:41 नवीन
मोत्याच्या कोड्यातच लायकी कळाली स्वत:ची... त्यामुळे आपला पास! मम्मी... ऊं..हुं..हुं..हॅ..हॅ..हॅ मला वाटत चांगला धागा आहे हा. एका कोड्याच बरोबर उत्तर येत नाही तोपर्यंत दुसर कोड कुणी टाकू नये, म्हणजे धागा प्रवाही होईल. जुनी फारच चांगली कोडी यानिमीत्ताने समोर येतील. (परत बाह्या सरसावलेला) Sandy
  • Log in or register to post comments

७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु

संजय पाटिल
Sun, 09/20/2015 - 22:06 नवीन
७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु झाला..आता झोपतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

...

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 21:15 नवीन
८ पुरुष व ६ मुले ह्यांची रोजची एकूण कमाई ३३० रुपये आहे जर ४ पुरुषांची कमाई हि ५ मुलांच्या कमाई पेक्षा ४५ रुपयांनी जास्त आहे तर एका पुरुषाची व एका मुलाची कमाई किती ? म्हणजे प्रत्येकी एकाची कमाई किती ?
  • Log in or register to post comments

गणित करायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!!

मार्गी
Sun, 09/20/2015 - 21:38 नवीन
माणसाचं वय z समजू. मुलांचं वय x आणि y समजू. z = 2 (x+y) = 2x + 2y ………. (1) आणि z-5 = 3(x-5 +y-5) = 3x – 15 + 3y – 15 = 3x + 3y- 30 म्हणून, z = 3x + 3y -25 ……….(2) (1) व (2) वरून, 2x + 2y = 3x + 3y -25 म्हणजेच, x+ y = 25 म्हणून (1) नुसार माणसाचं वय = z= 2 (x+y) = 2(25) = 50 मुलांचं आजचं वय 10 आणि 15. माणसाचं आजचं वय 50 = (10+15) च्या दुप्पट. पाच वर्षांपूर्वी मुलांचं वय 5 आणि 10. पाच वर्षांपूर्वी माणसाचं वय 45 = (5+10) च्या तिप्पट.
  • Log in or register to post comments

हे घया उत्तर

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 21:39 नवीन
पुरुष३० मुले१५रु
  • Log in or register to post comments

बरोबर

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 21:47 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

माझं कोडं

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 21:47 नवीन
मुलांचीनकोत ६,६,१ का नसावित? यांच्या बेरजेनुसार घराचा नंबर १३ च येतो किं?
  • Log in or register to post comments

आपल्याला हे नापास !

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 21:55 नवीन
कोड्यात चूकभूल होऊ शकते त्यावरून लगेच लायखीवर उतरू नये.
  • Log in or register to post comments

३० व १५

स्वप्नज
Sun, 09/20/2015 - 21:57 नवीन
८क्ष +६य = ३३० समीकरण १ ४क्ष = ५ य + ४५ म्हणजेच ८क्ष = १०य + ९० समीकरण २ समीकरण १ - समीकरण २ ६य= २४०-१०य १६य =२४० म्हणून य=१५ आणी क्ष=३० पुरुष ३० मुले १५
  • Log in or register to post comments

टायपिंग चुकले

दिवाकर कुलकर्णी
Sun, 09/20/2015 - 22:01 नवीन
मुलांची वये ६ ,६ , १ कां नसावित? असे वाचावे !
  • Log in or register to post comments

...

_मनश्री_
Sun, 09/20/2015 - 22:05 नवीन
२ संख्यांच्या वर्गांची बेरीज ३६९ आहे व त्या संख्यांची वजाबाकी ३ आहे तर त्या संख्या कोणत्या ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा